दही खाण्याचे आरोग्यदाही फायदे -Health benefits of eating curd daily

दही – आरोग्यवर्धक – Health benefits of eating curd daily

संशोधकांनी केलेल्या संशोधनातुन असे निदर्शनास आले आहे की ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाची समस्या आहे अशा व्यक्तींनी जर दहीचे सेवण केले तर त्यांचा रक्तदाब कमी होऊ शकतो.आणि ह्या केल्या गेलेल्या अभ्यासातुन प्राप्त झालेला निष्कर्ष हा इंटरनँशनल डेअरी जर्नल मध्ये देखील प्रसिदध झालेला आहे.

म्हणुन आजच्या लेखात आपण उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या रूग्णांसाठी दही खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत?आणि याबाबत तज्ञांचे काय मत आहे हे देखील जाणुन घेणार आहोत.

 

दही त असलेले पोषण मूल्य प्रति 100 ग्राम -Curd Nutritional Value Per 100G

 • कॅलरी -100
 • फॅट -4.2 ग्राम
 • कार्बोदके -3.45 ग्राम
 • प्रोटीन -11.75 ग्राम
 • कोलेस्ट्रॉल – 14mg
 • सोडियम – 371mg
 • फाइबर – 0ग्राम
 • साखर – 1.3 ग्राम
 • प्रोटीन – 11.75 ग्राम
 • विटामिन डी–0
 • कैल्शियम – 72 मिलीग्राम
 • आयरन – 0.13 मिलीग्राम
 • पोटेशियम – 99 मिलीग्राम
 • विटामिन A – 42 मिलीग्राम
 • विटामिन C – 0 मिलीग्राम

SOURCE

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी दही खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत?

 • आजच्या ह्या धकाधकीच्या धावपळीच्या आणि चिंता तणावाने ग्रस्त असलेल्या जीवणात उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होणे ही काही विशेष बाब राहिलेली आपणास दिसुन येत नाही.
 • कारण आज कोणत्याही गोष्टीबाबद अधिक विचार केल्याने त्याचा आपल्या डोक्यावर ताण पडुन शारीरीक तसेच मानसिक तणाव निर्माण झाल्याने तसेच सतत अधिक चिंता केल्यामुळे खुप व्यक्तींना उच्च रक्तदाबाची समस्या जाणवत असते.
 • आणि याबाबद भारताविषयी सांगायचे म्हटले तर 2020 मध्ये भारतातील 15 टक्के लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेले दिसुन आले आहेत.
 • एका अहवालात असे देखील देण्यात आले आहे की मागील चार ते पाच वर्षात उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
 • याचसोबत याबाबत केलेल्या सर्वेक्षण केल्यावर असे आढळुन आले आहे की 40 टक्के कुटुंबांमध्ये हा आजार सुरू आहे.
 • मग ह्यावर उपाय योजना करत असताना एक युनिव्हरसिटी आँफ साऊथ आँस्ट्रेलिया तसेच यूएस ए युनिव्हसिटी तर्फे एक कंबाईन रिसर्च करण्यात आले होते ज्यात असे उघडकीस आले आहे की आपण जर आपल्या रोजच्या आहारात दहीचा समावेश केला तर आपला रक्दाब नियंत्रणात राहत असतो.
 • संशोधकांनी केलेल्या ह्या संशोधनात हाय ब्लड प्रेशर तसेच हार्टशी संबंधित विविध विकारांवर दहीचे सेवन केल्याने काय परिणाम होतो हे तपासण्यात आले होते.
 • आणि मग शेवटी केलेल्या ह्या संशोधनातुन शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी जर रोज आपल्या आहारात दहीचे सेवन केले तर त्यांचा हाय ब्लडप्रेशरचा प्राँब्लेम साँलव्ह होऊ शकतो.तसेच त्यांचे ब्लड प्रेशर देखील पुर्णपणे नियंत्रणात येते.
 • आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे ह्या संशोधनातुन जो निष्कर्ष संशोधकांना प्राप्त झाला आहे त्याचे प्रकाशन इंटरनँशनल डेअरी जनरल मध्ये देखील करण्यात आले आहे असे आपणास दिसुन येते.
See also  'इन्फ्लूएंझा A एच3एन2 व्हायरस' ची लक्षणे आणि उपाय | H3N2 Virus Symptoms in Marathi

 

संशोधकांचे याबाबत काय म्हणने आहे?

 संशोधकांनी याबाबत असे सांगितले आहे की आज संपुर्ण जगभरात लाखो तसेच करोडो लोकांना हाय ब्लड प्रेशरचा प्राँब्लेम आहे.

 • आणि हाय ब्लड प्रेशर मुळेच खुप रूग्णांना हार्टचे प्राँब्लेम देखील फेस करावे लागत असतात.ज्यात हार्ट अटँक,स्ट्रोक इत्यादींचा समावेश आहे.
 • जगभरातील सर्वाधिक जास्त मृत्यु ह्या सीव्हीडी मुळेच घडताना दिसुन येत आहे.
 • आज अमेरिका सारख्या देशात सिव्हीडी मुळे 38 सेकंदात एक व्यक्ती मृत्युमुखी पडत असतो.आणि आँस्ट्रेलियामध्ये याचे प्रमाण पाहावयास गेले तर आँस्ट्रेलियात देखील दर 15 मिनिटांनी सिव्हीडी मुळे एक ते दोन व्यक्ती मृत्युमुखी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे.
 • यावरून आपणास दिसुन येते की हाय ब्लड प्रेशरचा स्ट्रेसचा किती मोठा गंभीर परिणाम आज आपणास भोगावा लागत आहे.

तज्ञ संशोधक अलेक्झांडर वेड यांनी याबाबतीत आपला काय सल्ला दिला आहे?

 • तज्ञ संशोधक अलेक्झांडर वेड यांचे असे म्हणने आहे
 • की ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी रोज दहीचे सेवन करणे त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.
 • कारण उच्च रक्तदाब ही हार्ट आणि रक्तवाहिन्यांशी निगडीत समस्या आहे.आणि उच्च रक्तदाबामुळेच खुप जणांना हार्टशी संबंधित विविध आजारांना सामोरे जावे लागत असते.
 • म्हणुन आपण आपला रक्तदाब आटोक्यात म्हणजेच कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी मार्ग शोधत राहणे फार गरजेचे आहे.
 • याचबाबत बोलत असताना त्यांनी हे देखील सांगितले की दुधापासुन तयार करण्यात आलेले विविध पदार्थ जसे की,तुप,ताक विशेषकरून दही आपले ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी अधिक फायदेशीर ठरत असते.
 • कारण दुधात तसेच दुधापासुन बनवलेल्या सर्व घटक पदार्थांमध्ये विपुल प्रमाणात कँल्शिअम,मँग्नेशिअम,पोटँशिअम असते.
 • आणि ही पोषकतत्वे आपल्या शरीराच्या उत्तम वाढीसाठी,उत्तम आरोग्यासाठी,हदयाशी संबंधित विविध विकारांशी लढा देण्यासाठी खुप फायदेशीर ठरत असतात.आणि ही सर्व पोषकतत्वे आपल्या शरीरातील रक्तदाब देखील नियंत्रणात ठेवत असतात.

 दही हा एक असा घटक पदार्थ आहे.ज्याचे सेवण केल्याने आपला रक्तदाब नियंत्रणात येत असतो दहीमध्ये बँक्टेरियाचे प्रमाण खुप अधिक प्रमाणात असते.ज्यामुळे आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राहत असतो.

See also  एचबी एवनसी टेस्ट अणि फास्टिंग ब्लड शुगर टेस्ट मध्ये कोणता फरक आहे Difference between HBA1C test and fasting blood sugar test

याबाबद संशोधन कसे करण्यात आले आणि त्यातुन काय समोर आले?

 सर्व संशोधकांनी मिळुन केलेल्या ह्या रिसर्चमध्ये एकुण 900 त्या पेक्षा अधिक जणांचा समावेश होता.आणि केलेल्या ह्या अभ्यायासातुन असे निदर्शनास आले आहे.

 • की जे लोक आहारात नियमितपणे दहीचे सेवन करतात त्यांचे ब्लड प्रेशर हे दहीचे सेवण करत नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत 7 ते 8 टक्के कमी असल्याचे दिसुन आले.
 • म्हणुन संशोधकांनी असे देखील म्हटले आहे की उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींचा रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी दही खाणे किती फायदेशीर आहे यावर भविष्यात अधिक जास्त प्रमाणात अभ्यास करणे गरजेचे आहे.

दही खाण्याचे इतर फायदे :

 दही खालल्याने आपले दात आणि हाडे अधिक मजबुत बनत असतात.कारण दहीमध्ये कँल्शिअम आणि फाँस्फरसचे प्रमाण अधिक असते.जे आपली दात आणि हाडे मजबुत बनवण्याचे काम करते.

 • दहीचे सेवन केल्याने आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेत देखील वाढ होत असते.कारण दही हे आपल्या शरीरात अँण्टी आँक्सीडेंट प्रमाणे देखील कार्य करत असते.
 • दहीचे सेवन केल्याने आपल्या पचनसंस्थेत देखील अधिक वाढ असते कारण यात लँक्टाँज नावाचा एक घटक असतो जो ज्या व्यक्तींचे अन्न पचत नाही त्यांना अन्नाचे पचन होण्यास फायदेशीर ठरत असतो.
 • दहीचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील कोलेस्टेराँल कमी होत असते.याचा फायदा आपल्याला असा होत असतो की आपले ब्लड प्रेशर नेहमी कंट्रोलमध्ये राहत असते.
 • दहीचे सेवन केल्याने आपले वजन देखील कमी होत असते कारण यात दहीमध्ये कँल्शिअमचे प्रमाण अधिक असते जे कोर्टिसोल कमी करत असते याचसोबत आपले वजन देखील कमी करते.दहीमुळे आपल्या शरीरातील कँलरीचे प्रमाण कमी होण्यास मदत असते ज्याने आपले पोट देखील जास्त जाड होत नाही.
 • याचसोबत दही ही आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील अधिक फायदेशीर ठरत असते.फक्त यासाठी आपल्याला दही,लिंबु आणि बेसनची पेस्ट तयार करून घ्यावी लागते.मग पंधरा मिनिट पर्यत चेहरयावर लावायची असते.मग दहा पंधरा मिनिटांनी शुदध पाण्यात आपला चेहरा धुवून घ्यावयाचा असतो.याने आपला चेहरा आधीपेक्षा अधिक उजळत असतो.
 • आणि आपल्याला आपले केस देखील उजळायचे असेल तर हीच प्रक्रिया आपण आपल्या केसांसाठी देखील अवलंबु शकतो
See also  चिया सीडस म्हणजे काय?Chia seeds meaning in Marathi

दहीचे सेवण करताना आपण घ्यावयाची काळजी :

 खुप दहींमध्ये साखरेचे प्रमाण अधिक जास्त प्रमाणात असते.आणि अधिक प्रमाणात साखरेचे सेवण केल्याने आपल्याला डायबिटीज तसेच लठठपणाची समस्या देखील भासु शकते.

 • म्हणुन आपण अशाच दहीचे सेवण करायला हवे ज्यात साखरेचे प्रमाण कमी असेल.
 • तसेच ज्या व्यक्तींना दुधाची अँलर्जी आहे आणि दुधाचे अधिक सेवन केल्याने सुज वगैरे येत असते अशा व्यक्तींनी दहीचे सेवण करणे टाळावे.