पेनी स्टाँक म्हणजे काय? -What Is Penny Stocks In India? Benefits and Risk

पेनी स्टाँक -शेअर्स म्हणजे काय ? -What Is Penny Stocks In India? Benefits and Risk

 आपण आता पर्यत पेनी स्टाँकविषयी खुपदा ऐकले आहे.पेनी स्टाँक विषयी असे म्हटले जाते की जे लोक शेअर मार्केटमध्ये नवीनच आले आहेत.त्यांच्या खुप आवडीचा शेअर्स हा असतो.

अशा वेळी आपल्या मनात हा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे की असे काय आहे ह्या पेनी स्टाँकमध्ये ज्यामुळे शेअर मार्केटमध्ये आलेले नवीनतम लोक हा स्टाँक खरेदी करणे अधिक पसंद करतात.

तसेच हे स्टाँक खरेदी करण्याकडे जास्तीत जास्त कल त्यांचा असतो.

मग अशा वेळी आपल्या मनात वेगवेगळे प्रश्न घर करून बसतात ज्यात अशी देखील शंका आपल्या मनात निर्माण होत असते की ही फेक स्कीम तर नाहीये.

आणि आनंदाची गोष्ट ही आहे की शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करत असलेल्या नवनवीन गुंतवणुकदारांच्या संख्येत मागील काही वर्षात खुप चांगली वाढ झालेली आपणास दिसून येत आहे.

म्हणजेच सर्वसामान्य व्यक्ती देखील आता शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्याकडे वळताना आपणास आज दिसून येत आहे.

पण जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये नवीनच गुंतवणुक करत असतो आणि ती गुंतवणुक पेनी स्टाँकमध्ये करत असु तर आपल्याला त्याविषयी अधिक माहीती प्राप्त करणे गरजेचे असते.जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही.

पेनी स्टाँक म्हणजे काय?

 पेनी स्टाँक हा एक असा स्टाँक असतो ज्यात कुठलाही नवीन गुंतवणुकदार अगदी नाण्याच्या किंमतीत देखील शेअर्स खरेदी करू शकतो.म्हणुनच बाजारात यास पेनी स्टाँक म्हणुन ओळखले जाते.

See also  शेअर मार्केट उत्तम ट्रेडिंग एप्स - Best Trading App Information In Marathi

यात एकदम लहानातल्या लहान कंपनीचे शेअर्स आपण खरेदी करू शकतो ते ही अत्यंत कमी किंमतीत.

आणि भारताविषयी सांगावयाचे म्हटले तर भारतात पेनी स्टाँक अशा स्टाँकला म्हटले जाते ज्याची किंमत पन्नास रुपयांपेक्षा देखील कमी असते.

यात अशा कंपनीचे शेअर्स समाविष्ट असतात ज्या डबघाईस निघाल्या असतात ज्यामुळे त्यांचे शेअर्स कोणी खरेदी करायला तयार होत नसते.म्हणुन मग अशा कंपनी भंगाराच्या किंमतीत आपले शेअर्स विकत असतात.

पेनी स्टाँक एवढे प्रसिदध का आहेत?नवीन गुंतवणुकदार पेनी स्टाँक का खरेदी करतात?

 पेनी स्टाँक शेअर्स मार्केटमध्ये प्रसिदध असण्याचे तसेच नवीन गुंतवणुकदारांकडुन त्याची जास्तीत जास्त खरेदी केली जाण्याची अनेक कारणे आहेत.

1)शेअर्स खुप कमी किंमतीत उपलब्ध होतात :

2) यातुन गुंतवणुकदारांना अधिक रिटर्न प्राप्त होतात :

3)मल्टी बँगर होण्याची शक्यता यात असते :

1)शेअर्स खुप कमी किंमतीत उपलब्ध होतात :

सर्वसामान्य व्यक्तीला देखील विकत घेता येईल एवढी कमी किंमत याची असते.

पेनी स्टाँकची किंमत ही खुप कमी असते.जेणेकरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करत असलेल्या मध्यम वर्गातील व्यक्ती देखील याची खरेदी करू शकतो.

आणि शिवाय हे शेअर्स कमी किंमतीचे असल्याने आपले जास्त पैशांचे शेअर्स विकत घेऊन ते बुडाल्यास जे नुकसान आपणास सहन करावे लागते ती नुकसानाची किंमत देखील इथे कमी होत असते.म्हणजेच यात खुप कमी रिस्क असते.

याचसोबत शेअर्सची किंमत वाढण्याची अधिक शक्यता यात असते.

2) यातुन गुंतवणुकदारांना अधिक रिटर्न प्राप्त होतात :

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करत असलेले नवीन गुंतवणुकदार यासाठी देखील पेनी स्टाँकमध्ये आपले शेअर्स गुंतवत असतात.

की जितक्या जास्त प्रमाणात ग्रोथची शक्यता छोटया कंपनीची असते तेवढी लार्ज तसेच मिडकँप कंपनीची ग्रोथ होण्याची शक्यता फार कमी असते.

म्हणजेच समजा यात गुंतवणुकदाराने आपल्या पैशांची गूंतवणुक केलेल्या कंपनीला जर एखादा मोठा प्राँफिट झाला तर याने कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत देखील चांगली वाढ होत असते.म्हणुनच खुप जण पेनी स्टाँकमध्ये पैसे गुंतवणे अधिक पसंद करतात.

See also  जी एसटी विषयी माहीती - GST information in Marathi

3) मल्टी बँगर होण्याची शक्यता यात असते :

नवीन गुंतवणुकदार पेनी स्टाँक खरेदी करणे यासाठी देखील अधिक पसंद करतात की पेनी स्टाँक आता मल्टीबँगर्स झाले आहेत.

ज्यामुळे याचा वापर करून गुंतवणुकदार अधिक प्राँफिट गेन करू शकतात.हे देखील एक प्रमुख कारण आहे की गुंतवणुकदारांचा कल पेनी स्टाँक भंगार स्टाँक म्हणुन ओळखले जात असुन देखील याची खरेदी करण्याकडे अधिक असतो.

पेनी स्टाँकमध्ये गुंतवणुक करावी की नाही?

पेनी स्टाँक हे एक प्रकारचे भंगार स्टाँक असतात.ज्यामुळे हे खरेदी करण्यात जोखिम खुप असते.अशा शेअर्सच्या किंमतीत कधीही वाढ होत असते तसेच घट देखील होत असते.

म्हणजेच यात गुंतवणुकदार भरपुर प्राँफिट देखील प्राप्त करू शकतात.याचसोबत शेअर्सची किंमत कमी झाल्यास मोठे नुकसान देखील सहन करावे लागु शकते.

याचसोबत फक्त गुंतवणुकदारांनी आपले शेअरसची खरेदी करावी यासाठी प्रमोटर्सकडुन स्टाँकच्या प्राईज मध्ये वाढ केली जात असते.

म्हणुन आपल्याला जर एखाद्या कंपनीचे पेनी स्टाँक खरेदी करावयाचे असतील तर आपण याविषयी बारकाईने निरीक्षण करून आधी संपुर्ण माहीती प्राप्त करायला हवी तसेच कंपनीचा फंटामेंडल आणि फायनान्शिअल कंडिशन स्ट्राँग आहे की नाही हे देखील बघायला हवे.याचसोबत कंपनीला भविष्यात अधिक ग्रोथ मिळण्याची शक्यता आहे का हे चेक करावे.

त्यानंतरच आपण कुठल्याही कंपनीचे पेनी स्टाँक खरेदी करायला हवे.

पेनी स्टाँकमध्ये गुंतवणुक कशी करावी?

जर एखाद्या गुंतवणुकदाराला पेनी स्टाँकमध्ये आपले शेअर्स गुंतवायचे असतील तर यासाठी त्या गुंतवणुकदारास आपले एक डिमँट अकाऊंट ओपन करावे लागत असते.

मग आपण आपल्या डिमँट अकाऊंट द्वारे देखील पेनी स्टाँकमध्ये आपल्या पैशांची गुंतवणुक सहजपणे करू शकतो.

पेनी स्टाँकमध्ये गुंतवणुक करताना गुंतवणुकदारांनी कोणती काळजी घ्यावयाची असते?

 पेनी स्टाँक खरेदी करत असताना गुंतवणुकदारांनी पुढील काळजी घ्यायला हवी :

 

  • पेनी स्टाँक खरेदी करताना गुंतवणुकदाराने कधीही असा पेनी स्टाँक खरेदी करू नये ज्यात अप्पर तसेच लोअर सर्किट लागण्याची शक्यता असते.कारण अशा शेअर्सची खरेदी केल्यानंतर आपल्याला नंतर त्यांना विकणे खुप अवघड जात असते.
  • कोणत्याही कंपनीचे पेनीस्टोक खरेदी करण्याच्या आधी गुंतवणुकदाराने त्या कंपनीचा बिझनेस काय आहे हे जाणुन घ्यायला हवे.त्या कंपनीने आखलेले फ्युचर प्लँनिंग विषयी माहीती प्राप्त करायला हवी.ती कंपनी सध्या मार्केटमध्ये फायद्यात जाते आहे का तोटयात हे जाणुन घ्यायला हवे.त्यानंतरच आपण कुठल्याही कंपनीचे पेनी स्टाँक खरेदी करायला हवे.
  • खुप गुंतवणुकदार पेनी स्टाँकची खरेदी त्याची किंमत कमी असल्यामुळे करीत असतात.पण असे सर्वच कमी किंमतीचे स्टाँक आपल्याला चांगले रिटर्नस प्राप्त करून देतील याची कोणतीही फिक्स गँरंटी नसते.
See also  ब्लु चिप शेअर्स म्हणजे काय  - What Are Blue Chip Stocks - Simply Explained

म्हणुन आपण स्टाँकची किंमत कमी असो किंवा जास्त असेच स्टाँक खरेदी करायला हवे जिथुन भविष्यात आपल्याला हाय रिटर्न्स प्राप्त होऊ शकतो.

  • पेनी स्टाँक मध्ये नेहमी चढ उतार हा सुरूच असतो म्हणुन आपल्याला जास्त प्राँफिट मिळतो आहे हे बघुन अधिक मिळण्याच्या लालुचमध्ये आपण न पडता जेवढे प्राँफिटचे टारगेट आपण ठेवले होते ते भेटल्यास माघार घेऊन घ्यायला हवी.

पेनी स्टाँक खरेदी करण्याचे फायदे कोणकोणते असतात? – What Is Penny Stocks In India? Benefits and Risk

 पेनी स्टाँक खरेदी केल्याने होणारे फायदे पुढीलप्रमाणे आहेत :

 

  • पेनी स्टाँकचे शेअर हे खुप कमी किंमतीचे असतात.म्हणुन गुंतवणुकदार यात जास्तीत जास्त शेअर्स खरेदी करू शकतात.ज्याने करून गुंतवणुकदाराने खरेदी केलेल्या शेअर्सची किंमत भविष्यात कधीही वाढल्यावर त्याला अधिकाधिक नफा प्राप्त होत असतो.
  • पेनी स्टाँकच्या किंमतीमध्ये खुप लवकर चढ उतार होत असते म्हणुन यात गुंतवणुकदाराला लवकर प्राँफिट प्राप्त करता येत असतो.
  • सगळयात महत्वाचे म्हणजे कमी पैशांची गुंतवणूक करून जास्त नफा यात आपण प्राप्त करू शकतो.

पेनी स्टाँक खरेदी करण्याचे तोटे कोणकोणते आहेत?

 पेनी स्टाँक खरेदी करण्याचे जसे अनेक फायदे आपणास दिसुन येतात तसेच यात गुंतवणुक करण्यात नुकसान देखील असते ज्या विषयी माहीती असणे आपल्याला फार गरजेचे आहे.

पेनी स्टाँक खरेदी केल्याने होणारे नुकसान पुढीलप्रमाणे आहेत :

  • पेनी स्टाँक मध्ये जेवढा अधिक फायदा आहे त्यापेक्षा अधिक नुकसानाची देखील शक्यता असते म्हणुन यात गुंतवणूक करणे सेफ मानले जात नसते.
  • यात कधी काय होईल हे सांगता येत नाही.ज्यामुळे प्राँफिटची फिक्स गँरंटी यात नसते.

ग्लोबल शेअर मार्केट टाइमिंग – शेअर्स बाजार सुरू व बंद केव्हा