डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहाची थोडक्यात माहिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहाची थोडक्यात माहिती

आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहाची माहिती पाहणार आहोत. भारतीय संविधानचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दरवर्षी १४ एप्रिल ला जगात मोठ्या उत्सहाने साजरी केली जाते. महान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 👉 HD फोटो डाऊनलोड करुन ते तुम्ही तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करुन मोठ्या उत्साहात जंयती साजरी करु शकता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहाची थोडक्यात माहिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहाची थोडक्यात माहिती

अंबादेवी मंदिर सत्याग्रह

हिंदू धर्म हा प्राणी मात्रावर दया करावी, सर्व मानब्’हे ईश्वराची लेकरे अशी शिकवण देतो. परंतु याच
हिंदू धर्मात त्या ईश्वरांची पूजा करणासाठी देखील. बहुसंख्य दलितांचा अधिकार नाकारला जाई. कारण
अस्पृश्यांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिरे ,बाटतील सामाजिक अनर्थ घडेल अशी एकेकाळी समजूत
होती. ही गोष्ट बाबासाहेबांना मान्य नव्हती. धर्म समानतेसाठी ज्याप्रमाणे सत्याग्रह कराबा लागला.
त्याचप्रमाणे हिंदू मंदिरांतीलही प्रवेशासाठीही’करावा लागेल याची जाणीव बाबासाहेबांना झाली. म्हणून डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रत्रेशासाठी’सत्याग्रह केला. देवाच्या दर्शनासाठी हा मंदिर सत्याग्रह नव्हता
तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात’ग्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हा मंदिर
प्रवेशाचा संघर्ष होता. हिंदू-दलिंताच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मुर्ती अपवित्र वा अशुद्ध होत
नाही, हे ही सिद्ध .करण्याचा. हेतू या चळवळीमागे होता. अमरावती येथील प्राचीन ‘अंबादेवी मंदिरात’
प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेंबआंबेडकरांचा हा सत्याग्रह डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली २६ जून
१९२७ रोजी सुरूध्झालो. या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान
कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त
दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा मराठीत

पर्वती मंदिर सत्याग्रह

अमरावती नंतर पुण्यातील ‘पर्वती टेकडीवरील मंदिर’ अस्पृश्यांना खुले नव्हते. हा बाबासाहेबांचा दुसरा मंदिर
सत्याग्रह आहे. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम एम जोशी, ना ग गोरे, र के खाडिलकर व
शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला त्यांचा अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून’
ट्रस्टने अर्ज फेटाळला. यानंतर मंदिर प्रवेशासाठी एक सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम कांबळे,
(अध्यक्ष), पांना राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. या सर्वांनी १३ ऑक्टोंबर १ ९२९९
रोजी पुणे पर्वती सत्याग्रह सुरू केला. यात शिवराम कांबळे, एम एम जोशी, ना ग गोरे, र के खाडिलकर,
विनायक भुस्कुटे, पांना राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित हजारों स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला
होता. सवर्ण हिंदूनी सत्याग्रहींबर शिव्या व काठ्यांचा वर्षाव केला असला तरी सामाजिक समतेची मुहूर्तमेढ
रोवण्यासाठी केलेला हा एक क्रांतिकारी प्रयत्न इतिहास विसरू शकणार नाही.

काळाराम मंदिर सत्याग्रह

काळाराम मंदिर सत्याग्रह

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक मुक्कामी काळाराम मंदिर सत्याग्रहाची घोषेणा केली. २ मार्च १९३० ही
सत्याग्रहाची तारीख निश्चित झाली. सत्याग्रही कमिटीचे अध्यक्ष म्हणून केशव नारायण वर्धेकर ऊर्फ बुवा यांची
निवड केली होती. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सचिव होते,.तर नाशिकचे शंकरराव गायकवाड हे कमिटीचे
सभासद म्हणून समाविष्ट झाले होते. या कमिटीतर्फे महाराष्ट्रभर’सत्यांग्रहाबद्दल जनजागृती करण्यात आली. या
सत्याग्रहाची संपूर्ण जबाबदारी शंकरराव गायकवाड यांच्यांकडे.होती/ शंकरराव गायकवाड व उपस्थित सर्व
सत्याग्रहींना पोलिसांनी बेदम मारहाण केली. ब्रिटिश जिल्हाधिकौरी” गार्डन रामकुंडावर आले. सत्याग्रहींचा जोश
व दृढ निश्चय पाहन त्यांनी रामकुंड व राममंदिर जनतेसाठी खुले करण्याचे आश्वासन दिले.