न्यूट्रिशन बार म्हणजे काय ? Nutrition Bars information Marathi

Nutrition Bars information Marathi

न्यूट्रिशन बार म्हणजे काय ?

न्यूट्रिशन बार म्हणजे पूरक आहार , ज्याला एनर्जी बार ,प्रोटीन बार ही म्हटलं जातं. जे आपण व्यायाम आधी नंतर घेयू शकता. न्यूट्रिशन बार आपल्या शरीराला प्रोटीन , कार्बोद्के विटामीन असे पौष्टीक घटकं पुरवू शकते.

आपल्या शरीराला पोषक अन्नाची आवश्यकता असते.जर आपण खाल्लेल्या अन्नात पोषक घटक सामाविष्ट नसतील तर मग काय करायचं ? याचा एक उपाय असा की,तुम्ही तुमच्या शरीराला पोषक असे घटक जेवणामध्ये सामाविष्ट केले पाहिजेत.तुमच्या जेवनामध्ये योग्य पोषक घटक सामाविष्ट नसतील तर तुम्ही शरीराची न्यूट्रिशन गरज भागविण्यासाठी न्यूट्रिशन बार चा उपयोग करू शकता..

काहीजण जगण्यासाठी खातात,तर काहीजण खाण्यासाठी जगतात.ह्या भेसळ युक्त जगात हेल्दी आहार खूप कमी झालाय.तुम्ही जर भाज्यांचा विचार केला,तर भाज्याही भेसळ युक्त झाल्यात.जे नैसर्गिक आहे,ते शक्यतो आपण खात नाही.अशा या भेसळयुक्त जगात तसेच व्यस्त जगात न्यूट्रिशन बार ची व्हॅल्यू खूप वाढते.

आजकालची काही युवा पिढी व्यायामाच्या बाबतीत खूप सिरियस आहे..व्यायामाच्या बाबतीत सिरियस असणाऱ्या पिढीला योग्य डाएट आता ऑनलाइन चेक करणे आणि ऑनलाइन मागवणे सोपे झाले आहे.ते त्यांच्या शरीरातील न्यूट्रिशन गरजा योग्य डाएट द्वारे भागवू शकतात;परंतु समजा काही जण व्यायामाबद्दल सिरीयस आहेत; परंतु कामाच्या व्यापाने किंवा जॉबच्या व्यस्त जीवणाने त्यांना योग्य असा पोषक डाएट ग्रहण करता येत नसेल .आशा परिस्थितीत त्यांच्यासाठी न्यूट्रिशन बार एक चांगला पर्याय आहे.

चांगल्या आरोग्यमध्ये चांगल्या आहाराचे तितकेच महत्व असते,जितके की व्यायामाचे असते.तुम्हाला चांगल्या आरोग्यासाठी पोषक घटक खाण्याची आवश्यकता असते.जे आपण अन्न खातो त्या अन्नामधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पोषक घटक मिळत असतात..

See also  आपल्या शरीरातील लाल रक्तपेशीमध्ये वाढ करणारया काही महत्वाच्या अन्नपदार्थांची यादी - red blood cells increase food list

डायटीशन शीला शेहरावत यांच्या मते,आजच्या युगात व्यायामाबद्दल युवा पिढीची क्रेज खूप वाढली आहे आणि आजच्या धावपळीच्या युगात एकतर आपण जेवण वेळेवर खात नाही किंवा आपण पोषण युक्त आहार ग्रहण करत नाही. अशा परिस्थितीत न्यूट्रिशन  बार खाणे फायद्याचे ठरते.पण तुम्ही एक गोष्ट लक्षात असू द्यावी , न्यूट्रिशन  बार पासून शरीरात वाढवलेल्या न्यूट्रिशन  पेक्षा पोषक अन्न खाऊन शरीरातील वाढलेले न्यूट्रिशन  फायद्याचे आहे. न्यूट्रिशन  बार हा न्यूट्रिशन  वाढवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे,पण तुम्ही न्यूट्रिशन  बार वर पूर्णपणे निर्धारित राहू नका.

न्यूट्रिशन  बार चे फायदे खालीलप्रमाणे : Nutrition Bars information Marathi

 • जर तुम्हाला तात्काळ ऊर्जेचे एनर्जी ची गरज आहे,तर तुम्ही न्यूट्रिशन बार खाऊ शकता. आपण कामात खूप व्यस्त आहे,तेव्हा आपण न्यूट्रिशन  बार खाऊ शकतो.कधीतरी आपण न्यूट्रिशन  बार डाएट मध्ये समाविष्ट करू शकतो.समजा व्यस्ततेमुळे तुमच्याकडे जेवणाचीही वेळ नाहीये.आशा वेळेस तुम्ही न्यूट्रिशन बार खाऊ शकता.
 • व्यायाम करण्यापूर्वी किंवा व्यायाम केल्या नंतर आपण न्यूट्रिशन बार खाऊ शकतो.न्यूट्रिशन बार ने तुमचे मसल फुगायला मदत होईल.
 • तुम्ही न्यूट्रिशन बारला सकाळच्या नाश्त्यामध्ये खाऊ शकता.एक गोष्ट धेनात ठेवा सकाळच्या न्यूट्रिशन  बार मध्ये प्रोटीन चे प्रमाण जास्त असायला हवे.

मार्केट मध्ये न्यूट्रिशन  बार बरेच पर्याय उप्लब्द आहेत .त्यातील चांगला न्यूट्रिशन  बार कसा निवडायचा ? Nutrition Bars information Marathi

 • न्यूट्रिशन  बारमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते.त्यामुळे तुम्ही, न्यूट्रिशन  बार घेताना त्यांच्यावरील असलेले लेबल चेक केले पाहिजे.त्या लेबल वर जर फ्रुक्टोज, सुक्रोज सारख्या गोड पदार्थांचे प्रमाण जास्त असेल तर तुम्ही तो न्यूट्रिशन  बार खरेदी करणे टाळल पाहिजे
 • .जर लेबल वर खजूर सारख्या गोड पदार्थांचा समावेश असला तर तुम्ही तो न्यूट्रिशन  बार नक्की खरेदी केला पाहिजे.त्यामधून तुम्हाला मिनरल आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात मिळतील.तुमच्या न्यूट्रिशन बारमध्ये साखरेचे प्रमाण 10-15 ग्राम असले पाहिजे.
 • प्रत्येक न्यूट्रिशन बारमध्ये फॅट ची संख्या वेगवेगळी असते.तुम्ही 5 ग्राम फॅट असलेला न्यूट्रिशन बार खरेदी केला पाहिजे.
 • न्यूट्रिशन  बारमध्ये प्रोटीन चे प्रमाण 15 ग्राम आणि त्यात थोडे फायबर चा समावेश असला पाहिजे. न्यूट्रिशन बारमध्ये प्रोटीन चे स्रोत व्हे किंवा केसीन असले पाहिजे.जर न्यूट्रिशन  बारमध्ये 35 % मिनरल आणि व्हिटॅमिन्स असतील तरच ते फायद्याचे ठरते.एनर्जी साठी तुम्ही ताजे फळ आणि पालेभाज्या खाऊ शकता.
 • साधारण न्यूट्रिशन बारमध्ये 150-300 कॅलरीज असतात.काही न्यूट्रिशन बार पॅक मध्ये हाय एनर्जी,बुस्ट यांसारखे शब्द लिहिलेले तुम्हाला दिसतील.जास्त एनर्जी म्हणजे जास्त कॅलरीज.त्यामुळे योग्य न्यूट्रिशन बार निवडताना फायबर ची माहिती नीट पहा.जेवढे जास्त फायबर तेवढे जास्त वेळ तुमचे पोट भरलेले असेल.
 • न्यूट्रिशन  बार चेक करताना कार्बो हायड्रेट पाहणे गरजेचे आहे. न्यूट्रिशन  बारमध्ये फॅट ,कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन चे प्रमाण 30:20:30 असे असले पाहिजे.
 • ज्या न्यूट्रिशन बारमध्ये फॅट चे स्रोत Unsaturated  व्हेजिटेबल ऑइल,जसे की सनफ्लॉवर, कोकोनट, इत्यादी,असतील ते चांगले असतात. न्यूट्रिशन बार मध्ये फॅट चे स्रोत पॉम ऑइल किंवा कर्नल ऑइल असेल तर त्यांना खरेदी करू नका. न्यूट्रिशन बारमध्ये फॅट चे प्रमाण 3 ग्राम पेक्षा कमी असले पाहिजे.
 • एक चांगल्या न्यूट्रिशन बारमध्ये तुमच्या शरीराला लागणाऱ्या मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स च्या एक-तिसरा हिस्सा असायला हवा.ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स सी,ए, डी, ए आणि मिनरल्स पोटॅशियम, मॅग्नेशियम ,कॅल्शियम आणि जिंक असले पाहिजे.
 • न्यूट्रिशन  बार खरेदी करताना लेबल नक्की चेक करा.ज्या न्यूट्रिशन  बारमध्ये सगळ्यात कमी बइंगरिडीएन्ट्स असतील तोच  न्यूट्रिशन बार खरेदी करा.पीनेट बटर असलेले न्यूट्रिशन  बार चांगले असतात.
 • सारखे न्यूट्रिशन बार खाणे तुमची सवय बनवू देऊ नका.
See also  आयुर्वेदिक अभ्यंग म्हणजे काय? त्याचे फायदे काय ? Abhyanga Ayurvedic Mahiti