युनिकॉर्न स्टार्टअप म्हणजे काय – भारतातील युनिकॉर्न ची यादी ? What Is A Unicorn Startup – List of Unicorn in India

युनिकॉर्न स्टार्टअप म्हणजे काय –  What Is A Unicorn Startup – List of Unicorn in India

युनिकॉर्न –  उद्योगजगतात  आज युनिकॉर्न बाबत मोठया प्रमाणावर  ऐकायला मिळत आहे. नेमकी ही  संकल्पना काय आहे ?

युनिकॉर्न ही संकल्पना –

युनिकॉर्न म्हणजे  1 ते 10 बिलियन अमेरिकन डॉलर्स मूल्य असलेला एक नवीन उद्योग , स्टार्टअप. कमीतकमी 1 बिलियन म्हणजे  7500 कोटी मूल्यांकन असलेला नवीन उद्योग.

आपल्याला  रोज सोशल मीडियावर किंवा वृत्तपत्र , टेलिव्हिजन चॅनल्स वर फार्मईजि , स्नॅपचॅट आणि पेटीम या युनिकॉर्न  बद्दल ऐकत ,वाचत असतो.

 • परंतु या नवीन स्टार्टअप ना युनिकॉर्न का म्हंटल जाते, आपल्याला माहीत आहे का? 
 • किंवा युनिकॉर्न म्ह्णून एकाद्या स्टार्टअप ला कुठले निकष पूर्ण करावे लागतात?
 • किंवा आपल्याला ही एकादा युनिकॉर्न सुरु करायचा आहे का? 

आपण जर एक उद्यमी व्यक्ती असाल तर या सर्व नामांकित युनिकॉर्न चा इतिहास पाहता , हे कठीण आहे पण अशक्य मात्र नक्कीच नाही? प्रचंड मेहनत, कष्ट नाविन्यता , कल्पकता व  व्यावसायिकता अशा अनेक गोष्टींचा आपण  संगम साधत कमी भांडवला वर नवीन व्यवसाय ,एक छोटासा स्टार्टअप  सुरू करून युनिकॉर्न मध्ये  नक्की परावर्तित करू शकता .

२०२१ या फक्त एका वर्षात  भारताने किमान साडे सात हजार कोटी रुपये भांडवल असलेले ४० स्टार्टअप युनिकॉर्न निर्माण केले असून , यात  शैक्षणिक क्षेत्रातला स्टार्टअप BYJU अग्रक्रमावर असून फक्त BYJU चे बाजारमूल्य  हे २१ बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास दीड लाख कोटी रुपयांच्या पेक्षया ही जास्त आहे . इतकाच न्हवे तर या भारतीय स्टार्टअप व्यावसायिकांनी सुमारे १५ लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या कंपन्या व २० लाखाच्या वर नवीन रोजगार च्या संधी उपलबद्ध  करून दिल्या आहेत .

आज आपण या लेखातून युनिकॉर्न बद्दल माहिती करून घेऊयात.

युनिकॉर्न म्हणजे काय?

उद्योग व भांडवली क्षेत्रात असा कोणताही व्यवसाय ज्याच मार्केट कॅपिटल किंवा बाजार मूल्य  हे 1  बिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 7500 कोटी  रुपयापेक्षया जास्त होत अश्या स्टार्टअप ला युनिकॉर्न म्हणून संबोधलं जात. 

 • हा युनिकॉर्न शब्द सर्वात आधी काऊबॉय उद्योगाच्या संस्थापक मिसेस आयलीन ली यांनी तयार केला होता,
 • त्यात त्यांनी अश्या एकूण 39 स्टार्टअप्सचा व्यसायांचा उल्लेख केला ज्याच कॅपिटल हे भारतीय चलनात 7500 कोटीपेक्षा (1 अब्ज डॉलर्सपेक्षा ) जास्त असणारे युनिकॉर्न होते.
 • सुरुवातीला हा शब्द अशा स्टार्टअप् वर भर देण्याकरता वापरला गेला जे अतिशय नवखे , व दुर्मिळ असतील .
 • त्यानंतर युनिकॉर्न स्टार्टअपची व्याख्या मध्ये काही बदल न करता तो शब्द प्रचलित आला आणि आता दिवसोगणिक  युनिकॉर्नची संख्या मात्र  वाढीस लागली आहे.

 

ब्लु चिप शेअर्स म्हणजे काय  – What Are Blue Chip

 

एक युनिकॉर्न स्टार्टअपची वैशिष्ट्ये-

युनिकॉर्न बनन इतक सोप नसून  आणि प्रत्येक युनिकॉर्नची स्वतःची एक कथा आहे ज्यात असे बरेच  वैशिष्ट्य आहेत ज्याचो या युनिकॉर्न मोठ होण्यात मदत झाली  आहे.

वैशिष्ट्य – जे प्रत्येक युनिकॉर्नमध्ये दिसतात:

 1. कल बदललणे –

जवळपास सर्व नवीन युनिकॉर्नमुळे ते ज्या क्षेत्रात व्यवसाय करतात ,त्या क्षेत्रात त्यांनी   नवीन गोष्टी अमलात आणल्या , नवीन कल स्थापित केले 

उदाहरण -उबेर –  लोकांची नियमीत लोकल प्रवास करण्याचीपद्धत

फार्मईजी – ऑनलाइन औषधी खरेदी किंवा शारीरिक आरोग्य चाचण्या घेणे (मेडिकल टेस्ट ),

पेटीम – ऑनलाइन पैसे व्यवहार , पेमेंट इत्यादि

 1. अग्रगण्य :

बारकाईने पाहिलं तर असे दिसून येईल की युनिकॉर्न बहुतेक त्यांच जो व्यवसाय किंवा सेवा उद्योग असेल त्यात ते खरे ट्रेंड सेटर आहेत , स्टार्टर्स आहेत.

 • या स्टार्ट्स ने सेवा व उत्पादन देण्याचा पद्धतीच बदल केलेत , नवीन ट्रेंड आणलेत ,
 • एकादी गोष्ट प्रचलित पद्धतीने करण्याची जी लोकांची सवय असते त्यातच बदल केलेत .
 • हॉटेल बुक करणे, फूड डिलीवरी मागवणे , प्रवासा करता कार बुक करणे. ग्राहकांना सवय लावतात, गरज निर्माण करतात आणि नंतर त्या सेवा पुरवितात
 1. उद्योग व सेवात सातत्याने नाविन्यपूर्णता आणतात ,

 नवीन प्रयोग करतात आणि आपले प्रतिस्पर्ध्यांचा  अभ्यास करून त्यांच्या पेक्षा पुढे राहण्यासाठी अथक प्रयत्न करतात

 1. उच्च तंत्रज्ञान आधारित –

युनिकॉर्नमध्ये आवर्जून दिसून येणारी  आणखी एक विशेष बाब म्हणजे  म्हणजे त्यांचे व्यवसाय हे  आधुनिक तंत्रज्ञानावर अधिक भर देतात .

 • PharmEasy – ऑनलाइन मेडिकल सेवा , उत्पादन करता एक युजर फ्रेंडली मोबाइल एप्लीकेशन तयार केले.
 • उबरने युजर फ्रेंडली मोबाइल एप्लीकेशन करून प्रवास करता कार बुकिंग सोपी केली
 1. ग्राहक-केंद्रित-

 युनिकॉर्न पैकी जास्त कंपन्या या बिझनेस ग्राहक केंद्रीत असतात .  ग्राहकांसाठी गोष्टी सोप्या  सुलभ करणे आणि  त्यांच्या दैनंदिन वैयक्तिक किंवा कार्यलयीन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनणे हे युनिकॉर्न च प्रमुख लक्ष्य असते .

 1. स्वस्त सेवा व उत्पादन ठेवणे हे   या युनिकॉर्न चे अजून एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना सेवा किफायतशीर  दरात देणे
 2. वैयक्तिक मालकीचे खाजगी मालकीचेः

सहसा  युनिकॉर्न हे वैयक्तिक मालकीचे असतात परंतु नंतर जेव्हा  एखादी मोठी , सुप्रसिद्ध कंपनी अश्या व्यवसायात  गुंतवणूक करते तेव्हा त्यांच मूल्यांकन वाढून ती युनिकॉर्न मध्ये रूपांतरित होते.

सोबतच  एका आलेल्या अहवालात असे समोर आले की युनिकॉर्नची 87% उत्पादने ही सॉफ्टवेअर आहेत तर 7% हार्डवेअर आहेत आणि 6% उत्पादने आणि सेवा या क्षेत्रात आहेत.

फक्त एक स्टार्टअप व्यवसायलाच  एक युनिकॉर्न म्हणतात का ?

 • तर या प्रश्नच उत्तर उत्तर होय स आहे. युनिकॉर्न हा शब्द फक्त ‘स्टार्टअप्स’ करता वापरला जातो ज्यांचे मूल्यांकन  हे 7500 कोटी पेक्ष्या जास्त आहे
 • पण जर मार्केटकॅप मूल्य 75000 कोटी पेक्षया जास्त असेल तर मात्र त्यांना स्टार्टअप्स डेकाकोर्न (एक सुपर युनिकॉर्न) स संबोधलं जाते ,डेकाकोर्न ची उदाहरण ड्रॉपबॉक्स, व स्पेसएक्स 

भारतातील नावाजलेल्या युनिकॉर्न स्टार्टअप्स कोणत्या आहेत

 1. फ्लिपकार्टः २०० in मध्ये

स्थापना – 2007 केली गेली संपूर्ण भारतातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स ब्रँडच्या खाली सूचीबद्ध,

मालक – फ्लिपकार्ट ही सचिन बान्सल आणि बिन्नी बन्साल या दोन मित्रांची व्यवसाय

 1. पेटीएमः

स्थापना – २०१० मध्ये

मालक – विजय शेखर यांनी स्थापन केलेले, पेटीएमची मालकी वन 7 कम्युनिकेशन्सची आहे, ज्याची स्थापना व्यवसाय – टॉप-अप सेवेतून  बस आणि ट्रेन तिकिट बुकिंगमध्ये गेले, बिल पेमेंट – पेमेंट सर्व्हिस सध्या दिवसाचे सुमारे 2 अब्ज

 1. रेझर पे

मालक हर्षिल मथूर आणि शशांक कुमार यांनी स्थापन केलेल्या बंगळुरू आधारित फिनटेक स्टार्टअप

 1. मीशो:

स्थापना 2011 बंगळुरू-

मालक – संजीव आणि आत्रे बार्नवाल मालक यांनी स्थापना केली, मीशो छोट्या आणि मध्यम व्यवसायांसाठी पुनर्विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध करुन देते जे त्यांना फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया चॅनेलद्वारे ऑनलाइन उद्यम सुरू करण्यास परवानगी देते.

 1. फार्मइजि

स्थापना 2015

मालक – मध्ये धवल शाह आणि धर्मिल सेठ शेथ

सेवा – वैदकीय सेवा , मेडिसिन डिलिव्हरी औषधी – रक्त चाचण्या

 1. क्रेडः

स्थापना – 2011

मालक –  कुनाल शहाने स्थापना केली, बंगळुरू-आधारित फिनटेक स्टार्टअपने क्रेडिट कार्ड विश्वात नावाजलेल नाव

 1. अर्बन कंपनीः

स्थापना -2014

मालक –  अबिराज भाल, रघाव चंद्र आणि वरुन खैतन यांनी स्थापना केली –

व्यवसाय – अर्बन कंपनी जी वापरकर्त्यांना सौंदर्यप्रसाधनांपासून साफ साफ सफाई ते  सुतार आणि तंत्रज्ञांपर्यंत  सेवा पुरवितात

 1. झेटा:

स्थापना – 2015

मालक –  रामकी गद्दिपती आणि भविण तुरखिया यांनी स्थापना केली,

व्यवसाय – निओ बँकिंग – क्रेडिट, डेबिट आणि प्रीपेड उत्पादनांच्या सेवा.

 1. भरतपे:

स्थापना – 2018

मालक – अशनेर ग्रोव्हर आणि शाश्वात नाक्रानी यांनी केली होती.

व्यवसाय – भारताचा पहिला यूपीआय क्यूआर कोड सुरू केला आणि आता तो इतर वित्तीय सेवांमध्ये विस्तारला आहे.

आज, युनिकॉर्न कंपन्यांनी मान्यता मिळविली आहे आणि बाजारात स्वत: साठी  मोठ स्थान मिळवले आहे. भारताच्या पुढे चीन (३०१ युनिकॉर्न ) व अमेरिका (४८७ युनिकॉर्न) असून अंदाजे २०३० पर्यंत भारत या क्षेत्रात चीनला मागे टाकेल.

२०३० पर्यंत कमीतकमी दहा हजार कोटी रुपये मूल्य असलेले ४०० नवीन उद्योजक व त्यापाठोपाठ लाखो रोजगार निर्माण व्हावेत म्हणून भरीतीयांनी देशी ऍप्स, देशी उत्पादनं, देशी सेवा उद्योग यांची खरेदी-विक्री व मौखिक जाहिरात करणे गरजेचे असणार आहे .

वस्तू व सेवा कर (जीएसटी) च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आज स्टार्ट-अप्सच् सुरवात करण सोप झाले आहे . यात  जीएसटीच्या माध्यमातून बरेच अप्रत्यक्ष कर काढून टाकले गेले आहेत आणि एकाच  खिडकी खाली  म्हणूनच, स्टार्टअप्ससाठी जे जीएसटी नियम आहेत त्यांचं पालन केल तर अशा कंपन्यांना बरेच फायदे मिळतात .

भारतातील युनिकॉर्न List of Unicorn in India

क्र कंपनी नावे मूल्य (USD Billion स्थापना शहर क्षेत्र
1 बायजू 21.00 7/25/2017 बेंगलोर Edtech
2 ओयो रूम्स 9.60 9/25/2018 गुरुगाव Travel
3 ड्रीम  11 8.00 4/9/2019 मुंबई Internet software s
4 रेझर पे 7.50 10/11/2020 बेंगलोर Fintech
5 राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज 6.50 7/1/2020 मुंबई Fintech
6 ओला कॅब 7.50 10/27/2014 बेंगलोर Auto & transportation
7 स्विगी 5.50 6/21/2018 बेंगलोर Supply chain, logistics
8 ऑफबिजनेस 5.00 7/31/2021 गुरगाव E-commerce
9 मीशो 4.90 4/5/2021 बेंगलोर Internet software
10 क्रेड 4.01 4/6/2021 बेंगलोर Fintech
11 शेअरचॅट 3.70 4/8/2021 बेंगलोर Internet software
12 डिजिट इंसूरन्स 3.50 1/15/2021 बेंगलोर Fintech
13 युनि अकादमी 3.44 9/2/2020 बेंगलोर Edtech
14 कार 24 3.30 11/24/2020 गुरगाव E-commerce & direct-to-consumer
15 एरुडिटस 3.20 8/12/2021 मुंबई Edtech
16 उडान 3.10 9/4/2018 बेंगलोर Supply chain, logistics,
17 दिल्लीवे 3.00 2/27/2019 गुरगाव Supply chain, logistics,
18 पाइन लॅब 3.00 1/24/2020 नोयडा Fintech
19 ओला इले. मोबिलिटी 2.70 7/2/2019 बेंगलोर Auto & transportation
20 ग्रो 3.00 4/7/2021 बेंगलोर Fintech
21 भारत पे 2.85 7/30/2021 दिल्ली Fintech
22 लेन्स्कार्ट 2.50 12/20/2019 फरीदाबाद E-commerce & direct-to-consumer
23 इन्फ्र्रा.मार्केट 2.50 2/25/2021 ठाणे E-commerce & direct-to-consumer
24 झेटवर्क 2.50 8/20/2021 बेंगलोर Internet software & services
25 मोबाइल प्रीमियर लीग 2.45 9/15/2021 बेंगलोर Internet software & services
26 पॉलिसी बाजार 2.40 5/6/2019 गुरगाव Fintech
27 फर्स्ट क्राय 2.10 2/7/2020 पुणे E-commerce & direct-to-consumer
28 अर्बन कंपनी 2.10 4/27/2021 गुरगाव E-commerce & direct-to-consumer
29 कोईन स्विच 1.90 10/6/2021 बेंगलोर Fintech
30 स्पिन्नी 1.75 11/24/2021 गुरुगाव E-commerce & direct-to-consumer
31 क्युअरफिट 1.50 11/10/2021 बेंगलोर Health
32 रेबेल फुड्स 1.40 10/7/2021 पुणे E-commerce & direct-to-consumer
33 पाच स्टार व्यवसाय 1.40 3/26/2021 चेन्नई Other
34 अपग्रेड 1.20 8/9/2021 मुंबई Edtech
35 कार देखो 1.20 10/13/2021 जयपूर E-commerce & direct-to-consumer
36 मायग्लम 1.20 11/10/2021 मुंबई E-commerce & direct-to-consumer
37 प्रिस्टिन केअर 1.40 12/7/2021 गुरुगाव Health
38 कोईन डिक्स 1.10 8/10/2021 महाराष्ट्र Fintech
39 अपना 1.10 9/15/2021 बेंगलोर Internet software & services
40 आको इंसुरन्स 1.10 10/18/2021 बेंगलोर Fintech
41 ग्लोबलबीज 1.10 12/28/2021 दिलही E-commerce & direct-to-consumer
42 रिविगो 1.07 7/11/2019 गुरगाव Supply chain, logistics, & delivery
43 मामेअर्थ 1.07 12/28/2021 गुरगाव E-commerce & direct-to-consumer
44 स्नॅपडिल 1.00 5/21/2014 दिल्ली E-commerce & direct-to-consumer
45 इनमोबी 1.00 12/2/2014 बेंगलोर Mobile & telecommunications
46 डेलीहंट 1.00 12/22/2020 बेंगलोर Internet software & services
47 ग्रोफर्स 1.01 6/30/2021 गुरगाव Supply chain, logistics, & delivery
48 ब्लॅकबक 1.00 7/22/2021 बेंगलोर Supply chain, logistics, & delivery
49 वेदांतू 1.00 9/29/2021 बेंगलोर Edtech
50 ल्युसिऊस 1.00 10/5/2021 बेंगलोर E-commerce & direct-to-consumer
51 मेन्सा ब्रँड्स 1.00 11/16/2021 बेंगलोर Other
52 नोब्रोकर 1.00 11/23/2021 बेंगलोर Internet software & services
53 स्लाइस 1.00 11/28/2021 बेंगलोर Fintech

DATA -SOURCE – CMS इंसइट्स

1 thought on “युनिकॉर्न स्टार्टअप म्हणजे काय – भारतातील युनिकॉर्न ची यादी ? What Is A Unicorn Startup – List of Unicorn in India”

Leave a Comment