World Book Day Matathi Quotes – भारतातील महान व्यक्तींचे ग्रंथा विषयी असलेले महान विचार – Inspirational thoughts about books in Marathi by greatest Indian legends

भारतातील महान व्यक्तींचे ग्रंथा विषयी असलेले महान विचार Inspirational thoughts about books in Marath by greatest Indian legends

आज 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपण आपल्या भारत देशातील जगातील काही महान विचारवंत यांच्या ग्रंथाविषयीच्या मतांचा विचारांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

1)मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक जास्त आवडतो.

-बाबासाहेब आंबेडकर

2) पुस्तकांच्या सहवासामध्ये मला ज्ञानाबरोबर नेहमीच आनंद प्राप्त झाला आहे.माझ्याकडे 50 हजार पुस्तकांचा संच आहे अणि हीच माझी सर्वात मोठी ठेव आहे.

ग्रंथालयात ग्रंथांसोबत व्यतीत केलेला प्रत्येक क्षण अत्यंत मौजेचा अणि आनंदाचा असा आहे.

-डाॅ एपीजे अब्दुल कलाम

3) देशातील सर्व संपत्ती माझ्या पायीशी आली तरी मी माझे वाचन प्रेम कधीच सोडणार नाही.

-इतिहासकार गिबेन

4) पुस्तके धर्म कधीच बनवत नसतात.परंतु धर्म पुस्तके बनवत असतात.कोणत्याही पुस्तकाने कधीही परमेश्वराची निर्मिती केली नाही.पण देवाने सर्व महान पुस्तकांना प्रेरित केले आहे.

-स्वामी विवेकानंद

5) अहिंसा हा माझ्या पुस्तकाचा पहिला अणि शेवटचा लेख आहे.

-महात्मा गांधी

6) एखादा खरा प्रेमी ज्या उत्कटतेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.

-बाबासाहेब आंबेडकर

7) पुस्तक वाचनाने माणूस जुना राहत नाही तो अधिक नवा बनत जातो.

-गोपाळ गणेश आगरकर

8) जर तुमच्याकडे दोन रूपये शिल्लक असतील तर एक रूपयात भाकर विकत घ्या अणि एक रूपयाचे पुस्तक विकत घ्या.

कारण भाकर आपल्याला जीवन जगण्यास मदत करेल अणि पुस्तक आपणास कसे जगावे हे शिकवेल.

-बाबासाहेब आंबेडकर

9) एक मंदिर बांधणे म्हणजे भीक मागण्यासाठी लाखो भिकारी तयार करणे आहे अणि एक ग्रंथालय बांधणे म्हणजे लाखो विदवानांची निर्मिती करणे आहे.

-बाबासाहेब आंबेडकर

10) एक चांगले पुस्तक हजारो मित्रांच्या समान असते.

-डाॅ एपीजे अब्दुल कलाम

11) चांगली पुस्तके मनाला प्रगल्भ करतात, वाईट पुस्तके आत्म्याला प्रदूषित करतात.

See also  किती बोलावे,कसे बोलावे अणि कधी बोलावे? बोलण्याची उत्तम कला कौशल्य कसे आत्मसात करावे?Art of speaking,Advanced communication skills

-अब्राहम लिंकन