Portfolio विषयी माहीती – Share market portfolio information in Marathi

Portfolio विषयी माहीती – Share market portfolio information in Marathi

 आज आपल्या पैशांची गुंतवणुक करत असलेल्या प्रत्येक गुंतवणुकदाराला आपला पोर्टफोलिओ तयार करणे खुप आवश्यक असते.कारण आपला पोर्टफोलिओ तयार केल्यामुळे आपली गुंतवणुक करण्यातील जोखिम कमी होत असते.आणि गुंतवणुकीतील जोखिमचे प्रमाण कमी झाल्यामुळे आपल्याला आपला कुठलाही मोठा लाँस होणार नाही याची शाश्वती प्राप्त होत असते.

आजच्या लेखात Share market portfolio information in Marathi  आपण ह्याच पोर्टफोलिओविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

पोर्टफोलिओ म्हणजे काय?

पोर्टफोलिओ म्हणजे गुंतवणूकदारांच्या वित्तीय मालमत्तेचा संग्रह.सोन,समभाग,म्युचल फंडस, ETF ,रोख रक्कम, रोखे(बॉण्ड्स), कमोडिटी असे सर्व वित्तीय संपत्ति साधन (financial instruments ) ज्यात आपण गुंतवणुक केली आहे त्याच्या  यात समावेश होतो.

आपण गुंतवणूक केल्या नंतर  आपल्या मालमत्तेची किंवा  मुळ भांडवल कमी होत नाही याची  काळजी या पोर्टफोलिओ मॅनेजमेंट द्वारे केली जाते. काही लोक ज्यांना आर्थिक विषयांची चांगली जाण असते ते स्वतः च आपला पोर्टफोलिओ  सांभाळतात कींवा काहीं लोक हे काम वित्तीय क्षेत्रातील तज्ञा लोकांना PMS पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सेवा पुरविणार्‍या कंपनी ना देतात

पोर्टफोलिओचे स्वरूप एखाद्या अहवालाप्रमाणे असते.ज्यात आपल्या गुंतवणुकीविषयी सर्व माहीती आपल्याला दिलेली असते.आपल्या पैशांची गुंतवणुक कुठे कुठे केली जाणार आहे?किती गुंतवणुक केली जाणार आहे?ह्या सर्व गुंतवणुकीच्या माहीतीचा पोर्टफोलिओ हा एक सारांश असतो.

पोर्टफोलिओ तयार करण्याचे फायदे कोणकोणते असतात?- Share market portfolio information in Marathi

आपण आपला पोर्टफोलिओ तयार करण्याचे अनेक फायदे आपल्याला होत असतात.आणि हे सर्व फायदे पुढीलप्रमाणे असतात:

See also  फक्त दहा रुपये किंमत असलेल्या उर्जा ग्लोबल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सला इलाॅन मस्कच्या नावामुळे मिळाला एक दिवसात २० टक्के इतका परतावा -Urja global share price

पोर्टफोलिओ तयार करण्याचा सगळयात पहिला फायदा हा असतो की याने आपल्याला एकाच वेळेला आपल्या सर्व गुंतवणूकीचा रेकाँर्ड ठेवता येतो.आपण आपले किती पैसे आणि कुठे गुंतवले जात आहेत याचा हिशोब ट्रँक करू शकतो.त्याकडे आपण लक्ष देऊ शकतो.

पोर्टफोलिओ तयार करण्याचा दुसरा फायदा हा असतो की आपल्याला आपली गुंतवणुक किती फायदा देते आहे तसेच किती नुकसान आपल्याला त्यातुन होत आहे हे जाणुन घेता येते.

पोर्टफोलिओ तयार करण्याचा अजून एक फायदा हा आहे की आपली जी गुंतवणुक जास्त फायदा देत असेल ती आपण कंटिन्यु करू शकतो त्यावर जास्त भर देऊ शकतो.तसेच ज्या गुंतवणुकीतुन आपल्याला हानी होत असेल त्यात आपण बदल देखील करू शकतो.

पोर्टफोलिओ तयार केल्याने आपली गुंतवणुकीतील रिस्क कमी होत असते.कारण यात आपण एकाच वेळेला विविध ठिकाणी आपल्या पैशांची गुंतवणुक करत असतो ज्याचा फायदा आपल्याला हा होतो की जरी एका ठिकाणी शेअर्सचे भाव कमी झाल्यामुळे आपले नुकसान होत असले तरी बाकीच्या ठिकाणी शेअर्सचे भाव वाढत असल्यामुळे आपल्याला फायदा देखील होत असतो.

गुंतवणुकीच्या वेळेनुसार आपण आपल्या पोर्टफोलिओत बदल करू शकतो.

आपला पोर्टफोलिओ कसा असायला हवा?

आपण आपला पोर्टफोलिओ कसा ठेवावा हे पुर्णपणे आपल्या जोखिम घेण्याच्या क्षमतेवरून ठरत असते.

आणि ही क्षमता ठरवता येते आपल्या वयोमर्यादेवरून कारण कमी वय असलेली व्यक्ती अधिक रिस्क घेऊ शकते पण जास्त वय असलेली व्यक्ती जास्त रिस्क घेऊ शकत नसते.

याचा फायदा कमी वयात जास्त रिस्क घेत असलेल्या व्यक्तीला होतो कारण त्याच्या पोर्टफोलिओमध्ये स्माँल कँप मिड कँप फंडचे़ प्रमाण लार्ज कँप फंड पेक्षा अधिक असलेले आपणास दिसुन येत असते.याच कारणामुळे कमी वय असलेल्या व्यक्तीचा पोर्टफोलिओ हा जास्त वय असलेल्या व्यक्तीच्या तुलनेत अधिक रिस्की तसेच आक्रमक असलेला आपणास दिसुन येत असतो.

पण ह्याच ठिकाणी आपण जास्त वय असलेल्या गुंतवणुकदाराचा पोर्टर्फोलिओ बघायला गेले तर आपणास असे स्पष्टपणे दिसुन येते की त्याचा पोर्टफोलिओत जास्त आक्रमकता तसेच रिस्क नसते.

See also  LIC IPO - पॉलिसीधारकां करता महत्वपूर्ण माहिती ? - What is LIC IPO's Policyholder Category

हेच एक कारण आहे की जास्त वय असलेल्या व्यक्तीच्या गुंतवणुकीत आपल्याला लार्ज कँप फंडचे प्रमाण आपल्याला अधिक दिसुन येत असते.

अशा पदधतीने यावरून आपल्याला लक्षात येते की कोणत्याही गूंतवणुकदाराचा पोर्टफोलिओ कसा असायला हवा हे त्याच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेवरून तसेच त्याच्या वयोमर्यादेवरून ठरवले जात असते.

गुंतवणुकीच्या वेळेनुसार आपण आपल्या पोर्टफोलिओत कशाप्रकारे बदल करू शकतो?

गुंतवणुक करत असताना आपण सुरूवातीला आपला पोर्टफोलिओ आक्रमक म्हणजेच हाय रिस्क असलेला ठेवू शकतो.पण जसजसे आपल्याला वाटु लागेल की आपण आपल्या गुंतवणुकीच्या निर्धारीत ध्येयाच्या जवळ येत आहोत.तेव्हा मग आपण जास्त रिस्क न घेता फक्त आपली गुंतवणुक सुरक्षेसाठी लार्ज कँप फंडमध्ये करण्याचे ठरवू शकतो.

आपण आपला पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी कोणकोणती महत्वाची पाऊले उचलायला हवीत?

 आपण आपला पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी पुढील महत्वाची पाऊले उचलणे खुप गरजेचे असते.

1)आपले गुंतवणुकीचे ध्येय निर्धारीत करणे :

2) एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक न करणे :

3) एकाच गुंतवणुकीवर पुर्णपणे अवलंबुन न राहणे :

1)आपले गुंतवणुकीचे ध्येय निर्धारीत करणे :

 आपण आपला पोर्टफोलिओ कसा आहे हे आधी लक्षात घ्यायला हवे आणि मग त्यानूसारच योग्य त्या गुंतवणुकीच्या ध्येयाची निवड करायला हवी.

2) एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक करणे :

 गुंतवणुक करत असताना आपण उचलायचे दुसरे महत्वाचे पाऊल हे देखील आहे की आपण एकाच ठिकाणी सर्व पैशांची गुंतवणुक करू नये याने आपली रिस्क देखील वाढत असते.कारण त्या ठिकाणी जर शेअर्सचे भाव कमी झाले तर आपली गुंतवणुक केलेली सर्व रक्कम वाया जाऊ शकते.आणि आपल्याला खुप मोठा आर्थिक फटका बसु शकतो.

म्हणुन आपण एकाच ठिकाणी सर्व पैशांची गुंतवणुक करणे टाळावे आपला पोर्टफोलिओ डायव्हरसिफाय करावा.याने आपली रिस्क घेण्याचे चान्सेस कमी होत असतात.

3) एकाच गुंतवणुकीवर पुर्णपणे अवलंबुन राहणे:

एकाच गुंतवणुकीवर आपण पुर्णपणे अवलंबुन राहु नये आपल्या Portfolio चे Diversification करायला हवे.

See also  Loan व Debt मध्ये काय फरक आहे? Difference in loan and debt

 

माहिती – भारतातील सर्वोत्तम 10 बँक

 

पोर्टफोलिओचे प्रकार किती आणि कोणकोणते असतात?

पोर्टफोलिओचे एकुण पाच प्रमुख प्रकार असतात आणि ते पाच प्रकार पुढीलप्रमाणे आहेत:

1) Aggressive Portfolio :

2) Hybrid Portfolio :

3) Conservative Portfolio :

4) Income Portfolio :

5) Defensive Portfolio :

1)Aggressive Portfolio :

ह्या पोर्टफोलिओत खुप जास्त प्रमाणात रिस्क असते.याचसोबत इथे जेवढी जास्त रिस्क आपल्याला पाहावयास मिळते तेवढेच जास्त रिटर्न देखील आपल्याला ह्यातुन प्राप्त होत असते.

हा पोर्टफोलिओ अशा गूंतवणुकदारांसाठी असतो जे अधिक प्रमाणात रिस्क घेण्याची क्षमता ठेवतात.म्हणजेच कमी वय असलेले व्यक्ती ह्या पोर्टफोलिओचा वापर करू शकतात.कारण त्यांच्यात रिस्क घेण्याची क्षमता अधिक जास्त असते.

2)Hybrid Portfolio :

हायब्रिड पोर्टफोलिओ हा एक असा पोर्टफोलिओ असतो ज्यात गुंतवणुक करत असलेल्या गुंतवणुकदाराला वैविध्यपुर्ण पोर्टफोलिओ दिले जाते.

याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येते की अशा प्रकारच्या फंड स्ट्ँट्रीजीत एकाचवेळी एका पेक्षा अधिक प्राँपर्टीची गुंतवणुक केली जात असते.

म्हणजे याच्यावरून आपल्या हे लक्षात येते की इथे आपण मिश्रित व्यवस्थापण दृष्टीकोनाचा वापर करू शकतो.

3) Conservative Portfolio :

कंझर्वेटिव्ह पोर्टफोलिओ हा पाच ते सहा वर्षासाठी म्हणजेच दिर्घ काळासाठी तयार केला जात असतो.

 ह्या पोर्टर्फोलिओत मोठया तसेच कमी रिस्क असलेल्या कंपन्यांचा समावेश होत असतो.

4) Income Portfolio :

इन्कम पोर्टफोलिओ हे अशा गुंतवणुकदारांसाठी तयार केले जात असते.ज्यांना वर्तमानकाळात इन्कम प्राप्त झाले नही तरी चालत असते पण त्यांना भविष्यात त्यांच्या गुंतवणुकीतून भरपुर नफा प्राप्त व्हावा अशी एकमेव अपेक्षा असते.

असे गूंतवणुकदार खुप कमी रिस्क घेणारे नसतात तसेच खुप जास्त रिस्क देखील घेत नसतात.असे गूंतवणुकदार कँलव्युलेटेड रिस्क घेणारे गुंतवणूकदार असतात.

5) Defensive Portfolio :

डिफेन्सिव पोर्टफोलिओ हा एक संरक्षणात्मक धोरण डोळयासमोर ठेवून तयार केलेला पोर्टफोलिओ असतो.

ह्या पोर्टफोलिओत आपला तोटा हानी होण्याची शक्यता कमी केली जात असते.

ह्या पोर्टफोलिओमधील साठयांचा मार्केटमधील शेअर्सच्या कमी जास्त होण्याच्या हालचालीशी कोणताही संबंध नसतो.म्हणजे ह्या पोर्टफोलिओत मार्केटमधील शेअरची प्राईज वाढणे कमी होणे ह्या हालचालींचा कोणताही व्यापक परिणाम होत नसतो.

अशा पदधतीने आजच्या लेखातुन आपण पोर्टफोलिओविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेतली आहे

 

.