रविवारच्या दिवशीच सुटटी का असते? – Why We Have Holiday On Sunday

रविवारच्या दिवशीच सुटटी का असते?  

 रविवार हा आपल्या प्रत्येकाच्या आवडीचा वार आहे.कारण ह्या दिवशी प्रत्येक कामाला सुटटी असते.

आणि ह्या दिवशी आपल्याला कामाची कुठलीही चिंता राहत नसते आणि भरपुर आराम करायला मिळतो.कुटुंबियांसोबत वेळ व्यतित करायला मिळतो.

आपल्या मनाला वाटेल ते आपण ह्या सुटटीच्या दिवशी करू शकतो.सकाळी उशिरा उठु शकतो.आपल्या घरच्यांसमवेत बाहेर फिरायला जाऊ शकतो.अशा खुप मनासारख्या गोष्टी आहे ज्या आपल्याला ह्या रविवारच्या सुटटीच्या दिवशी करता येत असतात.

पण कधी आपल्या मनात हा विचार येतच नसतो की आठवडयाचे एकुण सात दिवस असतात मग त्यात रविवारचाच दिवस सुटटीचा दिवस का असतो इतर दिवशी आपल्याला सार्वजनिक सुटटी का दिली जात नाही.

आजच्या लेखात आपण ह्याच प्रश्नाचे उत्तर जाणुन घेणार आहोत की रविवारच्याच दिवशी आपल्याला सुटटी का असते इतर दिवशी का नसते.

 

रविवारच्या दिवशीच सार्वजनिक सुटटी का असते?

रविवारच्याच दिवशी प्रत्येक कामाच्या ठिकाणी नोकरदारांना सार्वजनिक सुटटी का दिली जाते ह्यामागे एक कारण नसुन अनेक कारणे दडलेले आहेत.

आज आपण हीच सर्व कारणे जाणुन घेणार आहोत.

भारत हा एकमेव देश नाही जिथे रविवारच्या दिवशी सुटटी दिली जाते इतरही असे खुप देश आहेत जिथे रविवारच्याच दिवशी सुटटी असते.

भारतातच काही क्षेत्र असे देखील आहेत ज्यात रविवारी सुटटी न देता इतर दिवशी सुटटी दिली जाते.याचसोबत काही देश असे देखील आहेत जिथे रविवार सोडुन इतर दिवशी सुटटी असते.

आय एस ओ म्हणजेच (international standard of organization) प्रमाणित केले गेले आहे की रविवारचा दिवस हा आठवडयाचा शेवटचा दिवस मानला जाईल.आणि ह्याच दिवशी सगळयांना काँमन सुटटी राहील या बाबीस 1986 मध्ये मान्यता देण्यात आली होती.

  • पण यामागे मुख्य म्हणजे ब्रिटीशांना कारण ठरवले जाते.कारण 1846 मध्ये ब्रिटीश गव्र्हनर जनरलने हा आदेश सर्वात पहिले जारी केला होता.
  • ब्रिटनमध्ये सगळयात पहिले विदयार्थ्यांना रविवारच्या दिवशी सुटटी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
  • ज्याच्या मागे सुदधा एक कारण होते की जर रविवारच्या दिवशी विदयार्थ्यांना सुटटी दिली तर ह्या दिवशी त्यांना रोजच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करणे सोडुन काहीतरी नवीन क्रिएटिव्ह गोष्टी करता येतील.
  • ज्याने शिक्षणासोबत विदयार्थ्यांच्या क्रिएटिव्हीटीमध्ये देखील वाढ होत राहील.
  • पण याचठिकाणी भारतात आठवडयातुन एक दिवशी सुटटी प्राप्त करण्यासाठी खुप मोठा संघर्ष करावा लागला होता.आणि ही स्टोरी देखील खुप मजेशीर आहे.
  • जेव्हा भारत देश इंग्रजांच्या गुलामीत जगत होता.तेव्हा मिलमध्ये काम करत असलेल्या मजदुर वर्गाला एक दिवस देखील सुटटीचा दिला जात नव्हता.
  • पण याच ठिकाणी रविवारच्या दिवशी सर्व ब्रिटीश अधिकारी चर्चमध्ये जायचे आणि प्रार्थना करायचे.कारण ब्रिटीश लोकांमध्ये अशी मान्यता होती की देवाने काम करण्यासाठी फक्त आठवडयातील सहा दिवस दिलेले आहेत.आणि सातवा दिवस विश्रांतीसाठी बनवला आहे.
  • म्हणुन ब्रिटीश अधिकारीं स्वताला आठवडयातुन एक दिवस सुटटी देत होते.पण मजदुर वर्गाला एक दिवस देखील आराम करण्यासाठी सुटटी दिली जात नव्हती.
  • ही सर्व मिल कामगारांची दैना बघुन आणि त्यांच्यासोबत ब्रिटीश सत्तेकडुन केला जात असलेला अन्याय आणि भेदभाव बघुन तेव्हा मिल कामगारांच्या वतीने मिल कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी ब्रिटीश अधिकारींसमोर एक प्रस्ताव मांडला.
  • ज्यात स्पष्टपणे असे दिले गेले होते आठवडयातुन सहा दिवस काम केल्यानंतर एक दिवस तरी कामगारांना देखील सुटटी दिली जावी.
  • पण ब्रिटीश अधिकारींनी मिल कामगारांना आठवडयातुन एक दिवस सुटटी देण्यास नकार दिला ज्याचे परिणाम स्वरूप सर्व कामगारांनी ब्रिटीश अधिकारींच्या ह्या अन्यायकारक निर्णया विरूदध मोर्चा काढले.
  • आणि तब्बल सात वर्षाच्या आपल्या अधिकारासाठी केलेल्या मागणीनंतर तसेच संघर्षानंतर मिल कामगारांना आठवडयातुन एक दिवस सुटटी देण्यास मंजुरी देण्यात आली होती.
  • 10 जुन 1890 रोजी मिल कामगारांना रविवारची सुटटी मंजुर करण्यात आली होती.
  • 2015 ह्या साली 10 जुन रोजी सण्डे हाँलिडेचा 125 वा वर्धापण दिन साजरा करण्यात आला होता.
See also  एल आयसी आयपीओ वाटप LIC IPO allotment information in मराठी

पुणे शहरात रविवार हा वार मिसळवार म्हणुन देखील प्रचलित आहे.

पण आज ब्रिटीश सत्तेच्या जाळयातुन बाहेर निघून अनेको वर्षे लोटली गेली असुन देखील भारत सरकारने कधीही कुठल्याही प्रकारचा आदेश याबाबद अद्याप जारी केला नाही.त्यामुळे ब्रिटीश सत्तेत जी घोषणा करण्यात आली होती तिचेच पालन अजुनही केले जात आहे.

कोणत्या देशांमध्ये रविवारच्या दिवशी सुटटी नसते? -Why We Have Holiday On Sunday

याचठिकाणी काही असे देश।देखील आपणास दिसुन येतात जेथे रविवारच्या दिवशी सुटठी नसते.विशेषकरून मुस्लिम देशांमध्ये रविवारच्या दिवशी सुटटी नसते कार मुस्लिम देशांत शुक्रवारी म्हणजेच जुम्मे के दिन सुटटी दिली जाते.

 

याचसोबत नेपाळ,बांग्लादेश,मालदीव अशा एकुण बावीस देशांत शुक्रवारी किंवा शनिवारच्या दिवशी सुटटी दिली जाते.आणि सगळयात महत्वाची आणि आशचर्याची बाब म्हणजे पाकिस्तान जो मुस्लिम धर्मियांचा देश आहे तेथे आठवडयातील सात दिवसांत रविवारचाच दिवस सुटटीचा मानला जातो.

 

रविवारच्या सुटटी विषयीच्या धार्मिक मान्यता कोणत्या आहेत?

जेव्हा नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिल कामगारांना आठवडयातुन एक दिवस सुटटी दिली जावी असा प्रस्ताव अधिकारींसमोर ठेवला होता.

तेव्हा नारायण मेघाजी लोखंडे यांनी रविवारच्याच दिवशी कामगारांना सुटटी का दिली जावी याबाबद एक ठोस धार्मिक कारण देखील ब्रिटीश अधिकारींना सांगितले होते.

ज्यात असे दिले होते की रविवार हा हिंदु धर्मियांचे दैवत खंडोबाचा वार आहे.म्हणुन मिल कामगारांना देखील ब्रिटीश अधिकारींप्रमाणे रविवारच्याच दिवस सुटटी देण्यात यावी.

कारण ज्याप्रमाणे ब्रिटीश अधिकारी रविवारी चर्च मध्ये जाऊन जिजस समोर प्रार्थना करतात तशीच हिदुंना देखील आपल्या आराध्य दैवत खंडोबाचे दर्शन।घ्यायचे आहे आणि त्याच्याकडे प्रार्थना करायची आहे.म्हणुन मिल कामगारांना देखील रविवारच्याच दिवशी सुटटी दिली जावी.

रोमन कँथलिक आणि प्रोटेस्टंट ईसाई लोक देखील रविवारला देवाचा वार मानतात म्हणुन ईसाई देशात रविवारच्या दिवशी लोक चर्चमध्ये जात असतात.

रविवारच्या दिवशी सुटटी देण्याची प्रमुख कारणे :

  • जे लोक दिवसभर आठवडाभर सकाळ संध्याकाळ मेहनत करतात त्यांना एक दिवस मनसोक्त आराम करता यावा.
  • रोजचे दैनंदिन काम सोडुन आठवडयातुन एकदा तरी काहीतरी नवीन क्रिएटिव्ह गोष्टी आपण करायला हव्यात.
  • फँमिलीसोबत वेळ व्यतित करता यायला हवा.बाहेर फिरायला जाता यावे.
  • मंदिरात जाऊन सुटटीच्या दिवशी देवाची पुजा अर्चा करता यावी.आणि आपला मुड फ्रेश व्हायला हवा यासाठी देखील रविवारच्या दिवशी सुटटी दिली जाते.
See also  बिहार बोर्ड १०वी टॉपर लिस्ट २०२३ | Bihar Board 10th Topper List 2023 PDF In Marathi, PDF DOWNLOAD