API फुल फॉर्म मराठी – एपीआय माहिती – API full form in Marathi

API फुल फॉर्म मराठी – API full form in Marathi

API चा full form काय आहे ?

API चा full form आहे एप्लीकेशन  प्रोग्राम इंटरफेस. एपीआय हा  एक साचेबद्द , नियमित  आणि संगणक प्रणाली तयार करणार्‍या एप्लीकेशनचा एक संच , संग्रह असतो.

थोडक्यात काय तर API हे एकाद्या संगणक प्रणाली ने कसे कार्य पूर्ण करावेत. कसं संबधित घटकांनी  एकमेकांशी संवाद साधावा हे स्पष्ट  पणे सांगतो.

इतकंच न्हवे तर ग्राफीकल युजर इंटरफेस तयार करताना सुद्दा याचा उपयोग केला जातो.

आपल्याकडे जर एक सक्षम, कार्यक्षम API असेल तर एकादी यंत्रणां तयार करणं सोपं, सुलभ होत. कारण असे सक्षम API हवे असलेले सर्व घटक (ब्लॉक्स) पुरवू शकतात आणि  त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअर तात्काळ हवे ती system तयार करू शकतात.

कोणत्या प्रकारच्या API असतात? -API Types

विविध संकेतस्थळ, ऐपलीकेशन ऍप्लिकेशन आणि बऱ्याच ऑपरेटिंग सिस्टम कडे API असतात. जसे गूगल मॅप API  ,जे निरनिराळ्या लोकेशन साइट्स दाखवणाऱ्या ऍप्लिकेशन आणि  संकेतस्थळ कडून गूगल मॅप दाखवण्या करता रीतसर परवानगी गूगल कडून घ्यावी लागते.

किंवा  विंडोज सिस्टम कडे विविविध API असतात ज्या अनेक गॅझेट्स आणी संगणक प्रणालीत वापरल्या जातात. साधं  तुमी कोणत्या साइट्स वरून काही फोटो, माहिती कॉपी केली आणि पेस्ट केली ते सुद्दा एका API की मुळे शक्य होत असते.

सार्वजनिक किंवा खुल्या वर्गातल्या API

  1. सार्वजनिक किंवा खुल्या एपीआय –

अशा एपीआय मोफत उपलब्ध असतात आणि त्या लोकांना सहज मिळतात आणि  त्या अमर्यादित असतात .किती ही प्रमाणात तुमी त्याचा वापर करू शकता॰

  1. भागीदार एपीआय –
See also  सर्टिफिकेट आॉफ डिपाझिट म्हणजे काय? Certificate of deposit meaning in Marathi

हे एपीआय मात्र लोकाकरता  सार्वजनिकपणे उपलब्ध नसतात . म्हणून आपल्याला ते वापरण्यासाठी लोकांना काही संबधित  परवानग्यांची आवश्यकता पडते .

  1. खाजगी किंवा अंतर्गत एपीआय –

 या एपीआय सहसा कंपनीमध्ये अंतर्गत कारभारा साठी वापरण्यासाठी असतात आणि त्या फक्त अंतर्गत प्रक्रिया द्वारे मिळू शकतात . यांचा वापर  जास्त करून  नवीन सेवा आणि उत्पादने विकसित करण्यासाठी केला जातो करू शकते.

  1. संयुक्त एपीआय –

हे एपीआय विविध महितीचा साठा आणि सेवा एपीआय एकत्रित करतात. या प्रकारच्या एपीआयचा मुख्य हेतु हा दिलेल्या सूचना ची जलदरीत्या अंमलबजावणी करणे  आणि संकेतस्थळा वरील वापरकर्त्याची कार्यक्षमता वाढविणे आहे.

 

एपीआयची  काही उदाहरणे -API examples

प्रोग्रामेबलवेब या नावच्या संकेत स्थळा वर  साधारण 15,500 एपीआय पेक्षा जास्त API साठा असून त्यातल्या काहीची नवे खालीलप्रमाणे

  • अमेझोन API
  • गूगल मॅप API
  • युटुयब API
  • ट्विटर एपीआय
  • फ्लिकर एपीआय

API full form in Marathi

API अगदीसोप्या रीतीने समजेल असे एक उदाहरण –

समजा  तुमी अमेझॉन अफिलेट मार्केटिंग करता एक ब्लॉग किंवा वेबसाईट डेव्लोप करत आहात आणि त्यावर 100  उत्पादन माहिती देणार आहात , आता तुमाला एका उत्पादन ची 600 शब्दात माहितीही लिहायची आहे आणि फोटो  सुद्दा add करायचे आहेत.   दिवसाला 10 उत्पादनं ची महिती तुमी ब्लॉग वर लिहायची ठरवलीत तरी 10 दिवस लागतील .

पण आपल्याला माहीत आहे का की असा ही एकमार्ग आहे? त्यानुसार तुमी हे काम फक्त 5 मिनिटात करू शकाल. होय 5 मिनिटांत!!

हे शक्य होईल ते अमेझॉन API key ने. या API KEY तुमी कंपनी कडे मागू शकता, आपली।मागणी जर कंपनी चे नियम पूर्ण करत असाल तर API आपल्याला मिळेल आणि वरील काम आपण 10 दिवसा ऐवजी 5 मिनिटातच करू शकाल.

 

एपीआयचे फायदे -API Benefits

  • एपीआय याखूप उपयोग असतात कारण संपूर्ण माहिती न देता त्या हवी ती माहिती डिवाईस मध्ये  फक्त एक लहान कोड टाकून पूर्ण
  • विविध एप्लीकेशन मधील डाटा मिळवण्यसाठी API सहज निर्माण करता येतात.
  • विविध उपकरण जुळवणी करता आणि त्यांना उत्तोम उत्तम बनवण्या करता एपीआय खूप मोठ्या प्रमाणात कमी येतात .
  • निरनिराळ्या संगणकीय प्रणालीना ना अतिवेगवान रित्या कार्य करण्यास सक्षम बनवतात
See also  पर्यावरणाची काळजी - साध्य सोप्या 15 गोष्टी - नक्की हातभार लावा - How can we take care of environment in Marathi

एपीआयची मर्यादा

  • सर्वात मोठा धोका हा हकिंग पासून असतो , या बाबतीत API या खूपच दुबळी आणि संवेदनाक्षम असतात .
  • जर त्या हॅक झाल्याचं तर बाकीचे connected डिव्हाइस  वर तात्काळ हकिंग  हल्ल्याची शक्यता खूप जास्त असते.
  • या मुळे सर्व यंत्रणा च कोलमडू शकते त्यामुळे API मुळे कार्य सोपी, सहज होत असली तरी त्यांच संरक्षण करणे आणि चोख व्यवस्थापन करणे सोप नसते.