सीटेट परीक्षा जुलै २०२३ विषयी संपूर्ण माहिती CTET exam July 2023 complete information in Marathi
नुकतीच २०२३ करीता सीटेट भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.ज्यात असे दिले आहे की सीबीएसई कडुन देशभरातील विविध राज्यांत एकुण २८४ ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे.
ह्या परीक्षेत प्रथम येणारया उमेदवारांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे म्हणजे जो उमेदवार पहिले अर्ज करेल त्याला परीक्षेचे शहर वितरीत करण्यात येणार आहे.
जो उमेदवार आपल्याला हव्या असलेल्या परीक्षा सेंटरसाठी पहिले अॅप्लाय करेल त्या उमेदवारांना तिथे परीक्षा देण्याची संधी प्राप्त होणार आहे.
सीटेट परीक्षा ही वर्षातुन दोनदा घेतली जात असते.ही परीक्षा शासकीय तसेच खासगी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी प्राप्त करण्यासाठी आपली पात्रता आहे की नाही हे बघायला घेण्यात येते.
सीटेट परीक्षेचे नोटिकिकेशन हे २७ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आले आहे.केंद्रीय पात्रता परीक्षेसाठी तयारी करीत असलेले उमेदवार ctet.nic.in वर जाऊन आॅनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करू शकतात.
आज आपण सीटेट परीक्षा २०२३ चे स्वरूप कसे असणार आहे हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.
CTET exam अर्ज करण्याची शेवटची तारीख –
सीटेट परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २६ मे अशी निर्धारीत करण्यात आली आहे.सर्व पात्र अणि इच्छुक उमेदवार आपला अर्ज २६/५/२०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आपला अर्ज सादर करू शकतात.
CTET अभ्यासक्रम २०२३ पेपर १ आणि २ PDF डाउनलोड करा
CTET examफी भरण्याची शेवटची तारीख –
फी भरण्याची शेवटची तारीख देखील २६/५/२०२३ रोजी रात्री ११.५९ पर्यंत ठेवण्यात आली आहे.
कधी असणार परीक्षा?
सर्व परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा जुलै ते आॅगस्ट ह्या महिन्या दरम्यान सीबीटी पद्धतीने म्हणजे कंप्युटर वर घेतली जाऊ शकते.असे ह्या जाहीरातीत सांगितले आहे.
साधारणत १५ जुलै १० आॅगस्ट दरम्यान ही परीक्षा आयोजित केली जाऊ शकते.अणि घेतलेल्या परीक्षेचा निकाल सप्टेंबर मध्ये जारी करण्यात येणार आहे.
CTET exam परीक्षेचा कालावधी –
दोन शिफ्टमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.शिफ्ट एक मध्ये परीक्षेची वेळ सकाळी ९.३० ते दुपारी १२ असते.अणि शिफ्ट दोन मध्ये दुपारी २.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे.
परीक्षेचा एकुण कालावधी अडीच तास इतका असणार आहे.
CTET मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड करा | CTET Previous Year Question Papers Download PDF
कॅटॅगरी नुसार किती फी असेल?
जनरल अणि ओबीसी नाॅनक्रिमिलेअर यांना पेपर एक पेपर दोन यापैकी फक्त एक पेपर देण्यासाठी १००० रूपये इतकी फी आपणास भरावी लागणार आहे.
पण जनरल ओबीसी नाॅनक्रिमिलेअर कॅटॅगरी मधील उमेदवारांना दोन्ही पेपर द्यायचे असेल तर त्यांना १२०० रूपये इतकी फी भरावी लागणार आहे.
एससी एसटी तसेच भिन्न सक्षम व्यक्तींना पेपर एक अणि पेपर दोन यादोघांपैकी एक पेपर द्यायला ५०० रूपये इतकी फी लागणार आहे पण याच ठिकाणी त्यांना दोन्ही पेपर द्यायचे असतील तर त्यांना ६०० रूपये इतकी फी भरावी लागणार आहे.
फाॅर्म भरताना काही चुक झाल्यास ती बरोबर करेक्ट करण्यासाठी उमेदवारांना एक तारीख दिली जाणार आहे.त्या तारखेच्या आत फाॅम करेक्शन करणे आवश्यक असणार आहे.
CTET exam परीक्षेसाठी कोणाला फाॅम भरता येईल?
ज्या उमेदवारांनी डीटीएडला फक्त प्रवेश घेतलेला आहे असे उमेदवार देखील ह्या परीक्षेसाठी अर्ज करू शकणार आहे.
ज्या उमेदवारांनी बीएडला कोणत्याही एका वर्षात प्रवेश घेतलेला आहे असे उमेदवार ह्या परीक्षेसाठी फाॅर्म भरू शकणार आहे.
CTET exam पेपरचे स्वरूप –
सीटेटचे एकूण दोन पेपर घेतले जातात.
वर्ग पहिली ते पाचवी साठी पेपर १ घेतला जात असतो.अणि वर्ग सहावी ते आठवी साठी पेपर दोन घेतला जात असतो.
पेपर १ मधील विषय –
पेपर एक मध्ये आपणास पाच विषय कंपलसरी असतात.
Child development and pedagogy
Language first -भाषा एक आपण मराठी हिंदी इंग्रजी इत्यादी कुठलीही भाषा निवडु शकतो.फक्त जी भाषा आपण फस्टमध्ये निवडली आहे ती आपणास सेकंड लॅगवेज म्हणून निवडता येत नसते.
Language second
Mathematics
Environmental studies
वरील सर्व विषयांत ३० एमसीक्यु प्रश्न हे ३० गुणांसाठी विचारले जातात.एकुण १५० एमसीकयु प्रश्न १५० गुणांसाठी पेपर एक मध्ये विचारले जातात.
परीक्षेत कोणतीही निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आलेली नाहीये.त्यामुळे सर्व प्रश्नांवर आपणास क्लिक करता येणार आहे जेणेकरून आपला अंदाज बरोबर ठरल्यास आपणास चांगले गुण प्राप्त होऊ शकतात.
पेपर २ मधील विषय –
Child development and pedagogy compulsory तीस एमसीक्यु प्रश्न ३० गुणांसाठी विचारले जाणार आहे.
Language first compulsory तीस एमसीक्यु प्रश्न ३० गुणांसाठी विचारले जाणार.
Language second compulsory-तीस एमसीक्यु प्रश्न ३० गुणांसाठी विचारले जातात
वरील तीन विषय पेपर पेपर दोन साठी कंपलसरी असणार आहेत
याचसोबत ज्या उमेदवारांचे बीएससी वगैरे झाले आहे अशा उमेदवारांना मॅथेमॅटीक्स किंवा सायन्सची निवड करणे आवश्यक आहे.यात मॅथेमॅटीक्स सायन्स ह्या विषयावर ६० एमसीक्यु प्रश्न ६० गुणांसाठी विचारले जाणार आहे.
ज्या उमेदवारांनी बीए बीएड वगैरे केलेले आहे अशा उमेदवारांना सोशल सायन्स ह्या विषयाची निवड करणे आवश्यक आहे.सोशल स्टडी मध्ये इतिहास,नागरिकशास्त्र,भुगोल, राज्यशास्त्र इत्यादी विषयांवर ६० एमसीक्यु प्रश्न ६० गुणांसाठी विचारले जाणार आहे.
पेपर दोन मध्ये एकुण १५० गुणांसाठी १५० प्रश्न विचारले जातात.
पेपर एक हा सहा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांच्या टाईपचे प्रश्न यात विचारले जातात.पेपर दोन हा अकरा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांच्या टाईपचे प्रश्न यात विचारले जातात.
CTET exam प्रश्नपत्रिकेची भाषा –
प्रश्नपत्रिका ही आपणास हिंदी अणि इंग्रजी मध्ये उपलब्ध करून दिली जाते.
काॅलीफाय होण्यासाठी किती गुण आवश्यक आहे?
ओपन कॅटॅगरी मधील उमेदवारांना सीटेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ६० टक्के गुण मिळवणे आवश्यक असणार आहे. म्हणजे १५० पैकी ६० टक्के मिळवायला किमान ९० प्रश्नांची उत्तरे बरोबर असणे आवश्यक असणार आहे.
इतर कॅटॅगरी मधील उमेदवारांना ५५ टक्के गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असणार आहे.म्हणजे १५० पैकी ५५ टक्के गुण प्राप्त करायला किमान ८३ गुण असणे आवश्यक आहे.म्हणजे किमान ८३ प्रश्नांची उत्तरे बरोबर येणे आवश्यक आहे.
सीटेट प्रमाणपत्र अहर्ता –
ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आयुष्यभर ही परीक्षा पुन्हा पास करण्याची आवश्यकता नसते.ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना केवहीएस,एनवहीएस सेंट्रल तिबेटियन शाळा युनियन टेरिटरी स्कुल, स्टेट गर्वमेंट स्कुल मध्ये शिक्षक म्हणून नोकरी प्राप्त होते.
सीटेट उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना राज्याची टीईटी परिक्षा उत्तीर्ण होण्याची आवश्यकता भासत नाही.
B. Ed Admission ajun Zale nahi pan B.ed CET exam dili ahe ani result nantar admission karnar ahe tar mala CTET from bharta yeil ka
S.