गणेश चतुर्थी गणपती जन्म कथा – Ganesh chaturthi story in Marathi

गणेश चतुर्थी गणपती जन्म कथा ganesh chaturthi story in Marathi

मित्रांनो गणेश चतुर्थी हा आपल्या सर्वाच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या जन्माचा दिवस आहे.

शिवपुराणात केलेल्या उल्लेखात असे दिले आहे की एकेदिवशी देवी पार्वतीने नंदीस आपला दारपाल म्हणुन ठेवले.अणि देवी पार्वती स्नान करण्यासाठी गेल्या.

तेव्हाच महादेव तिथे आले अणि नंदीचे काहीही न ऐकता ते देवी पार्वती स्नान करत असलेल्या स्नानगृहात गेले.

ह्यामुळे देवी पार्वती अपमानित झाली त्यांना खुप राग आला.मग पार्वतीने तिच्या सखी जया अणि विजया यांचे ऐकत आपल्या शरीराला लावलेला हळद अणि उंटण्याचा लेप हा लेप काढुन देवी पार्वतीने एक छोटासा गोळा तयार केला अणि त्यापासुन एका सुंदर पुत्राची मुर्ती निर्माण केली.अणि त्या मुर्तीत प्राण फुंकले.

देवी पार्वतीने तिच्या ह्या पुत्रास तिचा अनुचर म्हणुन नियुक्त केले.

एकेदिवशी आपल्या ह्याच पुत्राला देवी पार्वती दारपाल म्हणुन नेमतात माझे स्नान होईपर्यत कोणालाही आत येऊ देऊ नकोस अशी स्पष्ट आज्ञा देतात अणि स्नान करण्यासाठी स्नान गृहात निघुन जातात.

तेव्हाच महादेव तिथे येतात देवी पार्वतीचा तो दारपाल म्हणुन नेमलेला पुत्र त्यांना स्नानगृहात जाऊ देत नाही.

तो बालक सांगतो की माझ्या मातेची अशी आज्ञा आहे की मी स्नानगृहात कोणालाही प्रवेश करू देऊ नये
माझी माता आत्ता स्नान करीत आहे म्हणुन तुम्ही स्नानगृहात प्रवेश करू शकत नाही.

महादेव त्या बालकाला विचारतात तु कोण आहेस अणि मला स्नानगृहात का जाऊ देत नाहीयेस?

बालक म्हणतो मी कोण आहे ते सोडा तुम्ही आधी इथुन निघुन जा बालकाच्या अशा स्वरात बोलल्याने महादेव संतापतात त्या कुमारासोबत महादेव यांचा खुप वाद होतो.

मग बालकाला त्या स्नानगृहापासुन हटवण्यासाठी अनेक देवता प्रयत्न करतात.पण सर्व जण यात अपयशी ठरतात.तो बालक त्यांना युदधात पराभुत करून टाकतो.

तेव्हा शेवटी संतप्त झालेले महादेव रागात त्यांच्या त्रिशुळाने ह्या बालकाचे मस्तक धडापासुन अलग करतात.

See also  आर्थिक नियोजनाचे महत्व - Financial Planning In Marathi

मग जेव्हा देवी पार्वती स्नान करून बाहेर येतात तेव्हा त्यांना घडलेला सर्व प्रकार दिसुन येतो.

हे पाहुन देवी पार्वती क्रोधित होता सृष्टी नष्ट करु लागतात मग सर्व देवांनी प्रार्थना केल्यावर क्षमा मागितल्यावर देवी शांत होतात.अणि बालकाला पुनर्जिवित करावे अणि त्या बालकास सर्वात पुज्य स्थान दिले जावे अशी मागणी महादेवाकडे करतात.

महादेव देवी पार्वती यांच्या मागणीस होकार देतात.अणि आपल्या गणांना आदेश करतात की पृथ्वीतलावर जा अणि सगळयात आधी तुम्हाला जो प्राणी दिसुन येईल त्याचे शिर कापुन घेऊन या.

गण पृथ्वीतलावर येतात तेव्हा सर्वप्रथम त्यांना हत्ती हा प्राणी दिसुन येतो.गण मग त्या हत्तीचे शिर कापुन घेऊन महादेवासमोर उपस्थित होतात.

मग तेच हत्तीचे शिर महादेव त्या बालकाच्या धडावर लावतात.अणि त्या बालकास पुनजिर्वित करतात.यानंतर महादेव अणि पार्वती यांनी ह्या बालकास स्वपुत्र म्हणुन स्वीकार केले.

गज म्हणजे हत्ती आनन म्हणजे मुख दोघांचा मिळुन अर्थ हत्तीचे मुख म्हणजेच गजानन असा होतो.

महादेवाने ह्या बालकास गणांचा देव म्हणुन गणेश असे नाव प्रदान केले.

हे सर्व घडले तो दिवस चतुर्थीचा होता म्हणुन ह्या दिवसाला तेव्हापासुन गणेश चतुर्थी म्हणुन महत्व प्राप्त झाले अणि हा दिवस तेव्हापासुन गणेश चतुर्थी म्हणुन साजरा केला जाऊ लागला.