महात्मा फुले यांच्या विषयी माहिती | Mahatma Phule information in Marathi

महात्मा फुले यांच्या विषयी माहिती | Mahatma Phule information in Marathi

११ एप्रिल भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण महात्मा फुले यांच्या सामाजिक अणि शैक्षणिक कार्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

महात्मा फुले हे भारतातील एक थोर समाजसुधारक,लेखक, विचारवंत,शिक्षणतज्ञ होते.

महात्मा फुले यांचा जन्म हा महाराष्ट्र राज्यात ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण नावाच्या एका गावात झाला होता.महात्मा फुले यांचे पुर्ण नाव हे ज्योतीराव गोविंदराव फुले असे होते.

महात्मा फुले यांच्या आईचे नाव चिमणाबाई असे होते तर वडिलांचे नाव गोविंदराव असे होते.खुप कमी वयात वय वर्षे तेरा असताना १८४० मध्ये महात्मा फुले यांचा विवाह सावित्रीबाईंशी झाला होता.

महात्मा फुले यांचे मुळ आडनाव गोर्हे होते पण शेवटच्या पेशव्यांच्या काळामध्ये महात्मा फुले यांचे वडिल अणि चुलते फुले वेचण्याचे काम करायचे म्हणून ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले होते.

Mahatma Phule information in Marathi

महात्मा फुले जयंतीच्या शुभेच्छा, संदेश 

जोतिराव नऊ वर्षांचे होते तेव्हाच त्यांच्या आईचे निधन झाले होते.

महात्मा फुले यांनी आपले प्राथमिक शिक्षण हे पुणे येथील स्काॅटिश मिशन हायस्कूल मधुन घेतले होते.महात्मा फूले लहानपणापासून बुदधीने अत्यंत तल्लख होते.म्हणुन अवघ्या पाच वर्षात त्यांनी आपला सर्व अभ्यासक्रम देखील पुर्ण केला होता.

महात्मा फुले शाळेत असताना एक अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून प्रख्यात होते.

महात्मा फुले यांना भारतातील लोकांमध्ये असलेले अज्ञान दारिद्रय आणि अणि जागोजागी केला जात असलेला जातीभेद मान्य नव्हता.

म्हणुन महात्मा फुले यांनी समाजातील ही विषमता जातीयभेद,अज्ञान दुर करण्याचा समाजात सुधारणा घडवून आणण्याचा जीवनभर प्रयत्न केला.समाजातील विषमता दूर करण्यासाठी अनेक महत्वाची पाऊले देखील उचलली.

महात्मा फुले यांनी समाजातील स्त्रीयांच्या शिक्षणावर विशेष भर दिला.सर्व खालच्या जातीतील मुलामुलींना देखील शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी त्यांनी जागोजागी शाळा देखील सुरू केल्या.

त्यांनी त्यांची पत्नी सावित्रीबाईंना देखील शिकवले अणि शिकवून पहिली स्त्री शिक्षिका बनवले.महात्मा फुले यांच्या ह्या महान कार्यात सावित्रीबाईं यांनी देखील त्यांना साथ दिली

महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या पुण्यातील बुधवार पेठ भिडेवाडा येथील शाळेतील अशिक्षित मुलींना शिकवण्याचे साक्षर करण्याचे काम सावित्रीबाई करत असत.

१८४८ मध्ये महात्मा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाईं समवेत पुणे येथील बुधवार पेठ येथे भिडे वाड्यात मुलींसाठी ही पहिली शाळा सुरू केली होती.हया शाळेत सर्व जातीच्या मुली होत्या.

महात्मा फुले यांच्या ह्या महान कार्यात त्यांना अनेक अडीअडचणींना अडथळ्यांना तोंड द्यावे लागले समाजाकडून त्यांच्या ह्या कार्यासाठी विरोध देखील केला गेला.

कारण त्याकाळी मुलींना जास्त शिकवले जात नव्हते.त्यांचे आयुष्य चुल मुल इथपर्यंत सिमीत असायच्या अशा परिस्थितीत समाजाच्या विरोधाला तोंड देत महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचे महान कार्य सुरू ठेवले.

जेव्हा सावित्रीबाईं मुलींना शिकविण्यासाठी जायच्या तेव्हा त्यांच्या ह्या कार्याला विरोध दर्शविण्यासाठी आजुबाजुचे लोक त्यांना शेणामातीचे गोळे देखील मारत असत.पण तरी देखील सावित्रीबाईं यांनी आपल्या कार्यात माघार घेतली नाही महात्मा फुले यांच्या सोबत मिळुन स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले.

कुटुंबातील एक महिला शिक्षित झाली म्हणजे पुर्ण कुटुंब शिक्षित होते.ज्ञान हीच खरी ताकद आहे.नीती हाच मानवी जीवनातील प्रमुख आधार असतो असे महात्मा फुले म्हणत असत.

समाजातील सामाजिक विषमता दूर करत महात्मा फुले यांनी तळागाळातील जनतेपर्यंत शिक्षण पोहचवण्याचे कार्य केले.

महात्मा फुले यांनी सावकारांकडुन उच्च जातीच्या लोकांकडुन‌ शेतकरी वर्गावर कशापदधतीने अन्याय केला जातो आहे कशी त्यांची पिळवणुक केली जात आहे हे सांगत शेतकरयांचे प्रश्न आपल्या शेतकरयांचा आसुड ह्या ग्रंथातुन मांडले.

खालच्या जातीतील लोकांना समान हक्क प्राप्त व्हावा म्हणून महात्मा फुले यांनी १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना देखील केली.सार्वजनिक सत्यधर्म हा ह्या समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो.

महात्मा फुले यांनी लिहिलेले इतर प्रसिद्ध ग्रंथ –

गुलामगिरी

अस्पृश्यांची कैफियत

शेतकरयांचा आसुड

तृतीय रत्न (नाटक)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडा

ब्राहमणाचे कसब

इशारा

सत्सार अंक १ अंक २

महात्मा फुले यांच्यावर थाॅमस पेन यांच्या विचारांचा अधिक प्रभाव होता.

महात्मा फुले यांनी एक मुलगा दत्तक देखील घेतला होता ज्याचे नाव यशवंत असे होते.

महात्मा फुले यांनी समाजातील सर्व अनिष्ट रूढी परंपरा यांना आळा घालण्यासाठी त्यांना समुळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले.

समाजातील स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवत त्यांनी समाजामध्ये असलेल्या अभागी महिलांकरीता बालहत्येला आळा घालण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह देखील सुरू केले.

महात्मा फुले यांनी समाजातील लोकांना विद्येचे महत्त्व पटवून दिले.

विदयेविना मती गेली
मतीविना नीती गेली
नीतिविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्तविना शुद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले ही महान शिकवण त्यांनी समाजाला दिली.

आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी समाजाची सेवा केली महात्मा फुले यांच्या ह्याच महान सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी समाजाने त्यांना महात्मा ही उपाधी देऊन सन्मानित केले होते.

२८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा फुले ह्या महान आत्म्याचा मृत्यू झाला.