म्युच्यल फंड म्हणजे काय? – Best 20 म्युच्यल फंड mutual fund information in marathi


mutual fund information in marathi

म्युच्यल फंड म्हणजे काय?- mutual fund information in marathi

आज गुंतवणुकदारांकडे बाजारात पैसे गुंतवण्यासाठी वेगवेगळे मार्ग तसेच पदधती आहेत.म्युच्यल फंडसुदधा गुंतवणुकदारांना गुंतवणुक करण्यासाठी एक चांगली संधी देत असतो.म्हणुन ह्या म्युच्यल फंडविषयी आपल्याला माहीत असणे फार गरजेचे आहे.त्याचे फायदे तोटे अणि महत्व आपल्याला माहीत असणे आवश्यक आहेत

म्युच्यल फंड हा एक असा फंड तसेच निधी असतो.ज्या एका फंडमध्ये खुप लोकांनी पैसे गुंतवलेले असतात.

म्युच्यल फंडमध्ये विविध गुंतवणुकदारांकडुन पैसे गोळा करुन अणि त्या गोळा केलेल्या पैशांची गुंतवणुक शेअर तसेच बाँण्ड मार्केटमध्ये केली जात असते.

यात गुंतवणुकदारांना त्यांच्या पैशांसाठी काही युनिट अँलाँट केले जात असतात.मग त्या युनिटच्या रेशोनुसार शेअर तसेच बाँण्डच्या खरेदी विक्रीवर मिळणारा नफा तसेच मोबदला म्युच्यल फंड युनिट धारकांमध्ये समान पदधतीने वितरीत केला जात असतो.

म्युच्यल फंड मध्ये कमी काळ गुंतवणुकीसाठी गुंतवणुकीत कमी फायदा होण्याची भीती तर असतेच.खासकरुन बँलेन्स अणि डेट फंड सोडुन गुंतवणुक इक्विटी फंड मध्ये केली जाते तेव्हा. मागच्या काही वर्षापासुन जास्त काळ गुंतवणुकीतुन होणारा गुंतवणुकदारांचा फायदाही आपण दुर्लक्षित करून चालणार नाही.म्युच्यल फंडमध्ये लोक अधिकतम जास्त कालावधीच्या गुंतवणुकीला जास्त पसंद करत असतात कारण यात आपल्याला मोबदला ही चांगला मिळत असतो तसेच आपले पैसेही त्यात सुरक्षित राहत असतात.

*म्युच्यल फंडचे प्रकार

म्युच्यल फंडच्या प्रकारांचा विचार करावयास गेले तर त्याचे दोन पदधतीने वर्गीकरण केले जाते.
१) म्युच्यल फंड (asset म्हणजे मालमत्ते नुसार)
२) म्युच्यल फंड (structure म्हणजे रचणे नुसार)

Asset class नुसार म्युच्यल फंडचे पडणारे प्रकार:

Debt Fund- डेबट फंड
Liquid Fund- लिक्विड फंड
Equity Fund- इक्विटी फंड
Large Cap Fund- लार्ज कँप फंड
Mid Cap Fund- मिड कँप फंड
Small Cap Fund-स्माँल कँप फंड
Multi Cap Fund- मल्टी कँप फंड
Elss Mutual Fund- ई एल एस एस म्युच्यल फंड
Equity Oriented Hybrid Fund- इक्विटी ओरिएन्टेड हायब्रिड फंड
Debt Oriented Hybrid Fund-डेबिट ओरिएन्टेड फंड
Balance Fund-बँलन्स फंड
Arbitrage Fund- आर्बिटेज फंड

Structure नुसार म्युच्यल फंड

 ओपन एन्डीड स्कीम -Open Ended Scheme
क्लोज एन्डेड स्कीम-Close Ended Scheme
इन्डेक्स फंड-Index Fund-
सेक्टर फंड -Sector Fund

म्युच्युल फंडचे फायदे-

1)तरलपणा असतो

– म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे गुंतवणूकदार कोणत्याही वेळी युनिट्सची पूर्तता करू शकत असतो.

२)गुंतवणुकीचे विविधीकरण-Diversity

जेव्हा एका गुंतवणूकीचे मूल्य यात वाढत जाते तेव्हा दुसर्‍याचे मुल्य कमी देखील होऊ शकते.

३) तज्ञ लोकांचे व्यवस्थापन यात पाहायला मिळते.

नवशिक्या गुंतवणूकदारास कसे आणि कोठे गुंतवणूक करावी? याबद्दल अधिक माहिती किंवा माहिती नसू शकते.म्हणुन याचकरिता काही तज्ञ म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापन आणि संचालन करत असतात.

४)छोट्या रकमेमध्ये सुदधा गुंतवणूक करण्याची सवलत एवढी लवचिकता-

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही. रोख प्रवाह स्थितीनुसार गुंतवणूक असू शकते.

५) कमी किंमत

म्युच्युअल फंडामध्ये बर्‍याच गुंतवणूकदारांकडून निधी गोळा केला जातो आणि त्यानंतरच सिक्युरिटीज खरेदी करण्यासाठी वापरला जातो. या फंडांची मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली जाते ज्यामुळे एका व्यवहाराच्या तुलनेत व्यवहारावर आणि इतर खर्चात बचत होते.म्युच्युअल फंडामध्ये कमी खर्च केल्यामुळे ही बचत गुंतवणूकदारांना दिली जाते.

६) चांगली सुरक्षा आणि पारदर्शकता उपलब्ध

सेबी मार्गदर्शकतत्त्वे लागू झाल्यानंतर म्युच्युअल फंडाच्या सर्व उत्पादनांना लेबल लावण्यात आले आहेत.म्हणजेच सर्व म्युच्युअल फंड योजनांमध्ये कलर कोडिंग असेल.हे गुंतवणूकदारास त्याच्या गुंतवणूकीची जोखीम पातळी शोधण्यास मदत करते,यामुळे गुंतवणूकीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित बनते.


mutual fund information in marathi

Best 20 म्युच्यल फंड mutual fund information in marathi

No Mutual Fund Name 31-Dec-20
1 SBI Mutual Fund   457,355.40
2 HDFC Mutual Fund   390,488.57
3 ICICI Prudential Mutual Fund   389,320.61
4 Aditya Birla Sun Life Mutual Fund   255,851.10
5 Kotak Mahindra Mutual Fund   217,077.49
6 Nippon India Mutual Fund   214,416.09
7 Axis Mutual Fund   177,752.09
8 UTI Mutual Fund   165,358.62
9 IDFC Mutual Fund   121,293.22
10 DSP Mutual Fund      89,486.74
11 Franklin Templeton Mutual Fund      82,109.40
12 L&T Mutual Fund      68,976.29
13 Tata Mutual Fund      59,263.06
14 Mirae Asset Mutual Fund      58,154.19
15 Edelweiss Mutual Fund      45,909.31
16 Invesco Mutual Fund      32,789.75
17 Sundaram Mutual Fund      30,466.71
18 Motilal Oswal Mutual Fund      24,184.98
19 Canara Robeco Mutual Fund      23,208.55
20 LIC Mutual Fund      15,743.51
21 HSBC Mutual Fund      10,131.07
22 Baroda Mutual Fund        8,285.75
23 BNP Paribas Mutual Fund        7,330.55
24 Principal Mutual Fund        6,854.92
25 PPFAS Mutual Fund        6,631.72
26 Mahindra Manulife Mutual Fund        5,058.08
27 PGIM India Mutual Fund        4,846.80
28 Union Mutual Fund        4,612.83
29 IDBI Mutual Fund        4,369.94
30 JM Financial Mutual Fund        3,700.10
31 BOI AXA Mutual Fund        2,351.05
32 IIFL Mutual Fund        1,885.10
33 Quantum Mutual Fund        1,735.38
34 IL&FS Mutual Fund        1,729.58
35 Indiabulls Mutual Fund            921.34
36 ITI Mutual Fund            844.81
37 Essel Mutual Fund            670.25
38 IIFCL Mutual Fund            603.31
39 Quant Mutual Fund            453.87
40 Taurus Mutual Fund            435.48

1 thought on “म्युच्यल फंड म्हणजे काय? – Best 20 म्युच्यल फंड mutual fund information in marathi”

Leave a Comment