लहान मुलांची आरोग्यविषयक काळजी पालकांनी कशी घ्यावी ? – Kids Health tips by Dr. G.M Patil

लहान मुलांची आरोग्यविषयक काळजी  – Kids Health tips by Dr. G.M Patil

कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडणे म्हणजे एक दिव्यच असते. आपली  नोकरी ,ऑफिस,व्यवयासाच्या जबाबदाऱ्या आणि त्यात मुलांचं संगोपन, एकूणच जीवनाचा हा अतिशय खडतर प्रवास.वेळ थोडा आणि प्रपंच मोठा .

लहान बालकांना शक्य तितक्या लवकर चांगल्या आरोग्य सवयी लावणं खूप महत्वाचे असते. घरातील लहान मुलं आईवडील,आजीआजोबा  यांचं अनुकरण करतात त्यामुळे मुलांसमोर एक उत्तम आदर्श ठेवणं खूप महत्वाचे आणि तितकेच गरजेचं आहे.

आज आपल्या सभोवताली पाहिलं तर बालकामध्ये मध्ये जाड होण्याचं प्रमाण वाढलंय.  आरोग्यदायी व क्रियाशील जीवनशैली आपल्याला वजन प्रमाणात ठेवण्यास मदत करते. तसेच आरोग्य च्या तक्रारी दूर ठेवण्यास मदत होते जश्या की  मधुमेह, हृदय ,अस्थमा व रक्तदाब.

आपण तरुण असाल,तर आपण आपली काळजी स्वतःची स्वतः घेऊ शकतो.आपल्याला काय होतंय हे आपण घरातील मोठ्या मंडळींना सांगू शकतो;परंतु लहान बाळांचं काय ? ते त्यांना काय होतंय हे सांगू शकत नाहीत,त्यामुळे आपली पालक म्हणून आपल्या बाळाची काळजी घेण म्हत्वाच  आहे..

घरातील लहान बालकांची काळजी कशी घेऊ शकतो ? याबबद्दल माहिती पाहणार आहोत.

कुटुंबाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आरोग्यदायी उपाय :

  • दिवसाची सुरवात ही  आरोग्यदायी नाश्ता ने करायला हवी.सकाळचा आरोग्यदायी नाश्ता आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा देतो.
  • सकाळचा आरोग्यदायी नाश्ता तुमच्या कुटुंबाला स्वस्थ ठेवण्यासाठी कामी येतो.
  • तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी आठवड्याचे रूपरेखा तयार करा आणि त्या प्रमाणे त्या त्या दिवशी ते ते पदार्थ बनवा.
  • जेवढे शक्य तितके एकत्र कुटुंबासोबत जेवण्याचा प्रयत्न करा.ते म्हणतात ना,एकत्र जेवल्याने जेवण थोडे जास्त जाते.
  • जेवणात पालेभाज्यांचा समावेश नक्की असावा.दिवसातून तुम्ही एकदा तरी कोणतही फळ खाल्ले पाहिजे.
  • जेवढे तुम्ही आपल्या आहारात पौष्टिक अन्नचा समावेश कराल तेवढे आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील.
  • जर तुम्ही मांसाहारी करत असाल तर अपल्या मुलांसाठी किमान आठवड्यातून एकदा मटण,चिकन किंवा मासे आना.
  • जेवनामध्ये फायबर युक्त पदार्थ असणे गरजेचे आहे.
  • जेव्हा तुम्ही बाहेरील स्नॅक्स खाता तेव्हा पहा की त्या गाड्यावर बनवलेले स्नॅक्स हे ताजे आणि झाकलेले असायला हवे.
  • आपल्या मुलांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन ची गरज असते.मुलांसाठी मल्टी व्हिटॅमिन पदार्थाची आवश्यकता नाही पण तुमच्या जेवनामध्ये व्हिटॅमिन चा समावेश असला पाहिजे.
  • आईने जेवणाच्या अगोदर जेवायला घेतलेली प्लेट स्वच्छ आहे का त्याची खात्री करा .कारण किटाणू प्लेट वर असू शकतात, त्या क्लीन करा .
  • रोग नियंत्रण नुसार लहान मुलांचा मागच्या तीस वर्षांमध्ये मुलांचे वजन वाढण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे.2012 मध्ये अमेरिकेत लोकसंख्येमधील 18 % 6 ते 12 वर्षाच्या मुलाचे वजन जास्त होते.
  • लहान मुलांसाठी शारीरिक हालचाल ही फार महत्वाची आहे.
  • आपली मुले जर शाळेत असतील तर त्यांना शाळेतील खेळामध्ये सहभागी होण्यासाठी आग्रह करा.
  • शाळेतील खेळामध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांचा व्यायामही होईल आणि त्यांचे आरोग्यही चांगले राहील.
  • मुले विडिओ गेम खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळायला जातील,तेवढे त्यांचे आरोग्य चांगले राहील.
  • आपल्या मुलांना चांगल्या आरोग्यदायी सवयी लावा.म्हणजे सकाळी उठल्यानंतर ब्रश करणे,व्यवस्थित अंघोळ करणे,इत्यादी.
  • अमेरिकन एकेडमी ऑफ पीडियाट्रिक डेंटिस्ट्री नुसार ‛दात किडने’ ही लहानपणाचा एक सामान्य प्रॉब्लेम आहे.फ्लोराईड लहान मुलांच्या दातांना सुरक्षित ठेवेल.
  • दातांच्या आरोग्याची विशेष देखभाल घ्या
See also  डाळिंब खाण्याचे आरोग्यदायी फायदे (रस,साल,फळ व पान) - Pomegranate fruit health benefits Marathi information

पालकांनी आपल्या मुलांसाठी जेवताना घ्यावयाची दक्षता –

  • जेवताना आपल्या मुलांबरोबर कौतुकास्पद भाषेत बोला.
  • जेवण बनवताना पौष्टीक तेलाचा वापर करा. जसे की सूर्यफूल, कनोला व ओलीव
  • आपल्या कुटुंबासोबत सुटीच्या दिवशी बाहेर खाण्यासोबत जा.
  • जेवताना आपल्या मुलांबरोबर गप्पा मारा , मजेत वेळ घालवा.
  • आपल्या घरगुती डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जेवणात योग्य तो बदल करा.
  • आपल्या कुटुंबातील सदस्यांचा कॅलरीज नुसार योग्य तो आहार द्या.

आपल्या मुलांना व्यायामासाठी चांगल्या सवयी लावणे.

  • जर तुम्ही फ्लॅट मध्ये राहत असाल तर वर-खाली करण्यासाठी लिफ्ट चा वापर न करता पायऱ्यांचा वापर करा.जर इमर्जन्सी असेल तर तुम्ही लिफ्ट चा वापर करू शकता.आपल्या मुलांनाही पायऱ्या चढण्याची सवय लावा.जेणेकरून त्यांचा व्यायाम होईल.
  • बाहेरील पॅकबंद पदार्थ घेत असाल तर त्यावरील न्यूट्रिंयट्स किती आहेत त्याचा तक्ता नक्की पहा
  • मुलांच्या शारीरिक हालचालीवर भर द्या , झाडलोट , सफाई , घरात धूळ सफाई अश्या काम त्यांनी केली पाहिजेत यावर भर द्या.
  • जेवणा आधी व नंतर चालण्याची सवय बालकांना सवय लावा.
  • तुम्ही जर नोकरी करत असाल तर घरात व्यायाम करण्यासाठी लहान व्यायाम साहित्य मागवता आला तर उत्तम आणि नियमित व्यायाम करा आणि
  • आपल्या मुलांना सूर्यनमस्कार सारखा व्यायाम करायला सांगा.
  • आपल्या मुलांसाठी एक आदर्श पालक बनण्याचा प्रयत्न करा.
  • लहान मुलांमध्ये आता विडिओ गेम खेळण्याची क्रेज खूप वाढली आहे.आपल्या मुलांना ह्या विडिओ गेम च्या आहारी न जाऊ देण्यासाठी पालक कन्ट्रोल सारख्या टूल्स चा वापर करा.तुम्ही असे करू शकता,आपल्या मुलाने दोन तासांच्या वर मोबाईल वापरु नये,यासाठी तुम्ही पालक कन्ट्रोल मध्ये 2 तास मोबाईल युज चा रिमाईंडर लावा.
  • आपल्या लहान मुलांना बाहेर मैदानावरती खेळण्यासाठी पाठवा.कारण जेवढे ते मैदानी खेळ खेळतील,तेवढे ते निरोगी राहतील.
  • आपल्या मुलांना सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.सुरवातीला लहान मुल टाळाटाळ करतात , उठणार नाही,पण हळू हळू त्यांना सकाळी लवकर उठण्याची सवय लागेल.
  • आपल्या मुलांना चांगले संस्कार लावण्यासाठी रामायण, महाभारत सारख्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत .चांगले विचार तुमच्या मुलांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करतील.
See also  डोळे येणे म्हणजे काय?Conjunctivitis and eye flu inspection meaning in Marathi

पालक म्हणून आपण अश्या काही लहान बाबी आंगीकरून आपण नक्कीच बालकांची काळजी घेवून त्यांना उत्तम आरोग्य देवू शकाल.


डॉ जि एम पाटील
नवजात शिशु व बालरोग तज्ज्ञ - Pediatrician 
अमळनेर जि जळगाव 
पत्ता - Address- ग्रामीण रुग्णालय ,
स्वामी नारायण मंदिर मागे , 
LIC ऑफिस जवळ अमळनेर
Rural Hospital, Amalner 
Address: 
Behind Swaminarayan Temple, 
Near LIC Office,
Amalner, Maharashtra 425401