श्रीगुरूचरित्र १८ वा अध्याय – Guru Charitra Adhyay 18

श्रीगुरूचरित्र १८ वा अध्याय

श्री गणेशाय नमः ।।
श्री सरस्वत्ये नमः ।।
श्री गुरूभ्यो नम: ।।

जय जया सिदधमुनि ।
तु तारक भर्वाणी ।

सुधारस आमुचे श्रवणी ।
पुर्ण केला दातारा ।।१।।

गुरूचरित्र कामधेनू ।
ऐकता न-धाये माझे मन ।
कांक्षित होते अंतकरण ।
कथामृत ऐकावया ।।२।।

ध्यान लागले श्रीगुरूचरणी ।
तृप्ती नव्हे अंतकरणी ।
कथामृत संजीवनी ।
आणिक निरोपावे दातारा ।।३।।

येणेपरी सिदधासी।विनवी शिष्य भक्तीसी।
माथा लावुनि चरणांसी ।कृपा भाकि तये वेळी ।।४।।

शिष्य वचन ऐकोनि ।संतोषला सिदधमुनि ।
सांग तसे विस्तारोनि ।ऐका श्रोते एक चित्ते ।।५।।

ऐक शिष्या शिखामणी । धन्य धन्य तुझी वाणी ।
तुझी भक्ती श्रीगुरूचरणी । तल्लीन झाली परियेसा ।।६।।

तुजकरीता आम्हांसी ।चेतन जाहले परीयेसी ।
गुरूचरित्र आद्यंतेसी । स्मरण जाहले अवधारी ।।७।।

भिल्लवडी स्थान महिमा ।निरोपिला अनुपमा ।
पुढील चरित्र उत्तमा।सांगेन एका एकचित्ते ।।८।।

क्वचित काळ तये स्थानी ।श्रीगुरू होते गौप्येनि।
प्रकट जहाले म्हणोनि ।पुढे निघाले परीयेसा ।।९।।

वरूणासंगम असे ख्यात।दक्षिण वाराणसी म्हणत ।
श्रीगुरू आले अवलोकित ।भक्तानुग्रह करावया ।।१०।।

पुढे कृष्णा तटाकांत ।श्रीगुरू तीर्थे पावन करीत ।
पंचगंगगा संगम ख्यात।तेथे राहिले द्वाद शाब्दे।।११।।

अनुपम्य तीर्थ मनोहर ।जैसे अविमुक्त काशीपुर ।
प्रयागसमान तीर्थ थोर । म्हणोनि राहीले परीयेसा ।।१२ ।।

कुरवपूर ग्राम ग्रहण ।कुरूक्षेत्र तोंचि जाण ।
पंचगंगा संगम कृष्णा अत्योओतम परियेसा ।।१३।।

कुरूक्षेत्री जितके पुण्य ।तयाहुनि अधिक असे जाण ।
तीर्थे असती अगण्य । म्हणोनि राहीले श्रीगुरू ।।१४।।

पंचगंगा नदीतीर । प्रख्यात असे पुराणांतर ।
पांच नामे आहेति थोर ।सांगेन ऐका एकचित्ते ।।१५ ।।

शिवा भद्रा भोगावती ।कुंभीनदी सरस्वती ।
पंचगंगा ऐसी ख्याति ।महापातक संहारी ।।१६।।

ऐसी प्रख्यात पंचगंगा ।आली कृष्णेचिया संगा।
प्रयागाहुनि असे चांगा ।संगमस्थान मनोहर ।।१७।।

अमरापुर म्हणिजे ग्राम। स्थान असे अनुपम्य ।
जैसा प्रयागसंगम।तैसे स्थान मनोहर ।।१८।।

वृक्ष असे औदुंबर । प्रत्यक्ष जाणा कल्पतरू ।
देव असे अमरेश्वरू ।त्या संगमा षटकुळी ।।१९।।

See also  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती स्टेटस- बायो इन्फोग्राफिक्स डाऊनलोड | Dr. Babasaheb Ambedkar Bio infographics Download

जैसी वाराणसी पुरी ।गंगाभागिरथी तीरी ।
पंचनंदीसंगम थोरी ।तत्समान परियेसा ।।२०।।

अमरेश्वर संनिधानी । आहेति चौसष्ठ योगिनी।
शक्तीतीर्थ निर्गुणी । प्रख्यात असे परीयेसा ।।२१।।

अमरेश्वर लिंग बरवे । त्यासी वंदुनि स्वभावे ।
पुजितां नर अमर होय । विश्वनाथ तोची जाणा ।।२२।।

प्रयागे करीतां माघस्नान ।जे पुण्य होय साधन ।
शतगुण होय तयाहुन ।एक स्नाने परीयेसा ।।२३।।

सहज नदीसंगमात। प्रयागसमान असे ख्यात ।
अमरेश्वर परब्रम्ह वस्तु ।तया स्थानी वास असे ।।२४।।

याकारणे तिये स्थानी । कोटीतीर्थे असती निर्गुणी ।
वाहे गंगो दक्षिणी ।वेणीसहित निरंतर ।।२५।।

अमित तीर्थे तया स्थानी ।सांगता विस्तार पुराणी।
अष्ट तीर्थ ख्याति जागरणी ।तया कृष्ण तटाकांत ।।२६।।

उत्तर दिशी असे देखा ।वहे कृष्णा पश्चिम मुखा ।
शुक्लतीर्थ नाम ऐका । ब्रम्हहत्या पाप दुर ।।२७।।

औदुंबर सन्मुखेसी ।तीनी तीर्थे परियेसी ।
एकानंतर एक धनुषी । तीर्थे असती मनोहर ।।२८।।

पापविनाशी काम्य तीर्थ ।तीसरे सिदध वरद तीर्थ
अमरेश्वर संनिधार्थ । अनुपम्य असे भुमंडळी ।।२९ ।।

पुढे संगम षटकुळात ।प्रयागतीर्थ असे ख्यात ।
शक्तीतीर्थ अमरतीर्थ । कोटीतीर्थे परियेसा ।।३०।।

तीर्थे असती अपरांतर ।सांगता असे विस्तार ।
याकारणे श्रीपादगुरू।राहीले तेथे द्वाद शाब्दे ।।३१।।

कृष्णा वेणी नदी होनी । पंचगंगा मिळोनी ।
सप्तपदी संगम सगुनी ।काय सांगू महिमा त्यांची ।।३२।।

ब्रम्हहत्यादी महापातके ।जळोनि जाती स्नाने एके।
ऐसे सिद्धस्थान निर्के ।सकळाभीष्ट होय तेथे ।।३३।।

काय सांगू त्याची महिमा ।आणिक द्यावया नाही उपमा ।
दर्शनमाते होती काम्या। स्नानफळ काय वर्णु ।।३४।।

साक्षात कल्पतरू।असे वृक्ष औदुंबरू।
गौप्य होऊन अगोचरू । राहीले श्रीगुरू तया स्थानी ।।३५।।

भक्त जन तारणार्थ ।होणार असे तीर्थ ख्यात ।
राहीले तेथे श्रीगुरूनाथ । म्हणोनि प्रकट जाहले जाणा ।।३६।।

असता पुढे वर्तमानी ।भिक्षा करावया प्रति दिनी ।
अमरापुर ग्रामी।जाती श्रीगुरू परीयेसा ।।३७।।

तया ग्रामी द्विज एक ।असे वेद अभ्यासक ।
त्याची भार्या पतीसेवक ।पतीव्रत शिरोमणी ।।३८।।

सुक्षीण असे तो ब्राह्मण । शुक्ल भिक्षा करी आपण ।
कर्ममार्गी आचरण ।असे सात्विक वृत्तीने ।।३९।।

See also  गणपती बाप्पाची आरती सुखकर्ता दुखहर्ता साँग लिरिक्स - Ganpati aarti sukhkarta dukhharta song lyrics in Marathi

तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत ।शेंगा निघती नित्य बहुत ।त्याणे उदरपुर्ती करी ।।४०।।

एखादे दिवशी त्या ब्राम्हणासी ।वरो न मिळे परीयेसी।
तया शेंगाते रांधोनि हर्षी दिवस क्रमी येणेपरी ।।४१।।

ऐसा तो ब्राम्हण दारीद्री।याचक बने उदर भरी ।
पंचमहायज्ञ कुसरी ।अतिथी पुजी भक्तीने ।।४२।।

वर्तता श्रीगुरु एके दिवशी ।तया विप्र मंदीरासी ।
गेले आपण भिक्षेसी ।नेले विप्रे भक्तीने ।।४३।।

भक्ती पुर्वक श्रीगुरूसी ।पुजा करी तो षोडशी ।
घेवडे शेंगा बहुवसी । केली होती पत्र शाका ।।४४।।

भिक्षा करुनि ब्राम्हणासी। आश्वासिती गुरू संतोषि ।
गेले तुझे दारिद्रय दोषी । म्हणोनि निघते तये वेळी ।।४५।।

तया विप्राचे गृहांत ।जो का होता वेल उन्नत
घेवडा नाम विख्यात ।आंगण सर्व वेष्टिले असे ।।४६।।

तया वेलाचे झाडमुळ।श्रीगुरू मुर्ती छेदिती तात्काळ ।
टाकोनि देती परिबळे ।गेले आपण संगमासी ।।४७।।

विप्र वनिता तये वेळी ।दुख करीती पुत्र सकळी ।
म्हणती पहा हो दैव बळी ।कैसे अदृष्ट आपुले ।।४८।।

आम्ही तया यती श्वरासी ।काय उपद्रव केला त्यासी ।
आमुचा ग्रास छेदुनी कैसी ।टाकोनि दिल्हा भुमीवरी ।।४९।।

ऐसेपरी ते नारी ।दुख करी नानापरी ।
पुरूष तिचा कोपवारी । म्हणे प्रारब्ध प्रमाण ।।५०।।

म्हणे स्त्रियेसी तये वेळी ।जे जे होणार काळी ।
निर्माण करी चंद्रमौळी ।तया आधीन विश्व जाण ।।५१।।

विश्वव्यापक नारायण । उत्पती स्थिती लया कारण ।
पिपीलिकादी स्थुल जीवन ।समस्ता आहार पुरवीतसे ।।५२।।

आयुरत्नं प्रयच्छतिं।ऐसे बोले वेदश्रुति ।
पंचानन आहार हस्ती ।केवी करी प्रत्यही ।।५३।।

चौरयाएंशी लक्ष जीवराशी । स्थुल सुक्ष्म समस्तांसी ।
निर्माण केले आहारासी ।मग उत्पती तदनंतरे ।।५४।।

रंकरायासी एक दृष्टी ।करूनि पोषितो सर्व सृष्टी ।
आपुले आर्जव वर वोखटी ।तैसे फळ आपणासी ।।५६।।

पुर्व जन्मीचे निक्षेपण ।सकृत अथवा दुष्कृत्य जाण ।
आपुलें आपणचि भोगोनि ।पुढील्यावरी काय बोल ।।५६।।

आपुले देव असता उणे । पुढील्या बोलती मुर्खपणे।
जे पेरीले तोचि भक्षणे कवणावरी बोल सांगे ।।५७।।

See also  सर्व काही आता महिलांसाठी एसटी प्रवासात सर्व महिलांना मिळणार ५० टक्के इतकी सुट - Sarv Kahi mahilansathi Maharashtra Budget 2023

बोल ठेवीसी यतीश्वरासी ।आपले आजर्व न विचारीसी । ग्रास हरितला म्हणसी । अविद्या सागरी बुडुनि ।।५८।।

तो तारक आम्हांसी । म्हणोनि आला भिक्षेसी ।
नेले आमचे दारिद्र्य दोषी ।तोचि तारील आमुते ।।५९।।

येणेपरी स्त्रियेसी ।संभाषि विप्र परियेसी ।
काढोनि वेल शाखेसी ।टाकिता झाला गंगेत ।।६०।।

तया वेलाचे मुळ थोरी ।जे का होते आपुले दारी ।
काढुं म्हणुनि द्विजवरी ।खणिता झाला तयावेळी ।।६१।।

काढतां वेलमुळासी ।लाधला कुंभे निधानेसी ।
आनंद जाहला बहुवसी ।घेऊनि गेला दारांत ।।६२।।

म्हणति नवल काय वर्तले ।यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले । म्हणोनि हया वेला छेदिले निधान लादले आम्हांसी ।।६३।।

नर नव्हे तो योगीश्वर ।होईल ईश्वरी अवतार ।
आम्हां भेटला दैन्यहर । म्हणति चला दर्शनासी ।।६४।।

जाऊनि संगमा श्रीगुरूसी ।पुजा करीती बहुवसी ।
वृतांत सांगती तयासी ।तये वेळी परीयेसा ।।६५।।

श्रीगुरू म्हणती तयासी । तुम्ही न सांगणे कवणासि ।
प्रकट करीता आम्हांसी । नसेल लक्ष्मी तुमचे घरी ।।६६।।

ऐसेपरी तया द्विजासी ।सांगे श्रीगुरू परीयेसी ।
अखंड लक्ष्मी तुमचे वंशी ।पुत्रपौत्री नांदाल ।।६७ ।।

ऐसा वर लाधोन ।गेली वनिता तो ब्राह्मण ।
श्रीगुरूकृपा ऐसी जाण । दर्शनमात्रे दैन्य हरे ।।६८।।

ज्यासी होय श्रीगुरू कृपा । त्यासी कैचें दैन्य पाप ।
कल्पवृक्ष आश्रय करीता बापा। दैन्य कैचे तयाघरी ।।६९।।

दैव उणा असेल जो नरू ।त्याणे आश्रयावा श्रीगुरू ।
तोचि उतरेल पैलपारू । पुज्य होय सकळीकांसी ।।७०।।

जो कोण भजेल श्रीगुरू । त्यासी लाधेल इह परू ।
अखंड लक्ष्मी त्याचे घरी ।अष्टेश्वर्ये नांदती ।।७१।।

सिदध म्हणे नामधारकासी ।श्रीगुरू महिमा असे ऐसी।भजावे तुम्ही मनोमानसी ।कामधेनू तुझ्या घरी ।।७२।।

गंगाधराचा कुमर ।सांगे श्रीगुरू चरित्र विस्तार ।
पुढील कथा मृतसार ।ऐका श्रोते एकचित्ते ।।७३।।

इति श्रीगुरू चरित्रामृते परमकथा कल्पतरौ
श्री नृसिंह सरस्वत्यु पाख्याने सिदध नामधारक संवादे

अमरापुर महिमान -द्विज दैन्य हरणं
नाम अष्ट़ादशोध्याय ।।१८।।

।।श्री गुरुदेव दत्त ।।