बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना गुरू का मानले?
आपण जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती जाणून घेण्यासाठी विविध शालेय अभ्यासक्रमातील धडे संदर्भ ग्रंथ वाचतो.विविध माध्यमांद्वारे बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती गोळा करतो.
तेव्हा आपणास त्यात एक वाक्य आवर्जून वाचायला मिळत असते ते म्हणजे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले यांना आपला गुरु मानले होते.
पण जेव्हा आपण हे वाचतो की बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना आपला गुरु मानले होते.
तेव्हा आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण होत असणार तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना आपला गुरु का मानले?
यामागचे कारण काय होते हेच कारण आजच्या लेखात आपण जाणुन घेणार आहोत.
बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना आपला गुरु का मानले ह्या प्रश्नाचे उत्तर आपणास १९४७ मध्ये प्रकाशित झालेल्या हु वेअर शुद्राज ह्या बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या एका ग्रंथातुन प्राप्त होते.
हु वेअर शुद्राज ह्या पुस्तकाच्या सुरुवातीला दिलेल्या एका अर्पण पत्रिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी असे लिहिलेले आहे की
भारतात एक महान शुद्र आहे ज्याने वरच्या जातीतील लोकांकडुन त्यांच्यावर केल्या जात असलेल्या अन्यायाची त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून दिली.
भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतुन मुक्त करण्यापेक्षा येथील सामाजिक लोकशाही बळकट करणे आवश्यक आहे हे महात्मा फुले यांनी समजावले होते.हे सत्य निदर्शनास आणून दिले ते महात्मा फुले होते.
देशातील धार्मिक सांस्कृतिक तसेच सामाजिक गुलामगिरी बाबत जेव्हा कोणाला माहीतीही नव्हते ह्या गुलामगिरीची आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव देखील कोणाला नव्हती अशा वेळी महात्मा फुले यांनी आपल्या विविध ग्रंथांच्या लेखणीतून ही बाब सर्वांच्या लक्षात आणुन दिली.अस्पृश्यांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून दिली.हया समाजप्रबोधनाच्या कार्यामध्ये महात्मा फुले यांना अनेक अडीअडचणींना अडथळ्यांना सामोरे जावे लागले.
अनेकदा त्यांच्यावर त्यांच्या ह्या कार्यामुळे हल्ले देखील करण्यात आले विविध पद्धतीने त्रास दिले गेले.तरी देखील महात्मा फुले हे डगमगले नाहीत हिमालय पर्वताप्रमाणे ते आपल्या कार्यावर ठामपणे उभे होते.
आपल्या ह्या सामाजिक कार्यात महात्मा फुले यांनी सर्व शुद्र, स्त्रिया अस्पृश्य जातीतील लोक यांना माणसाप्रमाणे जगण्याचा हक्क प्राप्त व्हावा म्हणून यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला सदैव झटत राहिले.
सामाजिक सबलीकरणासाठी तसेच सामाजिक लोकशाही सशक्त करण्याकरीता मुलींनी किती सुंदर कार्य केले आहे हे सर्व मुद्दे आजवर कोणी जगासमोर मांडु शकले नाही हे मुददे प्रश्न प्रथमतः महात्मा फुले यांनी भारतात मांडले.
म्हणुन बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील प्रथम समाजसुधारक, क्रांतिकारक म्हणुन महात्मा फुले यांचा उल्लेख केला होता.
हेच कारण आहे की बाबासाहेब आंबेडकर सारख्या बुद्धीवादी नेत्याला महामानव महात्मा फूले भावले अणि त्यांनी महात्मा फुले यांना आपला गुरु म्हणून स्वीकारले होते.
बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना आपला गुरु मानुन महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारी हीच सामाजिक लोकशाही आपल्या संविधानाच्या माध्यमातुन समाजात रूजवण्याचा जीवनभर प्रयत्न केला होता.