जागतिक ज्येष्ठ अत्याचार जागृती दिवस विषयी माहिती – World elder abuse awareness day information in Marathi

जागतिक ज्येष्ठ अत्याचार जागृती दिवस विषयी माहिती world elder abuse awareness day information in Marathi

मित्रांनो आपण सर्व जण ह्या समाजाचे घटक आहोत आणि आपल्या ह्या समाजातील अविभाज्य आणि एक अत्यंत महत्वाचा घटक हा आपल्या समाजातील ज्येष्ठ नागरीक आहेत.

पण आज कुठेतरी समाजात आपणास असे दिसुन येते आहे की समाजात ज्येष्ठ नागरीकांवर अन्याय अत्याचार केले जातात.त्यांच्यासोबत गैरवर्तन केले जाते त्यांचा अनादर देखील केला जातो.

ह्या सर्व गोष्टींना कुठेतरी लगाम घालणे गरजेचे आहे.यासाठी समाजातील ज्येष्ठ नागरीकांवर होत असलेल्या अत्याचारा विरूदध जागृती करण्यासाठी आंतरराष्टीय पातळीवर दरवर्षी 15 जुन रोजी ज्येष्ठ नागरीक अत्याचार जागृती दिवस साजरा केला जातो.

आजच्या लेखात आपण जागतिक ज्येष्ठ नागरीक अत्याचार जागृती दिवसाविषयी अधिक माहीती जाणुन घेणार आहोत.

जागतिक ज्येष्ठ अत्याचार जागृती दिवस कधी साजरा केला जातो?

जागतिक ज्येष्ठ अत्याचार जागृकता दिवस दरवर्षी 15 जुन रोजी साजरा केला जातो.

जागतिक ज्येष्ठ अत्याचार जागृकता दिवस 2022 मध्ये कधी आहे?

जागतिक ज्येष्ठ अत्याचार जागृकता दिवस 15 जुन रोजी आहे.

जागतिक ज्येष्ठ अत्याचार जागृकता दिवस का साजरा केला जातो?

समाजामध्ये ज्येष्ठांवर होत असलेल्या अत्याचाराबाबद समाजात जागृकता निर्माण करण्यासाठी आणि त्याविषयी समाजात प्रबोधन करून त्याविरूदध आवाज उठवण्यासाठी दरवर्षी 15 जुन रोजी जागतिक ज्येष्ठ अत्याचार जागृती दिवस साजरा केला जातो.

ज्येष्ठ नागरीकांच्या प्रती समाजातील लोकांमध्ये प्रेम आणि आदरभाव निर्माण व्हावा आणि समाजात ज्येष्ठ नागरीकांवर होत असलेल्या अत्याचाराविरूदध लोकांनी आवाज उठवावा त्यांच्या सुरक्षेसाठी नेहमी जागृक असावे यासाठी युनायटेड नेशनकडुन 2011 मध्ये एक ठराव पास करण्यात आला होता.आणि मग त्या पास केलेल्या ठरावा अंतर्गत दरवर्षी जागतिक ज्येष्ठ अत्याचार जागृती दिवस साजरा केला जाऊ लागला.

See also  आपला मोबाईल गरम होण्याचे कारण काय? - Why does my phone get hot Marathi information

मित्रांनो आज संपुर्ण जगामध्ये ज्येष्ठ नागरीकांची संख्या पाच ते सहा कोटी पेक्षा अधिक झालेली आपणास पाहायला मिळते.आणि हीच संख्या महाराष्टात जवळजवळ एक कोटी इतकी असलेली आपणास दिसुन येते.

समाजामध्ये आज दिवसेंदिवस विभक्त कुटुंब पदधतीत वाढ होत आहे.याचमुळे आपल्या मुलांपासुन दुर एकटे राहत असलेल्या ज्येष्ठ नागरीकांना समाजात एकटे वावरत असताना सामाजिक,शारीरीक,मानसिक तसेच आर्थिक अशा विविध अत्याचारांना आज सामोरे जावे लागत आहे.

तसेच समाजात काही ठिकाणी ज्येष्ठ नागरीकांना हिनतेची वागणुक दिली जाते.त्यांच्यासोबत अनेक ठिकाणी गैरवर्तन देखील केले जाते.त्यांना शिवीगाळ देखील केली जाते.

ह्या अशा गैरकृत्यांना कायमचा आळा घालण्यासाठी समाजात ज्येष्ठ नागरीकांच्या सुरक्षेविषयी सतर्कता जागृकता निर्माण व्हावी यासाठी हा दिवस विशेषकरून दरवर्षी साजरा करण्यात येतो.

जागतिक ज्येष्ठ अत्याचार जागृकता दिवस दरवर्षी कसा साजरा केला जातो?

● समाजामध्ये ज्येष्ठ नागरीकांच्या सुरक्षेची असलेली नितांत गरज आणि महत्व यादिवशी समाजापटवून दिले जाते.

● ज्येष्ठ नागरीकांच्या सुरक्षेविषयी समाजात जागृकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी विविध उपक्रमांदवारे सामाजिक प्रबोधन केले जाते.

समाजातील ज्येष्ठ नागरीकांवर होणारया अत्याचाराला आळा घालण्यासाठी सरकारने तयार केलेले कायदे-

मित्रांनो ज्येष्ठ नागरीकांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी त्यांना कायद्यामध्ये देखील काही तरतुदी करण्यात आल्या आहेत ज्या पुढीलप्रमाणे आहेत –

● 2005 मध्ये घरगुती हिंसा प्रतिबंधक कायदा तयार करण्यात आला होता ज्यात कलम 125 नुसार समाजातील ज्येष्ठ नागरीकांना संरक्षण तसेच संगोपण प्रदान केले गेले.

● मग यानंतर 2007 मध्ये सरकारकडुन पालक व ज्येष्ठ नागरीक कल्याण हा कायदा तयार करण्यात आला.ज्यात मुलांनी आपल्या पालकांचे संगोपण करणे ही त्यांची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे असे सांगितले गेले आहे.तसेच मुलाने जर आपल्या पालकांचा सांभाळ केला नाही तर त्याला शिक्षा करण्याची नोंद देखील ह्या कायद्यामध्ये करण्यात आली आहे.ही शिक्षा सहा महिने तुरूंग आणि पाच ते दहा हजार रूपये दंड अशी आहे.

See also  भारताचा ग्रॅड मास्टर प्रज्ञानंदच्या नावावर असलेले सर्व रेकाॅड अणि पुरस्कार - Praggnanandhaa awards list

● ज्येष्ठ नागरीकांना आपल्या भरण पोषण तसेच उदरनिवार्हाविषयी कुठलीही तक्रार असल्यास ज्येष्ठ नागरीक आपल्या जिल्हयातील सहायक आयुक्त यांच्याकडे,किंवा समाजकल्याण संस्थेकडे देखील आपली तक्रार नोंदवु शकतात.