Diet – उत्तम आरोग्य – जगातील काही महत्वपूर्ण आहारांची माहिती – Various Best Diet Plans Marathi information

Diet – महत्वपूर्ण आहारांची माहिती – Various Best Diet Plans Marathi information   

 वजन वाढणे ही आजकाल एकाच व्यक्तीची समस्या राहिलेली नसुन अनेक स्त्री तसेच पुरुषांना ह्या समस्येचा सामना करावा लागत असतो.आणि ही समस्या निर्माण होण्याचे मुळ कारण असते आपल्या शरीरातील फँटसमध्ये वाढ होणे.

शरीराचा फँटस वाढल्याने आपल्याला अनेक शारीरीक तसेच मानसिक समस्यांना देखील सामोरे जावे लागत असते.

जसे की शरीराचा लठठपणा वाढल्यामुळे हदय विकाराचा झटका येणे तसेच इतर आरोग्याशी संबंधित समस्या उत्पन्न होत असतात.

आणि आरोग्य उत्तम नसल्याचा विपरीत परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर देखील होत असतो.

याचसाठी आपण आपल्या शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी आपल्या आहारावर योग्य संतुलन ठेवणे फार गरजेचे असते.

याचसोबत सकाळी व्यायाम तसेच योगा देखील करायला हवा.ज्याने आपल्या शरीराची चरबी वाढणार नाही.

आजच्या लेखात आपण वजन कमी करण्यासाठी आणि आपल्या आरोग्यात उत्तम सुधारणा घडवून आणण्यासाठी काही बेस्ट डाएट प्लँनविषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

आपले वजन कमी करण्यासाठी आणि संपुर्ण आरोग्यात उत्तम सुधारणा घडवून आणण्यासाठी बेस्ट डाएट प्लँन कोणता आहे?

 आपल्याला प्रत्येकाला हा प्रश्न नेहमी पडत असतो की आपले वजन कमी करण्यासाठी आणि संपुर्ण आरोग्यात उत्तम सुधारणा घडवून आणण्यासाठी आपण कोणता डाएट प्लँन फाँलो करायला हवा.

आपणास देखील हा प्रश्न वारंवार उदभवत असेल तर आपण एकदम योग्य ठिकाणी आलेले आहात.

चला तर मग जाणुन वजन कमी करण्यासाठी आणि आपल्या उत्तम आरोग्यासाठी बेस्ट डाईट प्लँन कोणता आहे?

1)उपवास करणे : Fasting

2) भाजीपाला आधारीत आहाराचे सेवण करणे :

3) लो कार्ब डाएट : कमी कार्बोदके

4) पँलिओ डाएट : कमी कार्बोदके

5) कमी चरबी असलेल्या आहाराचे सेवण करणे :

6) मध्य युरोपिय  आहार :

7) वेट वाँचरचा उपयोग करणे : वजन वाढीवर लक्षं

8) डँश डाईट : रक्त दाबाब नियत्रणा करता

1)उपवास करणे :

  • आपण आत्तापर्यत अनेक जणांच्या तोंडुन हे ऐकले असेल की आपल्याला आपले स्वास्थ्य,आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर आपण आठवडयातुन एकदा तरी उपवास करायला हवा.
  • आणि हे एकदम बरोबर देखील आहे कारण आठवडयातुन कमीत कमी दोन दिवस जरी उपवास केला तरी आपले वजनात बरीच घट होत असते.याचसोबत आपली पाचनसंस्था देखील व्यवस्थित कार्य करत असते.चयापचय क्रियेत देखील वाढ होते.
  • आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे उपवास केल्याने आपण आपल्या भुकेवर नियंत्रण ठेवू शकतो.कारण उपवास करताना आपण 10 ते 12 तास उपाशी राहत असतो.म्हणुन हा देखील एक उत्तम मार्ग आहे ज्याचा अवलंब करून आपण आपल्या शरीरातील कँलरी कमी करू शकतो.
  • अभ्यासात असे निर्दशनास आले आहे की अधून मधून उपवास केल्याने आपले तीन ते 25 आठवडयांत तीन ते नऊ टक्के इतके वजन कमी होत असते.ज्याचे सरासरी प्रमाण इतर पदधतींच्या तुलनेत अधिक मानले जाते.
  • एवढेच नाही तर असे केल्याने आपल्या कमरेचा घेरा हा सात ते आठ टक्के इतका कमी होण्यास मदत होत असते.
See also  8 बेस्ट स्क्रिन रेकॉर्डरची माहिती - Screen recorder Marathi information

उपवास करण्याचे इतर फायदे :

  • उपवास केल्याने आपल्या मेंदुचे आरोग्य सुधारते.
  • इंसुलिनच्या संवेदनशीलतेत देखील वाढ होते.
  • जळजळ कमी होत असते.

2) भाजीपाला आधारीत आहाराचे सेवण करणे :

 वनस्पती आधारीत आहार देखील वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरत असतो.यात शाकाहार,वनस्पतीजन्य आणि शाकाहारी पदार्थाचे सेवण आपण करत असतो.ज्यात आपल्या आरोग्यासाठी तसेच इतर पर्यावरणीय कारणांसाठी मांसाहाराचा प्रतिबंध केला जातो.

  • वनस्पती तसेच शाकाहार आधारीत आहारात आपण फळे,हिरव्या पालेभाज्या,धान्य कडधान्ये इत्यादी मांस विरहीत आहाराचे सेवण करत असतो.मांसाहाराला यात यासाठी मज्जाव केला जात असतो की मांसाहारी आहारात कँलरीजचे प्रमाण अधिक असते आणि त्याचे सेवण केल्याने आपल्या शरीरातील कँलरीजच्या प्रमाणात देखील वाढ होऊ शकते.
  • म्हणुन यात वनस्पती आधारीत आहाराचे सेवण करून मांसाहाराचा प्रतिबंध केला जातो.
  • संशोधकांनी केलेल्या संशोधनात असे देखील निर्दशनास आले आहे की वजन कमी करण्यासाठी वनस्पती आधारीत आहाराचे सेवण करणे अधिक उपयुक्त आणि फायदेशीर ठरते.
  • मांसाहारी आहाराचे सेवण करत असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत वनस्पती आधारीत आहाराचे सेवण करत असलेले व्यक्तींचे वजन दोन किलो इतके कमी झाले आहे.
  • आणि शाकाहारी आहाराचे सेवण करत असलेल्या व्यक्तींनी वनस्पती आहाराचे सेवण न करत असलेल्या व्यक्तींपेक्षा5 किलो इतके वजन कमी करण्यात यश प्राप्त केले.असे संशोधनातुन समोर आले आहे.
  • वनस्पती आधारीत आहाराचे सेवण करण्याचे फायदे :
  • वनस्पती आधारीत आहाराचे सेवण केल्याने हार्ट अटँक,कँन्सर,डायबिटीस यांसारख्या आजारांचा धोका कमी होत असतो.
  • वनस्पती आधारीत आहाराचे सेवन केल्याने आपले वजन कमी होण्यास देखील मदत होत असते.

3) लो कार्ब डाएट :

  • वजन कमी करण्यासाठी लो कार्ब डाएट देखील एक उत्तम पर्याय आहे.
  • अभ्यासातुन असे समोर आले आहे की लो कार्ब डाएट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरत असते.आणि कमी चरबी असलेल्या आहारापेक्षा अधिक प्रभावी ठरत असते.
  • संशोधनपुर्ण अभ्यासातुन असे निर्दशनास आले आहे की कमी हायड्रेट आहारामुळे कमी चरबी युक्त आहारापेक्षा अधिक प्रमाणात वजन कमी होत असते.
  • इतकेच नाही तर कमी कार्बो हायड्रेट आहार हा पोटाची चरबी कमी करण्यासाठी देखील खुप प्रभावी असतो.
  • लो कार्ब डाएटचे फायदे :
  • लो कार्ब डाएटमुळे हाय कोलेस्टेराँल,हाय ब्लड प्रेशरचा तसेच हार्ट अटँकचा धोका कमी होत असतो.
  • पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की लो कार्ब डाएटचे अतिसेवन देखील आपण करू नये कारण असे केल्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्टेराँलची पातळी वाढत असते तसेच पचन क्रिया देखील खराब होत असते.
See also  राजु श्रीवास्तव विषयी माहीती - Raju Srivastav Information In Marathi

4) पँलिओ डाएट :

  • पँलिओ डाएटमध्ये आपण अशा खाद्य पदार्थांचे सेवण करत असतो ज्या खाद्य पदार्थांचा समावेश हजारो वर्षा पुर्वी आपल्या आहारात केला जात होता.ज्यात विविध फळे,भाज्या मांस, मटण ड्राय फुटस इत्यादींचा समावेश होत असतो.
  • आणि यात साखर तसेच इतर दुग्धजन्य पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध केला जात असतो.
  • अणि अभ्यासातुन असे समोर आले आहे की पँलिओ आहाराचे सेवण केल्याने पोटाची चरबी आणि वजन दोघे कमी होत असते.
  • तीन आठवडयांच्या केलेल्या अभ्यासपुर्व संशोधनात असे समोर आले आहे की पँलिओ आहाराचे सेवण करत असलेल्या 15 निरोगी व्यक्तींनी सरासरी3 किलो इतके वजन कमी केले आहे.तसेच पँलिओ आहाराचे सेवण केल्याने आपल्या कंबरेचा घेर देखील कमी होण्यास मदत होत असते.
  • पँलिओ आहाराचे सेवण करण्याचे फायदे :
  • पँलिओ आहाराचे सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर,हाय कोलेस्टेराँल,हार्ट अटँक यासारख्या आजारांची संभावना कमी होत असते.

5) कमी चरबी असलेल्या आहाराचे सेवण करणे :

 पाहावयास गेले तर आपणास असे दिसुन येते की कमी चरबीयुक्त आहारात कमी कँलरीज समाविष्ट असतात.

  • कमी चरबीयुक्त आहारात कँलरीजचे सेवण मर्यादित प्रमाणात केले जात असल्याने वजन कमी करण्यास ते उपयुक्त ठरत असते.
  • 33,500 अधिक जणांनी मिळुन केलेल्या विश्लेषणातुन असे निदर्शनास आले आहे की कमी चरबीयुक्त आहाराचे सेवण केल्याने वजन आणि कंबर या दोघांमध्ये छोटे छोटे बदल होताना दिसुन आले आहेत.
  • लठठपणा असलेल्या व्यक्तींनी जर 7 ते 14 टक्के कमी चरबीयुक्त आहाराचे सेवन केले तर7 टक्के इतके वजन कमी होत असते.असे 56 अभ्यासकांनी मिळुन केलेल्या आठ आठवडयांच्या अभ्यासातुन समोर आले आहे.
  • कमी चरबीयुक्त आहाराच्या सेवणाचे फायदे :
  • कमी चरबीयुक्त आहाराचे सेवण केल्याने हार्ट अटँक तसेच स्ट्रोकचा धोका देखील कमी होत असतो.

6) मध्ये युरोप आहार :

  • हा आहार इटली तसेच ग्रीस सारख्या देशांत ज्या पदार्थाचे आहारात सेवन केले जाते अशा पदार्थांवर आधारीत आहे.
  • सागरी आहार जरी हार्ट अटँकचा धोका कमी करण्यास मदत करत असले तरी अभ्यासातुन असे सुचित करण्यात आले आहे की याने वजन देखील कमी होण्यास मदत होत असते.
  • या आहारात फळ,भाज्या,शेंगा,मासे,सिफुड एक्सट्रा व्हरजिन आँलिव्ह आँईल इत्यादींचा समावेश होत असतो.
  • या आहारात अंडी,दुधाचे पदार्थ यांसारख्या पदार्थाचे सेवण कमी प्रमाणात केले जाते.
  • आणि सगळयात महत्वाची बाब अशी की हा आहार वजन कमी करण्याचा आहार नसला तरी अभ्यासातुन असे स्पष्ट झाले आहे की याने वजन कमी होण्यास मदत होते.
  • 19 अभ्यासांच्या विश्लेषणातुन हे सिदध देखील झाले आहे की भुमध्य सागरी आहाराचे सेवन करत असलेल्या व्यक्तींनी नियंत्रित आहारापेक्षा अधिक वजन कमी केले आहे.
See also  युजीसी नेट परीक्षेची Answer Key PDF Download | UGC NET Final Answer Key PDF Download

7) वेट वाँचरचा उपयोग करणे :

 वेट वाँचर देखील वजन कमी करण्याचा उत्तम पर्याय आहे.

  • अनेक अभ्यासातुन असे उघडकीस आले आहे की वेट वाँचर प्रोग्रँम आपल्याला वजन कमी करण्यास मदत करत असते. यात ठरवून दिलेया प्रमाणंनुसार कॅलरी घेतल्या जातात
  • 45 अभ्यासपुर्ण समीक्षा तसेच विश्लेषणातुन असे आढळुन आले आहे की जे व्यक्ती वेट वाँचर आहाराचे सेवन त्यांनी मानक समुपदेशन प्राप्त केलेल्या व्यक्तींच्या तुलनेत6 टक्के इतके वजन कमी केले आहे.
  • वेट वाँचर आहारात निबर्ध असलेल्या तसेच अँलर्जी असलेल्या पदार्थांसे सेवण न करण्याच्या योजनेचे पालन केले जाते .

8) डँश लाईट :

 डँश लाईट ही एक खाण्याची योजना तसेच पदधत असते.जी हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी आणि त्याला प्रतिबंधित करण्यासाठी खासकरून तयार करण्यात आली आहे.

  • यात फळ,भाज्या,सर्व धान्य पातळ मांस खाण्यावर भर दिला जातो.
  • डँश आहार हा वजन कमी करण्याचा आहार नसला तरी बरेच लोकांनी यातुन वजन कमी केले असल्याचे अहवालात आत्तापर्यत पाहण्यात आले आहे.
  • 13 अभ्यासाच्या विश्लेषणातुन असे आढळुन आले आहे की डँश आहाराचे सेवण करत असलेले व्यक्तींनी 8 ते 24 आठवडयांपेक्षा अधिक प्रमाणात वजन कमी केले आहे.
  • डँश आहाराचे फायदे :डँश आहार ब्लड प्रेशर आणि हार्ट अटँकचा कर्करोगाचा धोका कमी करत असते.
[rpwe limit="05" thumb="true"]

1 thought on “Diet – उत्तम आरोग्य – जगातील काही महत्वपूर्ण आहारांची माहिती – Various Best Diet Plans Marathi information”

Comments are closed.