युपीआय पेमेंटच्या मर्यादेत आरबीआयने वाढवली मर्यादा – UPI Lite Transaction Limits increased

युपीआय पेमेंटच्या मर्यादेत आरबीआयने वाढवली मर्यादा

आता आॅनलाईन पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची गरज नाही युपीआय लाईट दवारे ५०० रूपयांपर्यत आॅफलाईन पेमेंट करता येईल

आरबीआयने गुरूवारी आॅफलाईन पद्धतीने कमी मुल्य असलेले डिजीटल पेमेंट करण्याच्या ट्रान्झॅक्शन मर्यादेत अजुन वाढ केली आहे.

आरबीआयने आता एक ट्रान्झॅक्शन मर्यादा २०० रूपया वरून ५०० रूपये इतकी वाढवली आहे.ही व्यवहार मर्यादा त्वरीत लागु केली जाणार असल्याचे आयबीआयने सांगितले आहे.

म्हणजे आता आपल्या मोबाईल मध्ये कमकुवत इंटरनेट कनेक्शन असताना तसेच इंटरनेट चालविण्यासाठी डेटा उपलब्ध नसताना देखील आपण युपीआय वाॅलेट दवारे ५०० रूपयांपर्यत ट्रान्झॅक्शन करू शकतो.

युपीआय लाईट काय आहे?

ही एक नवीन सर्विस आहे जी एनपीसीआय अणि आरबीआयने मिळुन २०२२ साली सुरू केली होती.

  • युपीआय लाईट दवारे मोबाईल वापरकर्त्याना इंटरनेटचा तसेच युपीआय पिनचा वापर न करता देखील कमी रक्कम समोरच्या व्यक्तीला ट्रान्स्फर करता येते.
  • याआधी आपणास युपीआय लाईट दवारे आॅफलाईन पद्धतीने इंटरनेटचा वापर न करता २०० रूपयांपर्यतचे ट्रान्झॅक्शन करता येत होते.
  • पण आता आरबीआयने ह्या ट्रान्झॅक्शन मर्यादेत अजुन वाढ केल्याने आपणास इंटरनेटचे कनेक्शन उपलब्ध नसताना तसेच मोबाईल मध्ये इंटरनेट बॅलन्स नसताना देखील ५०० रूपयांपर्यतचे ट्रान्झॅक्शन एकावेळी करता येणार आहे.
  • युपीआय लाईट दवारे रिअल टाईम मध्ये आॅफलाईन पेमेंट करण्यासाठी आपणास युपीआय पिन इंटर करण्याची देखील आवश्यकता नसते.
  • फक्त युपीआय लाईट दवारे पेमेंट करण्यासाठी आधी आपल्याला बॅक अकाऊंट मधून वाॅलेट मध्ये पैसे अॅड करावे लागतात.यानंतर ह्याच पैशांदवारे आपण पेमेंट करू शकतो.
See also  प्री ॲप्रोवड लोन संबंधी मराठी माहिती - Pre approved loan in Marathi -