पीसीओडीचा फुलफाॅम काय होतो?पीसीओडी म्हणजे काय?Pcod meaning, pcod full form in Marathi
पीसीओडी म्हणजे पाॅलिसिसटीक ओव्हेरीयन डिसीज होय.याचा शब्दशः अर्थ समजून घ्यायचे म्हटले तर पाॅली म्हणजे विविध,सिस्टीक म्हणजे गाठी अणि ओव्हेरीयन म्हणजे अंडाशयाचा आजार.
थोडक्यात सांगायचे म्हटले तर हा एक महिलांमधील असा हार्मोनल आजार आहे ज्यात महिलांच्या अंडाशयाला अनेक प्रकारच्या गाठी येऊ लागतात.यामुळे हार्मोनलचे संतुलन बिघडत असते.
पीसीओडी ही महिलांना उदभवणारी एक हार्मोनल समस्या आहे.यात महिलेच्या गर्भाशयात लहान मोठ्या स्वरूपात गाठी तयार होत असतात.
यामुळे महिलांना पिरीअड अनियमित होणे,वजनात वाढ होणे,प्रेगनेंसी मध्ये विविध प्रकारच्या अडचणी येत असतात.गर्भधारणा होण्यास अडचणी निर्माण होतात अशा विविध प्रकारच्या समस्या पीसीओडी मुळे महिलांमध्ये निर्माण होत असतात.
सर्वप्रथम पीसीओडी ही हार्मोनल समस्या ३० ते ३५ ह्या वयोगटातील स्त्रियांना जाणवत होती आता ही समस्या १८ ते २० ह्या वयोगटातील मुलींना देखील खराब अणि अयोग्य जीवनशैली अणि आहारामुळे जाणवताना दिसुन येते.
आज सुमारे ५ ते १० टक्के महिलांना पीसीओडीची समस्या असलेली आपणास दिसून येते.
पीसीओडी ची प्रमुख लक्षणे कोणकोणती आहेत?pcod symptoms in Marathi
पीसीओडी मध्ये ९ पेक्षा कमी पिरीअड येणे ३ किंवा अधिक महिने मासिक पाळी न येणे हे मुख्य लक्षण मानले जाते.
पीसीओडीची काही प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत-
- केसात कोंडा होणे
- त्वचेवर पुरळ येऊ लागणे
- ओटीपोटात दुखु लागणे
- चेहर्यावर तसेच हात पायांवर लव येणे
- चेहर्यावर मुरूम येणे
- मानेवरची त्वचा जाड होऊन काळसर दिसु लागणे
- पिरीअड अनियमित होणे
- दिर्घ वेदनादायी पिरीअड होणे
- वजन वाढणे
- ब्लड प्रेशर वाढणे
- थकवा जाणवण
- झोप न येणे
- डोकेदुखी
- इत्यादी
पीसीओडीची प्रमुख कारणे कोणकोणती आहेत?pcod causes in Marathi
- रोजची खराब तसेच अयोग्य जीवनशैली
- नियमित व्यायाम न करणे
- अयोग्य तसेच चुकीचा आहार घेणे
- रोजचा ताणतणाव चिंता चिडचिड
- स्थुलत्व येणे
- इन्सुलिनचे अधिक प्रमाण
- आनुवंशिक समस्या असणे
- पीसीओडी मध्ये कोणता धोका असतो?
- पीसीओडी मध्ये महिलांना डायबिटीस तसेच गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची भीती असते.कारण पीसीओडी दरम्यान महिलेच्या शरीरातील इंन्सुलिनचे प्रमाण खुप वाढत असते.याचमुळे अंडाशयात सीज अशुदध पाण्याने भरलेली फोडी तयार होते.
पुढे जाऊन याचेच परिवर्तन कॅन्सर मध्ये देखील होण्याची शक्यता असते.
पीसीओडी मुळे महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते.ज्यामुळे त्यांच्या शरीरात निर्माण होत असलेल्या स्त्री बीजात घट होत असते.ज्यामुळे महिलेला वंध्यत्व येण्याची दाट शक्यता असते.
पीसीओडी वर वेळ असताच उपचार नाही केला तर महिलेस असामान्य गर्भाशय रक्तस्राव,लिव्हरला सुज येणे, वंध्यत्व येणे मधुमेह होणे, गर्भाशयाचा कॅन्सर असा विविध समस्या निर्माण होऊ शकतात.
पीसीओडी पासुन आपला बचाव कसा करायचा? पीसीओडी झाल्यास कोणकोणते उपचार करायला हवेत?pcod treatment in Marathi
वरील पीसीओडीचे सांगण्यात आलेली लक्षण आपल्यात जाणवत असल्यास त्वरित सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा.
मग तपासणी दरम्यान पीसीओडी निदान चाचणीनंतर डाॅक्टर काय सल्ला देतात ते बघायचे.तपासणी दरम्यान महिलेला पीसीओडी झाला असल्यास किंवा तशी शक्यता दिसुन येत असल्यास डाॅक्टर सोनोग्राफी टेस्ट,काही ब्लड टेस्ट,हार्मोनल टेस्ट करायला सांगु शकतात.
टेस्ट दरम्यान महिलेला पीसीओडीची समस्या आहे असे निदर्शनास आले तर महिलेवर पुढील उपचार करायला सुरुवात केली जात असते.
पीसीओडी वर उपचार करायला अधिक कालावधी लागु शकतो यावर उपचार करण्यासाठी साधारणपणे बारा ते अठरा महिने इतका कालावधी यावरील उपचारासाठी लागतो.
यावरील आवश्यक ते उपचार करून झाल्यावर देखील यात वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे कारण ही जीवनशैली आहाराशी संबंधित समस्या आहे.
पीसीओडी झाला आहे किंवा नाही हे जाणुन घेण्याकरीता कोणकोणत्या चाचणी कराव्या लागतात?
महिलेला पीसीओडीची समस्या आहे किंवा नाही हे जाणुन घेण्यासाठी सोनोग्राफी टेस्ट ब्लड टेस्ट अणि हार्मोनल टेस्ट केली जाते.
हार्मोनल टेस्ट तसेच ब्लड टेस्ट मध्ये महिलेच्या शरीरातील हार्मोनलचे प्रमाण रक्तातील साखरेचे प्रमाण,चेक केले जाते.हया सर्व टेस्ट मुळे पीसीओडी संदर्भांत डाॅक्टरांना योग्य ते वैद्यकीय अनुमान काढणे अधिक सोपे जाते.
पीसीओडी पासुन बचावासाठी पीसीओडी आपणास होऊ नये म्हणून महिलांनी हाय कोलेस्टेरॉल,हाय कॅलरी,हाय कार्बोहाइड्रेटचा समावेश असलेल्या पदार्थांचे अधिक सेवन करणे टाळावे.
जंक फूडचे सेवण करणे टाळावे, शक्यतो ताज्या अणि गरम अन्नपदार्थाचा आपल्या आहारात समावेश करायला हवा.जड पदार्थ देखील आहारात समाविष्ट करू नये.सिगारेट दारू अल्कोहोल अशा मादक पदार्थांचे सेवन करणे टाळावे.वेळेवर औषधांचे सेवन करावे.आपल्या वजनावर नियंत्रण ठेवणे.
मुलींमध्ये ही समस्या निर्माण होऊ नये म्हणून लहानपणापासून त्यांना योग्य तो आहार दयायला हवा त्यांना लहानपणापासूनच शारीरिक मैदानी खेळ खेळण्याची सवय लावावी व्यायाम करण्याची योगा करण्याची सवय लावावी.
त्यांच्या वजन अणि उंचीमध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे.