Commercial Bank म्हणजे काय ? प्रकार व सुविधा – Commercial Bank Information In Marathi

Commercial Bank विषयी माहीती – Commercial Bank Information In Marathi

बँक म्हणजे काय हे आज कोणालाच सांगायची गरज पडत नाही कारण बँक काय असते हे प्रौढ व्यक्तींपासुन ते शाळेत जात असलेल्या लहान मुलांना देखील माहीत असते.

पण जेव्हा बँकेच्या वेगवेगळया प्रकारांची नावे आपण ऐकत असतो.तेव्हा आपल्या मनात जाणुन घेण्याची तीव्र ईच्छा निर्माण होत असते की कमर्शिअल बँक कशाला म्हणतात?ह्या बँकेचे काय काम असते?आपण ज्या बँकेत पैसे जमा करतो जिथुन कर्ज काढतो ती बँक कोणती असते?

कारण बँकेचे हे असे विविध प्रकार आपण पहिल्यांदाच ऐकत असतो.

आजच्या लेखात आपण Commercial Bank विषयी आपल्या मनात असलेल्या सर्व शंकाचे निरसन करणार आहोत.आणि सर्व माहीती एकदम सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

Commercial Bank म्हणजे काय?

Commercial Bank ही एक वित्तीय संस्था तसेच असे ठिकाण,जागा असते जिथे आपण आपले पैसे अगदी सुरक्षित आपल्या बचत खात्यामध्ये जमा करत असतो आणि ज्याच्याबदले बँकेकडुन आपल्याला त्या पैशांवर काही व्याज देखील दिले जात असते.

कमर्शिअल बँकेत आपल्याला एटीएम कार्ड,क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड,लोन,नेटबँकिंग इत्यादी आँनलाईन सोयीसुविधा दिल्या जात असतात.

Commercial Bank मध्ये कोणत्या अकाऊंटवर जमा(Deposit) करू शकतो?

Commercial बँकेत आपण एकुण पाच अकाऊंटमध्ये आपले पैसे जमा(Deposit) करू शकतो.

1)Saving Account

2)Current Account

3) Fixed Deposit

4) Recurring Deposit

5) Home Safe Saving Account

1) Saving Account :

यात आपण आपल्या खात्यामध्ये पैसे सुरक्षित राहण्यासाठी जमा करत असतो आणि ह्या जमा केलेल्या पैशांवर बँकेकडून आपल्याला काही व्याज देखील मिळत असते.पण हे व्याज एफडीपेक्षा कमी असते.

See also  Personal Finance - बँकिंग,इन्कम वं इन्श्युरंस क्षेत्रातली 25 म्हत्वाचे शब्द - Useful Personal Finance terms in Marathi

यात आपण पाहिजे तेवढी रक्कम आपल्या बँक खात्यात जमा करू शकतो.पण ह्या खात्यातुन आठवडयातुन चार किंवा पाच वेळाच आपल्याला पैसे काढता येत असतात.

2) Current Account :

Current Account हे एक Business Account असते जे मोठमोठे Investor, Traders, Companies डेली ट्रान्झँक्शनसाठी Use करत असतात.

ह्या अकाऊंटमध्ये आपण कधीही पैसे टाकु शकतो तसेच ते पाहिजे तेव्हा काढु देखील शकतो.

ह्या अकाऊंटमध्ये जे पैसे असतात त्यावर आपल्याला बँकेकडुन कुठलेही व्याज दिले जात नाही.याउलट आपल्याकडुन ट्रान्झँक्शनसाठी सर्विस चार्ज घेतला जात असतो.

3) Fixed Deposit :

यात आपण पाच,दहा किंवा पंधरा,वीस इत्यादी वर्षाच्या कालावधीसाठी आपले पैसे बँकेत जमा करत असतो.आणि मग बँक त्याच पैशाचा वापर करून ठरलेल्या कालावधीत फिक्स व्याजदर लावून आपले पैसे आपल्याला ठरलेल्या कालावधीनंतर वापस करत असते.

4) Recurring Deposit :

आरडीमध्ये आपण बारा महिने,चोवीस महिने अशा कालावधीसाठी आपल्या अकाऊंटवर जमा करत असतो.

यात आपण दर महिन्याला चार हजार किंवा पाच हजार अशी रक्कम आरडी मध्ये जमा करायची असते आणि मग आरडीचा ठरवलेला कालावधी पुर्ण झाल्यावर आपण ते पैसे बँकेतुन काढु शकतो.

आरडीवर देखील आपल्याला एफडी इतकेच व्याज प्राप्त होत असते.

5) Home Safe Saving Account :

हे अकाऊंट विशेषकरून गावातील खेडयातील अशा व्यक्तींसाठी असते ज्यांची कमाई फार जास्त नाही.

यात आपणास एक गलल्यासारखा बाँक्स दिला जातो ज्यात आपण आपले पैसे जमतील तसे जमा करायचे असतात आणि मग पैसे जमल्यावर तो बाँक्स बँकेकडे घेऊन जायचे असतात मग बँक तेच पैसे आपल्या खात्यावर जमा करत असते.

Nifty BEES म्हणजे काय ? गुंतवणूक कशी करावी ?

Nifty BEES म्हणजे काय ? गुंतवणूक कशी करावी ? Nifty BEES Information In Marathi

Commercial Bank कडुन आपणास कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात?

आपल्याला कमर्शिअल बँकेकडून ओव्हरड्राफ्ट आणि शाँर्ट टर्म लोनची फँसिलिटी देखील दिली जात असते.

See also  ज्येष्ठ नागरीक बचत योजना SCSS माहीती - Senior Citizen Saving Scheme Details In Marathi

1)Overdraft :

Overdraft Facility त्याच व्यक्तीला Use करता येते ज्याचे बँकेत Current Account आहे आणि त्याचे स्वताचे क्रेडिट कार्ड देखील आहे.

यात आपल्या खात्यात जर दहा हजार असतील आणि बाजारातुन आपल्या एखादी पंधरा हजाराची वस्तु विकत घ्यायची असेल तेव्हा आपण Overdraft Facility चा वापर करून ती पंधरा हजाराची वस्तु घेऊ शकतो.

फक्त बँकेने दिलेले पाच हजार आपल्याला बँकेला वापस करावे लागत असतात.याला आपण क्रेडिट लोन घेणे असे देखील म्हणु शकतो.

2) Short Term Loan :

जेव्हा आपल्याला एखादे घर खरेदी करायचे असते,स्वताची कार विकत घ्यायची असते,किंवा स्वताचा एखादा उद्योग धंदा सुरू करायचा असतो,शिक्षणासाठी कर्ज हवे असते.

तेव्हा देखील इथून आपणास काही पैसे व्याज आकारून कर्जाच्या स्वरुपात ठरलेल्या कालावधीसाठी उधार दिले जात असतात.अशा लोनला Short Term Loan असे म्हटले जाते.

यात लोन घेण्यासाठी आपल्याला बँकेला काही Securities Provide करणे गरजेचे असते.

इतर सुविधा

कमर्शिअल बँकेत आपल्याला एटीएम कार्ड,क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड,लोन,नेटबँकिंग इत्यादी आँनलाईन सोयीसुविधा देखील दिल्या जात असतात.

कोणत्या बँक Commercial Bank आहे?

आरबी आयच्या अंतर्गत काम करत असलेली प्रत्येक बँक कमर्शिअल बँक आहे.
उदा.बँक आँफ बडोदा,आयडीबीआय बँक,एचडी एफसी ,आयसी आयसीआय,एसबीआय,इत्यादी बँका ह्या Commercial Bank आहेत.

पण आरबीय आयचा कमर्शिअल बँकेत समावेश होत नसतो कारण ती स्वता एक सेंट्रल बँक आहे.

1 thought on “Commercial Bank म्हणजे काय ? प्रकार व सुविधा – Commercial Bank Information In Marathi”

Comments are closed.