सोशल मीडिया मार्केटिंग – Social media marketing information in Marathi

सोशल मीडिया मार्केटिंग विषयी माहीती social media marketing information in Marathi

मित्रांनो जेव्हापासुन डिजीटल क्रांती घडुन आली आहे सर्व व्यवसाय पैशांची देवाणघेवाणीचे व्यवहार सुदधा डिजीटल पदधतीनेच घडत आहे.

त्यातच सोशल मीडिया हे एक असे माध्यम बनले आहे जिथे आपण आता फक्त मित्रांसोबत चँटिंग करने, आपले फोटो अपलोड करणे त्यावर लाईक कमेंटस करणे त्यांना शेअर करणे एवढेच मनोरंजनाचे काम करू शकत नाही.

तर आज आपण आपल्या कुठल्याही नवीन प्रोडक्ट सर्विस बिझनेसची मार्केटींग देखील सोशल मीडिया दवारे करू शकतो.

सोशल मिडियाचा वापर करून आपण आपले विचार भावना लोकांपर्यत पोहचवू शकतो.आपला व्यवसाय जगभरात पोहचवू शकतो.आपल्या कस्टमरच्या संख्येमध्ये वाढ घडवून आणु शकतो.असे अनेक फायदे आज सोशल मीडियाचे आहेत.

आजच्या लेखात आपण ह्याच सोशल मीडिया प्लँटफाँर्म विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

सोशल मीडिया म्हणजे काय?Social media meaning in Marathi

सोशल मीडिया हे एक असे डिजीटल आँनलाईन प्लँटफाँर्म आहे ज्यादवारे जगभरातील विविध ठिकाणचे लोक एकमेकांशी संवाद साधु शकतात.एकमेकांशी जोडले जातात.एकमेकांशी विचारांची देवाण घेवाण करू शकतो.आपल्या लाईफमधील महत्वाचे क्षण आपल्या मित्र मैत्रीणींसोबत तसेच इतरांसोबत फोटो व्हिडिओ दवारे शेअर करू शकतो.

जगातील सर्वात बेस्ट सोशल मीडिया प्लँटफाँर्म ?best social media platforms in world in Marathi

सर्वात जास्त वापरले जाणारे जगातील सर्वात बेस्ट सोशल मीडिया प्लँटफाँर्म पुढीलप्रमाणे आहेत –

See also  ई-काँमर्सचे फायदे- Advantages Of E Commerce In Marathi

● इंस्टाग्राम

● टविटर

● फेसबुक

● युटयुब

● टेलिग्राम

● क्वोरा

● लिंक्ड ईन

इत्यादी.

एस एम एमचा फुलफाँर्म काय होतो?smm full form in Marathi

एस एम एमचा फुलफाँर्म social media marketing असा होतो.

सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय?Social media marketing meaning in Marathi

सोशल मीडिया मार्केटिंग हा डिजीटल मार्केटिंगचाच एक खुप महत्वाचा भाग मानला जातो.

जेव्हा एखादी व्यक्ति कंपनी तसेच संस्था सोशल मीडिया दवारे आपल्या बिजनेस प्रोडक्ट आणि सर्विसेसला सोशल मीडियावर त्याची मार्केटिंग करून प्रमोट करत असते स्वताचा प्रचार प्रसार करत असते तेव्हा त्यास सोशल मीडिया मार्केटिंग असे म्हटले जाते.

सोशल मीडिया वरून आपल्या प्रोडक्ट सर्विसला बिझनेसला प्रमोट करण्यासाठी इतरांपर्यत पोहचवण्यासाठी आपण विविध इंफोग्राफिक्स,ईमेजेस टेक्सट,व्हिडिओ यांचा समावेश करू शकतो.

सोशल मीडिया मार्केटिंगचे 8 महत्वाचे फायदे ? 8 important Benefit of social media marketing in Marathi

सोशल मीडिया मार्केटिंगचे आठ महत्वाचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत-

1)आज लहानांपासुन ते काँलेजात शिकणारे तरूण तरूणी तसेच मोठयांपर्यत सर्वच जण सोशल मीडियाचा वापर करताना आपणास दिसुन येतात.असे म्हणायला देखील हरकत नाही की आज सर्व जग सोशल मीडियावर येऊन जमा झाले आहे.

आणि अशात जर आपण सोशल मीडियावर अँक्टिव्ह राहिलो तर आपण आपली आँडियन्सची संख्या अजुन जास्त वाढवू शकतो.कारण सोशल मीडिया मुळे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचु शकतो आणि आपल्या व्यवसायाचा प्रचार प्रसार म्हणजेच डिजीटल पदधतीने सोशल मीडिया दवारे मार्केटिंग करू शकतो.

2) सोशल मीडिया वर अँक्टिव्ह राहिल्याने जास्तीत जास्त लोकांसोबत आपला संपर्क होईल आणि आपल्या कस्टमरच्या संख्येत वाढ होऊन आपला बिझनेस अजुन जोरात चालायला लागेल.

3) सोशल मीडिया मुळे आपण आपल्या व्यवसायाचा प्रचार एका ठिकाणी बसुन संपूर्ण जगभरात करू शकतो.आणि आपला स्वताचा एक ब्रँण्ड बनवू शकतो.

4)जर आपला व्यवसाय आपले प्रोडक्ट सर्विस नवीनच असेल आणि लोकांना त्याविषयी माहीतीच नसेल तर अशावेळी आपल्याकडे जास्त कस्टमर येत नसतात.पण याच ठिकाणी जर आपण सोशल मीडिया दवारे आपल्या बिझनेस,प्रोडक्ट सर्विसचा प्रचार केला तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यत,कस्टमरपर्यत आपला बिझनेस पोहचवू शकतो.

See also  फायनान्शिअल लिटरेसी म्हणजे काय? - Financial literacy meaning in Marathi

याने आपले कस्टमर देखील वाढत जातात.फक्त यासाठी आपल्याला सोशल मीडिया वर स्वताच्या बिझनेसचे एक आँफिशिअल पेज तयार करावे लागेल.जास्तीत जास्त सोशल मीडिया गृपवर जाँईन व्हावे लागेल.किंवा स्वताचे वेगवेगळया सोशल मीडिया प्लँटफाँर्मवर गृप तयार करावे लागतील.

5) जर आपला एखादा ब्लाँग किंवा युटयुब चँनल असेल तर आपण आपल्या सोशल मीडिया पेज तसेच गृपवर त्याची लिंक शेअर करून आपल्या ब्लाँग वेबसाईटवर तसेच युटयुब चँनलवर ट्रँफिक घेऊ शकतो.याने आपल्या ब्लाँगवरची ट्रँफिक वाढते,इन्कम मध्ये वाढ होते.आणि युझर्सला आपल्या ब्लाँगवर युटयुब चँनलवर वळवता येते.

6) आपण आपल्या सोशल मीडिया वरील टारगेट कस्टमरची आवड,गरज,समस्या लोकेशन इत्यादी जाणुन घेऊन त्याच्याशी संबंधित एखादे बेस्ट प्रोडक्ट सर्विस तयार करून त्यांना त्याची सर्विस देऊ शकतो.आणि एक चांगला रिव्हेन्यु तसेच इन्कम जनरेट करू शकतो.

7) जर आपण सोशल मीडिया वर अँक्टिव्ह राहिलो आणि आपल्या आँडियन्सशी संवाद साधत राहिलो त्यांच्या प्रश्नांची उत्तर देत राहिलो तर आपल्या आँडियन्सच्या एंगेजमेंटमध्ये अधिक वाढ होत असते.त्यांची आपल्याप्रती असलेली लाँयल्टी देखील वाढत असते.

8) सोशल मीडिया मार्केटिंगदवारे आपण आँफलाईन पेक्षा खुप कमी खर्चात आपल्या बिझनेसची मार्केटिंग करू शकतो आणि त्यातच आपला बिझनेस नवीनच असेल आणि बिझनेसची जाहीरात करायला आपल्याकडे जास्त भांडवल नसेल तर आपण सोशल मीडिया मार्केटिंग करून खुप कमी किंमतीत जाहीरात करून जास्तीत जास्त लोकांपर्यत आपला व्यवसाय घेऊन जाऊ शकतो.