नाथ संप्रदाय विषयी माहिती Nath sampradaya information in Marathi
राज्यातील नवनाथांमधील आठ नाथ ह्या तीर्थक्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवुन आणले जाणार आहे.
येथील तीर्थक्षेत्र इतर पर्यटन स्थळे अणि उपलब्ध असलेल्या इतर सोयी सुविधा यांचा विकास घडवून आणण्यासाठी शासन आता पाच कोटी पन्नास लाख रुपये देण्यास मान्यता देखील दिली आहे.
यात दोन कोटी 75 लाख इतकी रक्कम पर्यटन अणि सांस्कृतिक विभागाकडुन दिली गेली आहे.
गोरक्षनाथ रेवननाथ कानिफनाथ ह्या क्षेत्राच्या विकासासाठी 50 लाख अणि मच्छिंद्र नाथ,गहिनीनाथ,नागनाथ,जालिंदरनाथ,भरतरीनाथ याला 25 लाख दिले जाणार आहे.
आजच्या लेखात आपण ह्याच नवनाथांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
नाथ संप्रदाय कोण आहे?
नाथ संप्रदाय हा भारतातील एक शैव संप्रदाय म्हणून ओळखला जातो.नाथ हया शब्दाचा शब्दशः रक्षण करणारा किंवा स्वामी असा होत असतो.
आदीनाथ म्हणजे शिव अणि महादेवापासुन ह्या संप्रदायाची निर्मिती झाली होती
शिव संप्रदायापासुन ह्या संप्रदायाचा उदय झाला होता म्हणून ह्या संप्रदायाला नाथ संप्रदाय असे म्हटले जाते.
नाथ संप्रदायाची स्थापना जवळपास दहाव्या ते बाराव्या शतकाच्या दरम्यान करण्यात आली असल्याचे सांगितले जाते.पण भारतातील अनेक लोकपरंपरेचे संशोधक नाथ संप्रदायाची स्थापना संशोधनानुसार वेगवेगळा सांगताना आपणास दिसून येतात.
नाथ संप्रदायाची दीक्षा घेणाराच व्यक्ती आपल्या नावापुढे नाथ ही उपाधी लावू शकतो.
नाथ संप्रदायाची स्थापना कोणी केली?याचा इतिहास काय आहे?
नाथ संप्रदायाची स्थापना ही मत्सयेंद्रनाथ उर्फ मच्छिंद्रनाथ यांनी केली होती.अणि ह्या संप्रदायाचा विकास घडवुन आणण्याचे काम गोरक्षनाथ उर्फ गोरखनाथ यांनी केले.
योगमार्गाने सिदधावस्था प्राप्त करणे हे ह्या संप्रदायाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.मच्छिंद्रनाथ ह्या संप्रदायाचे नवव्या शतकाच्या कालावधीतील प्रथम मानवी गुरू होते.मच्छिंद्रनाथ यांच्या नंतर गोरखनाथ यांनी ह्या संप्रदायाला नावारूपास आणल्याचे सांगितले जाते.
नवनवाथांची निर्मिती उत्पती ही गोरखनाथ यांच्यापासून झाली अणि त्यांनीच हे नऊ विविध अवतार घेतले असल्याचे सांगितले जाते.म्हणुन काही ठिकाणी नवनाथात गोरखनाथांचे नाव घेतले जात नाही हे नाव वेगळ घेण्यात येत असल्याचे सांगितले जाते.
त्र्यंबकेशवर येथे गुरू गोरक्षनाथ यांनी नवनाथांना अणि ८४ सिदधांना उपदेश केला होता अशी मान्यता आहे.
नाथांची नवनाथ ही गणना खुप प्रसिद्ध मानली जाते पण नवनाथ नेमकी कोण याबाबत देखील अभ्यासकांमध्ये दुमत असल्याचे आपणास दिसून येते.एकाच नाथाच्या अनेक नावामुळे ही दविधा स्थिती निर्माण झाली असल्याचे सांगितले जाते.
उदा,कानिफनाथ,कृषणपा,कनप्पा,कान्होपा ही एकाच नावाची वेगवेगळे रूपांतर असल्याचे आपणास दिसून येते.
ज्या ठिकाणी नवनाथांची वस्ती झाली तसेच जिथे नवनाथांनी आपले मठ स्थापित केले ते ठिकाण नाथांचे तीर्थक्षेत्र मानले जाते अणि नाथ परंपरेचे जोगी अशाच ठिकाणी यात्रा करताना आपणास आढळतात.
उदा, त्र्यंबकेश्वर,दारका, पुष्कर, रामेश्वर,पैठन,गिरणार,हिंगळजा गोरखपूर इत्यादी स्थाने ही नाथांशी संबंधित आहेत.
नवनाथांचे महत्व –
फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात नवनाथांना विशेष महत्व देण्यात आले आहे.सातारा तसेच सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात मच्छिंद्र गड नावाचा एक गड आहे.
ह्या मच्छिंद्र गडावर मच्छिंद्र नाथाचे मंदीर असल्याचे सांगितले जाते.हयाच मच्छिंद्र गडावर इसवी सन बारामध्ये मच्छिंद्र नाथ यांनी चैत्र वैद्य पंचमीच्या दिवशी समाधी घेतली होती.
सांगली जिल्ह्यातील बततीशिराळा येथे पंढरीच्या विठठला एवढेच येथील गोरखनाथ मंदिरास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.असे म्हटले जाते की एकादशीच्या दिवशी सांगली सातारा कोल्हापूर ह्या जिल्ह्यामध्ये वास्तव्यास असलेले भाविक भक्तजण येथे दर्शन घेण्यासाठी येतात.येथील नागपंचमीचा आरंभ गोरक्षनाथ यांनीच केला होता असे सांगितले जाते.
महाराष्ट्र राज्यात नाथ संप्रदाय आणणायारया गहिनीनाथ यांची समाधी बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील नागचिंचोली नावाच्या गावात आहे असे म्हटले जाते.
महाराष्ट्र राज्यातील सर्व भागात कोकणापासुन विदर्भापर्यत ठिकठिकाणी नाथ संप्रदायाच्या पाऊलखुणा आपणास पाहावयास मिळतात.
नाथ परंपरेत एकुण बारा पंथ आहेत.यात काही पंथ आदीनाथ काही गोरक्षनाथ यांनी प्रवर्तित केले आहे.
नवनाथांचा परिचय –
१)मच्छिंद्रनाथ –
मच्छिंद्रनाथ हे नाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आहेत.हे आदीनाथांचे शिष्य आहेत.
मासळीच्या गर्भात असताना महादेवाने पार्वतीला केलेला उपदेश ऐकला होता असे म्हटले जाते.
मच्छिंद्रनाथ यांना काही विदवानांनी शैव तर वैष्णव देखील समजतात.मच्छिंदनाथ यांनी लिहिलेला एक कौलनिर्णय नावाचा ग्रंथ देखील उपलब्ध असल्याचे सांगितले जाते.
खुप जण त्यांना बौदध तांत्रिक समजायचे तर काही जण त्यांना कौलमारगी म्हणून ओळखायचे.
२)गोरक्षनाथ-
गोरक्षनाथ उर्फ गोरखनाथ हे मच्छिंद्रनाथ यांचे शिष्य म्हणून ओळखले जातात.
गाईच्या शेणाच्या ठिगातुन गोरक्षनाथांचा जन्म झाला असल्याचे सांगितले जाते.बाराव्या शतकाच्या आसपासचा काळ हा गोरक्षनाथ यांचा होता.
गोरक्षनाथ यांना योगमार्गाची दिक्षा त्यांचे गुरू मच्छिंद्रनाथ यांच्याकडुन प्राप्त झाली होती.पुढे त्यांनी घोर तपश्चर्या करत सिदधी प्राप्त केल्याचे सांगितले जाते.यानंतर तीर्थयात्रा करीत गोरक्षनाथ यांनी अनेक शिष्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली अणि संपूर्ण भारतात त्यांनी ह्या पंथांचा प्रचार प्रसार केला.
३) गहिनीनाथ –
गहिनीनाथ हे गोरक्षनाथ यांचे शिष्य होते.गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरू म्हणून ओळखले जातात.असे सांगितले जाते की गहिनीनाथ यांचा जन्म मातीच्या गोळयातुन झाला होता.
मच्छिंद्रनाथ यांचे शिष्य गोरक्षनाथ यांच्याकडुन ज्यांना उपदेश मिळाला तेच हे गहिनीनाथ.गहिनीनाथ यांनी निवृतीनाथ यांना गुरू उपदेश करत नाथ परंपरेचा वारसा जपला अणि पुढे जाऊन ज्ञानेश्वर यांना हा नाथ परंपरेचा वारसा निवृतीनाथ यांच्यापासून प्राप्त झाला असे म्हटले जाते.
४) जालिंदरनाथ-
जालिंदरनाथ हे मच्छिंद्रनाथ यांचे गुरू बंधु होते.नवनाथांच्या सर्व नामावलीत जालिंदरनाथ यांच्या नावाचा उल्लेख आवर्जुन केला जातो.
जालिंदरनाथ यांचा जन्म जालिंदर येथे झाला म्हणून त्यावरून त्यांचे नाव जालिंदरनाथ असे पडल्याचे म्हटले जाते.कानीफनाथ यांना जालिंदरनाथ यांच्या कडुनच अनुग्रह प्राप्त झाला असल्याचे सांगितले जाते.
५) कानिफनाथ –
नवनारायणांनी श्री कृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या रूपात जन्म घेतला.त्याचप्रमाणे प्रबुद्ध नारायण यांनी हिमालयातील एका हतीच्या कानात जन्म घेतला त्यावरून त्यांचे नाव कानिफनाथ असे पडल्याचे सांगितले जाते.
यांनीच प्रदीर्घ काळ कार्य करीत धर्म अणि संस्कृतीचे रक्षण केले होते.
६) भरतरीनाथ –
दर वर्षी परभणी जिल्ह्यात श्रावण महिन्यात नागपंचमीच्या दिवशी भरतरीनाथ यांची यात्रा भरते.भरतरीनाथ हे देखील नाथ संप्रदायातील प्रमुख घटक मानले जातात यांचे देखील नाथ संप्रदायात आपले अमुल्य योगदान दिले आहे.
७) रेवणनाथ –
ब्रम्ह देवाच्या विर्यापासुन पृथ्वीवर एका कुणब्याला एक मुल दिसले हे मुल सुर्यासारखे दैदिप्यमान अणि तेजस्वी होते.नंतर कुणब्याने रेतीत पडलेल्या मुलाला उचलत घरी नेले मग त्याच्या पत्नीने अंघोळ घालत भिजवले रेवादी वाळवंटात हे मुल सापडले असल्याने याचे नाव रेवननाथ असे ठेवण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात रेवननाथ यांची समाधी आहे.
८) नागनाथ –
नागनाथ यांना नाथ संप्रदायात नागार्जुन ह्या नावाने देखील संबोधले जाते.
९) चरपटीनाथ –
चरपटीनाथ हे ब्रम्हदेवाचे पुत्र आहेत अणि त्यांना दत्तात्रेय कडुन उपदेश मिळाल्याचे म्हटले जाते.