Grey Market IPO काय आहे? – Grey Market IPO information in Marathi

Grey Market IPO माहिती – Grey Market IPO information in Marathi

2020 सालात जगभरात कोरोना नावाच्या जागतिक भयंकर महामारीने प्रवेश केला.ज्याचा परिणाम हा प्रत्येक ठिकाणी झाला होतो.

पण आपण शेअर बाजाराच्या दृष्टीकोनातुन याचा विचार करावयास गेले तर 2020 पासुन तर आत्तापर्यत बाजारात अनेक आयपीओ आले.

आपण रोज वर्तमानपत्रात तसेच टिव्हीवरील बातमीत बघत असतो की आज ह्या कंपनीचा आयपीओ बाजारात आला किंवा अमुक कंपनीचा आयपीओ बाजारात इतक्या दिवसांनी येणार आहे.तसेच लाँच होणार आहे.

आपल्याला देखील शेअर मार्केटशी आयपीओ संबंधित अशा बातम्या ऐकण्यात तसेच वाचण्यात रूची असेल तर आपण कधी तरी कोणाच्या तोंडुन किंवा वर्तमानपत्रात,टिव्हीवरील न्युजमध्ये एक शब्द नक्कीच ऐकला तसेच वाचला असेल तो grey market.

तेव्हा हा नवीन शब्द ऐकल्यावर आपल्या मनात याविषयी जाणुन घेण्याची उत्कंठा निर्माण होत असते.हे ग्रे मार्केट काय असते?याचे महत्व काय असते असे प्रश्न आपल्या मनात निर्माण होत असतात.

आपल्या मनात देखील असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि आपल्याला ग्रे मार्केटविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घ्यायची असेल तर आपण एकदम योग्य ठिकाणी आले आहात.

कारण आजच्या लेखात आपण grey market विषयी एकदम सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.

Grey market म्हणजे काय?

Grey market हे एक मार्केट आहे.जिथे सर्व ट्रेडर्स,इनव्हेस्टर्स अनौपचारीक पदधतीने कुठल्याही कंपनीच्या शेअर्सची ट्रेडिंग करत असतात.

आणि ही ट्रेडिंगची प्रोसेस कंपनीचे शेअर्स आयपीओ दवारे लाँच होण्याच्या आधीच पार पडत असते.

See also  इंग्रजी शिकण्यासाठी काही सोप्या टीप्स तसेच ट्रिक्स - Best tips and tricks for learning English in Marathi

ग्रे मार्केट हे एक अनधिकृत मार्केट असते जिथे सेबीचे कुठलेही नियम लागु होत नसतात.सेबी देखील अशा प्रकारच्या ट्रेडिंगसाठी कुठलीही जबाबदारी घेत नसते.

सेबीच काय तर इतर बाजार निरीक्षण संस्था देखील अशा व्यवहारांचा कुठलाही मागोवा घेत नसतात.हे मार्केट काही लोक आपापासातील परस्पर विश्वासावर चालवत असतात.

आणि सगळयात महत्वाचे म्हणजे जेव्हा एखादी कुठलीही कंपनी आपला आयपीओ मार्केटमध्ये लाँच करायला जात असते.

त्यापुर्वी त्या आयपीओची गणना करण्यासाठी आणि त्याची बाजारात काय मागणी आहे? हे जाणुन घेण्यासाठी मार्केटमधील खुप कंपन्या कुठल्याही आयपीओची टेस्टिंग ग्रे मार्केटच्या आधारे करत असतात.

Grey market premium म्हणजे काय?

ग्रे मार्केट प्रिमियम ही प्राईज असते ज्यात कोणत्याही कंपनीच्या शेअर्सची ट्रेडिंग ही ग्रे मार्केटमध्ये केली जात असते.

हे आपण एका उदाहरणासहित समजुन घेण्याचा प्रयत्न करूया.

  • समजा स्टाँक Y ची issue price 200 रूपये आहे.आणि ग्रे मार्केटमधील प्रिमियम देखील 200 रूपये आहे तर याचा अर्थ असा होत असतो की कुठलाही इन्वहेस्टर,ट्रेडर ते शेअर्स एकुण 400 रूपयांमध्ये(issue price 200+ premium price 200) खरेदी करायला तयार आहे.
  • जर बाजारातील एखाद्या IPO च्या एका शेअर्सची प्राईज100 रूपये इतकी असेल आणि बाजारात त्या IPO चा ट्रेंड घसरत असेल.ज्यामुळे ग्रे मार्केटमधील विक्रेते अशा आयपीओची अधिक विक्री करत असतात. अशा परिस्थितीत आपल्याला हे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये issue priceपेक्षा कमी दरात मिळत असतात.
  • कुठलेही शेअर issue price च्या खाली विकले जात असतील तर समजुन जावे की ते शेअर्स negative GMP वर ट्रेंड करत आहे.
  • समजा रिलायन्स निपा़ँनची issue price 200 रुपये इतकी आहे.आणि त्याचा ग्रे मार्केटमधील प्रिमियम हा 50 रुपये इतका आहे तर अशा परिस्थितीत GMP positive असतो.
  • आणि मग प्रिमियम हा पाँझिटिव्ह असल्यामुळे रिलायन्स निपाँन ह्या कंपनीचे शेअर्स 200+50=250 वर ट्रेडींग करतील
  • पण याच ठिकाणी रिलायन्स कंपनीचा issue price 200 आहे आणि जीएमपी 30 आहे आणि ग्रे मार्केट निगेटिव्ह असेल तर अशा परिस्थितीत रिलायन्स कंपनीचे शेअर्स विकत असलेल्या ट्रेडर्सचे शेअर्स हे 30 च्या सवलतीत ट्रेडिंग होतील.(200-30=170)
See also  G20 presidency - जी टवेंटी प्रेसीडेन्सी म्हणजे काय - G20 presidency meaning in Marathi

एक गोष्ट इथे आपण लक्षात घेणे फार गरजेचे आहे ती म्हणजे इथे GMP खुप अस्थिर असतो आणि जोपर्यत शेअर्सच्या व्यवहाराची पर्क्रिया स्टाँक एक्सचेंजवर सुरू होत नसते.तो पर्यत अस्थिरता कायम राहत असते.

Kostak rate कशाला म्हणतात?

कुठल्याही कंपनीचे शेअर्स सुचिबदध करण्याअगोदर इनव्हेस्टर त्याच्या आयपीओ अँप्लीकेशनची विक्री करून जे उत्पन्न प्राप्त करत असतो त्याला कोस्टक रेट असे म्हटले जाते.

ज्या इन्वहेस्टर्सला आयपीओ अलाँटमेंटची रिस्क घ्यायची नसते त्यांना हे खुप फायदेशीर ठरत असते.

यात जर एखाद्या इन्वहेस्टर्सने आयपीओसाठी अँप्लाय केला असेल पण त्याला आयपीओ मेंबरशीप घेण्याची ईच्छा नसेल तर तो इन्वहेस्टर त्याचे अँप्लीकेशन ग्रे मार्केटमधील इतर इच्छुक इन्वहेस्टर्सला विकु शकतो.

या प्रकरणात एका इन्वहेस्टर्सच्या जागी दुसरा इच्छुक इन्वहेस्टर आयपीओ अँप्लीकेशनची मेंबरशीप घेत असतो.ज्याच्या बदले मेन इन्व्हेस्टरला तो दुसरा खरेदी कर्ता,इन्वहेस्टर काही विशिष्ट रक्कम देखील देत असतो.

आणि या सगळयात मेन इन्वहेस्टरला आपली मेंबरशीप अँप्लीकेशन विकुन जी रक्कम प्राप्त होत असते तिलाच कोस्टक रेट असे म्हटले जात असते.

कोस्टक रेटच्या मुल्यात वेगवेगळया आयपीओनुसार बदल होत असतो.यात अँप्लीकेशन,मेंबरशीप खरेदी करत असलेल्या इच्छुक व्यक्तीला यात फायदा तसेच तोटा देखील होऊ शकतो.पण मेन इन्वहेस्टरला यात फिक्स कोस्टक रेटचा बेनिफिट मिळत असतो.

 

Nifty BEES म्हणजे काय ? गुंतवणूक कशी करावी ?

Gray market trading का केली जात असते?

  • ग्रे मार्केट ही कुठलीही नवीन संकल्पणा नाहीये फार पुर्वीपासुन ही संकल्पणा अस्तित्वात आहे
  • आणि याचा फायदा हा आहे की जर आपल्याला वाटत असेल की भविष्यात एखाद्या शेअर्सच्या किंमतीत वाढ होणार आहे.तर मग आपण ते शेअर्स आयपीओमध्ये लिस्ट होण्याच्या आधी त्याची खरेदी करू शकतो.
  • या शिवाय याचा अजून एक फायदा असतो शेअर बाजारात आयपीओ लिस्टेड होण्याआधी इन्वहेस्टर यातुन exit देखील करू शकतात.
  • जर समजा एखाद्या इन्वहेस्टरला काही कारणास्तव आयपीओसाठी अँप्लाय नही करता आला तर त्याला ग्रे मार्केटदवारे आयपीओ मध्ये गुंतवणुक करता येते.याचसोबत ज्या इन्वहेस्टर्सला जास्त शेअर्स खरेदी करायचे असतील ते देखील ग्रे मार्केटदवारे शेअर्सची खरेदी करू शकत असतात.
  • कुठल्याही कंपनीचे स्टाँक एक्सचेंजवर लिस्टेड होण्याआधी ग्रे मार्केट ट्रेडिंगमध्ये जात असतात.यादवारे अंडररायटर्सला आयपीओच्या valuation ची माहीती प्राप्त असते.
  • सोबतच अंडररायटर्सला कंपनीच्या शेअर्सचा मार्केट डिमांड आणि सप्लाय याविषयी माहीती प्राप्त होत असते.जेणे कंपनी तसेच ट्रेडर्सला भविष्यातील गुंतवणुकीची योजना ठरवायला मदत होत असते.
See also  आर्मीचा फुलफाँर्म - Army Full Form In Marathi

Grey market विषयी जाणुन घ्यावयाच्या काही महत्वपुर्ण बाबी –

आयपीओ ग्रे मार्केटचे रेट हे खुप अस्थिर असतात म्हणुन यात कधीही चढ उतार पाहायला आपणास मिळत असतो.त्यामुळे ग्रे मार्केट आयपीओ रेटवर आधारीत कुठल्याही प्रकारचा गुंतवणुकीचा निर्णय घेणे आपल्यासाठी घातक ठरू शकते.

आयपीओचे मार्केट रेट प्रत्येक मार्केटमध्ये चेंज होत असतात.

ग्रे मार्केटमधील प्रती शेअर आयपीओचे रेट आयपीओ जीएमपी म्हणुन ओळखला जात असतो.

ग्रे मार्केटमध्ये आयपीओ अँप्लीकेशनची विक्री करून इन्वहेस्टरला जी रक्कम मिळते ती कोस्टक रेट असते.

Gray Market हा आयपीओ मार्केटचा part आहे का?

मित्रांनो ग्रे मार्केट हा एक अनौपचारीक मार्केटचा प्रकार आहे.आणि आयपीओ मार्केट हे सेबीच्या मार्गदर्शक तत्वानुसार मार्केटमधून फंड गोळा करणयाचे अधिकृत तसेच मान्यताप्राप्त औपचारीक माध्यम आहे.

शेअर मार्केटमधील आयपीओ आपल्याला माहीत असतो पण आयपीओ मधील ग्रे मार्केट विषयी माहीती असणे देखील महत्वपुर्ण आहे.

Gray market विषयी वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न -FAQ

1)ग्रे मार्केट शेअर्स जारी करत नाही मग काय करते?

ग्रे मार्केट हा एक बाजार आहे जो विश्वासावर चालतो.हा काही व्यक्तींचा छोटासा गृप असतो जो वेगवेगळया प्राईजवर आयपीओ स्टाँकवर बोली लावत असतो आणि आँफर जारी करत असतो.

2) ग्रे मार्केटमधुन गुंतवणुकदार जास्त नफा कसा प्राप्त करू शकतात?

ग्रे मार्केट हे सेबीच्या नियमांच्या कक्षेबाहेर चालत असते.त्यामुळे यात सर्व व्यवहारफाँरवर्ड ट्रान्झँक्शनच्या स्वरुपात होत असतात.आणि यात प्रतिपक्ष रिस्कसाठी खुले असतात.

सूचीच्या किंमतीचे सूचक म्हणून आपण ग्रे मार्केटकडे पाहू शकतो.पुन्हा त्यांना जास्त गांभीर्याने घेऊ नये कारण अशा राखाडी बाजारातील किंमती देखील हेराफेरीच्या अधीन असतात.