Investment Banking म्हणजे काय ? कार्य व प्रकार – Investment Banking Information In Marathi

Investment Banking विषयी माहीती – Investment Banking Information In Marathi

बँक म्हणजे काय हे तर आपल्याला माहीतच आहे.बँक हे एक असे ठिकाण असते जिथे आपण आपले पैसे सुरक्षित आपल्या सेव्हिंग खात्यामध्ये जमा करत असतो आणि ज्याच्याबदले बँक आपल्याला त्या पैशांवर काही व्याज देखील देत असते.

तसेच आपल्याला घर गाडी विकत घ्यायचे असेल किंवा एखादा उद्योग धंदा सुरू करायचा असेल तेव्हा देखील इथून आपणास काही पैसे उधार दिले जात असतात.
पण अशा बँकेस आपण Commercial Bank म्हणुन ओळखत असतो.

पण इन्वहेस्ट बँकिंग मध्ये वरील असा कुठलाही प्रकार होत नसतो.अशा परिस्थितीत हे इन्व्हेस्टमेंट बँकिंग काय असते?याचे महत्व काय असते?असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होणे हे साहजिकच आहे.

म्हणुन आजच्या लेखात आपण Investment Banking म्हणजे काय असते याविषयी सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.

Investment Banking म्हणजे काय?

• इन्व्हेस्टमेंट बँकिंग हे विविध कंपन्या,शासन,इतर संस्थांना भांडवल निर्मितीशी निगडीत परिपुर्ण सेवा देत असलेले बँकिंगचे एक सेक्टर असते.

• इन्व्हेस्टमेंट बँक आपणास Investment Management, Securities Trading,आणि Security Under Writing च्या सर्विस आँफर करत असतात.

• इन्व्हेस्टमेंट बँक ही मोठमोठया कंपनी तसेच संस्थांना सेवा देत असते.तसेच छोटे व्यवसायिक तसेच व्यक्तींना गुंतवणुकीच्या काही सेवा देत असते
• .इन्व्हेस्टमेंट बँक अनेक महत्वाच्या सेवा देत असते ज्यात आयपीओ आणि फंड उभारणे ह्याचा देखील समावेश असतो.

• इन्वहेस्टमेंट बँक सर्व प्रकारचे व्यवसाय,कर्ज,भांडवली रोखे(Equity Securities) यांची हमी घेण्यासाठी अंडरराईट वर्क करते.रोख्यांच्या विक्रीमध्ये हे साहाय्य करत असतात.

See also  गुगल फोटो लाँक फोल्डर कसे वापरावे? Google Photos Locked Folder how to set up it?

• याचसोबत संस्था प्रायव्हेट इन्वहेस्टरर्स या दोघांकरीता विलिनीकरण(Merger),अधिग्रहण (Acquisition),पुनर्रचना(Reconstruction) आणि ब्रोकर ट्रेड सुलभ होण्यास मदत करत असतात.

• इन्व्हेस्टमेंट बँका Issurs ला शेअर Issue करण्याबाबद तसेच प्लेसमेंट बाबत गाईडन्स देखील करत असतात.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर Investment Banking हा सुदधा बँकिंगचाच एक प्रकार आहे.

• फक्त यात कस्टमर्सला मदत न करता मोठमोठया कंपनी,संस्था,काँर्पोरेशन्सला बिझनेसेसला फंड गोळा करायला मदत केली जाते.

• त्यांना पैसे देण्याचे काम Investment Bank करत असते.त्यांना फायनान्शिअल अँडवाईज देण्याचे काम देखील इन्व्हेस्टमेंट बँकेकडुनच केले जाते.

Investment Bank चे कोणकोणते प्रकार आहेत?

Investment Banking च्या प्रकारांचे त्या बँकिंग सेक्टरच्या आकार,क्षेत्रफळ,आणि पुरवत असलेल्या सेवांचे प्रकार यानुसार त्याचे वर्गीकरण केले जात असते.

Investment Bank चे पुढील प्रकार आहेत :

1)Bulge Bracket Investment Bank :

2) Regional Boutique Investment Bank :

3) Middle Market Investment Bank :

4) Elite Boutique Investment Bank :

1)Bulge Bracket Bank :

बल्ज ब्रँकेट बँक ही फुल सर्विस देणारी इन्व्हेस्टमेंट बँक म्हणुन ओळखली जाते.ह्या बँका मोठया आकाराच्या असतात.ह्या सर्व गुंतवणुक बँकिंग सेवा देण्याचे काम करतात. ह्या बँका भौगोलिक सीमेमध्ये मर्यादित नसतात.ह्या जगातील सर्व प्रमुख देशांत सेवा प्रदान करत असतात.

यात गोल्डमँन सँक्स,डयुश बँक,क्रेडिट सुईस,माँरगन स्टँन्ली इत्यादी बँकिंग सेक्टरची नावे समाविष्ट आहेत.

2) Regional Boutique Investment Bank :

ह्या बँका आकाराने एकदम लहान असतात.आणि नावाप्रमाणेच यांच्या सेवा एका विशिष्ट प्रदेशासाठी केंद्रीत असतात.

ह्या बँका सेवांची सर्व श्रेणी देखील देत नसतात.ह्या अशा बँकेत कर्मचारी देखील खुपच कमी असतात.

3) Middle Market Investment Bank :

ह्या बँका आकाराने खुप लहानही नसतात आणि मोठया देखील नसतात एकदम मध्यम स्वरूपाच्या असतात.
म्हणुन यास मिडल मार्केट इन्वहेस्टमेंट बँक असे म्हटले जाते.

ही बँक आपणास सर्व प्रकारच्या सर्विस देत असते पण काही मोजक्याच सर्विसमध्ये हिचे स्पेशलाईझेशन असते.यात कर्मचारी खूप जास्तही नसतात आणि खुप कमी देखील नसतात.

See also  क्राँस सेलिंग अणि अप सेलिंग मधील फरक - Difference between cross selling and up selling in Marathi

ही बँक मल्टीनँशनल नसते पण एक स्टेट पेक्षा जास्त सर्विस देत असते.

4) Elite Boutique Investment Bank :

हे बुल्ज ब्रेकेटच्या समान असते.हे बँक त्याच्या काही सर्विसेसमध्ये स्पेशलाईज देखील असते.पण यात कर्मचारी कमी असतात

Investment Bank कोणकोणत्या आहेत?

काही Investment Bank ची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

● माँरगन स्टँन्ली

● गोल्डमँन सँक्स

● जे.पी माँरगन चेस

● डाँइशे बँक

● बँक आँफ अमेरिका मेरिल लिंच

Investment Banker कोण असतो?त्याचे काय काम असते?

जेव्हा आपल्याला आपल्या बिझनेससाठी,एखादी छोटी कंपनी खरेदी करायला फंडची आवश्यकता असते.तेव्हा आपण इन्वहेस्टमेंट बँकशी संपर्क साधत असतो.

ज्यात आपण त्या इन्व्हेस्टमेंट बँकला सांगत असतो की आम्हाला एक अमुक छोटी कंपनी खरेदी करायची आहे ज्यासाठी आम्हाला निधीची आवश्यकता आहे.

अशा वेळी इन्व्हेस्टमेंट त्यांचा एक इन्व्हेस्टमेंट बँकर(गुंतवणुक तज्ञाला) आपला बिझनेस बघण्यासाठी पाठवत असते.

मग तो इन्व्हेस्टमेंट बँकर आपला सर्व बिझनेस व्यवस्थित Analyze करत असतो.आणि चेक करून सांगत असतो की आपल्याला असे काय करावे लागेल जेणेकरून बिझनेसमध्ये आपल्याला जास्तीत जास्त नफा प्राप्त होईल.

यानंतर आपण ती कंपनी खरेदी केल्यावर इन्व्हेस्टमेंट बँकर आपल्याकडून जेवढया अमाऊंटमध्ये डिल फायनल झाली आहे त्याचा एक टक्का आपल्याला गाईडन्स करण्यासाठी काही कमिशनच्या स्वरुपात आपल्याकडुन घेत असतो.

म्हणजे समजा शंभर करोडची डिल क्रँक झाली असेल तर इन्व्हेस्टमेंट बँकर त्यात दहा करोड कमिशन घेत असतो.

 

भारतातील सर्वोत्तम दहा बँक – 2021  – List of top Indian Banks in Marathi

भारतातील सर्वोत्तम दहा बँक – 2021  – List of top Indian Banks in Marathi