पीसी ओएस म्हणजे काय? PCOS in Marathi

पीसी ओएस म्हणजे काय?PCOS in Marathi

पीसीओ एस म्हणजे पाॅलिसिसटीक ओव्हेरीयन सिंड्रोम होय.याचा शब्दश अर्थ पाॅली म्हणजे विविध,सिस्टीक म्हणजे गाठी,ओव्हेरीयन म्हणजे अंडाशयाचा आजार अणि सिंड्रोम म्हणजे लक्षणे असा होतो.

यालाच आपण सोप्या भाषेत एकापेक्षा जास्त लक्षणे एकत्रित दिसुन येणे असे म्हणुन शकतो.

पीसीओ एस ही सुदधा पीसीओडी प्रमाणे महिलांमधील हार्मोनल असंतुलनाची मुख्य समस्या तसेच आजार आहे.यात स्त्रियांच्या शरीरातील पुरूष हार्मोनल एंड्रोजनचे संतुलन बिघडत असते.

याचे कारण देखील पीसीओडी प्रमाणे अयोग्य जीवनशैली,आहार तसेच अनुवांशिकता हेच आहे.ही हार्मोनल असंतुलनाची समस्या प्रजनन वयात असताना पाच टक्के पैकी एक टक्के महिलेस असलेली आढळुन येते.

यावर वेळ असताच उपचार केला गेला नाही तर ज्या महिलेला आई बनायचे आहे त्या महिलेला गर्भधारणा संबंधित विविध समस्यांना सामोरे जावे लागु शकते.

याच्या दिसुन येत असलेल्या लक्षणांनुसार प्रत्येक स्त्रीवर तसेच मुलीवर उपचार करण्यात येत असतो.

म्हणजे समजा एखादी विवाहित महिला आहे जिला बाळ होत नसेल तर तिच्यावर ह्या समस्येदरम्यान वेगळे उपचार केले जात असतात.

तसेच एखादी तरूण मुलगी आहे जिला अनियमित पाळी येणे शरीरात लठ्ठपणा येणे अशी समस्या असल्यास तिच्यावर वेगळ्या पद्धतीने उपचार केला जाईल.

पीसी ओएस म्हणजे काय? PCOS in Marathi
पीसी ओएस म्हणजे काय? PCOS in Marathi

पीसीओएसची प्रमुख लक्षणे कोणकोणती आहेत? PCOS symptoms in Marathi

पीसीओ एसची एकत्रित लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत-

 • गर्भधारणा न होणे गर्भधारणे दरम्यान समस्या निर्माण होणे गर्भाशयात गाठ होणे इत्यादी
 • चेहर्यावर जाड केस येणे
 • अनियमित मासिक पाळी येणे
 • शरीरात लठ्ठपणा जाणवने
 • केसांची असामान्यपणे वाढ होणे
 • वजन वाढणे

चेहर्यावर त्वचेवर मुरूम येणे

पीसीओएसची कारणे तसेच परिणाम कोणते आहेत?

 • महिलांमध्ये पीसीओएसची समस्या निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे अनुवांशिकता तसेच त्यांची अयोग्य तसेच चुकीची जीवनशैली अणि आहार होय.
 • इन्सुलिन प्रतिरोधकाचे प्रमाण जास्त झाल्याने महिलांना ही समस्या उद्भवत असते.जेव्हा एखाद्या महिलेच्या रक्तातील इंन्सुलिन मध्ये अत्याधिक वाढ होत असते तेव्हा ती महिला गर्भाशयादवारे जास्तीत जास्त टेसटेराॅईन बाहेर काढु लागते.
 • ह्या अतिरिक्त टेसटोराईनमुळे महिलांना अनियमित मासिक पाळी येणे केसांची अत्याधिक वाढ होणे इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते.
 • याचसोबत हार्मोनल मधील असंतुलनामुळे देखील महिला़ंना पीसीओएसची समस्या निर्माण होत असते.इन्सुलिन मध्ये अधिक वाढ झाल्याने महिलांना डायबिटीसची समस्या देखील उदभवत असते.
See also  ओमेगा-3 फॅटी ऍसिड -Omega-3 Fatty Acids Marathi information

ज्या महिलांना पीसीओ एसची समस्या आहे त्यांना वंध्यत्व येऊ शकते.त्यांच्यामध्ये स्त्री बीजाची उत्पत्ती होत नाही.कारण ह्या समस्येमुळे प्रजननासाठी आवश्यक असलेले बीजांडच नियमितपणे निर्माण होत नसते.

पीसीओएसवर उपाय कोणते आहेत?

 • पीसीओएस हा आजार नसुन हार्मोनल असंतुलनाशी संबंधित महिलांमधील एक महत्वाची समस्या आहे.यात लक्षणांच्या आधारावर कुठल्याही महिलेवर उपचार केले जात असतात.
 • पोट फुगण्याची समस्या उद्भवू नये म्हणून महिलांनी सकस आहाराचे सेवन करायला हवे.हार्मोनल संतुलनासाठी डाॅक्टर काही औषधे घेण्याचा सल्ला देखील देत असतात.
 • पीसीओएस मध्ये जीवनशैलीत बदल करण्यासोबत काही औषधै डाॅक्टर उपचारासाठी घेण्यास सांगु शकतात.मासिक पाळीच्या समस्येत ओव्हॅलयूशन मध्ये सुधारणा घडुन येण्यासाठी डाॅक्टर काही गोळ्या औषधे घेण्यास सांगु शकतात.महिलांमधील हार्मोन वर उपचारा दवारे नियंत्रण केल्यास गर्भधारणा होऊ शकते.
 • तसेच अॅडव्हान्सड फर्टिलिटी उपचार पदधतीचा वापर करून गर्भधारणा केली जाऊ शकते.
 • वजन कमी करण्यासाठी व्यायाम करण्याचा सल्ला रूग्णांस डाॅक्टरांकडुन दिला जातो.
 • आपल्या जीवनशैलीत,आहारात योग्य तो बदल करून नियमित योगा व्यायाम करून पीसीओडी अणि पीसीओएस या दोघेही समस्या उपचारा दवारे नियंत्रित केल्या जाऊ शकतात.