पेरु खाण्याचे फायदे – 7 Amazing Benefits Of Guava in Marathi


पेरु खाण्याचे फायदे – 7 Amazing Benefits Of Guava in Marathi

पेरु खाण्याचे फायदे

पेरु त भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व ‘क’ असते. जे रोगप्रतिकारक  शक्‍ती चांगली वाढवते. तसेच पोटॅशिअम भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याने आपल्या शरीरात सोडियमची पातळी योग्य स्तरावर राहण्यास मदत होते. पेरूमध्ये असणारे जीवनसत्त्व ‘अ’ हे त्वचेचे आरोग्यास व डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्‍त आहे. त्याचबरोबर पेरू फळामधील कॉपर, मॅग्रेशिअम असल्यामुळे रक्‍तनिर्मितीसाठी फायदेशीर ठरते.

पेरूचा रस आपल्याला हायड्रेटेड ठेवतो. पेरूमध्ये जीवनसत्त्व ‘क* चे प्रमाण संत्र्यापेश्षा चारपट जास्त आहे. आपल्या पाचन तंत्रासाठी पेरू उत्कृष्ट आहे. तंतूंचा एक समृद्ध स्रोत असल्याने नैसर्गिक रेचक म्हणून कार्य करते

7 Amazing Benefits Of Guava in Marathi

कर्करोगाचा धोका कमी

पेरू फळातील लाइकोपीन, क्ेरेसेटिन, जीवनसत्त्व ‘क* आणि अँटीऑक्सिडंटुस हे घटक आपल्या शरीरात कर्करोगास कारणीभूत पेशींना प्रतिबंधित करतात. लाइकोपीन स्तनाच्या कर्करोगापासून देखील संरक्षण करते. म्हणूनच दररोज एक पेरू खावा.

7 Amazing Benefits Of Guava in Marathi
Amazing Benefits Of Guava in Marathi

दृष्टी वाढवा

पेरूमध्ये असणार्‍या “अ’ जीवसत्त्वामुळे आपल्या डोळ्यांची चमक वाढते. यासह, यामुळे डोळ्याचे स्नायूही मजबूत बनतात. म्हणूनच दररोज सकाळी किंवा संध्याकाळी पेरू खाणे चांगले.

7 Amazing Benefits Of Guava in Marathi

गरोदरपणात

गर्मवती महिलांसाठी पेरू खूप चांगला आहे. त्यामध्ये असलेले फॉलिक ऑसिड किंवा व्हिटॅमिन बी-९ मुलांची मज्ञासंस्था विकसित करण्यास मदत करते. याद्यतिरिकक्‍त पेरू लहान मुलांना न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरपासून वाचवते

Amazing Benefits Of Guava in Marathi

ताण कमी

पेरूमध्ये उपस्थित मॅग्नेशियम शरीराच्या मज्ञातंतू आणि स्नायूंना आराम देते. दिवसभर जोरदार वर्कआउटनंतर एक पेरू खा. है प्रवास आणि कामाचा ताण कमी करण्यात खूप मदत करते,

less stress - Amazing Benefits Of Guava in Marathi

वजन कमी करा –Amazing Benefits Of Guava in Marathi

आपल्या आहारातील प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि फायबर कमी न करतापेरू वजन कमी करण्यास मदत करते. दररोज एक पेरू आपल्या चयापचय नियंत्रित करते आणि वाढत्या वजनावर ब्रेक लावते. कारण केळी, सफरचंद, संत्री यासारख्या इतर फळांपेक्षा पेरूमध्ये साखर कमी असते.

Amazing Benefits Of Guava in Marathi

व्हिटॅमिन “सी’चा एक चांगला स्त्रोत

पेरूचा रस विटामिन ‘सी’चा एक चांगला स्त्रोत आहे जो उधरक्तदाव विरुद्ध लढाला काम करतो. हे एंटीऑक्सीडेंट म्हणून कार्य करते जे आपल्याला जुनाट आजारापासून वाचवते. यामुळे इदयरोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.

पेरूचा रस घेतल्याने आपल्या पाचन तंत्रामध्ये तंतूचा आकार वाढत जातो. अतिसार आणि डायजेन्ट्रीसारख्या इतर पाचन विकारांची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकते कारण त्यात अंटीमायक्रोबियल गुणधर्म आहेत. हे पोटॅशियम आणि व्हिटय़ामिन सी सारख्या इतर पोषक तत्वे निरोगी ठेवून पाचक प्रणाली निर्जतुक करते.

विविध प्रक्रियायुक्त पदार्थ

१, पेरूचा रस

* साहित्य : ताजे सोललेली आणि चिरलेला पेरू, १ कप (१५५ ग्रॅम) साखर, १ चमचे थंड पाणी, अर्धा कप (१२० मि.ली.) बर्फाचे तुकडे,

पुदिना पाने.

* कृती : प्रथम ताजे पेरू सोलून घ्या आणि त्यांचे लहान तुकडे करा. त्यात साखर जशी लागेल व पुदिना घालावा. शेवटी बर्फाचे तुकडे घालून मिक्‍सरमधून बारीक करावे व चवदार पेरूचा रस तयार होतो.

. पेरू लोणचे

साहित्य: कच्च्या पेरूचे फळ, मोहरीचे तेल, बडीशेप, मेधी बियाणे, मोहरी, हिंग, लाल तिखट, मीठ.

कृती : पेरू चांगले धुऊन घेऊन कोरडे करावेत. त्याच्या माध्यम आकाराच्या फोडी कराव्यात. कापलेल्या फोडी कोरड्या करून घ्याव्यात नाहीतर लोण्याला पाणी सुटते. नंतर सर्व पावडर मसाले एकत्र करून पेरूच्या फोडीवर टाकावेत. त्याचबरोबर अखंड मसाले चांगल्या गरम तेलात तळून घ्या. मसाले करपू नये याची काळजी

घ्यावी. शेवटी तळलेले मिश्रण पेरूच्या फोडीवर टाकावे. पेरूचे तयार लोणचे थंड झाल्यावर निर्जंतुक केलेल्या डब्यात भरून कोरड्या जागेवर ठेवावे,

 पेरू चीज -Amazing Benefits Of Guava in Marathi

साहित्य : ३ पिकलेले पेरू (उकडून घेतलेले), १ कप साखर, ३ ते ४ चमचे तूप, सजावटीसाठी पिस्ता, काजू, बदाम, मनुके.

कृती : उकडलेले पेरू मिक्सरमधून पाणी न धालता बारीक पेस्ट करून घ्यावेत. बारीक केलेली पेरूची पेस्ट चाळणीने गाळून घ्यावी. तवा गरम करा. त्यावर पेरू लगदा, १ कप साखर घाला आणि साखर कमी गॅसवर वितळू द्या. गाळलेली पेरूची पेस्ट गरम पातेल्यात तूप टाकून शिजवायला ठेवावी, त्यात साखर घालावी, मिश्रण घट्ट

होईपर्यंत चांगले ढवळत राहा, मिश्रण थोडे घट्ट झाले की त्यात तूपटाकावे व गॅसच्या मध्यम आचेवर शिजवावे, मिश्रण चांगले घट्ट झाले की गरम असताना प्लेटमध्ये काढून घ्यावे तरच चांगले पसरेल. प्लेटमध्ये तयार झालेले पेरू चीज पसरून घेऊन त्याचे जसे हवे त्याआकारात कापून घ्या,

ज्या फळात जास्त प्रमाणात पेक्टिन असते ते फळ जेली बनविण्यासाठी योग्य असते. पेरूमध्ये थेक्टिन असल्यामुळे

  • जेली तयार करता येते.
  • ५ साहित्य : १
  • पेरू किलो अर्क, ५५०
  • ग्रॅम साखर, ३ ग्रॅम
  • सायट्रिक असिड.

५ कृती : पूर्ण परिपक्व झालेले पेरू घ्यावे. ते स्यच्छ पाण्याने धुवावेत.

नंतर स्टीलच्या सुरीने लहान तुकडे करावेत. फळाच्या दीडपट पाणी घेऊन फोडी शिजवण्यास वीस ते तीस मिनिटे ठेवावेत नंतर त्यात सायट्रिक अँसिड टाकावे. एक किलोच्या फोडी अर्कासाठी ३ ग्रॅम सायट्रिक असिड टाकावे. शिजलेला अर्क मलमलच्या कपड्यातून गाळून घ्यावा व सांगितल्याप्रमाणे ७4० ग्रॅम साखर मिसळून मंद

आचेवर घट्ट होईपर्यंत शिजवावे. त्याचा ब्रिक्स रिफ्रॅक्टोमीटरच्या साहाय्याने काढावा, नंतर गरजेप्रमाणे कलर टाकावा ब निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरून झाकण लावून सील करावे

 पेरूनेक्टर :

  • यामध्ये २० टक्के रस, १३ ते १५ टक्के टी.एस.ए्स. आणि असिड्चे
  • प्रमाण ०.३ टक्के असते.
  • ७ साहित्य : एक लीटर रस, साखर ६०० ग्रॅम, सायट्रिक आम्ल
  • १३ ग्रॅम, पाणी ३ लीटर.
  • ५ कृती; प्रथम गाळून घेतलेला रस घ्या. पाणी, साखर व अँसिड यांचे

मिश्रण स्टीलच्या पातेल्यात घेऊन मंद आचेवर ठेवावे. नंतर सर्व मिश्रण विरघळेपर्यंत हलवत रहा. चांगले ढवळून घ्या. सर्व मिश्रण निर्जतुक झाकण घट्ट मशीनद्वारे बसवावीत व हवाबंद करावीत. ९० अंश सें.ग्रे. तापमानाला पाण्यात २५ मिनिटे ठेवावीत. थंड करून कोरड्या जागी ठेवून द्यावीत.

माहिती – कृषी महाराष्ट्र

See also  ब्राऊन राईस म्हणजे काय ? Brown Rice चे म्हत्व

1 thought on “पेरु खाण्याचे फायदे – 7 Amazing Benefits Of Guava in Marathi”

Comments are closed.