भारतातील सर्वोत्तम दहा बँक – 2021 – List of top Indian Banks in Marathi
आज आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत प्रगती घडवून आणण्यात बँकिंग क्षेत्राचे खुप मोठे मोलाचे योगदान असलेले आज आपणास दिसुन येते.
ह्या बँक देखील दोन प्रकारच्या असतात एक असते खासगी बँक आणि दुसरी असते सरकारी बँक.पण दोघेही बँका आपापल्या क्षमतेप्रमाणे देशाच्या विकासासाठी आपापल्या परीने समान योगदान देण्याचे काम करत असतात.
आजच्या लेखात आपण भारतातील 2021मधील अशाच काही सर्वोत्तम दहा टाँप बँकाविषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
बँक म्हणजे काय?
बँक ही एक अशी वित्तीय संस्था आहे जी जिथे आपण आपले पैसे सुरक्षित राहावे यासाठी जमा करत असतो. बँकेकडुन आपल्याला आर्थिक अड अडचणीच्या काळात कर्ज देखील दिले जात असते.अशा पदधतीने बँक आपल्याला विविध आर्थिक नियोजनाच्या सर्व सेवा सुविधा देण्याचे काम करत असते.
बँकेमध्ये पैसे ठेवल्याने आपल्याला आपले पैसे चोरी होण्याची अजिबात भीती राहत नसते.आपले पैसे,दागदागिने तसेच इतर वस्तु आपण बँकेमध्ये सुरक्षितपणे ठेवू शकत असतो.
तसेच बँक आपल्याला एटीएम कार्ड,डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड नेटबँकिंग अशा इत्यादी सेवा सुविधा देखील देत असते.जेणेकरून आपण घरबसल्या मोबाईल इंटरनेटचा वापर करून पैशांची देवाण घेवाण करू शकतो.आँनलाईन एखाद्या वस्तुची क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी करू शकतो.आपल्याला पाहिजे तेव्हा एटीएम मधून पैसे काढू शकतो.
बँकेचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?
बँक ह्या एकाच प्रकारच्या नसुन विविध प्रकारच्या असतात आणि त्यांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :
1) सेंट्रल बँक :
2) बिझनेस बँक :
3) को आँपरेटिव्ह बँक :
4) इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक :
5) एक्सचेंज बँक :
6) सेव्हिंग बँक :
7) रिजनल रूरल बँक :
1)सेंट्रल बँक : सेंट्रल बँकला मराठीत मध्यवर्ती बँक असे देखील म्हणतात.सेंट्रल बँक ही आपल्या भारत देशातील एक सर्वोच्च वित्तीय संस्था म्हणुन आपणास परिचित आहे.
रिझर्व बँक आँफ इंडिया ही भारतामधील सेंट्रल बँक आहे.
2) बिझनेस बँक : बिझनेस बँक ही एक व्यावसायिक बँक असते.जिचा आपल्या देशाच्या विकासामध्ये खुप मोलाचा वाटा असतो.
ह्या बँकचे देखील तीन प्रकार पडत असतात.
- पब्लिक सेक्टर बँक
- प्रायव्हेट सेक्टर बँक
- फाँरेन बँक
3)को –आँपरेटिव्ह बँक : भारतामध्ये को आँपरेटिव्ह बँकेची 1904 मध्ये स्थापणा करण्यात आली होती.
ह्या बँकेचे देखील तीन प्रकार असतात.
- प्रायमरी क्रेडिट युनियन बँक
- सेंट्रल को आँपरेटिव्ह बँक
- स्टेट को आँपरेटिव्ह बँक
- लँण्ड डेव्हलपमेंट बँक
- अरबन को आँपरेटिव्ह बँक
4) इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक :
ह्या बँकेची स्थापणा भारतात 1964 मध्ये करण्यात आली होती.ह्या बँकच्या स्थापणेचे मुख्य उददिष्ट भारतीय उद्योगांमध्ये विकास घडवून आणने त्यासाठी आर्थिक सुविधा पुरवणे हे होते.
5) एक्सचेंज बँक :
एक्सचेंज बँकेला आपण फाँरेन एक्सचेंज बँक असे देखील म्हणत असतो.ही बँक देशाबाहेर समाविष्ट केली जाते पण ही आपला व्यवसाय भारतामधुनच करताना आपणास दिसुन येते.
6) सेव्हिंग बँक : सेव्हिंग बँक ही बचत ठेवी स्वीकारण्याचे आणि त्यावर व्याज देण्याचे काम करत असते.
7) रिजनल रूरल बँक : ही भारतामधील शासकीय मालकीची व्यावसायिक बँक म्हणुन प्रचलित आहे जी भारतात असलेल्या विविध राज्यांत प्रादेशिक पातळीवर कार्य करते.
2021 मधील भारतातील सर्वोत्तम दहा टाँप बँक कोणकोणत्या आहेत?
2021 मधील भारतातील सर्वोतम टाँप दहा बँकाची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
1) बँक आँफ बडोदा :
2) स्टेट बँक आँफ इंडिया :
3) कोटक महिंद्रा बँक लि :
4) एचडी एफसी बँक :
5) आयसी आयसी आय बँक :
6) अँक्सिस बँक :
7) इंदुसलँण्ड बँक :
8) पंजाब नँशनल बँक :
9) येस बँक :
10) बँक आँफ इंडिया :
1) बँक आँफ बडोदा : बँक आँफ बडोदा हे भारत सरकारच्या मालकीत असलेले बँकिंग सेक्टर आहे ज्याची मालकी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडे देण्यात आलेली आहे.
बँक आँफ बडोदाला भारतातील तिसरया क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक म्हणुन ओळखले जाते.
2) स्टेट बँक आँफ इंडिया :
स्टेट बँक आँफ इंडियाला जगातील सर्व बँकांमध्ये 43 व्या क्रमांकावर असलेली सर्वात मोठी बँक म्हणुन ओळखले जाते.ही एक बहुराष्टीय स्वरुपाची सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेली आपणास दिसुन येते.
ह्या बँकेचे मुख्य कार्यालय महाराष्टातील मुंबई ह्या शहरात आहे.
3) कोटक महिंद्रा बँक :
कोटक महिंद्रा बँक ही एक भारतातील बँकिंग क्षेत्राशी संबंधित सेवा देणारी कंपनी आहे.
ह्या बँकेचे मुख्य कार्यालय महाराष्टातील मुंबई ह्या शहरात स्थापण करण्यात आले आहे.
4) एचडी एफसी बँक : एचडी एफसी ही सुदधा एक भारतीय बँकिंग तसेच इतर वित्तीय सेवा पुरवणारी कंपनी आहे.जिचे मुख्य कार्यालय महाराष्टातील मुंबई ह्या शहरात वसलेले आहे.
एचडी एफसी ही एक भारतामधील खासगी क्षेत्रातील एक सर्वात मोठी बँक म्हणुन प्रसिदध आहे.ह्या बँकेची स्थापणा 1994 मध्ये करण्यात आली होती.
5) आयसी आयसी आय बँक :
आयसी आयसी आय बँकेचे मुख्य कार्यालय देखील महाराष्टातील मुंबई ह्या शहरात आहे.आयसीआयसी आय बँक ही एक खासगी क्षेत्रातील बँक म्हणुन ओळखली जाते.
ह्या बँकेची स्थापणा ही 1994 मध्ये करण्यात आली होती.
6) अँक्सिस बँक :
अँक्सिस बँक। ही भारतातील एक खासगी बँक आहे.जिचे प्रमुख काम आर्थिक उत्पादनांची सेवा प्रदान करणे हे आहे.
आँक्सिस बँक ह्या बँकेचे प्रमुख कार्यालय महाराष्टातील मुंबई येथे स्थापित करण्यात आले आहे.
एक मार्च 2020 पर्यत ह्या बँकैच्या 5000 शाखा निर्माण झाल्या होत्या.अँक्सेस बँकेकडून मोठमोठया तसेच मध्यम स्वरूपाच्या कंपनींना व्यवसायासाठी आर्थिक सेवा दिली जात असते.
7) इंदुसलँण्ड बँक :
इंदुसलँण्ड बँक ही भारतातील एक नवोदित पिढीची बँक आहे.जिचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे.
ह्या बँकेचे उदघाटन मनमोहन सिंग यांच्या हस्ते 1994 मध्ये करण्यात आले होते.
ही एक अशी नव्या पिढीतील खासगी बँक आहे जी आपल्याला व्यवसाय,व्यवहार तसेच इतर बँकिंग उत्पादनाच्या सेवा पुरविण्याचे देखील काम करते.
8) पंजाब नँशनल बँक :
पंजाब नँशनल बँकेला आपण पीएनबी असे म्हणून देखील ओळखतो.पंजाब नँशनल बँक ही भारतातील एक नँशनल बँक आहे जिचे प्रमुख कार्यालय भारतातील नवी दिल्ली या शहरात स्थापण करण्यात आले आहे.ह्या बँकेची स्थापण 1894 मध्ये करण्यात आली होती.
ही बँक देखील भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अधिपत्याखालीच असलेली आपणास दिसुन येते.
9) येस बँक :
येस बँक ही इतर खासगी क्षेत्रातील बँकापैकीच एक आहे.येस बँकचे प्रमुख कार्यालय भारतातीलच मुंबई ह्या शहरात आहे.
ह्या बँकेची स्थापणा 2004 मध्ये करण्यात आली होती.आणि येस बँकेचे प्रमुख कार्यालय भारतामध्येच महाराष्टातील मुंबई ह्या शहरात आहे.
येस बँक आपल्या सर्व कस्टमरला बँकिंगशी संबंधित तसेच प्राँपर्टी मँनेजमेंटच्या सर्विसेस देण्याचे काम करते.आणि ह्यासाठी येस बँक आपल्या कस्टमरला आपल्या विविध उत्पादनांची आँफर देखील देत असते.
10) बँक आँफ इंडिया :
बँक आँफ इंडिया ही एक भारतामधीलच एक व्यावसायिक ब़ँक आहे जिचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे.
बँक आँफ इंडियाची स्थापणा ही 1906 मध्ये करण्यात आली होती.
बँक आँफ इंडियाला भारतातील एक अव्वल क्रमांकाची बँक म्हणुन ओळखले जाते.बँक आँफ इंडियाच्या परदेशामध्ये सुदधा एकुण 29 शाखा आहेत.आणि भारतात बँक आँफ इंडियाच्या कमीत कमी 4,250 इतक्या शाखा आहेत.
अशा पदधतीने आज आपण भारतातील 2021मधील सर्वोतम अशा दहा बँकाविषयी थोडक्यात आणि मुददेसुदपणे माहीती जाणुन घेतली आहे.
2 thoughts on “भारतातील सर्वोत्तम दहा बँक – 2021 – List of top Indian Banks in Marathi”
Comments are closed.