आनंद महिंद्रा यांच्या विषयी जाणून घ्यायची काही रोचक तथ्ये -Amazing facts about anand Mahindra in Marathi
आनंद महिंद्रा हे भारतातील प्रसिद्ध उद्योजक तसेच महिंद्रा गृपचे अध्यक्ष म्हणून ओळखले जातात.
आनंद महिंद्रा यांचा जन्म १ मे १९५५ मध्ये मुंबई मध्ये झाला होता.
आनंद महिंद्रा यांच्या वडिलांचे नाव हरिष महेंद्रा असे आहे अणि आईचे नाव इंदिरा महेंद्रा असे आहे.
- आनंद महिंद्रा यांना दोन बहिण देखील आहेत ज्यांचे नाव राधिका नाथ अणि अनुजा शर्मा असे आहे.
- आनंद महिंद्रा यांनी परदेशातील हाॅवर्ड युनिव्हसिर्टीतून आपली पदवीचे शिक्षण करत डिग्री प्राप्त केली होती.यानंतर भारतात आल्यावर महिंद्रा गृप मध्ये त्यांनी एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणून जाॅईन केले होते.
- महिंद्रा आज एक भारतीय आॅटोमोबाईल इंडस्ट्री म्हणून विख्यात आहे पण पॅसेंजर कार बनवण्याआधी ही कंपनी ट्रॅक्टर बनवण्यासाठी अधिक प्रसिद्ध होती.
- आनंद महिंद्रा यांचे लग्न व्यवसायाने पत्रकार असलेल्या अनुराधा यांच्या सोबत झाली होती.आनंद महिंद्रा यांच्या दोन मुली देखील आहेत ज्यांचे नाव अलिका अणि दिव्या असे आहे.
- आनंद महिंद्रा यांचे टविटर वर दहा मिलियन इतके फाॅलोवर्स आहेत.आनंद महिंद्रा हे सोशल मिडिया वर नेहमी अॅक्टिव्ह राहत असतात.आपल्या फाॅलोवर्स सोबत ते नेहमी सोशल मिडिया दवारे संवाद साधत असतात.
- आनंद महिंद्रा यांचे सध्याचे २०२३ मधील नेटवर्थ २१० करोड युएसडी इतके आहे.
- आनंद महिंद्रा यांनी त्यांचे शालेय शिक्षण तामिळनाडू मधील लाॅरेनस स्कुल उटी मधून पुर्ण केले आहे.त्यांनी हाॅवर्ड युनिव्हसिर्टीतून फिल्म मेकिंगचा आर्किटेक्चरलचा अभ्यास देखील केला आहे यात त्यांनी १९७७ मध्ये डिस्टिंक्शन मिळवत पदवी प्राप्त केली होती.
- याचसोबत त्यांनी त्यांचे एमबीएचे शिक्षण १९८१ मध्ये हाॅवर्ड बिझनेस स्कुल मधुन पुर्ण केले होते.
- आनंद महिंद्रा यांना वाचणाची खुप आवड आहे याचसोबत त्यांना जहाज चालवायला टेनिस खेळायला देखील खुप आवडते.आऩंद महिंद्रा हे एक उत्कृष्ट छायाचित्रकार देखील आहेत.