औषधी वनस्पतीचं महत्व (अश्‍वगंधा, तुळस आणि गवतीचहा ) – Medicinal Plants Information In Marathi

औषधी वनस्पतीचं बाबत माहिती (अश्‍वगंधा, तुळस आणि गवतीचहा ) -Medicinal Plants Information In Marathi

अश्‍वगंधा औषधी वनस्पती

गुजरात, मध्यप्रदेश,कर्नाटक या राज्यात ही वनस्पती आढळते.लागवडीचा विचार करता भारतात मध्यप्रदेश आघाडीवर आहे.

मध्यप्रदेशात रतलाम, मंदसोर,राजस्थानातील कोटा या वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे  ५००० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते.

महाराष्ट्रातील  जळ्गाव, बुलडाणा, अकोला, पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यामध्ये अश्वगंधाचे लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे.

 

अश्‍वगंधा उपयोग : Indian ginseng or  winter cherry Uses and Medicinal Benefits

 • अश्वगंधा पुरुषप्रधान रोगांवर तितकीच उपयोगी असली तरी स्त्री रोगांवरही तितकीच उपयुक्‍त आहे.
 • अश्वांधाच्या मुळांची भुकटी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना उत्तम प्रकारचे टॉनिक आहे.
 • मुळामध्ये असलेल्या अल्कोलॉईडमुळे अशक्तपणा, नपुंसकत्व, नाहीसे होते. तसेच स्त्रियांमध्ये गर्भधारणा होण्यास व पुरुषांमध्ये शुक्रपेशींच्यावाढीस मदत होते
 • तसेच सूज, क्षय, कृमी, कुष्ठरोग, त्वचारोग, आमवात, श्देतपदर, कफ, वात, सांधेदुखी, रक्तविकार, हृदय दौर्बल्य या विकारांवर मुळ्या उपयोगी आहे.
 • याच्या पानांचे दररोज सेवन केल्यास शरीरातील चरबी कमी होते व प्रकृती सडसडीत व उत्साहवर्धक रहाते.

लागवड

 • सुधारित वाण : विभागीय कृषि संशोधन केंद्र, मदसोर (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ) याची डब्ल्यू एस.-२० (जवाहर आस्कंद- २०)तसेच केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्था, लखनौ यांनी पोशिता व निमित्ती या जाती विकसीत केल्या आहेत.
 • जमीन ; चांगला निचरा मध्यम काळी कसदार जमीन या पिकांसाठी चांगली असते. नदीकाठच्या गाळावर जमिनीमध्ये अशवगंधाचे उत्पादन चांगले येते. लाल मातीच्या (सामु ७.५ ते ८) जमिनीत हिची चांगली

वाढ होते.

 • रोपे तयार करणे ; एक हेक्‍टर लागवडीसाठी १.० ते १.५ किलो बियाणे पुरेसे होते. गादी वाण्यावर १० सें.मी. अतरावर २ ते ३ सें.मी. खोलीच्या काकर्‍ऱ्या द्याव्यात. प्रत्येक वाफ्यात काकऱ्या पेरून बियाणे हाताने पेरून झाल्यावर हलक्या हाताने मातीने झाकावे व लगेच झारीने पाणी द्यावे. त्यानंतर प्रत्येक ओळीला २ ते ३ ग्रॅम युरियाची मात्रा द्यावी म्हणजे रोपे जोमदार होतात. पुनर्लागवडीसाठी ५ ते ६ आठवड्यांनी रोपे तयार होतात.
 • लागवड (पुनर्लागवड) : अश्वगंधाची लागवड सरी-वरंब््यावर लागवड केलेली चांगली ६० ते ७० सें.मी. अंतरावर सरी-वरंबे तयार करावेत. वरंब्याच्या दोन्ही बाजूनी दोन रोपात १५ ते २० सें.मी. अंतर ठेवून लागवड करावी. लागवडीच्या वेळेस योग्य प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करावा.
 • आंतरमशागत व पाणी : या पिकाला सुरुवातीला आंतरमशागत करावी लागते. सुरुवातीला २ ते ३ खुरपण्या
See also  पर्यावरणाची काळजी - साध्य सोप्या 15 गोष्टी - नक्की हातभार लावा - How can we take care of environment in Marathi

करून पीक तणविरहित ठेवावे. हे पीक बहूवर्षीय आहे व डोंगराळ तसेच कोरडवाहू मागात येते. तरीपण लागवड

 • केल्यास आवश्यकतेनुसार, तापमानानुसार व जमिनीच्या प्र कारानुसार पाणी द्यावे. हलक्या जमिनीत १0 ते

५२ दिवसांनी आणि मध्यम भारी जमिनीत १५ ते २०दिवसांनी पाणी द्यावे. काढणी तंत्रज्ञान व मुळांची प्रलवारी : लागवडीनंतर सुमारे ६ महिन्यांनी मुळाची काढणी करावी. मुळांचे ७ ते १० से.मी. लांबीचे तुकडे करावेत आणि पाण्याने स्वच्छ धुऊन सावलीत वाळवावेत. मुळ्यांची लांबी व जाडीनुसार प्रतवारी करावी.

 • उत्पादन ; साधारणपणे हेक्‍टरी १०० किलो बी व १० ते १२ क्विटल सुकलेली मुळे मिळतात. औषधी म्हणून मुळांचा वापर होतो. बी लागवडीसाठी उपयोगी होते.
 • बाजारभाव : सुकलेल्या मुळ्या रु. १२० ते १५० प्रति किलो प्रमाणे बाजारभाव मिळतो. त्यासाठी औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांशी किंवा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांशी चर्चा करून या पिकाची लागवड करावी.

 

तुळस औषधी वनस्पती – Holy Basil Or Tulsi,

 • तुळशीचे मूळ, पाने द बियांचा औषधी उपयोग होतो. ही तिखट/तुरट चवीची व उष्ण गुणांची आहे.
 • तिचा उपयोग कफ, दमा, वात, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अर्धशिशी, ताप, वात दोषामुळे होणारे रोग,
 • क्षयरोग, संधिवात, नेत्रविकार पोटदुखी, वेदना/ठणका, भूक मंदावणे, पोटात कृमी होणे, मूळव्याध, चर्मरोग अशा विविध रोगांवर केला जातो.
 • बी मूत्ररोगावर वापरतात. तुळसीचा कीड प्रतिकारक म्हणूनही केला जातो.
 • तुळसीच्या वाळलेल्या फांद्या, खोडाचा वापर विविध आकाराचे माळेतील मणी तयार करण्यासाठी करतात.
 • याचा उपयोग साधुसंत, वारकरी मंडळी गळ्यात घालण्यासाठी करतात. अशी ही तुळस बहुउपयोगी आहे.

तुळस पासून निर्मित औषधे : Medicines from Basil

 • वरसंहारक रस, मुक्‍्तपंचामृत, दर्वी तेल, त्रिभुवन किर्ती स्सतसेच सर्दी व खोकल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक औषधामध्येमोट्या प्रमाणावर वापर करतात.

सुधारीत वाण :

 • कृष्णतुळस, क्पूर्तुळस, रानतुळस, लवगतुळस,सिम सौमया, सिम आयु (औषधी व सुगंधी वनस्पती संस्थान,लखनौ)

लागवड :

 • तुळसीच्या सुकलेल्या मंजिरीतील पक्व बी घेऊन वाफ्यातपेरणी मार्च-एप्रिल महिन्यात करावी व पुनर्लागवड जून-जुलै महिन्यात४५ > ३० सें.मी. व ६० > ३० से.मी. अंतरावर करावी.

पाणी व्यवस्थापन :

 • उन्हाळ्यात प्रत्येक महिन्यात पाण्याच्या तीनपाळ्या द्याव्यात. इतर हंगामात पिकांच्या गरजेनुसार पाणी द्यावे.

आंतरपशागत :

 • पीक तणविरहित ठेवावे.पीक काढणी ; पीक लागवडीपासून ९० ते ९५ दिवसानंतर पीक जेव्हा फुलोऱ्यात असते तेव्हा जमिनीपासून अंदाजे २० सें.मी. अंतरावर फांद्या घ्याव्यात. नंतरची कापणी ६५ ते ७५ दिवनी घेतली तरी चालते.
See also  Account Payee Cheque आणि Cross Cheque म्हणजे काय? - Different Types Of Cheques In Marathi

 

पीक काढणीनंतरची प्रक्रिया :

 • पीक काढणीनंतर १२ तास सावलीत सुकवावे. त्यामुळे तेलाच्या उत्पादनात वाढ होते.

 

उत्पादन/हेक्‍टरी :

ओली, पाने मंजिरी व फांद्या(टन/हे.) १५ ते २५, तेल (किलो) १०० ते ११०.

विशेष माहिती :

 • तुळशीच्या पानात ०.५ ते 0.७ टक्के पिवळे जर्द, किंचित लवंगेसारख्या वासाचे बाष्पणशील तेल असते, कृष्णा तुळशीच्या तेलात प्रामुख्याने युजॉल हे रासायनिक घटक द्रव्ये असते.

 

गवतीचहा औषधी वनस्पती -लागवड व प्रक्रिया –  Cymbopogon citratus –  lemon grass

 • गवतीचहा हे बहुवार्षिक गवत असून ते २ मीटर पर्यंत उंच वाढते.त्याला मरपूर फुटवे येतात.
 • पाने केसाळ असून ८० ते १२५ सें.मी. लांबव १.२५ ते १.७५ सें.मी. पर्यंत रुंद असतात.
 • पानांना ठिंबू सारखा वास येतो. फुलांचा दांडा २५ ते ३५ सें.मी. लांब असतो.

 

लेमन ग्रास आर्थिकदृष्ट्या महत्त्व :lemon grass Medicinal Uses

 • गवती चहापासून सिट्रॉल हे प्रमुख द्रव्य मिळते.
 • त्याच सिट्रॉलचा उपयोग निरनिराळ्या सुगंधीयुक्‍त स्सायनांमधून होतो. सर्वसाधारणपणे गवती चहाच्या तेलात ५५ ते ८५ टक्के सिट्रॉल मिळते.
 • त्याचा उपयोग अ जीवनसत्त्वाच्या औषधी गोळ्या तयार करण्याकडे, सुगंधित साबण, सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीत लेमन ड्रॉप्स, सुगंधी तेल इत्यादिमध्ये उपयोग होतो.
 • या गवताचा सूप किंवा आमटी यांना स्वाद व वास आणण्यासाठी उपयोग करतात. तेलाचा उपयोग जंतुनाशक द्रव्ये करण्यासाठीसुद्धा करतात. महाराष्ट्रात गवती
 • चहा लागवड करण्यास चांगला वाद आहे. गवती चहापासून काढलेल्यातेलास भारतात तसेच परदेशी बाजारपेठेत खूप मागणी आहे.

आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्व :

 • गवतीचहा व काळी मिरी यांचा काढा मासिक पाळीच्या दुखण्यावर उत्तम आहे.
 • तसेच सर्दी पडणे, अंगदुखी व आमवात अशा अशा अनेक प्रकारच्या व्याधीवर गवती चहाचा काढा घेण्याची प्रथा आहे.
 • तेलाचा उपयोग पोटातील गॅसेसवर, संधिवातावर, चमकीवर होतो. साखर टाकून घेतल्यास घाम येतो.
 • तसेच सर्व प्रकारचे वेदनाशामक बाम, डासांपासून संरक्षण करण्यासाठी मलमे गवती चहापासून बनवतात.

लागवड व मशागत तंत्रज्ञान

 • जमीन : सुपीक जमिनीपेक्षा पोयट्याची, रेताड परंतु चांगला निचरा होणारी जमीन या पिकांच्या लागवडीस योग्य आहे. लालसर वाळूमिश्रित जमिनीतही हे पीक चांगले येते.
 • या जमिनीतील गवती चहाची मुळे उत्तम वाढतील अशी जमीन लागवडीखाली आणावी. कारण त्यामुळे त्यातील सिट्रॉलचे प्रमाण वाढते.

सुधारित जाती :

 • गवती चहाच्या के.सी.पी.-२५, ओ.डी.-१९,प्रगती, प्रमाण, कावेरी, या सुधारित जाती आहेत.
See also  जैविक खते म्हणजे काय? प्रकार व 10 फायदे ( Jaivik khat)

हवापान :

 • उष्ण हवामान. उबटार वातावरण ‘परपर सर्यप्रकाश दीवाढीस जास्त पाऊस लागतो. उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन करावे.लागवड पद्धत ; या गवताची लागवड ४ ते ६ वर्षातून एकदाच करावी लागते. त्यामुळे जमीन एकदाच चांगल्या प्रकारे तयार करून घेणे फार महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात जमीन खोल नांगरट करावी. नंतर दोन
 • कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन सपाट करावी. गवतीचहा लागवड बियांपासून अथवा गवती चहाच्या आलेल्या नवीन फुटव्यापासून करता येते.
 • परंतु फुटव्यापासून केलेली लागवडीची वाढ जोमाने होते. तसेच गवती चहाची लागवड पाण्याची उपलब्धता असल्यास केव्हाही करता येते. मात्र पावसाळ्याची लागवड चांगली जोमाने होते. गवती
 • चहाचे पीक एक वर्षानंतर अनेक फुटव्यांना जन्म देते, असे अनेक फुटवे कुदळीने खणून पावसाळ्याच्या सुखातीस काढावे व चांगले रोगविरहित फुटवे शेतात ७५ ५८ ६० सें.मी. अंतरावर लागवड करावी. लावणी करताना जमिनीत पुरेसे पाणी असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे. पाण्याच्या पाळ्या
 • स्थानिक परिस्थितीनुसार ८ ते १० दिवसांनी द्याव्यात एकदा लावणी केल्यानंतर पीक ४ ते ६ वर्षे राहत असल्यामुळे मेलेल्या रोपांच्या ठिकाणी दुसरी रोपे ताबडतोब लावावी.

आंतरमशागत :

 • या गवतामध्ये तणांचा फार त्रास होतो. त्यामुळे तण वेळीच काढावे. नाहीतर हे तण गवताबरोबर कापले जाऊन तेलाचा दर्जा कमी करते. प्रत्येक पावसाळ्यापूर्वी गादीवाफे किंवा सऱ्या बांधणी करून घ्यावी.

कापणी :

 • लागवडीनंतर पहिली कापणी ६ ते ९ महिन्यांनी करावी. नंतरच्या कापण्या ३ ते ४ महिन्यांनी कराव्यात. अशाप्रकारे पहिल्या वर्षी २ ते ३ कापण्या व नंतरच्या वर्षात ३ ते ४ कापण्या कराव्यात सहा वर्ष हे पीक चांगले उत्पादन देऊ शकते. कापणी जमिनीपासून २० ते २५ सें.मी. उंचीवर करावी.

उत्पादन :

 • प्रति वर्षी एकरी १५ ते १८ टन ताजे गवत व गवती चहापासून ९० लीटर तेलाचे उत्पादन मिळते. सध्या तेलाचा ‘माव प्रति लीटर ८०० ते १००० रु. इतका आहे.
 • तेल काढल्यानंतर गवताचा राहिलेला चोथा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरला जातो.
 • तसेच या चोथ्यामध्ये उसाची मळी किंवा प्रथिनयुक्त अंबोण मिसळून जनावरांना चारा म्हणून उपयोग करता येतो.
 • गवती चहा हे पीक निश्‍चित पैसा मिळवून देणारे असल्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केल्यास आर्थिक फायदा होईल.

तेल काढणी प्रक्रिया :

 • तेलाच्या अधिक उत्पादनासाठी कापलेले गवत १२ ते १४ तास सावलीत ठे वावे. त्यानंतर पानांचे बारीक तुकडे करून आसवन यंत्राच्या टाकीत भरावे.
 • या गवतापासून वाफेच्या साहाय्याने ऊर्ध्वपातन (डिस्टेलेशन) करून तेल काढण्यात येते. बॉयलर मधील पाण्याची वाफ आसवन यंत्राच्या टाकीत जाते.
 • यामुळे गवती चहाच्या पानांच्या तेलाची वाफ होऊन पाण्यात मिसळते. त्यानंतर ही वाफ कंडेन्सरमध्ये थंड होऊन द्रवात रूपांतर होते.
 • तेल हलके असल्यामुळे हे पाण्याच्या पृष्ठभागावर गोळा होते. विभागणी यंत्राद्वारे तेल व पाणी सहज अलग वेगळे होतात.
 • ऊर्ध्वपातन यंत्राच्या सहाय्याने तेल काढण्यास प्रति बॅचला ३ ते ४ तास वेळ लागतो. अशाप्रकारचेआसवन यंत्र मद्वात्मा फले कषि विद्यापीठ राइरी येथील औषधी व

1 thought on “औषधी वनस्पतीचं महत्व (अश्‍वगंधा, तुळस आणि गवतीचहा ) – Medicinal Plants Information In Marathi”

Comments are closed.