अनुष्का शर्मा यांच्या विषयी काही रोचक तथ्ये amazing facts about Anushka Sharma in Marathi
१ मे रोजी प्रसिद्ध बाॅलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा वाढदिवस आहे.अनुष्का शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्याविषयी काही रोचक तथ्ये जाणुन घेणार आहोत.
अनुष्का शर्मा यांचा जन्म १ मे १९९८ मध्ये उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या ह्या शहरात झाला होता.
अनुष्का शर्मा यांच्या वडिलांचे नाव अजय कुमार शर्मा असे आहे.अजय कुमार शर्मा हे एक पुर्व भारतीय आर्मी ऑफिसर होते.
अनुष्का शर्मा यांच्या आईचे नाव आशमा शर्मा असे आहे.अनुष्का शर्मा यांच्या भावाचे नाव करनेश शर्मा असे आहे.
अनुष्काचे सुरूवातीचे शिक्षण बॅगलोर येथील सैनिकी शाळेत झाले.यानंतर अनुष्का शर्मा हिने माऊंट कारनल काॅलेजमधुन पदवीचे शिक्षण प्राप्त केले.यानंतर अनुष्काने माॅडलिंग मध्ये करिअर करायचे ठरवले.
अनुष्का शर्मा हिला आधीपासूनच माॅडल बनायचे होते.माॅडलिंग मधुन करिअर करायचे याचकरीता ती बॅगलोर वरून मुंबई येथे गेली होती.मुंबई मध्ये सुरुवातीला एका फॅशन विकेंड मध्ये माॅडल म्हणून तिच्या करीअरला प्रथमतः सुरूवात केली.सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी इथे अनुष्काने रॅम्पवर कॅट वाॅक देखील केला होता.
बॅगलोर मधील एका माॅलमध्ये शाॅपिंग करत असताना प्रसिद्ध फॅशन डिझायनर वेंडर रोडीस याने अनुष्काला बघितले लाईक माय फॅशन शो मध्ये रॅम्प वॉक करण्याची आॅफर अनुष्काला दिली होती.
माॅडलिंगला सुरूवात केल्यानंतर अनुष्काने अॅक्टिंग स्कुल मध्ये समाविष्ट होण्याचा देखील निर्णय घेतला होता.यानंतर मुव्ही मध्ये अभिनय करण्यासाठी आॅडिशन द्यायला देखील तिने सुरूवात केली होती.
आॅडिशन दिल्यानंतर तिला तीन मुव्ही मध्ये काम करायची संधी मिळाली ज्यावर तिने साईन देखील केले होते.
२००८ मध्ये अनुष्का शर्माने रब ने बना दी जोडी ह्या चित्रपटापासून तिच्या चित्रपट अभिनय क्षेत्रातील करिअरला प्रथमतः सुरूवात केली होती.अनुष्का अणि शाहरूख खान यांच्या ह्या जोडीला दर्शकांची खुप पसंती प्राप्त झाली.हा चित्रपट बाॅक्स आॅफिस मधील २००८ मध्ये दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.
२०१२ मधील जब तक है जान हा चित्रपट अनुष्काच्या करीअर मधील सुपरहीट ठरलेला चित्रपट मानला जातो.
अनुष्का शर्मा अणि विराट कोहली या दोघांची पहिली भेट २०१३ मध्ये एका शांपुच्या अॅडमध्ये झाली होती.तेव्हाच दोघांची मैत्री झाली असे सांगितले जाते की तेव्हा विराट कोहली देखील चांगल्या फाॅममध्ये होता अणि अनुष्का शर्मा हिचे चित्रपट देखील हिट जात होते.
अनुष्का शर्मा हिला पाळीव प्राण्यांशी खुप संलग्नक आहे.असे सांगितले जाते की प्राण्यांवर अत्याचार करणारया विरूद्ध नेहमी आवाज उठविला आहे एकवेळा प्राण्यांवर अत्याचार करणारया विरूद्ध आवाज उठविण्यासाठी एक मोहीम सुरू केली होती जिचे नाव justice for animals असे होते.
सुलतान हा चित्रपट अनुष्काच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक चित्रपट मानला जातो पण खुप कमी जणांनी माहीत आहे की कंगणा राणावतला अनुष्काच्या आधी आॅफर देण्यात आली होती.पण कंगनाने चित्रपटासाठी साईन न केल्याने अनुष्काला ह्या चित्रपटात अभिनेत्रींच्या रुपात साईन करण्यात आले होते.