वनस्पती आणि प्राणी या दोघांमध्ये काय फरक आहे? – Difference between Plants and Animals

वनस्पती आणि प्राणी या दोघांमध्ये काय फरक आहे? – Difference between Plants and Animals

 

जेव्हा आपण कुठल्याही प्राण्याकडे तसेच वृक्षाकडे बघत असतो.तेव्हा आपल्या मनात एकच प्रश्न येत असतो की वृक्ष आणि प्राणी या दोघांमध्ये कोणता फरक आहे?

कारण वृक्ष आणि प्राणी या दोघांच्यामध्ये बरीच समानता असते.म्हणजेच दोघेही श्वास घेतात,दोघांनाही जिवंत राहण्यासाठी हवा आणि पाण्याची आवश्यकता असते दोघांचीही वाढ देखील होते शिवाय ते पुनरूत्पादन देखील करीत असतात.

मग अशा वेळी आपल्या मनात हा एकच प्रश्न निर्माण होत असतो वृक्ष देखील सजीव असतात ज्यांची वाढ होते आणि प्राणी देखील सजीव आहे मग या दोघांमध्ये मुळ फरक काय आहे?

म्हणुन आजच्या लेखात आपण वृक्ष आणि प्राणी यातील समानता आणि तफावत जाणुन घेणार आहोत.

म्हणजे आपल्या मनातील शंका दुर राहण्यास मदत होईल.

वनस्पती आणि प्राणी या दोघांमध्ये कोणता फरक आहे?

वनस्पती आणि प्राणी दोघांत पुढीलप्रमाणे फरक आहेत: Difference between Plants and Animals

फरक     -Difference between Plants and Animals

स्थलांतर                वनस्पति

वृक्ष हे एका जागेवरून दुसरया जागेवर स्थलांतर करू शकत नसतात.कारण वृक्षांची मुळे जमिनीत रोवलेली असतात ..म्हणुन त्यांना एका ठिकाणाहुन दुसरया ठिकाणी स्थलांतर करता येत नसते.वृक्षांच्या फक्त फांदया आणि पाने हलत असतात ते ही हवा आल्यावर.

प्राणी       -प्राणी हे एका जागेवरून दुसरया जागेवर स्थलांतर करू शकतात.

कारण वृक्षांप्रमाणे त्यांची काही मुळे नसतात जी एकाच जागेवरील जमिनीशी जोडली गेल्याने ते हलु शकत नाही म्हणुन प्राणी एका ठिकाणाहुन दुसरया ठिकाणी सहज स्थलांतर करू शकतात.

See also  जागतिक मार्बल दिवस काय आहे?, इतिहास | World Marbles Day In Marathi

अन्न

वनस्पति                वृक्ष सुर्यप्रकाशाद्वारे उर्जा प्राप्त करून आणि जमिनीतील पाणी शोषुन घेऊन आपले अन्न स्वता तयार करतात. म्हणुन त्यांना आपले अन्न प्राप्त करण्यासाठी कुठेही जावे लागत नाही.

प्राणी       -प्राण्यांना मात्र आपले अन्न प्राप्त करण्यासाठी इथे तिथे भटकावे लागत असते.शोध घ्यावा लागत असतो.मग त्यांना त्यांचा भक्ष्य सापडत असतो म्हणजेच इतर प्राण्यांची हत्या करून त्यांना खावे लागत असते. म्हणजेच प्राण्यांना आपले अन्न प्राप्त करण्यासाठी इतरांवर अवलंबुन राहावे लागते.

ज्ञानेंद्रिये वनस्पति                वृक्ष हे आपल्या पानांमधुन स्टोमाटा ह्या घटकामुळे श्वास घेत असतात.आणि कार्बन डाय आँक्साईड प्राप्त करीत असतात.आणि वातावरणात आँक्सिजन सोडत असतात.

प्राणी     प्राणी आपल्या फुफ्फुसांद्वारे श्वास घेत तसेच सोडत असतात.प्राणी हे आँक्सिजन प्राप्त करत असतात आणि वातावरणात कार्बन डाय आँक्साईड सोडण्याचे कार्य कर असतात.

प्राण्यांमध्ये अनेक sense organs असतात म्हणजे ज्ञानेंद्रिये असतात.आपल्या ज्ञानेंद्रियांचा वापर करून प्राणी आजुबाजुच्या घटना प्रसंग, एखाद्या व्यक्ती तसेच वस्तुचा इतर प्राण्यांचा स्पर्श वास,चव इत्यादी अनुभवू शकतात

इंद्रियाद्वारे ते जाणुन घेऊ शकतात.वृक्षामध्ये एकच सेन्स आँरगन असतो तो म्हणजे स्पर्श.जेव्हा आपण त्यांना स्पर्श करतो तेव्हा हे वृक्ष कोमेजुन जात असतात.

पचनसंस्था

वनस्पति         -वृक्षांमध्ये पचनसंस्था नसते.म्हणून ते कुठल्याही अन्नाचा संचय स्टार्चच्या स्वरूपात करीत असतात.

वनस्पती सूर्यप्रकाशात स्वत: चे अन्न स्वत: तयार करतात. त्यांना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात. उदा. जास्वंद, डाळिंब, सदाफुली इत्यादी. तर काही वनस्पती, जसे बुरशी, बांडगूळ, अमरवेल मात्र इतर वनस्पतींचा अन्नासाठी उपयोग करतात. त्यामुळे त्यांना परपोषी वनस्पती म्हणतात.

रचना

प्राणी-     प्राण्यांमध्ये योग्य अशी पचनसंस्था असते जिच्यादवारे प्राण्यांना अन्नाचे पचन करण्यास त्यातील पोषकतत्वे शोषुन घेण्यास मदत होत असते.

वनस्पति                -वनस्पतीच्या सेल्युलर रचनेत सेल वाँल,प्लाजमोडेस्माटा,क्लोरोप्लास्ट,प्लास्टीडस आणि इतर आँर्गन ही  असतात

वाढ

प्राणी       प्राण्यांच्या सेल्युलर रचनेत सेल वाँल्स नसतात.पण इतर आँर्गनेल असतात.वनस्पति             वनस्पतींच्या वाढीला कोणतीही मर्यादा नसते.

See also  पुस्तक परीक्षण - अवेकन द जायांट विदिन - Book Review of Awake The Giant Within in Marathi

प्राणी       प्राण्यांची वाढ ही विशिष्ट कालावधीपर्यतच होत असते.

अन्न प्रक्रिया

वनस्पति

वनस्पती सूर्यप्रकाशात स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषकतत्त्वे आणि हवेतील कार्बन डायॉक्साइड यांच्या साहाय्याने अन्ननिर्मिती करतात. ही प्रक्रिया वनस्पतींच्या पानांमध्ये होत असते. पानांमधील हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेला प्रकाशसंक्षेषण म्हणतात .

या क्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात.

विविध प्रक्रिया

प्राणी-प्राण्यांमध्ये मात्र हरितद्रव्य नसते. प्राणी स्वतःचे अन्न तयार करत नाहीत.

अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ हे सजीवांचे लक्षण आहे. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन शरीरात घेणे व त्याच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डायॉक्साइड वायू शरीराबाहेर सोडणे यालाच श्वसन म्हणतात

मासा, साप, उंदीर, अळी, झुरळ अशा प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक इंद्रिये असतात,

प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी, टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यांना उत्सर्ग म्हणतात. हे उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन  म्हणतात .

सजीवांच्या स्वत: सारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणतात

वनस्पति          भाजीपाला जसे मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी यांचा वापर अन्नासाठी, तर अडुळसा, हिरडा, बेहडा, शतावरी यांचा वापर औषधासाठी केला जातो.

प्राणीही आपल्याला असेच उपयोगी पडतात.

 

भारतातील विविध भागांतील वनस्पती आणि प्राण्यांचे सर्वेक्षण, संवधर्नाचे कार्य भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था (१८९०) आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था (१९१६) स्वतंत्रपणे करतात.

  • झाडांमुळे वातावरणाला आँक्सिजन प्राप्त होत असते.म्हणुन जागोजागी वृक्ष लावा वृक्ष जगवा ही मोहीम राबवली जाते.काही
  • प्राण्यांमुळे आपणास लोकर प्राप्त असतो, मांस प्राप्त असते.जे शिजवुन मनुष्य खात असतो.
  • वृक्षांमध्ये क्लोरोफिल असते म्हणुन झाडांचा रंग हिरवा असतो.
  • वनस्पती आणि प्राणी दोघांमध्ये काय समानता आहे?
  • प्राणी आणि वनस्पती दोघे श्वास घेत असतात
  • प्राणी आणि वनस्पती दोघांची वाढ होत असते.
  • प्राणी आणि वनस्पती दोघे पुनरूत्पादन करीत असतात.
  • प्राणी आणि वनस्पती दोघांना जिवंत राहण्यासाठी हवा आणि पाण्याची आवश्यकता असते.
See also  अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा ,कोटस तसेच संदेश - Akshay Tritiya Quotes ,sms Shubhechha 2023 in Marathi

Leave a Comment