ऑलिव्ह ऑइल म्हणजे काय?Olive oil meaning in Marathi

ऑलिव्ह ऑइल म्हणजे काय? Olive oil meaning in Marathi

ऑलिव्ह ऑइल म्हणजे जैतुनचे तेल होय.पण जैतुनचे तेलास ऑलिव्ह ऑइल असे देखील म्हटले जाते.

ऑलिव्ह ऑइल हे एक अत्यंत प्रसिद्ध असे स्वयंपाकाचे आरोग्यासाठी पोषक असे तेल आहे.ऑलिव्ह ऑइल हे आॅलिव्हच्या वृक्षापासुन तयार केले जाते.

ऑलिव्ह ऑइलचा वापर कोठेकोठे केला जातो?

ऑलिव्ह ऑइलचा उपयोग मुख्यत्वे भुमध्य सागरीय स्वयंपाक बनवताना केला जातो.यात मोनो असंतृप्त mono unsaturated नावाचे आपल्या आरोग्यास लाभदायक असणारे फॅट असते.

हे मोनो असंतृप्त नावाचे फॅट चरबीतील जळजळ कमी करण्यास मदत करते.तसेच शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासोबत हदय रोगाच्या समस्येपासून आपला बचाव करते.हे आपले आरोग्य सुधारण्यास देखील साहाय्य करते.

यात असलेले अॅटी आॅक्सीडंट आपल्या पेशींना हानी होऊ देत नाही तसेच आपले विविध आजारांपासून रक्षण देखील करते.

ऑलिव्ह ऑइल मध्ये व्हिटॅमिन ई विपुल प्रमाणात असते. व्हिटॅमिन ई मध्ये अॅटी आॅक्सीडंट असते जे आपल्या शरीराचा आॅक्सीडेटिव्ह हानीपासुन बचाव करते.

ऑलिव्ह ऑइल हे सॅलेड,मॅरीनेड स्टयुज इत्यादी अशा विविध प्रकारच्या पदार्थात वापरले जाते.

ऑलिव्ह ऑइलचे आरोग्यदायी फायदे कोणकोणते आहेत?health benefits of olive oil in Marathi

Olive oil meaning in Marathi
Olive oil meaning in Marathi
 1. ऑलिव्ह ऑइल आपल्या पचन संस्थेला सुरळीत करते.अणि याने गॅस अॅसिडीटी बद्धकोष्ठता सारख्या समस्या देखील दुर होतात.
 2. ज्यांना खोकला आहे गॅस होत आहे,अॅसिडीटी मुळे पोट साफ होत नाहीये अशा व्यक्तींनी आपल्या आहारात ऑलिव्ह ऑइलचे सेवन करायला हवे.याने पोट साफ होण्यास मदत होते.
 3. मधुमेहाच्या रुग्णांनी आपली साखर नियंत्रणात आणण्यासाठी तसेच डायबिटीसचा धोका टाळण्यासाठी रोज किमान दोन चमच तरी ऑलिव्ह ऑइलचे सेवन आहारातुन करायला हवे.
 4. ऑलिव्ह ऑइल मध्ये अॅटी आॅक्सीडंट असते.जे आपले वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सर पासुन संरक्षण करते.
 5. उदा,त्वचेचा कर्करोग,स्तनांचा कर्करोग इत्यादी
 6. मानवी शरीरात ऑलिव्ह ऑइल एक नैसर्गिक वेदना नाशक म्हणून कार्य करते.
 7. ऑलिव्ह ऑइल मध्ये असणारे फॅटी अॅसिड असते जे निरोगी त्वचा,केस नखांसाठी अधिक फायदेशीर ठरते.हे आपली त्वचा मऊ आणि लवचिक ठेवते.
 8. आॅलिव्ह तेलाचे सेवन केल्याने आपले मानसिक सामर्थ्य तसेच एकाग्रता क्षमतेत स्मरण शक्ती मध्ये देखील वाढ होत असते.कुठलेही काम करत असताना आपणास अगदी फ्रेश अणि टवटवीत वाटते.
 9. ऑलिव्ह ऑइलचे सेवन केल्याने अलझायमरची समस्या निर्माण होत नाही मेंदुमधील रक्तपुरवठा वाढत असतो.अणि स्मरण शक्तीत देखील वाढ होते.
 10. आॅलिव्ह तेलाचे सेवन आपण वजन कमी करण्यासाठी पोटाची चरबी कमी करण्यासाठी देखील करू शकतो.
 11. ऑलिव्ह ऑइल केस अणि त्वचेसाठी देखील अधिक फायदेशीर आहे.यात व्हिटॅमिन ई आहे जे त्वचेचा कोरडेपणा कमी करते.
 12. ऑलिव्ह ऑइलने त्वचेची मालिश केल्यास आपले केस अवेळी गळत नाहीत, तसेच केस पांढरे होत नाही तसेच केसात कोंडा देखील होत नसतो.
 13. ऑलिव्ह ऑइलने केसाची मालीश केल्यास केसांच्या आरोग्यात वाढ होते.
 14. ऑलिव्ह ऑइलचे सेवन केल्याने आपल्या चेहर्यावर असलेले डाग तसेच सुरकुत्या देखील नाहीशा होतात.आपली त्वचा माॅईशचराईज होते नेहमी आपली त्वचा साफ राहते.
 15. डिप्रेशन तसेच अॅग्झायटी मध्ये देखील ऑलिव्ह ऑइल खुप फायदेशीर ठरते.यात हायड्राॅकसी टायरोसोल जे रक्तवाहिन्या संकुचित होण्याचा धोका कमी करण्यास मदत करते.
 16. ऑलिव्ह ऑइलचे सेवन केल्याने आपणास स्ट्रोक हदयविकाराचा धोका निर्माण होत नाही.
See also  Depression - नैराश्य कारण, लक्षण व उपचार विषयी माहीती - Depression information in Marathi