विदयार्थ्यांनी दहावी बारावीनंतर स्पर्धा परिक्षेची तयारी करायला हवी का? -What is the Right Time for Preparation for Civil services exams

विदयार्थ्यांनी दहावी बारावीनंतर स्पर्धा परिक्षेची तयारी करायला हवी का?What is the Right Time for Preparation for Civil services exams

 

आज एम पी एससी युपी एससी सारख्या स्पर्धा परिक्षांच्या क्षेत्रात दिवसेंदिवस स्पर्धा वाढतच चाललेली आहे.ज्यामुळे येथे यश मिळण्याची अनिश्चितता ही वाढतच चाललेली आहे.

ज्यामुळे आपल्याला प्रत्येकाला हा प्रश्न पडत असतो की दहावी बारावीनंतर आपण स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करावा की नाही?कारण खुप जण असे आहेत जे कित्येक वर्षापासुन स्पर्धा परिक्षेसाठी प्रयत्न करत आहेत पण अजुनही त्यांना यश प्राप्त झालेले आपणास दिसुन येत नाही.

ज्यामुळे आपल्या मनात खुपदा हा संभ्रम निर्माण होत असतो.की इतक्या वर्षापासुन प्रयत्न करत असलेल्या विदयार्थ्यांना जर स्पर्धा परिक्षेत यश प्राप्त होत नाहीये तर आपल्याला झटक्यात यश कसे प्राप्त होईल?

म्हणुन आजच्या लेखात दहावी बारावीनंतर आपण स्पर्धा परिक्षेची तयार करायला हवी का नाही?हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.जेणेकरून विदयार्थ्यांना ह्या दविधा मनस्थितीतुन बाहेर पडण्यास मदत होईल.आणि त्यांना आपल्या करिअरच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेता येईल.

विदयार्थ्यांनी दहावी बारावीनंतर स्पर्धा परिक्षेची तयारी करायला हवी की नाही?Preparation for Civil services exams after 10 or12 th  standard

  • दहावी आणि बारावी हा प्रत्येक विदयाथ्याच्या जीवणातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा असतो.कारण यानंतरच आपल्या जीवनाला एक वेगळी दिशा प्राप्त होत असते.
  • आणि सध्या विदयाथ्यांच्या समोर करिअरसाठी विविध क्षेत्रे ही आँप्शन म्हणुन असतात.ज्यात स्पर्धा परिक्षा हे अत्यंत बेस्ट आँप्शन आहे जे विदयार्थी करीअरसाठी अधिक प्रमाणात निवडत असतात.
  • पण स्पर्धा परिक्षेची आधीपासुन चांगली पुर्वतयारी करण्यासाठी आपण कोणती शाखा निवडायला हवी?तसेच दहावी बारावीपासुन स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाची सुरूवात कशी करावी?असे अनेक प्रश्न पालक वर्गापुढे तसेच विदयार्थी वर्गाकडे उभे ठाकलेले असतात.
  • आणि खरे पाहायला गेले तर दहावी बारावीत शिकत असलेल्या फार मोजक्या विदयार्थ्यांना आपल्या पुढच्या करिअरचे निर्णय घेण्याचे ज्ञान असते.तसेच तेवढा अनुभव प्राप्त असतो म्हणुन ह्या काळात बहुतेक विदयार्थ्यांच्या करिअरचे निर्णय त्यांचे पालक घेत असतात.
  • आणि विदयार्थ्यांच्या जीवणाचा हा एक टर्निग पाँईट असल्यामुळे इथे विदयाथ्यांच्या मनात वेगवेगळया क्षेत्रात करिअर करण्याची आवड निर्माण होत असते.म्हणुन पालकांनी विदयार्थ्यांची आवड जाणुन न घेता कोणताही निर्णय घेणे देखील अडचणीचे कारण ठरू शकते.
  • विदयार्थ्यांनी असे क्षेत्र निवडायला हवे ज्याची त्यांना मनापासुन आवड आहे.आणि ज्या क्षेत्रात ते शेवटपर्यत तग धरून आवडीने कार्य करू शकतात.पण आपला प्रत्येक मित्र मैत्रीण स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करतो आहे हे बघुन त्याक्षेत्रातील चैन चंगळ तसेच लाईफ स्टाईल, रूबाब बघून बरेच विदयार्थी यात उतरत असतात.
  • आणि मग थोडे दिवस अभ्यास केल्यावर त्यांना लक्षात येते की हा एवढा प्रचंड अभ्यास आपल्यातुन पेलणार नाही आणि अशा वेळी बरेच विदयार्थी निराश होऊन जातात.
  • म्हणुन कोणतेही क्षेत्र निवडत असताना विदयार्थ्यांनी आपल्या इतर मित्र मैत्रीणींची नक्कल करू नये ते करता आहे म्हणुन आपण पण तेच करावे असा प्रकार करू नये.
  • खुपजण तर फक्त अधिकारीचा रूबाब, ऐट त्याची लाईफस्टाईल,पगार हे बघुन ह्या क्षेत्रात उतरत असतात जे अत्यंत चुकीचे आहे.
  • म्हणुन करिअरचे क्षेत्र निवडत असताना विदयार्थ्यांनी विचारपुर्वक निर्णय घ्यायला हवा.आणि आपल्यातुन शक्य होत नसेल तर करिअर तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.कोणतीही घाई करू नये.
See also  रॅमन मॅगसेसे पुरस्कार विषयी माहिती -Ramon Magsaysay award information in Marathi

विदयार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासास सुरूवात कधी करावी?Right Time for Preparation for Civil services exams

  • खुप विदयार्थ्यांचा हा एकच प्रश्न असतो की आम्ही दहावी बारावी नंतर स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाला सुरूवात कधीपासुन करावी?
  • मित्रांनो स्पर्धा परिक्षा देण्यासाठी आपले ग्रँज्युएशन पुर्ण असणे गरजेचे असते.किंवा आपण ग्रँज्युएशन पुर्ण करण्याच्या फायनल ईयरला असणे गरजेचे आहे.तसेच आपले वय 21 असणे देखील गरजेचे आहे.तेव्हाच आपण स्पर्धा परिक्षा देऊ शकतो.
  • आणि खर म्हणजे स्पर्धा परिक्षेमध्ये सर्व प्रकारच्या शालेय तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रम विचारला जात असतो.जो आपण लगेच दहा पंधरा दिवसात पुर्ण करू शकत नाही.
  • याची तयारी करण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक ते दोन वर्ष कठोर मेहनत करावी लागत असते.पहिली पासुन ते ग्रँज्युएशनच्या लास्ट इयर पर्यतच्या सर्व अभ्यास क्रमाची(एन्सीआरटीची) उजळणी करावी लागत असते.
  • त्यामुळे एकाच वेळी सर्व विषयांचा अभ्यास करून स्वतावर मानसिक तसेच शारीरीक तणाव न आणता विदयाथ्यांनी आधीपासुन म्हणजेच बारावीनंतर थोडा थोडा अभ्यास करत राहायला हवा.जेणेकरून ग्रँज्युएशन पुर्ण होईपर्यत तीन वर्षात त्यांची सर्व तयारी उत्तम पदधतीने होऊन जाते.नंतर त्यांच्यावर अभ्यासाचा जास्त लोड देखील येत नसतो.
  • याचसोबत अधून मधुन बँकेच्या,रेल्वेच्या,पोस्टाच्या अशा विविध जागांसाठी भरती निघत असते ज्याची परिक्षा देखील विदयार्थ्यांना देता येते.
  • याने विदयार्थ्यांचा स्पर्धा परिक्षेचा अभ्यास देखील चालू राहतो आणि इतर सरकारी भरतींच्या परिक्षा देणे देखील चालू राहते.याने विदयार्थ्यांना परिक्षेत कसे प्रश्न विचारले जातात याचा अंदाज येत असतो.
  • त्यातच एखाद्या ठिकाणी लक लागले तर त्यांची एखाद्या परिक्षेत पास होऊन बँकेत तसेच रेल्वे इत्यादी ठिकाणी नोकरी देखील लागुन जात असते.
  • म्हणजेच याचाच अर्थ आपण जरी अधिकारी पदासाठी तयारी करतो आहे तरी आपण त्याच्याशी संबंधित किरकोळ परिक्षा देत राहिलो तर आपला परिक्षेचा सराव देखील होतो आणि एखाद्या ठिकाणी लक लागुन आपली एखाद्या चांगल्या जागेवर निवड देखील होऊ शकते.
See also  गूगल डूडल - सुंदर आणि आकर्षक - नवीन वर्षाच्या पुर्व संध्येला गुगलने तयार केले डूडल  - New Year's Eve: Google doodle ready to welcome 2022

स्पर्धा परिक्षेत यश नाही मिळाले तर विदयार्थ्यांनी काय करावे?

 

  • आज प्रत्येकाला मोठा अधिकारी व्हायचे आहे स्पर्धा परिक्षेत पहिल्या क्रमांकाने टाँप टेनमध्ये पास व्हायचे असते म्हणुन एकाच पदासाठी लाखो जण प्रयत्न करत असतात त्यातही लाख जणांमध्ये फक्त मोजक्याच एक दोन जणांना,कँडिडेटला ते पद प्राप्त होत असते.
  • मग अशा परिस्थितीत बाकींच्यानी काय करावे हा प्रश्न पडत असतो कारण स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात असेही व्यक्ती आपणास दिसून येतात जे पाच ते सहा वर्षापासुन प्रयत्न करता आहे पण त्यांना यश प्राप्त होत नाही.कारण यात निवडुन येण्यासाठी खुप मोठी स्पर्धा देखील असते.त्यामुळे शंभर टक्के यश प्राप्त होईलच अशी कोणतेही गँरंटी नसते.
  • अशी परिस्थिती जर आपल्यावर आली आणि आपली निवड नाहीच झाली तर आपल्याकडे दुसरा मार्ग म्हणजेच प्लँन बी देखील तयार असायला हवा.
  • म्हणजेच आपण शिक्षण करताना असे क्षेत्र निवडुन शिक्षण करायला हवे ज्यात केलेल्या शिक्षणाच्या बळावर त्यातील अनुभव आणि ज्ञानाच्या बळावर आपण एक चांगली तसेच उत्तम नोकरी प्राप्त करू शकतो किंवा स्वताचा एखादा बिझनेस देखील सुरू करू शकतो.
  • ज्या विदयार्थ्यांचे ग्रँज्युएशन झाले आहे आणि त्यांनी ज्या क्षेत्रात आपले ग्रँज्युएशन पुर्ण केले आहे त्या क्षेत्रात ते विविध करिअरच्या संधी प्राप्त करू शकतात
  • उदा बी ए पुर्ण केलेला विदयार्थी स्पर्धा परिक्षेत यश नाही मिळाले तर बीए च्या बेसवर प्राथमिक कक्षेत विदयार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक म्हणुन लागु शकतो किंवा अजुन शिक्षण करून एम ए बीड सेट नेट करून प्राध्यापक बनू शकतो.
  • बीकाँम सायन्स पुर्ण केलेले विदयार्थी स्पर्धा परिक्षेत यश नाही मिळाले तर आपल्या क्षेत्राशी संबंधित इतर करिअरच्या संधींचा लाभ घेऊ शकतात.
  • खुप विदयार्थी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यात पदवीच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करत असतात अशा विदयार्थ्यांनी आपल्या पदवीच्या शिक्षणाकडे पहिले लक्ष द्यायला हवे कारण समजा जर भविष्यात आपल्याला स्पर्धा परिक्षेत यश प्राप्त झालेच नही तर आपण पुर्ण केलेल्या पदवीच्या बळावर इतर करिअरच्या संधी शोधु शकतो.
See also  रॅमन मॅगसेसे पुरस्कार विषयी माहिती -Ramon Magsaysay award information in Marathi

स्पर्धा परिक्षेत यश प्राप्त करण्यासाठी विदयार्थ्यांनी कोणत्या शाखेची निवड करावी?

 

  • कला विभागात शिक्षण घेतलेले विदयार्थी स्पर्धा परिक्षेकडे आधी अधिक प्रमाणात वळत होते.
  • पण स्पर्धा परिक्षेत आज कला विभागात शिक्षण घेतलेले विदयार्थीच नाही तर आज अभियांत्रिकी वैदयकीय क्षेत्रात शिक्षण पुर्ण केलेले विदयार्थी देखील वळताना दिसुन येत आहेत.
  • आणि स्पर्धा परिक्षेत आता सर्व शाखेचा अभ्यासक्रम समाविष्ट केला जातो आहे ज्यात कला वाणिज्य अभियांत्रिकी इत्यादींचा समावेश होतो.
  • त्यामुळे कोणत्याही शाखेतील विदयार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळुन उत्तम यश संपादीत करू शकतात यासाठी आपण कला शाखेत शिक्षण घ्यायला हवे असे काही नसते.

1 thought on “विदयार्थ्यांनी दहावी बारावीनंतर स्पर्धा परिक्षेची तयारी करायला हवी का? -What is the Right Time for Preparation for Civil services exams”

Comments are closed.