डाळिंब खाण्याचे आरोग्यदायी फायदे (रस,साल,फळ व पान) – Pomegranate fruit health benefits Marathi information

डाळिंब खाण्याचे आरोग्यदायी फायदे – Pomegranate fruit health benefits Marathi information

 

डाळिंब या फळाच  आहारातील महत्व असामान्य आहे आणि औषधी म्हणून अतिशय महत्त्वाचे फळ आहे. महाराष्ट्र राज्य डाळिंब उत्पादनात भारतात पहिले आहे. महाराष्ट्राशिवाय गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, हिमाचल प्रदेश व आसाम या राज्यांतही डाळिंब लागवडीचे प्रमाण वाढत आहे.

  • डाळिंब हे फळ अतिशय पौष्टिक असून त्यामध्ये पाणी, कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, तंतुमय पदार्थ लोह, स्फुरद, चुना, रिबोफ्लेवीन आणि उष्मांक आढळतात.
  • डाळिंब हे औषधी म्हणूनही अतिशय उपयोगाचे आहे कारण हे तुरट, आंबट, मधुर, तृप्रिकारक, स्निग्ध, विपन, ग्राही, राद, उष्ण, रुचकर, लघु आणि अग्निदीपक, बलप्रद, अतिसारनाशक, मलबाधक, पित्तनाशक, दिपाहारक, कृमिनाशक असून
  • कफ-खोकला, श्रम, मुखरोग, कंठरोग, हृदयरोग, पित्त, दाह, तहान,ज्वर, वायू, आमांश, अतिसार यांचा नाश करते.
  • डाळिंबाच्या पिकलेल्या फळाशिवाय त्याच्या सालीचा आणि मुळांचाही औषधी म्हणून उपयोग होतो.
  • हे फळ अनेक रोगावर उपायकारक आहे. जसे की- त्रिदोष तहान, मुख, कंठरोग, हृदयरोग, आमांश, अतिसार आदींसाठी डाळिंबाचा चांगला उपयोग होतो.
  • फळाच्या सालीचा वापर अतिसार, संग्रहणी, रकती अतिसार, उपदंश, खोकला या विकारांमध्ये होतो.
  • फळाचा रस तापातील तहान भागविण्यासाठी, ताप कमी करण्यासाठी आणि हृदयरोगात शक्‍ती प्रदान करण्यासाठी होतो. फळाच्या रसाने हृदयरोग होत नाही.
  • पोटातील आग शमते. घशाचे आणि मुखातील रोग बरे होतात.
  • रसाच्या सेवनाने पचनसंस्थेवर भार न पडता शरीराला पोषक द्रव्ये उपलब्ध होतात. डाळिंबाचा रस पाचक असून, रक्‍त वाढविण्यात व तेज आणि उत्साह वाढविण्यात मदत करतो.
See also  व्हिनेगर म्हणजे काय? Vinegar meaning in Marathi

डाळिंब फळाच्या महत्व – Pomegranate plant importance as whole plant   

  • डाळिंबाच्या मुळ्या या जंतुनाशक आहेत.
  • डाळिंबाची साल आणि बियांचे चूर्ण वातीच्या कफावर गुणकारी आहे.
  • डाळिंबाची अपक्क फळे पचनास मदत करतात. तसेच शक्तिवर्धक असून, उलट्यांवर गुणकारी आहेत. जठरांची सूज, घसादुखी, हृदयविकार आणि लहान-मोठ्या आतड्यांच्या पेशींच्या आकुंचन-प्रसरणाचे कार्य पिकलेले
  • डाळिंब फळ करते. याशिवाय, शक्तिवर्धक आणि तहान भागविणारे आहे.
  • डाळिंबाच्या नियमित सेवनाने मेंटूचे आजार, लिहाच्या तक्रारी, मूत्रपिंडाचे विकार उद्‌भवत नाहीत. डाळिंबाच्या फळाची साल, फूल, लग, धणे, मिरी किंवा दालचिनी यांचे मिश्रण अतिसारावर गुणकारी आहे.
  • पिकलेल्या फळातील बिया आणि रस पोटातील वायू कमी होण्यास मदत करतात.
  • अरबस्तानात डाळिंबाच्या मुळाची साल टेपवर्म मलावरोध दूर होण्यासाठी मऊ बियांचे डाळिंब खूप उपयुक्त आहे. या फळात स्निग्धाचे प्रमाण कमी असल्यामुळे डाळिंब खाऊन कधीही मेदाची वृद्धी होत नाही. या फळामध्ये पोटॅशियमचे प्रमाण भरपूर आहे.
  • त्यामुळे डाळिंबाच्या सेवनाने पोटॅशियममुळे हृदय कार्यक्षम व निरोगी राहते.

डाळिंब फळाच्या रसाचे फायदे – Pomegranate juice  health benefits 

 

डाळिंब फळाच्या रसाचे फायदे - Pomegranate juice health benefits

 

  • गोड डाळिंबाचा रस हे तृप्त करणारे पेय आहे.
  • रस पित्तनाशक आहे.
  • रसातील क्षुधावर्धक गुणामुळे भूक वाढते आणि पचन व्यवस्थित होते.
  • रस सप्तधातुवर्धक आणि बलदायी आहे.
  • रस हृदयरोगनाशक आहे.
  • रसाचे सेवन खडीसाखरेबरोबर केल्यास पोटातील जळजळ, आंबट
  • ढेकर आणि लघवीची आग कमी होते.
  • पचनसंस्थेला अपोषक आहारामुळे आलेली विकृती कमी करण्यास गुणकारी आहे.
  • ताप अधिक वाढल्यास घशातील कोरड, लघवीचा त्रास आणि
  • जळजळ कमी करण्याकरिता डाळिंवाचा रस उपयुक्‍त आहे. शरीरातील उष्णतेचे विकार कमी करतो.

फळाच्या रसातील ग्लुकोज व फ्रुक्टोजच्या साखरेमुळे रसाचे सेवन केल्यास लगेच ताजेतवाने वाटते.

  • कृष्ठरुग्णंना डाळिंबरस बल प्रदान करतो.
  • दीर्घ उपवासाला हे फळ फारच उपकारक आहे.
  • फळाचा रस यकृत, हृदय व मेंदूचे आजार कमी करतो व कार्यक्षमता वाढवितो.
  • फळाच्या रसाने लहान मुलांचा गोवर बरा होतो.
  • हा रस हृदयरोगरोधक व रोगप्रतिकारक आहे.
  • डोळे आल्यास रसाचे दोन थेंब डोळ्यांत टाकल्यास जळजळ थांबते.
  • रक्‍तपिती या रोगावर रस गुणकारी आहे.
  • डाळिंबाचा रस उच्च रक्तदाबावर उपयोगी आहे.
  • डाळिंबरस ज्वरनिहारक व बलदायक आहे.
  • डाळिंबरस कफनाशक असून, त्याचे सेवन कोणत्याही दिवसांमध्ये उपयोगी आहे.
  • डाळिंबरसातील टॅनिन व अँक्झालिक आम्ल कफनाशक आणि अनेक व्याधींवर गुणकारी आहे.
See also  दही खाण्याचे आरोग्यदाही फायदे -Health benefits of eating curd daily

डाळिंबातील घटकद्रव्ये : – Pomegranate Nutrition chart  

  • पाणी- ७८ टक्के
  • प्रथिने -0.६ टक्के
  • स्निग्ध पदार्थ -०.१ टक्‍के
  • कर्बोदके -१४.५ टक्के
  • तंतुमय पदार्थ- ५.१ टक्के
  • खनिजे -०.७टक्के
  • चुना -१० मि.ग्रॅम १०० ग्रॅम
  • लोह -०.२ मि.ग्रॅम./१०० ग्रॅम
  • स्फुरद -७० मि.ग्रॅम./१०० ग्रॅम
  • सोडियम- ०.९ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम
  • पोटॅशियम- १३ मि.ग्रॅम १०० ग्रॅम
  • कॉपर -०.२ मि.ग्रॅम १०० ग्रॅम
  • गंधक- १२ मि.ग्रॅम /१०० ग्रॅम
  • क्लोरीन -२ मि.ग्रॅम./१०० ग्रॅम
  • ऑक्झालिक असिड -१४ मि.ग्रॅम /१०० ग्रॅम
  • थायामीन- ०.०६ मि.ग्रॅम /१०० ग्रॅम
  • रायबोफ्लेविन -०.१ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम
  • निकोटीक अँसिड ०.३ मि.ग्रॅम /१०० ग्रॅम
  • व्हिटॅमीन के -१४ मि.ग्रॅम /१०० ग्रॅम

कळाच्या सालीचा उपयोग — Pomegranate bark health benefits 

  • पोटातील कृमी नष्ट करण्यास उपायकारक.
  • सालीचे चूर्ण हिरड्यांमधला रक्‍तस्राव व हिरडीदुखी या आजारावर गुणकारी आहे.
  • सालीचा काढा हळदीबरोबर घशाच्या दुखण्यावर उपायकारक ठरतो.
  • संग्रहणीच्या आजारात फळाची साल ताकाबरोबर घेतल्यास हा आजार कमी होतो.
  • नाकातून येणारा रक्‍तस्राव थांबविण्यासाठीसुद्धा सालीचा अर्क उपयोगी ठरतो.
  • कफ कमी करायलाही साल चावल्यासहि 0000. ठरते.
  • डाळिंबाच्या सालीपासून आयुर्वेदिक दंतमंजन तयार करतात. या दंतमंजनामुळे दात पांढरेशुभ्र व बळकट होतात.
  • डाळिंबाच्या सालीपासून टॅनीन हा रासायनिक पदार्थ बनवतात,ज्याचा औषधनिर्मितीसाठी उपयोग होतो.

डाळिंबाच्या फळाचे आयुर्वेदिक उपयोग – Pomegranate fruits health benefits 

  • या फळाला आयुर्वेदात अन्यसाधारण महत्त्व आहे, कारण हे फळ रसायण व वाजीकरण गुणाचे असून त्यामुळे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंतचे आजारनिर्मूलक व संरक्षक आहे.
  • डाळिंबाच्या फळाने शरीरातील वात आणि कफ दोषांचे शमन होते. शरीराचा दाह होणे, हातापायांची आग होणे, मूत्रप्रवृतीची जळजळ होणे या विकारांवर गुणकारी आहे.
  • हृदयाच्या विविध रोगांत बिया गुणकारी आहेत.
  • डाळिंब हे फळ ज्वरनाशक असून पौष्टिक आहे.
  • पिततदोषामुळे घशाची आग होणे, घसा लहान होणे अशा प्रकारच्या
  • विकृती डाळिंबसेवनाने नष्ट होतात.
  • डाळिंब जलप्राशन-तृप्ती देणारे फळ आहे. घामातून कमी झालेले
  • आवश्यक क्षार आणि पाणी व्याप्तीची कमतरता यामुळे दूर होते.
See also  जागतिक अन्न सुरक्षा दिवस २०२३, थीम, पोस्टर, महत्त्व आणि इतिहास | World Food Safety Day 2023 In Marathi

डाळिंबाच्या पानांचा उपयोग : Pomegranate leaves health benefits 

  • डाळिंबाच्या पानाचा लेप डोळे आलेल्या पापण्यांवर लावल्याने
  • डोळ्यांची जळजळ कमी होते.
  • पानाच्या रसाने शरीरची मालीश केल्यास घामामुळे येणारी दुर्गंधी बंद
  • होते व त्वचा सतेज व रोगमुक्त होते.

डाळिंबाच्या फुलांचा उपयोग : Pomegranate flowers health benefits 

  • डाळिंबाच्या फुलांचे चूर्ण खाल्ल्यावर जुलाबावर परिणामकारक ठरते.
  • फुलांचे चूर्ण भ्षयरोगावरसुद्धा अतिशय उपायकारक आहे.
  • स्त्रियांमध्ये होणारा गर्भपात व गर्भस्राव या चूर्णाच्या सेवनाने कमी होतो.
  • नाकातून रक्‍त येत असल्यास फुलाचा दोन थेंब रस नाकात टाकल्यास खूप उपायकारक ठरतो.
  • शरीराच्या जखमेवर हे चूर्ण लावल्यास आराम व लाभ मिळतो.
  • डाळिंबाच्या मुळ्यांचा उपयोग : डाळिंबाच्या मुळ्यांचा काढा रिकाम्यापोटी घेतल्यास पोटदुखी थांबते.

डाळिंबाच्या झाडाच्या सालीचा उपयोग :

झाडाची साल वाटून त्याचा रस नाकात घातल्यास नाकातून येणारे रक्‍त थांबते.

२. झाडाच्या सालीचे चूर्ण घेतल्यास जुलाब धांबतात.

३. झाडाच्या सालीच्या तुरटपणामुळे तोंडात सतत पाणी सुटणे, थुंकी सुटणे आदी दोष नष्ट होतात.

 

पेरु खाण्याचे फायदे – 7 Amazing Benefits Of Guava in Marathi

Source – शेतकरी मासिक

1 thought on “डाळिंब खाण्याचे आरोग्यदायी फायदे (रस,साल,फळ व पान) – Pomegranate fruit health benefits Marathi information”

Comments are closed.