नीरज चोप्रा बनला दोहा डायमंड लीग २०२३ विजेता – Neeraj chopra win doha diamond league 2023

नीरज चोप्रा बनला दोहा डायमंड लीग २०२३ चा विजेता Neeraj chopra win doha diamond league 2023

टोकियो आॅल्मपिक मध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या

भारत देशाचा स्टार भालाफेक पटटु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग २०२३ मध्ये आपल्या दमदार अणि उत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले आहे.

नीरज चोप्रा हा फस्ट अटेम्ट मध्येच भालाफेक करून विजेता बनला आहे.यात नीरज चोप्रा हयाने वलड चॅम्पियन अॅडरसन पीटर्स याला पराभुत करत दोहा डायमंड लीग जिंकले आहे.पीटर्स याला ह्या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावता आले आहे.

अॅडरसन पीटर्स याने दोहा डायमंड लीग मधील स्पर्धेत अंतिम फेरीत वलड चॅम्पियनशिप जिंकले होते.

भारताचा स्टार भालाफेक पटटु म्हणून परिचित असलेल्या नीरज चोप्रा हयाने काल ५ मे रोजी दोहा मध्ये आयोजित करण्यात आलेल्या डायमंड लीग २०२३ ला जिंकण्यात यश प्राप्त केले आहे.

नीरज चोप्रा याने दोहाच्या कतार स्पोर्ट्स वर झालेल्या ह्या स्पर्धेत ८८.६७ मीटर इतका भालाफेक करत पहिल्याच प्रयत्नात विजेतेपद पटकावले आहे.

पण ह्या नवीन स्पर्धे दरम्यान आपला एक नवीन विक्रम नोंदविण्यात नीरज चोप्रा अपयशी झाला आहे.नीरज चोप्रा हयाला पुन्हा एकदा ९०० मीटर इतका अडथळा पार करण्यात अपयश प्राप्त झाले आहे.

दोहा डायमंड लीग मधील नीरज चोप्रा हयाने ८८.६७ मीटर इतका भालाफेक केला तर दुसरया प्रयत्नात ८६.०४ मीटर तिसरया प्रयत्नात ८५.४७ इतका भालाफेक केला आहे.

चौथा प्रयत्न नीरज चोप्राचा फाॅल ठरला आहे.यानंतर आपल्या पाचव्या प्रयत्नात नीरज चोप्रा हयाने ८४.३७ मीटर अणि सहाव्या प्रयत्नात ८६.५२ मीटर इतका भालाफेक करण्यात यश मिळवले आहे.

याआधी देखील नीरज चोप्रा हयाने २०२२ मधील स्वीत्झर्लड मध्ये झालेल्या डायमंड लीग मध्ये विजेतेपद पटकावले होते.हया वर्षी देखील नीरज चोप्रा हयाने त्यांच्या चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन करीत आपल्या पहिल्याच प्रयत्नात ८८.६७ मीटर इतका लांब अंतरावर भालाफेक केला आहे.

See also  रेपो रेट म्हणजे काय - RBI मॉनेटरी पॉलिसी ? Repo rate meaning in Marathi

नीरज चोप्रा हयाने आपल्या करीअर मधील केलेली चौथी सर्वोत्तम कामगिरी ठरणार आहे.२०१४ मध्ये नीरज चोप्रा हयाने ह्या स्पर्धेत भाग घेतला होता तेव्हा तो चौथ्या क्रमांकावर होता.

नीरज चोप्रा याने २०२० सालात टोकियो आॅल्मपिक मध्ये सुवर्णपदक जिंकत एक नवीन इतिहासाची नोंद देखील केली होती.येथील स्पर्धेत नीरज चोप्रा याने ८८.९४ मीटर इतका लांब अंतरावर भालाफेक करण्यात यश प्राप्त केले होते.

आपल्या ह्या नवीन यशासाठी विक्रमासाठी संपूर्ण क्रीडा जगतातुन नीरज चोप्रा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातो आहे.