Infosys – इन्फोसिस  ची सुरवात , कार्य आणि संपूर्ण माहीती – Infosys company Information In Marathi

Infosys ची यशोगाथा – संपूर्ण माहीती – Infosys company Information In Marathi

इन्फोसिस  माहीती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध सेवा पुरवणारी साँपटवेअर कंपनी आहे.आणि ह्या कंपनीचे वैशिष्टय हे आहे की ही कंपनी फक्त भारतामध्येच नाही तर परकीय देशांत देखील माहीती तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्यंत फेमस कंपनी म्हणुन ओळखली जाते.

इन्फोसिस  ही भारतामध्ये माहीती तंत्रज्ञान क्षेत्रातील म्हणजेच इनफरमेशन टेक्ना़लाँजी सेक्टरमधील सगळयात जास्त नोकरीच्या संधी देत असलेली कंपनी म्हणुन देखील प्रसिदध आहे.

आजच्या लेखातुन आपण ह्याच भारतातील अत्यंत फेमस साँफ्टवेअर कंपनी इन्फोसिस  विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

इन्फोसिस  काय आहे?

इन्फोसिस  कंपनीला साँपटवेअर तसेच आय टी म्हणजेच माहीती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अत्यंत प्रसिदध कंपनी म्हणुन जगभर ओळखले जाते.

इन्फोसिस कंपनी माहीती तंत्रज्ञान (आय टी) क्षेत्रात उच्च पदवी शिक्षण पुर्ण केलेल्या विदयार्थी तसेच विदयार्थीनींना विपुल प्रमाणात नोकरीची संधी देण्याचे काम करते.

याच कारणाने इन्फोसिस  कंपनीला आयटी क्षेत्रात सगळयात जास्त जाँब देत असलेली भारत देशातील एक अत्यंत प्रसिदध कंपनी म्हणुन ओळखले जाते.

इन्फोसिस चा फुलफाँर्म

इन्फोसिस  कंपनीच्या नावाचा फुल फाँर्म information system असा होतो.आणि हे नाव देखील यावरूनच पडले होते.

इन्फोसिस  कंपनीची स्थापणा :

इन्फोसिस  ही कंपनी 2 जुलै 1981 रोजी शिक्षणाचे माहेरघर म्हणुन ओळखल्या जात असलेल्या पुणे शहरात स्थापित केली गेली होती.

इन्फोसिस  कंपनीचे हेड आँफिस

इन्फोसिस  ह्या कंपनीचे हेड आँफिस भारतातच बंगलौर येथे स्थापित करण्यात आले आहे

इन्फोसिस  कंपनीचे फाऊंडर

इन्फोसिस  ह्या प्रसिदध साँफ्टवेअर कंपनीच्या फाऊंडरचे नाव एन आर नारायण मुर्ती असे आहे

नारायण मुर्ती यांचा जन्म :

डाँ नारायण मुर्तीचा जन्म 20 आँगस्ट 1946 रोजी कर्नाटक येथील सिडलघाटा येथे झाला होता.

डाँ नारायण मुर्ती यांचे कुटुंब

नारायण मुर्ती यांच्या कुटूंबात त्यांची पत्नी सुधा मुर्ती,चिरंजीव रोहन मुर्ती आणि कन्या अक्षदा मुर्ती हे आहेत.

See also  वजन -ऊंची चे प्रमाण  किती असावे ? - Weight to Height Ratio Chart in Marathi

इन्फोसिस  कंपनी काय काम करते

इन्फोसिस  ही आयटी क्षेत्रातील भारतातील एक मोठी प्रसिदध साँपटवेअर कंपनी आहे.

इन्फोसिस  कंपनीचे नाव सर्वप्रथम इन्फोसिस टेक्नाँलाँजी लिमिटेड होते त्यानंतर इन्फोसिस चे नाव इन्फोसिस  लिमिटेड असे पडले होते.इन्फोसिस  कंपनीचा आरंभ डाँ नारायण मुर्ती यांनी त्यांचे सहकारी मित्र (सहा इंजिनिअरांसोबत) मिळुन केला होता.

इन्फोसिस  लिमिटेड ही भारत देशातील इन्फरमेशन टेक्नाँलाँजी रिलेटेड साँफ्टवेअर कंपनी आहे जिचे काम इन्फरमेशन टेक्नाँलाँजीशी रिलेटेड सर्विसेस देणे आहे याचसोबत ही कंपनी ग्लोबल बिझनेस कंसल्टिंगचे काम करताना देखील आपणास आढळुन येते.यात इन्फोसिस कंपनी अशा बिझनेसमँन लोकांना मार्गदर्शन करते.

ज्यांनी स्वताचा बिझनेस चालू तर केला आहे पण तो कसा यशस्वीपणे पुढे नेता येईल हे त्यांनी माहीत नसते.अशा व्यावसायिक,उद्योजकांना इन्फोसिस  लिमिटेड बिझनेस कंसल्टिंग करण्याचे काम करते.

बिझनेस कशा पदधतीने करायचा?त्यातुन आपला प्राँफिट मार्जिन कसा काढायचा?तसेच आपल्या सुरू केलेल्या छोटया बिझनेसचा हाय लेव्हलवर कशा पदधतीने विस्तार घडवून आणायचा?या सर्व बाबींविषयी योग्य ते गाईडन्स करण्याचे काम करते.

कारण इन्फोसिस  ह्या कंपनीने उद्योग क्षेत्रात कित्येक वर्ष कार्य केले असल्यामुळे इन्फोसिस  कंपनीचा बिझनेस फील्ड मधील एक्सपिरीयंस खुप अधिक आहे.

आणि इन्फोसिस ने आत्तापर्यत व्यवसाय उद्योग,क्षेत्रात खुप मोठे यश संपादन केले असल्यामुळे आपला अनुभव इतर उद्योजकांसोबत शेअर करून इतरांनाही व्यवसाय उद्योग क्षेत्रात उच्च यश प्राप्त करण्यासाठी प्रेरित तसेच मार्गदर्शन करून प्रोत्साहित करण्याचे कार्य इन्फोसिस  कंपनी करत आहे.

 म्हणुनच इन्फोसिस  कंपनीला भारतातील टाँपची आय टी कंपनी म्हणुन ओळखले जाते.याचमुळे व्यवसाय उद्योग क्षेत्रात कार्य करण्याची मनापासुन ईच्छा आणि आवड असलेल्या कित्येक देशातील नवीन व्यावसायिक उद्योजक इन्फोसिस  कंपनीकडे व्यवसाया विषयी मार्गदर्शन घेण्यासाठी येत असतात.

म्हणजेच याचाच अर्थ असा होतो की इन्फोसिस  ही भारतातील एक अशी साँफ्टवेअर कंपनी आहे जी इतर कंपनींना साँफ्टवेअर संबंधित सर्विस देण्यासोबत उद्योग व्यवसाय क्षेत्रात कार्य करत असलेल्या इतर कंपनींना त्यांच्या उद्योग,व्यवसायात प्रगती तसेच सुधारणा घडवून आणून उद्योग क्षेत्रात मोठे यश प्राप्त करण्यासाठी बिझनेस कंसल्टिंग करण्याचे कार्य करते.

See also  केवायसी म्हणजे काय? - KYC meaning in Marathi

Infosys कंपनी कोणकोणत्या सर्विसेस देते?

इन्फोसिस  ही एक जगप्रसिदध साँफ्टवेअर आयटी कंपनी आहे जी इतर कंपनींना साँपटवेअरशी संबंधित सर्व सेवा प्रकारच्या सेवा देण्याचे काम करते.

साँफ्टवेअरशी निगडीत सर्विसेस देण्याबरोबर इतरही अशा अनेक सर्विसेस आहेत ज्या देण्याचे काम इन्फोसिस करते.आणि त्या सर्विसेसची यादी पुढीलप्रमाणे आहे :

Infosys company services :

  • Digital marketing services
  • Digital commerce services
  • Digital interaction services
  • Digital workplace service
  • Artificial intelligence
  • Data analytics
  • Blockchain
  • Engineering services

Other services –

  • Business management
  • Consulting services

Infosys company ची सुरूवात कशी झाली?

नारायण मुर्ती यांच्या करिअरचा आरंभ इंडियन इंस्टीटयुट आँफ मँनेजमेंट येथे चीफ सिस्टम प्रोग्रमरचे काम करण्यापासुन झाला.

यानंतर नारायण मुर्ती यांनी साफट्राँनिक्स नावाची कंपनी देखील चालू केली होती पण तिला फारसे यश प्राप्त न झाल्याने ती बंद पडली.

मग नारायण मुर्ती यांनी पुण्यातील पाटणी कंप्युटर सिस्टममध्ये जाँब देखील केला.आणि इथेच त्यांची आणि नंदन निलेकणी यांच्याशी आणि त्यांच्या इतर सहकारींशी भेट घडुन आली.

आणि मग नारायण मुर्ती आणि त्यांच्या सहकारींनी मिळुन 1981 मध्ये इन्फोसिस ची स्थापणा केली.आणि इन्फोसिसची सुरुवात करण्यासाठी स्वताकडे पैसे नसल्याने नारायण मुर्ती यांनी त्यांच्या पत्नी सुधा मुर्ती यांच्याकडुन 10 हजाराचे लोन देखील घेतले होते.

Infosys विषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न

1)इन्फोसिस ही कोणत्या देशाची कंपनी आहे?

इन्फोसिस कंपनी ही भारत देशात वास्तव्यास असलेली एक जगप्रसिदध साँफ्टवेअर आयटी कंपनी आहे.

2) इन्फोसिस कंपनीची स्थापणा कोणी केली होती?

इन्फोसिस कंपनीची स्थापणा डाँ नारायण मुर्ती आणि त्यांचे सहकारी मित्रांनी मिळुन केली होती.ज्यात डाँ नारायण मुर्ती,नंदन निलकनी,क्रिस गोपालकृष्ण,एस डी शिबुलाल,एन एस राघवन,के दिनेश या सर्वाचा समावेश होता.

3) इन्फोसिस ह्या कंपनीचे सीईओ कोण आहेत?

इन्फोसिस कंपनीचे सीईओ सलिल पारेख हे आहेत.सलिल पारेख यांना सीईओ चे पद 2 जानेवारी 2018 मध्ये देण्यात आले होते.

See also  बँकेशी संबंधित अत्यंत महत्वाचे शब्द आणि त्यांचे अर्थ -Bank Related Important Terms In Marathi

4) डाँ नारायण मुर्ती यांना कोणकोणते पुरस्कार प्राप्त झाले आहेत?

डाँ नारायण मुर्ती यांना 2000 सालात पदम श्री हा पुरस्कार देण्यात आला होता.याचसोबत 2003 मध्ये युवा विश्व उद्योजक,2008 मध्ये पदमविभुषण आणि 2013 मध्ये सयाजी रत्न पुरस्कार तसेच इंडियन आँफ द ईयर आयकाँन आँफ द इंडिया इत्यादी असे अनेक पारितोषिक त्यांना देण्यात आले आहेत.

5) इन्फोसिस कंपनीची सुरूवात करण्यासाठी नारायत मुर्ती यांनी त्यांच्या पत्नीकडुन किती रूपयाचे कर्ज घेतले होते?

इन्फोसिस कंपनीची सुरूवात करण्यासाठी नारायत मुर्ती यांनी त्यांच्या पत्नीकडुन 10 हजार रूपयाचे कर्ज घेतले होते.

6) इन्फोसिस  कंपनीचा टर्न ओव्हर किती आहे?

इन्फोसिस कंपनीचा टर्न ओव्हर 98,595 करोड पेक्षा जास्त आहे.

7) इन्फोसिस कंपनीचे पहिले कर्मचारी कोण होते?

इन्फोसिस ह्या कंपनीचे पहिले कर्मचारी एन एस राघवन हे होते.आणि नारायण मुर्ती ह्या कंपनीचे चौथे कर्मचारी होते कारण पाटणी मधील आपले कार्य पार पाडण्यासाठी नारायण मुर्ती यांनी कमीत कमी एक ते दोन वर्षाचा कालावधी लागला होता.मग त्यानंतर नारायण मुर्ती यांने आपल्या टीमला जाँईन केले होते.

8) 2021 मधील देशातील सर्वात पाँवरफुल्स कपल्समध्ये नारायण मुर्ती आणि सुधा मुर्ती यांचा कितवा क्रमांक लागतो?

इंडियन इंस्टिटयुट यांनी केलेल्या वार्षिक सर्वेक्षणातुन नुकत्याच 2021 मध्ये जाहीर केलेल्या यादीमध्ये पाच काँर्पारेंट वल्डमधील जोडया देखील सहभागी आहेत ज्यात डाँ नारायण मुर्ती आणि सूधा मुर्ती दहाव्या क्रमांकावर आहेत.