चालण्याचे आरोग्य दायी फायदे – Health benefits of walking Marathi


Health benefits of walking Marathi

चालण्याचे आरोग्य दायी फायदे –

खेळाडू आणि सामान्य लोक जी शारीरिक तंदुरुस्ती बाबत चौकस असतात ते नेहमीच नवनवीन आणि अत्याधुनिक व्यायाम उपकरण आणि नवीन प्रकारच्या व्यायामबाबत माहिती शोधत असतात जेणेकरुन त्यांच जे क्षेत्र आहे त्यात त्यांच्या कामगिरी त अधिक सुधारणा व्हावी तसेच आरोग्य मजबुत व्हावं.

परंतु सर्वोच्च म्हत्वाचा पण अगदी साधा ,सहज ,सोपा व्यायामाचा प्रकार आपण विसरत आहोत.

निसर्गाने मानवाचं शरीर अस बनवलं आहे की आपण सरळ उभं राहू शकतो आणि दोन पायांवर चालू शकतो.तंत्रज्ञान च्या ओघात मात्र वाहनांनी सर्व जीवन व्यापल आहे ,इतकं व्यापल की साधं रस्त्यावर, नाक्यावरच्या दुकानावर जाऊन दूध आणायचा म्हटलं तरी बरीच लोक बाईक वर जाऊन आणतील पण चालणं  टाळतील.

नवीन संगणकीय कामं वाढत चालल्याने दिवसोगणिक शारीरिक कष्टाचे काम कमी होत चाललीत.घरातील लहान मोठी शारीरिक दैनंदिन काम ही आज उपकरण द्वारे होताना दिसत आहेत.काही शारीरिक कष्ट न करता रोजची घरगुती काम करून घेण्यात लोकांचा कल वाढत आहे.ठरवलं तर सहज प्रत्येक जण 30 मिनिटं पेक्ष्या सहज चालू शकतो, पण याबाबत लोकांमध्ये उदासीनता पाहवयास मिळते.

दिवसभर सतत हालचाल करणे,शकय तितकं चालण्या ऐवजी लोक बैठे काम करताना दिसतात. वर म्हटल्याप्रमाणे मानवी शरीराची रचना ही सतत बैठे काम करण्यास योग्य नाही. जितकं आपण शारीरिकरचणे च्या विरुध्द जाऊन काम करू तितकं शरीराला हे घातक ठरू शकते.

मानवाच्या दैनंदिन हालचालीं करता व वाहतुकी करता ,निसर्गाने चालणं या प्रकाराची बेसिक नि मुख्य प्रकार म्हणून रचना केली आहे.

म्हणनुच शरीराच्या उत्तम आरोग्याकरता चालणं या साध्या व्यायाम वर भर दिला पाहिजे. रोज चालणं हा आपल्या दैनंदीन कृतीचा एक अविभाज्य भाग झाला पाहिजे.

See also  टीपीएचा फुलफाँर्म काय होतो? TPA Full Form In Marathi

लक्षात असू द्या आपलं शरीर जितकं अधिक क्रियाशील राहील ,आपण सतत काही न काही काम करत राहाल तितकं आपलं शरीर कार्यक्षम राहील.

वॉकिंग (चालण्याचे) फायदे – Health benefits of walking Marathi

  • आयुष्य दिर्गायुषी होतं
  • आपलं वजन नियंत्रणात राहत- आपले जर वजन जास्त असेल तर तुम्ही चालण्याने ने वजन कमी करू शकता.
  • आपली अनावश्यक चरबी जाळली जाते
  • वजन वाढलेल्या लोकांचं शरीराचा आकार योग्य होतो
  • दैनंदिन तणाव कमी होण्यास मदत होते- वॉकिंग हा तणाव कमी करण्यासाठी चांगला व्यायाम आहे.
  • स्मृतिभ्रंश च्या त्रासावर मात करता येते
  • रक्तदबाब नियंत्रण ठेवता येते
  • हृदय मजबुत होते
  • आपली हाड मजबुत होतात आणि अस्थीविकारावर मात देता येते
  • निराशा कमी करून आपण आनंदी राहता
  • स्मरण शक्ती वाढते
  • गाढ झोप लागते
  • व्हिटॅमिन ड च प्रमाण वाढतं
  • व्यायाम करण्याच्या पूर्वी 10-15 मिनिटे वॉकिंग करणे फायद्याचे ठरते.ह्या प्रि वॉकिंग मुळे तुमच्या जॉईंट चा वॉर्म अप होतो आणि चालल्यामुळे शरीरातील नर्व्ह सिस्टीम व्यायाम करण्यासाठी तयार होतात.
  • चालण्याने आपली शारीरिक क्षमता – तुमचा स्टॅमिना वाढतो.
  • योग्य आहार आणि चालण्याची ची सवय तुम्हाला आजारांपासून दूर ठेवते.त्यामुळे तुम्ही ही नियमित चालल पाहिजे.
  • तुम्ही जर सकाळी वॉकिंग साठी जात असाल तर तुम्हाला वातावरणातील फ्रेश ऑक्सिजन मिळतो .

चालण्या बाबत काही म्हत्व च्या बाबी – Health benefits of walking Marathi

  • तुम्ही सकाळी आपल्या सभोवतालच्या गार्डन मध्ये गेला तर,आपल्याला तिथे मंडळी वॉकिंग करताना दिसतील.
  • वॉकिंग च महत्व हळू हळू का असेना आज वयस्कर  माणसापासून ते तरुण वयातील मंडळीमडे वाढताना दिसत आहे.
  • जेव्हा वॉकिंग करता तेव्हा एक गोष्ट लक्षात असू द्या ,सपाट जमिनीवर चालण्यापेक्षा चढ-उतार असणाऱ्या जमिनीवर चाला.तुम्ही चढ-उतार असलेल्या जमिनीवर चाललात तर तुम्हाला खूप घाम येतो आणि त्यामुळे तुमच्या भरपूर कॅलरीज बर्न होतात.
  • ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे,त्यांच्यासाठी सकाळी वॉकिंग ला जाणे हा चांगला पर्याय आहे. वॉकिंग हा सोपा व्यायाम चा प्रकार आहे,त्यामुळे वॉकिंग कोणीही करू शकते.
  • तुम्हाला जर वाकिंग चालू करायचे असेल तर,तुम्ही सुरवातीला 30 ते 40 मिनिटांचे वाकिंग शेड्युल बनवा आणि जसे जसे तुम्हाला वॉकिंग ची सवय होईल,तसे तसे चालण्याच प्रमाण वाढवा.
  • वॉकिंग करताना आपण पायात काय घालून वॉकिंग करतोय ? हे ही महत्वाचे असते.तुम्ही वॉकिंग करण्यासाठी वॉकिंग शूज चा वापर करा.सँडल किंवा स्लीपर घालून वॉकिंग ला जाने टाळा
See also  भारतातील Best IVF Centers विषयी माहीती - Best IVF Centers In India

वॉकिंग केल्यामुळे ठीक होणारे आजार –

  • हाय कोलेस्ट्रॉल, उचरक्त दवाब आणि मधुमेह (ब्लड प्रेशर आणि डायबेटीस) या सारख्या व्याधी असणाऱ्या रुग्णांना डॉक्टर वॉकिंग करण्याचा सल्ला देतात.नियमित वॉकिंग केल्यामुळे ब्लड प्रेशर,शुगर आणि कोलेस्ट्रॉल मेन्टेन राहते.
  • वॉकिंग केल्यामुळे फॅट बर्निग हार्मोन्स निर्माण होतात आणि हे हार्मोन्स इन्सुलिन बनवतात.यामुळे डायबेटीस रुग्णांची साखर मेन्टेन राहण्यामध्ये मदत होते.
  • ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांच्यासाठी वॉकिंग हा चांगला पर्याय आहे.वॉकिंग केल्यामुळे हृदयाचा आजार असणारे व्यक्ती स्वस्थ राहतात.

चालणे बाकीच्या व्यायामापेक्षा उत्तम का आहे ?

  • साईकलिंग आणि स्विमिंग ह्या वर्क आऊट पेक्षा चालणे हा चांगला वर्क आऊट आहे.कारण तुम्ही सी चालणे घरातही करू शकता.
  • एका आठवड्यामध्ये 5 वेळा 30 मिनिटे केलेला वॉकिंग वर्क आऊट तुम्हाला आजारांपासून दूर ठेवायला मदत करू शकतो.
  • जॉगिंग मुळे आपल्या पायावर दाब येतो,पण चालण्याने हा दाब  तितकसा येत नाही.
  • वॉकिंग करण्यामध्ये बाकीचे वर्क आऊट करण्यापेक्षा कमी कष्ट पडतात त्यमुळे वॉकिंग वर्क आऊट करू शकते.
  • तुम्ही वॉकिंग करताना जोरात किंवा हळू चालू शकता.आपल शरीर जसे साथ देईलतसे आपण त्यात बदल करू शकता

Disclaimer – Dear readers, The article aims to provide basic information, so  Please note,  No  information or content on this website, irrespective of date, should ever be used as a substitute for direct medical advice or recommendation  from your doctor or other qualified practitioner.

सूचना – वाचकांनी काळजी घ्यावी , संकेत स्थळवरील लेख ही वाचकांना त्या त्या विषयावरील मूलभूत माहिती (Basic information ) मिळावी हा असतो . आरोग्या बाबत नेहमी रीतसर वैद्यकीय तपासणी करून आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेवून वैद्यकीय उपचार घ्यावेत.