लालबागचा राजा गणपती महत्व कथा अणि इतिहास – Lalbaug cha Raja Ganpati information

लालबागचा राजा गणपती महत्व कथा अणि इतिहास

ही कहाणी आहे इसवी सन 1932 मधील मुंबई येथील लाल बाग परळमधील तेव्हा मुंबई हे शहर आपणा सर्वाना बाँम्बे म्हणुन प्रचलित होते.

बाँम्बे ह्या शहराला इंग्रजाच्या दृष्टीकोनातुन तेव्हा खुप अधिक महत्व दिले जात होते.देशातील इतर सर्व राज्यांच्या मध्ये जो व्यापार होत होता.त्यांच्यापेक्षा अधिकतम उद्योग व्यापार हा त्याकाळी बाँम्बे येथे होत असे.

ह्यामुळे त्याकाळी बाँम्बे हे शहर देशाच्या राजधानी असलेल्या दिल्ली शहरापेक्षा अधिक वरचढ तेव्हा मानली जात होते.

बाँम्बे शहरात समुद्र किनारे देखील जवळच होते म्हणुन बाँम्बे ह्या शहरातुन एकेकाळी ब्रिटीशांना व्यापार उद्योग करण्यासाठी खुप नफा प्राप्त होत असे.

ब्रिटीश काळामध्ये बाँम्बे मध्ये तेव्हा अनेक नवनवीन उद्योग व्यवसाय उदयास आले होते.मोठे मोठया कारखान्यांची देखील इथे तेव्हा बांधणी करण्यात आली.

जागोजागी नवनवीन उद्योग व्यवसाय कारखाने सुरू झाल्याने बाँम्बे ह्या शहराचे पुर्ण स्वरूपच तेव्हा बदलून गेले होते.

यातच बाँम्बे मध्ये तेव्हा अजुन एक नवीन उद्योग क्षेत्राचा उदय झाला म्हणजे टेक्सटाईल मिलचे कापड गिरणीचे देखील काम येथे इतर व्यवसायांसोबत सुरू करण्यात आले.

त्याकाळी लाल बाग परळ भागात अनेक कापड गिरण्या बांधण्यात आल्या होत्या.काम जोरात चालु झाल्याने ह्या गिरणीत कामासाठी अधिक मजुरांची आवश्यकता भासु लागले ज्यामुळे इथे कामगारांसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होऊ लागल्या.

ह्या कापड गिरणीत जे मजदुर काम करीत असे ते इथेच लाल बाग परळ मध्ये राहु लागले.म्हणजे कायमचे स्थायिक झाले.ज्यामुळे लाल बाग परळ भागात लोकांच्या वस्त्यांचे चाळींचे प्रमाण वाढत गेले.

बाँम्बे मध्ये झपाटयाने होत असलेल्या ह्या विकासामुळे इथे लोकांना राहण्यासाठी हळुहळु जागेची कमतरता भासु लागली.

म्हणुन त्या काळातील इंग्रज सरकारने लाल बाग परळ येथे असणारी पेरू चाळ व तेथील मार्केट हटवून त्याजागी नवीन कारखाना उभारायचे ठरवले.

See also  महिला समानता दिवस का साजरा केला जातो ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? -Women's equality day in Marathi

लाल बाग परळ येथील मार्केटमध्ये माशांची विक्री करणारया लोकांसमोर ह्यामुळे मासे विक्रीसाठी आता कुठे बसायचे असा जागेचा मोठा प्रश्न निर्माण झाला.

तेव्हा लोकमान्य टिळकांनी प्रारंभ केलेला सार्वजनिक गणेशोत्सवाचा कार्यक्रम पुण्याबरोबरच मुंबई मध्ये देखील पसरला होता.

ज्याने लोकांच्या मनात श्रदधा तसेच भक्तीची भावना निर्माण होऊ लागली.याचसोबत ह्या सार्वजनिक गणेशोत्सवामुळे येथील सर्व लोकांना एकत्र जमता येत होते.संघटीत होता येत होते.

मुंबई मध्ये देखील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्थापणा होऊ लागली होती अशा परिस्थिति मध्ये जे लाल बाग परळ मधील मासे विक्री करणारे कोळी लोक होते त्यांनी त्यांचा मासेविक्री साठीचा जो जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे तो सुटावा म्हणुन सर्व मिळुन त्यांनी गणपतीस साकडे घेतले.

ज्यात त्यांनी गणपतीला अशी मागणी केली की गणपती बाप्पा आम्हाला आमच्या मासे विक्रीकरीता हक्काची जागा मिळु दे,प्राप्त करून दे.

हा लाल बाग परळ येथील मासे विक्री करणारया लोकांकडुन आपल्या इच्छापुर्तीसाठी गणपतीला केलेला पहिला नवस होता.

यानंतर गणपतीला नवस बोलल्यानंतर ह्या सर्व मासे विक्रेत्यांनी नवीन जागेचा शोध घेण्यास सुरूवात केली.ज्यात त्यांना यश प्राप्त झाले अनेक व्यापारींनी त्यांना ह्यासाठी मदत देखील करण्याचे आश्वासन अणि अवघ्या एक वर्षात त्यांना त्यांच्या प्रयत्नांचे फळ प्राप्त झाले.

लाल बाग परळ मधील मार्केटमध्ये मासे विक्री करत असलेल्या ह्या सर्व मासे विक्रेत्यांना त्यांना विक्रीकरता स्वताच्या हक्काची जागा अखेरीस प्राप्त झाली.

गणपतीला जो नवस ह्या मासे विक्रेत्यांनी केला होता तो पुर्ण झाला.गणपती बाप्पाच्या कृपेने हा चमत्कार घडुन आल्यामुळे येथील लोकांनी ज्या मार्केटमध्ये त्यांना मासे विक्रीसाठी जागा प्राप्त झाली.तिथेच एक गणपती बाप्पाची मुर्ती स्थापित केली.

स्थापणेच्या पहिल्या दिवसापासुन नवसाला पावणारा गणपती म्हणुन हा गणपती अख्ख्या लाल बाग परळ तसेच देशाच्या कानकोपर मध्ये प्रसिदध झाला होता.

म्हणुन दुरवरचे बाहेरगावचे लोक देखील इथे गणपती बाप्पाला नवस बोलण्यासाठी येऊ लागले.तेव्हापासुन हा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणुन जगभर ओळखला जाऊ लागला.

See also  आयसी एस आय उपचारा विषयी माहीती - ICSI treatment information in Marathi

ह्या गणपतीला केलेला आपला प्रत्येक नवस नक्कीच पुर्ण होतो अशी भाविकांची दृढ श्रदधा ह्या गणपतीबाबद निर्माण झाली.

हळुहळु हा गणपती इतका विख्यात झाला की मुंबई येथील गणेशोत्सवाचा हा प्रमुख घटक बनला.हा गणपती लाल बाग परळ येथील मार्केटमध्ये स्थापित केला असल्यामुळे लोक ह्या लाल बागचा गणपती म्हणुन संबोधित करू लागले.

हा गणपती लाल बाग येथील लोकांच्या मनावर राज्य करतो म्हणुन यास लाल बागचा राजा असे देखील म्हटले जाते.

आधीपासुनच ही गणेशाची मुर्ती विविध स्वरूपात साकारली जाऊ लागली.

हा गणपती कधी मासेमारी करणारया कोळी लोकांच्या होडीत बसलेला आहे तसेच श्रीकृष्णाप्रमाणे गणपती बाप्पा रथ चालवत आहे असे दृश्य असणारी अशी देखील गणपतीची मुर्ती येथे साकारण्यात आली होती.

यामुळे लाल बागचा हा गणपतीचे स्वरुप अणि याच्या आजुबाजुला केला जाणारा देखावा रोशनाई लोकांच्या आकर्षणाची मुख्य बाब बनली.

ह्या गणपतीच्या मुर्तीच्या उंचीत देखील आता वाढ करण्यात आलेली पाहावयास मिळते.इथे स्थापण केली जाणारी सध्याची गणपतीची मुर्ती किमान वीस ते पंचवीस फुट इतकी लांब असते.

आज लाखो भाविक गणेशोत्सवात ह्या नवसाला पावणारया लाल बागच्या राजाचे दर्शन घ्यायला लांबुन लांबुन येतात.गणेशोत्सवाच्या काळात रोज किमान एक लाख भाविक हे रांगेत उभे राहुन ह्या लालबागच्या राजाचे दर्शन घेत असतात.

ह्या गणपतीची मुर्ती बनवायची सुरूवात ही गणपती बाप्पाच्या चरणांपासुन केली जाते.ह्या दिवशी पादय पुजन सोहळा देखील आयोजित करण्यात येत असतो.

गणेशोत्सवाच्या ह्या काळात मोठमोठया सेलिब्रीटी अभिनेते,राजकीय कार्यकर्ते नेते मंडळी इथे खास लाल बागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी इथे येत असतात.

ह्या काळात ह्या मंदिरात येणारया सेलिब्रिटीच्या नेत्यांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलिस पथक तसेच सुरक्षा रक्षक येथे नेमण्यात येतात.

दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झालेली आपणास इथे दिसुन येते.नवसाच्या रांगेत तर लाखो भाविक दहा ते बारा तास नंबर लावून उभे राहत असतात.इतकी भयानक गर्दी गणेशोत्सवात येथे असते.

See also  डेबिट कार्ड अणि क्रेडिट कार्ड या दोघांमधील फरक - Difference between credit card and debit card in Marathi

लाल बागच्या राजाची विसर्जणाची मिरवणुक मोठया राजेशाही थाटात काढली जाते.लाल बाग मधुन निघालेली गणपतीची विसर्जन मिरवणुक गिरगाव चौपाटी येथे पोहचायला अक्षरश दुसरया दिवसाची पहाट होऊन जाते.