हरघर तिरंगा योजना तसेच अभियानाविषयी माहीती – Har Ghar Tiranga Abhiyan

हरघर तिरंगा योजना तसेच अभियानाविषयी माहीती

घरोघरी तिरंगा अभियानाची सुरूवात कोणी केली आहे?

घरोघरी ह्या राष्टीय अभियानाची घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

घरोघरी तिरंगा अभियान काय आहे?

 • घरोघरी तिरंगा अभियानामार्फत भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आँफिशिअल टविटर अकाऊंट वरून सर्व भारत वासियांना असे आवाहन केले आहे की भारत देशातील प्रत्येक घराघरात भारताचे राष्टध्वज तिरंगा फडकविण्यात यावा.
 • कारण ह्या वर्षी आपला देश स्वतंत्र होण्यास तब्बल 75 वर्ष पुर्ण होणार आहेत.म्हणुन हा 75 वा स्वातंत्र्य दिन घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा केला जाणार आहे.

या अभियानात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन जनतेला नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

 • म्हणुन 13 आँगस्ट ते 15 आँगस्ट दरम्यान प्रत्येक भारतीय नागरीकाने आपली देशभक्ती व्यक्त करण्यासाठी मोठया संख्येने या अभियानात सामील व्हावे.
 • ह्या अभियानात सहभागी होऊन 15 कोटीपेक्षा अधिक लोक घरोघरी ध्वजारोहन करताना दिसुन येतील.
 • आपल्या घराचा समावेश ह्या घरोघरी तिरंगा अभियानात होण्यासाठी आपण प्रत्येकाने rashtragaan.In ह्या वेबसाइट वर जावे अणि नाव रेजिस्ट्रेशन करून घरोघरी तिरंगा हे प्रमाणपत्र डाऊनलोड देखील करून घ्यायचे आहे.

घरोघरी तिरंगा या अभियानाचे मुख्य उददिष्ट काय आहे?

 • मित्रांनो आपल्या सर्वानाच चांगले माहीत आहे की आपल्या देशाचा तिरंगा हाच आपल्या देशाचा राष्टध्वज आहे.
 • या तिरंग्यात मध्यभागी अशोक चक्र अणि हिरवा पांढरा भगवा हे तिघे रंग दिलेले आहेत.ह्या वर्षी देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 75 वर्ष पुर्ण होत असल्याने ह्या 75 व्या वर्धापणदिना निमित्त अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे.
 • ह्या अभियानाचा मुख्य हेतु म्हणजे या अभियानात सहभागी होऊन आपण आपल्या मनात असलेली देशाविषयीची भक्ती,प्रेम,आदर निष्ठा व्यक्त करु शकतो.
 • घरोघरी तिरंगा अभियानासाठी ध्वज कोठुन खरेदी करायचा?
See also  20 थोर भारतीय स्वतंत्रता सेनानीं - भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक  - Greatest Freedom Fighters Of India Marathi information

घरोघरी तिरंगा अभियानासाठी शासनाने एकुण तीन प्रकारच्या ध्वजांची व्यवस्था केली आहे.

 • घरोघरी तिरंगा अभियानात सहभागी होण्यासाठी आपण जवळच्या पोस्ट आँफिस कार्यालयात जाऊन ध्वज खरेदी करू शकतो.किंवा आँनलाईन ध्वज खरेदी करण्याचे पर्याय आपल्याजवळ उपलब्ध असणार आहे.

भारताचा तिरंगा ध्वज हा राष्टध्वज म्हणुन कधी स्वीकारण्यात आला आहे?

 • भारताचा तिरंगा झेंडा राष्टध्वज म्हणुन 22 जुलै 1947 रोजी स्वीकारण्यात आला होता.

घरोघरी तिरंगा ह्या अभियानासाठी नावनोंदणी करण्याची सुरूवात कधीपासुन झाली आहे?

 • घरोघरी तिरंगा अभियानात सहभागी होण्यासाठी नाव नोदणीची सुरूवात 22 जुलै 2022 पासुन करण्यात आली आहे.
 • घरोघरी तिरंगा ह्या अभियानासाठी नावनोंदणी करण्याची शेवटची तारीख काय आहे?
 • घरोघरी तिरंगा ह्या अभियानात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख 5 आँगस्ट 2022 ही आहे.

 स्वातंत्र्याच्या ह्या अमृत महोत्सवास कधी आरंभ होईल अणि कधी याचा शेवट होईल?

 • स्वातंत्र्याच्या ह्या 75 व्या अमृत महोत्सवाला 13 आँगस्ट रोजी आरंभ होईल अणि 15 आँगस्टपर्यत हा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे.
 • स्वातंत्र्याच्या ह्या अमृत महोत्सवात कोणकोणते उपक्रम राबवले जातील?
 • स्वातंत्रयाच्या ह्या अमृत महोत्सवामध्ये तिरंगा फडकविण्या व्यतीरीक्त अनेक स्पर्धा अणि कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे.अणि यात जो स्पर्धक विजयी होईल त्यास आकर्षक बक्षिस भेटवस्तु तसेच ट्राँफी देण्यात येणार आहे.

घरोघरी तिरंगा अभियानामध्ये सहभाग _ नाव नोंदणी कशी करायची?प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे?

how to register for har ghar tiranga abhiyan How to download har ghar tiranga certificate

● सर्वात आधी पहिले आपण आपले गुगल क्रोम ब्राऊझर ओपन करावे अणि तिथे सर्च बारमध्ये har ghar tiranga असे टाईप करून सर्च करावे.

https://harghartiranga.com/ – क्लीक करा

 

घरोघरी तिरंगा अभियानामध्ये सहभाग _ नाव नोंदणी कशी करायची?प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे?

 

● आपल्या समोर एक होम पेज ओपन होईल ज्यात pin a flag आँप्शनवर क्लीक करायचे.

● यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.जिथे आपण आपला मोबाइल नंबर अणि आपले नाव तसेच आपण तिरंगा फडकवणार आहे त्या ठिकाणाचे नाव टाकायचे.अणि आपली लोकेशन अँक्सेस आँन करून घ्यावी.आपल्याला हवे असेल तर आपण आपल्या जीमेल अकाऊंट वरून देखील लाँग इन करू शकतो.

See also  IVF म्हणजे काय? प्रक्रिया, तयारी व जोखीम - IVF information in Marathi

● अणि next बटणवर क्लीक करावे.

● यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होईल जिथे pinned a flag नाव दिसुन येईल तिथे क्लीक केल्यावर असे दिलेले असेल की your flag has been pinned आपली नावनोंदणी यशस्वीपणे पुर्ण झाली आहे.

● मग आपल्यासमोर खालीच सर्टिफिकिट डाउनलोड करायचे एक आँप्शन दिसुन येईल तिथे डाऊनलोड वर क्लीक करून आपले सर्टीफिकिट डाउनलोड करून घ्यायचे.आपण हे सर्टिफिकिट आपण आपल्या फेसबुक टविटर लिंक्ड इन इत्यादी सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करू शकतो.

हर घर तिरंगा अभियानातील सेल्फी विद तिरंगा स्पर्धेत कसा सहभाग घ्यायचा?

● हर घर तिरंगा या अभियानाची वेबसाइट harghartiranga.com ही आहे.जिथे व्हिझिट करायचे अणि show your commitment by pinning a flag यात जाऊन आपण आपल्या घरावर तेरा ते पंधरा आँगस्ट रोजी तिरंगा फडकवाल अशी इथे रेजिस्टरेशन करून कमेंटमेंट द्यायची.

● हा तिरंगा आपण एकुण चार पदधतीने पिन करू शकतो.आपले घर, शाळा,आँफिस,कुठुनही आपण तिरंगा पिन करू शकतो.

● पहिल्या स्टेप मध्ये आपणास pin a flag वर जायचे आहे

● स्टेट टु मध्ये आपणास आपल्या अकाऊंटवरून लाँग इन करायचे आहे.

● स्टेप तीन मध्ये आपल्या मोबाइलची लोकेशन अँक्सेस करण्यास allow करायची.

● स्टेप फोरमध्ये जाऊन आपण pin a flag मध्ये जाऊन आपला तिरंग्याचा फोटो पिन करू शकतो.

● खाली स्क्रोल करून आल्यावर आपल्याला upload selfie with flag चे आँप्शन दिसुन येईल तिथे जाऊन आपण तिरंग्यासोबत आपली सेल्फी काढुन अपलोड करू शकतो.

तिरंगा फडकवविण्याबाबतचे काही महत्वाचे नियम –

घरोघरी तिरंगा या अभियानात सहभागी होऊन जे व्यक्ती तिरंगा फडकवणार त्यांना तिरंगा फडकविण्याचे सरकारने तयार केलेले नियम देखील माहीत असणे गरजेचे आहे.

चला तर मग जाणुन घेऊ हे नियम काय आहेत –

● आपल्या देशाचा राष्टध्वज आपण फाटु तसेच मळु देऊ नये.

See also  ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांची  नावे - Gyanpeeth Award List in Marathi

● प्लास्टिकचे ध्वज अजिबात वापरू नये आपलण फडकवत असलेला तिरंगा हा खादीचा,सुती,सिल्क इत्यादीचा असावा.

● ध्वजावर काही लिहायचे नाही.

● राष्टध्वजावर इतर कुठलेही ध्वज लावु धार्मिक ध्वज चिन्ह लावु नये.

● आपण जर आपला राष्टध्वज आपल्या घराच्या खिडकीतून, बाल्कनीतून किंवा इमारतीच्या समोरून आडवा किंवा तिरकस फडकवला,तर आपणास ध्वज बिगुलाच्या आवाजाने उंच आणि खाली करता येतो.

● जर एखादा राष्टीय शोक दिन असेल तेव्हाच आपण राष्टध्वज अर्धा झुकता ठेवू शकतो.

● राष्टध्वज मळला किंवा फाटला तर तो पुर्णपणे अलग करून घ्यायचा अणि नष्ट करायचा.

● ध्वज फडकवताना कधीही नेहमी उत्साहाने फडकवायला हवा आणि तो खाली उतरवताना आदराने खाली उतरवावा.ध्वज फडकवायचा आणि बिगुलाच्या आवाजाने खाली उतरवायचा.

● एखाद्या विशेष प्रसंगी आपणास रात्री देखील तिरंगा ध्वज फडकवता येईल.

● जर राष्टध्वज एखाद्या अधिकाऱ्याच्या वाहनावर बसवला असेल,तर राष्टध्वज वाहनाच्या उजव्या बाजूला किंवा अगदी मध्यभागी उंचावता येईल.

● ध्वजाला नेहमी सन्मानाचे स्थान दिले जावे.अणि तो अशा ठिकाणी फडकवायचा जिथुन तो आपणास स्पष्ट दिसेल.

● सरकारी इमारतीवर रविवारच्या दिवशी आणि इतर सुटीच्या दिवशी फक्त सूर्योदय झाल्यानंतर आणि सूर्यास्ताच्या दरम्यान ध्वज फडकविण्यात यावा.

 

 

हर घर तिरंगा निबंध तसेच भाषण – Har Ghar Tiranga Essay And Speech In Marathi

 

1 thought on “हरघर तिरंगा योजना तसेच अभियानाविषयी माहीती – Har Ghar Tiranga Abhiyan”

Comments are closed.