ब्लु चिप शेअर्स म्हणजे काय  – What Are Blue Chip Stocks – Simply Explained

Blue-Chip Stocks  माहिती

जे गुंतवणुकदार शेअर बाजारात आपल्या पैशांची गुंतवणुक करत असतात त्यांना ब्लु चीप स्टाँक तसेच ब्लु चिप कंपनी हे दोन शब्द नेहमी ऐकावयास मिळत असतात.

तेव्हा सगळयात पहिले आपल्या मनात हा एकच प्रश्न निर्माण होत असतो की ब्लुचिप कंपनी म्हणजे काय असते?कोणत्या कंपन्यांना ब्लु चिप कंपनी म्हटले जाते? ब्लु चिप कंपनीचे वैशिष्टय काय असते?इत्यादी असे निरनिराळे प्रश्न आपल्या मनात उदभवत असतात.

आजच्या लेखातुन आपण ब्लु चिप कंपनीविषयी आपल्या मनात उदभवत असलेल्या अशा सर्व महत्वपुर्ण प्रश्नांची उत्तरे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ब्लू चिप कंपनी म्हणजे काय?

ब्लु चिप ही एक अशी कंपनी असते.जिचा स्टाँक मार्केटमध्ये नेहमी हाय परफाँर्र्मन्सचा रेकाँर्ड असतो.आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे अशा कंपनींचे शेअर कधीही खाली जाताना आपणास दिसून येत नाही.

ब्लू-चिप स्टॉक हे विश्वासार्ह मोठ्या, सुस्थापित कंपन्यांनी जारी केलेले समभाग (शेअर्स ) असतात या कंपन्या  आर्थिकदृष्ट्या मजबूत असतात अनेक वर्षापासून उत्तम आर्थिक कमाई करून गुंतवणूक दारांना उत्तम परतावा देत असतात आहे.

ब्लू-चिप स्टॉक्स हे ज्यांचा आर्थिक यशाचा सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड आहे. याचे देखील एक कारण असते ते म्हणजे अशा कंपन्या आर्थिक दृष्टया अत्यंत प्रबळ असलेल्या आपणास दिसुन येत असतात.

आर्थिक दृष्टया मजबुत असल्यामुळे अशा कंपनी कधीही कोणते कर्ज उचलत नसतात.कारण त्यांची आर्थिक स्थिती मजबुत असल्याने त्यांना कोणतेही कर्ज घेण्याची गरजच पडत नसते.आणि अशा कंपनीनी कर्ज उचलले तरी ते अधिक प्रमाणात नसते.

See also  Phone pe मध्ये bank account कसे add करतात? - How to add bank account on PhonePe

आणि दैनंदिन जीवणात शेअर बाजारात जे चढ उतार आपणास पाहायला मिळतात अशा छोटया मोठया चढ उतारांचा कुठलाही प्रभाव ह्या कंपनींवर पडत नसतो.जेणेकरून शेअर होल्डर्सचे कुठल्याही प्रकारचे आर्थिक नुकसान देखील यात होत नसते.

अशा कंपनी मार्केटमध्ये खुप जुन्या देखील असतात ज्यामुळे त्यांचा मार्केट कँप देखील खुप जास्त असलेला आपणास पाहायला मिळतो.तसेच त्यांच्या सेल्समध्ये आणि प्राँफिटमध्ये निरंतर वाढ होत राहते.

थोडक्यात ज्या कंपनींचा शेअर मार्केटमध्ये अधिक प्रभाव असतो अशा कंपनींना ब्लु चिप कंपनी म्हणुन ओळखले जाते.

ब्लु चिप शेअर कशाला म्हणतात?

ब्लु चिप शेअर हे अशा ब्लु चिप कंपनीचे शेअर असतात ज्या कंपनीचे मार्केटमध्ये हाय कँपिटलायझेशन आहे.तसेच त्या कंपनीचा हाय परफाँर्मन्स रेकाँर्ड आहे.त्या कंपनीची चांगली सेलिंग तसेच ग्रोथ देखील होत आहे.

ब्लु चिप शेअर्सची वैशिष्टये कोणकोणती असतात?

ब्लु चिप शेअर्सची अनेक वैशिष्टये असलेली आपणास पाहायला मिळतात.त्यातील काही प्रमुख वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत :

 

1)लार्ज मार्केट कँप कंपनीचे शेअर्स : ब्लु चिप शेअर हे अशा कंपनीचे शेअर्स असतात ज्या कंपनीचे शेअर बाजारात हाय मार्केट कँपिटलायझेशन असलेले आपणास दिसुन येते.

आणि अशा कंपनींची साईज मार्केट कँप खुप अधिक असल्याने गुंतवणुकदारांना अशा कंपनीचे शेअर्स खरेदी करायला अधिक सोपे देखील जाते.

2) डिव्हीडंडमध्ये देखील बेनिफिट मिळत असतो :

ब्लुक चिप कंपनींमध्ये अशा दिग्दज कंपन्यांचा समावेश असतो ज्या नेहमी प्राँफिटमध्येच जात असतात.आणि आपल्याला मिळालेल्या प्राँफिटमधून काही हिस्सा ह्या कंपनी आपल्या कंपनीतील शेअर होल्डरला डिव्हीडंडच्या स्वरूपात वाटुन देत असतात.

3) बोनस शेअरचा लाभ उठवता येतो :

ब्लू चिप कंपनी ह्या वेळोवेळी आपल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करत असलेल्या शेअर होल्डरला बोनस देखील जारी करत असतात.

म्हणजेच ब्लु चिप शेअर्समध्ये गुंतवणुक करत असलेल्या गुंतवणुकदारांना अतिरीक्त शेअर देखील बोनसच्या स्वरूपात दिले जात असतात.

4) खात्रीशीर शेअर असतात :

See also  पोस्ट ऑफिसमधील व्याजदरात वाढ झालेल्या योजना अणि त्यांचे व्याजदर - Post office scheme increased interest rates in Marathi

ब्लु चिप शेअर हे मुख्य करून मोठमोठया ट्रस्टेड कंपनी एक्सपर्ट इन्व्हेस्टर देखील खरेदी करत असतात.याचाच अर्थ हे शेअर एवढया मोठमोठया कंपनी तसेच शेअर बाजार तज्ञ देखील खरेदी करतात म्हणजेच हे शेअर खात्री शीर असतात हे देखील सिदध होते.

5) कधीही शेअर्सची खरेदी विक्री करता येते :

यात गुंतवणुकदाराला कधीही आपले शेअर खरेदी करता येतात तसेच ते पाहिजे तेव्हा विकता देखील येतात.म्हणजेच यात एक शेअर्सची लिक्विडीटी देखील असलेली आपणास दिसुन येते.

6) दिर्घकाळ गुंतवणुकीसाठी अधिक फायदेशीर :

ब्लु चिप शेअर हे दिर्घकालीन गुंतवणुकीसाठी अधिक फायदेशीर असलेले आपणास दिसुन येतात.म्हणजेच यात जो गुंतवणुकदार दिर्घकाळासाठी गुंतवणुक करतो त्याला लाँग टर्म मध्ये चांगला प्राँफिट तसेच हाय रिटर्न्स मिळत असतो.

ब्लु चीप शेअर्सविषयी जाणुन घ्यावयाच्या काही महत्वाच्या बाबी कोणकोणत्या आहेत?

 • ब्लू चिप शेअर खरेदी करत असलेल्या प्रत्येक गुंतवणुकदाराने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ब्लु चिप शेअर हे खुप महागडे शेअर असतात.
 • ब्लु चिप शेअर्समध्ये लगेच ताबडतोब एकदम गतीने वाढ होत नसते.कारण हे शेअर लाँर्ग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी मुख्यत्वे खरेदी केले जात असतात.
 • ज्यांना खुप कमी रिस्कमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करायची असते अशा गुंतवणुकदारांसाठी ब्लु चिप शेअर अधिक चांगले ठरतात.
 • ज्या गूंतवणुकदारांना ब्लु चिप शेअरमधुन चांगली इन्कम जनरेट करायची असेल अशा गुंतवणुकदारांनी कमीत कमी तीन ते चार वर्ष गुंतवणुक करणे आवश्यक असते.
 • ब्लु चिप किंवा इतर कुठलेही शेअर्स खरेदी करताना प्रत्येक गुंतवणुकदाराने फंडामेटली आणि टेक्निकली अँनेलिसेस करणे फार आवश्यक असते.कारण शेअर मार्केट हे एक असे ठिकाण आहे जिथे नेहमी चढ उतार येतच असतात.म्हणजेच आज जी कंपनी ब्लु चिप कंपनी आहे भविष्यात देखील ब्लु चिप राहीलच अशी कुठलीही गँरंटी नसते.म्हणुन गुंतवणुक करताना आपण पुर्ण रिसर्च करावा मगच यात गुंतवणुक करावी.
See also  Mortgage loan म्हणजे काय? कसा अर्ज करावा ? तारण कर्ज संपूर्ण माहीती - Mortgage loan information in Marathi

ब्लु चिप कंपनीचे शेअर्स कसे ओळखावे?

कोणत्या कंपनीचे स्टाँक तसेच शेअर्स ब्लु चिप आहेत हे ओळखण्यासाठी आपल्याला काही पाँईण्ट लक्षात घेणे गरजेचे आहे.

 

 • सगळयात आधी आपण हे पाहायला हवे की कोणती कंपनी आपल्या क्षेत्रात वर्षानुवर्षापासुन खुप जुनी तसेच टाँपला देखील आहे. निफटी 50 इंडेक्स मध्ये समाविष्ट असतात

 

 • कोणत्या कंपनीचे मार्केट कँपिटलायझेशन हाय आहे.अशा कंपनीचे मार्केट करोडोपेक्षा अधिक असणे गरजेचे असते.

 

 • ब्लु चिप कंपनीचा पीई रेशो 15 पेक्षा अधिक आहे की नाही हे बघायला हवे जर एखाद्या कंपनीचा पीई रेशो १५ पेक्षा अधिक आहे तर ती ब्लु चिप कंपनी असते.

 

 • ब्लु चिप कंपनीच्या रिव्हेन्युमध्ये नेहमी सातत्याने वाढ होत राहते.जर एखाद्या कंपनीच्या रिव्हेन्युमध्ये वर्षानू वर्षापासुन सातत्याने वाढ होत असेल तर ती कंपनी ब्लु चिप कंपनी आहे असे समजावे.

 

 • ब्लु चिप कंपनीचा नेट प्राँफिट हा प्रत्येक वर्षी वाढत असतो म्हणून आपण निवडलेल्या कंपनीच्या नेट प्राँफिटमध्ये प्रत्येक वर्षी वाढ होताना दिसून येत असेल तर ती कंपनी ब्लु चिप कंपनी आहे असे समजायला हरकत नाही.

 

 • ब्लु चिप कंपनीचे शेअर्स मोठमोठे गुंतवणुकदार तसेच ट्रस्टेड कंपन्या खरेदी करत असतात.म्हणुन मोठमोठया ट्रस्टेड कंपनी ज्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतात ते ब्लु चिप शेअर्स आहेत असे मानायला हरकत नाही.

 

 

ब्लु चिप कंपनींमध्ये कोणकोणत्या कंपन्यांचा समावेश होतो? – What Are Blue Chip Stocks

ब्लु चिप कंपनीत पुढील काही कंपन्यांचा समावेश होत असतो:

 

 • टीसी एस कंपनी
 • एचडी एफसी बंँक
 • इन्फोसिस कंपनी
 • विप्रो कंपनी
 • हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनी

 

इत्यादी दिग्दज कंपनींचा समावेश ब्लु चिप कंपनीमध्ये होतो.

Portfolio विषयी माहीती – Share market portfolio information in Marathi

1 thought on “ब्लु चिप शेअर्स म्हणजे काय  – What Are Blue Chip Stocks – Simply Explained”

Leave a Comment