Pre Approved loan In Marathi -एसबीआई पूर्व स्वीकृत लोन –
एसबीआई ही भारतातील एक मोठी सरकारी बँक आहे ,आणि एसबीआई बँक आपल्या कस्टमर साठी सतत नवीन योजना आणि लोन योजना घेऊन येत असते ,ज्याचे उदेश्य असते की एसबीआई मध्ये खाते असलेल्या लोकांना त्या योजनांचा आणि लोन चा लाभ व्हावा.
तुम्हाला देखील एसबीआई चे पूर्व स्वीकृत लोन काढायचे आहे, तर या लेखामध्ये आपण एसबीआई च्या पूर्व स्वीकृत लोन बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.त्याच बरोबर आपण या एसबीआई च्या पूर्व स्वीकृत लोन साठी कशा पद्धतीने apply करायचे ? याबद्दल देखील माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.
एसबीआई बँकेच्या पूर्व स्वीकृत लोन साठी निवेदन करण्यासाठी तुमच्याकडे
- आधार कार्ड नंबर ,
- PAN कार्ड नंबर आणि
- इतर डॉक्युमेंट असणे गरजेचे असते.जेणेकरून तुम्ही एसबियाई च्या या पर्सनल लोन साठी apply करू शकता आणि याचा फायदा घेऊ शकता.
SBI Pre Approved Loan –
तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईल वरती एसबीआई बँकेच्या पूर्व स्वीकृत लोन साठी सहजरीत्या apply करू शकता.
ह्या एसबीआई बँकेच्या पूर्व स्वीकृत लोन साठी निवेदन करण्यासाठी तुम्हाला योनो ॲप तुमच्या मोबाईल वरती डाऊनलोड करणे गरजेचे आहे.आणि तुम्हाला पर्सनल लोक काढण्यासाठी त्या योनो ॲप मध्ये एसबीआई च्या बँकिंग डिटेल्स टाकून लॉगिन करावे लागेल.
लॉगिन झाल्यानंतर तुम्ही एसबीआई बँकेच्या पूर्व स्वीकृत लोन सिलेक्ट करा आणि या लोन साठी असणाऱ्या पात्रते मध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही या पर्सनल लोन साठी निवेदन करू शकता.
त्यानंतर पुढे जाऊन तुम्ही सांगितलेले डॉक्युमेंट्स योग्य रित्या भरा ,तुमचे निवेदन यशस्वी रित्या सबमिट झाल्यानंतर काही वेळातच तुमच्या खात्या मध्ये लोन ची अमाऊंट क्रेडिट होईल आणि तुम्ही त्या लोन चा फायदा उचलू शकता.
तुमचे एस बी आई बँकेत खाते असेल तर तुम्ही सहजरीत्या या एसबीआई बँकेच्या पूर्व स्वीकृत लोन साठी निवेदन करू शकता .
एसबीआई बँकेच्या पूर्व स्वीकृत लोन – Online application procedure :
१) एसबीआई बँकेच्या पूर्व स्वीकृत लोन साठी तुम्ही सर्वात आधी योनो नावाची ॲप आपल्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर वरून डाउनलोड करा.
२) त्यानंतर त्या ॲप च्या dashboard वरती तुम्हाला menu option दिसेल त्या ऑप्शन वरती तुम्ही क्लिक करा.
३) क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे नवीन ऑप्शन उघडतील.
४) त्या पर्यायांमध्ये तुम्हाला लोन चां पर्याय दिसेल त्यावरती तुम्ही क्लिक करा.
५) त्यानंतर लोन मध्ये तुम्हाला पर्सनल लोन हा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वरती तुम्ही क्लिक करा.
६) क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे नवीन पेज ओपन होईल.
७)त्यानंतर तुम्हाला Express Credit Loan ऑप्शन च्या खाली“Apply now” चा ऑप्शन दिसेल ,त्यावरती तुम्ही क्लिक करा.
८) त्यानंतर तुम्ही पुढे विचारलेली माहिती न चुकता व्यवस्थित रित्या भरा आणि प्रोसिड ऑप्शन वरती क्लिक करा .नंतर तुमच्या पुढे नवीन ऑप्शन ओपन होईल.
९) त्यानंतर तुम्हाला रिविव निवेदन फॉर्म येईल ,तो निवेदन फॉर्म आपण व्यवस्थित भरला आहे की नाही ,हे चेक करा.तुम्ही जर तो निवेदन फॉर्म व्यवस्थित भरला असेल तर पुढे प्रोसिड ऑप्शन वरती क्लिक करा.
१०) त्यानंतर तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल वरती otp येईल ,तो otp तुम्ही व्यवस्थित भरा.
११) तुमचे एसबीआई बँकेच्या पूर्व स्वीकृत लोन साठीचे निवेदन यशस्वी रित्या सबमिट होईल आणि काही वेळातच तुमच्या खात्यामध्ये लोन ची रक्कम क्रेडिट होईल.
आजच्या लेखामध्ये आपण एसबीआई बँकेच्या पूर्व स्वीकृत लोन विषयी संपूर्ण माहिती पाहिली आणि एसबीआई बँकेच्या पूर्व स्वीकृत लोन साठी कशा पद्धतीने apply करायचे याची देखील माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहिली.