NGO म्हणजे काय ? NGO information in Marathi
एनजीओ एक अशी Non Government Organization असते.ज्यात शासनाचा कोणताही सहभाग असलेला आपणास दिसुन येत नाही.ह्या संस्थेचा मुख्य हेतु गोरगरिबांना साहाय्य करणे,त्यांच्या अडीअडचणी,समस्यांना समजुन घेणे आणि मग त्यावर योग्य ती उपाययोजना करून त्यांची मदत करणे हा असतो.
आज आपण ह्याच एनजीओविषयी आजच्या लेखातुन सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
एनजीओ म्हणजे काय? NGO information in Marathi
- एनजीओ ही एक कुठलीही सरकारी संस्था तसेच संघटना नसुन ही एक खासगी संस्था असते.जी समाजाची सेवा करण्यासाठी,समाजातील गरिब तसेच दुबळया लोकांना मदत करण्यासाठी पुर्ण वेळ कार्यरत असते.
- एनजीओकडुन गरिब तसेच निराश्रित स्त्री तसेच पुरूषांच्या राहण्याची सोय केली जात असते.आपल्या शिक्षणाचा खर्च स्वता करू शकत नसलेल्या गरीब मुलांना शिकविण्याचे काम देखील ह्या एनजीओमार्फत केले जात असते.
- तसेच ज्या महिलांवर अन्याय अत्याचार होत असेल अशा महिलांची सुरक्षा करण्याचे त्यांना योग्य तो न्याय तसेच त्यांचा हक्क मिळवुन देण्याचे काम देखील एनजीओ करत असते.
- एनजीओ ही एक अशी संघटना आहे जी कोणीही स्थापित करू शकते.आणि त्याचे नेतृत्व देखील करू शकते.
- एनजीओच्या विकासाची प्रथम सुरूवात ही आपल्याला अमेरिका ह्या देशातुन झालेली दिसुन येते.अमेरिका हा एक असा देश आहे जिथे आजही अशा अनेक खासगी संस्था कार्यरत आहेत.ज्या फक्त समाजसेवेसाठी उभारण्यात आल्या आहेत.आणि ह्या संस्थेच्या स्थापणेत सरकारचे कुठलेही योगदान असलेले आपणास दिसुन येत नाही.
एनजीओची कार्य करण्याची पदधत कशी असते? – NGO information in Marathi
- स्थापित केल्या गेलेल्या कोणत्याही संस्था तसेच संघटनेत एकुण सात किंवा त्याहुन अधिक लोकांचा सहभाग असतो.आणि एनजीओ ही संस्था संघटना स्वताच्या फायद्याला अधिक महत्व न देता गरीब जनतेचे समाजाचे कल्याण आपल्याला कशा पदधतीने करता येईल याला याचा विचार नेहमी करत असते.
- आणि हे एक असे काम आहे जे कोणतीही सामाजिक कार्य करण्याची समाजाची सेवा करण्याची मनापासुन आवड असणारी प्रत्येक व्यक्ती करू शकते.फक्त यासाठी आपल्याला तशी कायदेशीर नोंदणी करावी लागत असते किंवा आपण हे सामाजिक सेवेचे कार्य कोणतीही नाव नोंदणी न करता देखील पार पाडु शकतो.
- पण ज्या सर्वसामान्य व्यक्तीला स्वताचे एक एनजीओ सुरू करून समाज सेवा करायची असेल त्याने आपली नाव नोंदणी करणे अधिक फायदेशीर ठरेल.कारण याने त्याला शासनाकडुन देखील ह्या समाज हिताच्या कार्यासाठी आर्थिक साहाय्य प्राप्त होत असते.
- याने आपल्याला आपल्या एनजीओचे काम अजुन मोठया पातळीवर करण्यास प्रोत्साहन तसेच सरकारचा पाठिंबा मिळत असतो.किंवा आपण आपल्या एनजीओसाठी फंड देखील गोळा करू शकतो.
पण समजा समाजातील एखादा उच्चप्रतिष्ठीत श्रीमंत समाजसेवक व्यक्ती असेल ज्याला आपले एक एनजीओ सुरू करायचे असेल तर अशी व्यक्ती शासनाकडुन कुठलीही आर्थिक मदत न घेता तसेच कोणतीही नाव नोंदणी न करता देखील आपल्या पदधतीने एनजीओ चालवू शकते.
एनजीओचे कार्य करण्याचे प्रमुख उददिष्ट काय असते?
- एनजीओ ह्या नाँन प्राँफिट नाँन गर्वमेंट संस्था संघटनेची कार्य करण्यामागील विविध उददिष्टे असतात आणि ही उददिष्टे पुढीलप्रमाणे असतात.
- गोर गरिब तसेच निराश्रित स्त्रियांच्या राहण्याची तसेच काम करण्याची आपल्या संस्थेमार्फत सोय करून त्यांना आपल्या संस्थेच्या घरकुल योजनेत सहभागी करून घेणे.
- गरीब मागासवर्गीय,आदीवासी समाजातील लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्या समस्या दुर करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणे.
- वृदधाल्पकाळात जगत असलेल्या वयोवृदध स्त्री तसेच पुरुषांना मदत करणे ज्यात त्यांची राहण्या खाण्याची सोय करणे,त्यांना आर्थिक सहायता प्रदान करणे इत्यादी कार्ये असतात.
- समाजातील अशा लोकांना आर्थिक मदत करणे,मानसिक आधार देऊन त्यांचे मनोबल वाढवणे जे कँन्सर तसेच कँन्सर सारख्या इतर विविध दुर्गध आजारांशी लढा देत असतात.
- समाजातील अशा गरीब अंध,अपंग तसेच अशिक्षित मुलांना आपल्या संस्थेमार्फत शिकविणे ज्यांचे पालक त्यांच्या शिक्षणाचा खर्च करू शकत नाही.किंवा जे अनाथ असल्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा खर्च करायला कोणी नाहीये.
- आपल्या संस्थेमार्फत शाळेतील मुला मुलींना सकस आणि पोषक अन्न पुरवठयाची सुविधा प्रदान करणे.
- आपल्या संस्थेमार्फत शालेय शिक्षणासाठी विदयार्थ्यांना वहया पुस्तकांचे वाटप करणे.
एनजीओचे प्रकार किती आणि कोणकोणते असतात?= NGO information in Marathi
एनजीओ हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात जे पुढीलप्रमाणे आहेत:
1)Government Register Ngo :
2)Non Government Register Ngo :
1)Government Register Ngo :
ह्या मध्ये अशा एनजीओंचा समावेश होत असतो.ज्याची शासनाकडे आपण कायदेशीर पदधतीने नोंदणी केलेली असते.आणि ह्यामुळे समाजसेवेच्या कार्यासाठी हातभार म्हणुन सरकार देखील मदत स्वरूपात आपल्याला फंड देत असते.
अशा प्रकारच्या एनजीओत एखादी कंपनी,संस्था संघटना सोसायटीचा समावेश होत असतो.
2) Non Government Register Ngo :
हे एक असे एनजीओ असते.ज्याची शासनाकडे आपण कायदेशीर पदधतीने कुठलीही नोंद केलेली नसते.याच कारणामुळे अशा एनजीओच्या कामकाजासाठी शासनाकडून कुठलाही निधी दिला जात नसतो.किंवा कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत देखील केली जात नसते.
अशा प्रकारच्या एनजीओत खासगी संस्था संघटनेचा समावेश होत असतो.
स्वताचे एनजीओ सुरू करण्याचे फायदे कोणकोणते असतात?
तसे पाहायला गेले तर एनजीओ ही एक नाँन प्राँफिट संस्था संघटना असते.जिचे प्रमुख कार्य कोणताही आर्थिक लाभ न घेता फक्त निस्वार्थपणे समाजाची सेवा करणे हे असते.आणि ह्याच कारणासाठी एनजीओची मुख्यकरून स्थापणा केली जात असते.
पण आता ह्याच एनजीओचा वापर करून लोक अतिरीक्त कमाई करताना देखील आज आपल्याला दिसुन येत आहे.म्हणजेच एनजीओ हे एक एक्सट्रा इन्कमचे चांगले माध्यम आहे.असे म्हणण्यास आपल्याला कुठलीही हरकत नाही.
नोकरी करून आपल्याला जेवढी सँलरी महिन्याला प्राप्त होत असते त्यापेक्षा अधिक कमाई आपण एनजीओ मध्ये काम करून एका दिवसात करू शकतो.
याचसोबत एनजीओ मध्ये काम केल्याने आपल्याला सामाजिक सेवेच्या कार्यात आपले योगदान देता येते जेणे आपल्याला परमार्थाचा आनंद देखील मिळत असतो.आणि पुण्य देखील प्राप्त होत असते.
आणि सगळयात महत्वाचे म्हणजे एनजीओ ही एक खासगी संस्था संघटना असल्यामुळे त्यातुन आपली जी कमाई होत असते.त्यावर शासनाला आपल्याकडून कोणताही टँक्स घेता येत नसतो.हा देखील एक वैयक्तिक फायदा एनजीओ सुरू करण्याचा किंवा त्यात काम करण्याचा आपल्याला मिळत असतो.
आपण आपल्या नवीनतम सुरू केलेल्या एनजीओसाठी निधी कसा प्राप्त करावा?
आपण आपल्या एनजीओसाठी विविध पदधतीचा वापर करून निधी गोळा करू शकतो.
एनजीओसाठी निधी प्राप्त करण्याच्या पदधती पुढीलप्रमाणे आहेत :
1) खासगी संस्था तसेच कंपन्यांशी संपर्क साधुन :
2) शासनाकडुन आर्थिक मदत मिळवून :
3) एखादा कार्यक्रम आयोजित करून :
1)खासगी संस्था तसेच कंपन्यांशी संपर्क साधुन :
आपल्या एनजीओच्या कामाला निधी प्राप्त व्हावा यासाठी आपण विविध खासगी कंपन्यांना प्रत्यक्ष भेट देऊन,त्यांच्याशी मोबाईलवर बोलुन,किंवा त्यांना ईमेल पाठवून देखील निधी देण्यासाठी विनंती करू शकतो.
पण यासाठी त्या कंपनीने आपल्यावर ट्रस्ट करावा यासाठी आपल्याला आपल्या संस्थेची एक आँफिशिअल वेबसाईट तयार करावी लागेल.जेणेकरून त्या कंपनीला आपली संस्था एक जेन्युएन संस्था आहे असे कळेल तसेच याची खात्री पटेल आणि मग ते आपल्या एनजीओच्या कामासाठी आपल्याला मदत म्हणुन फंड देखील देतील.
2) शासनाकडुन आर्थिक मदत मिळवून :
आपण सुरू केलेल्या एनजीओची जर आपण शासनाकडे कायदेशीररीत्या नोंदणी केली असेल तर शासन देखील ह्या सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदतीच्या स्वरुपात तसेच योगदान म्हणुन आपल्याला फंड देत असते.
3) एखादा कार्यक्रम आयोजित करून :
आपण आपल्या एनजीओसाठी आपल्याला लोकांकडुन जास्तीत जास्त फंड प्राप्त व्हावा यासाठी एखादा मोठा भव्य सामाजिक तसेच धार्मिक समारंभाचे आयोजन करू शकतो.
यातुन आपण समाजातील गोरगरिब,निराश्रित,अनाथ अपंगांसाठी करत असलेल्या सामाजिक कार्याची त्यांना नीट व्यवस्थित माहीती द्यावी.आपल्या कार्याचे महत्व जनतेला पटवून द्यावे आणि मग ह्या सामाजिक सेवेच्या कार्यात हातभार लावण्यासाठी आपण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार थोडीफार मदत करावी असे आवाहन देखील करू शकतो.
कोणत्याही एनजीओला आपण जाँईन कसे करू शकतो?
कोणत्याही एनजीओमध्ये आपण प्रकारे सहभागी होऊ शकतो.एक म्हणजे आपण आपली स्वताची एखादी खासगी एनजीओ सुरू करू शकतो.नाहीतर आपण एखाद्या दुसरया एनजीओमध्ये सभासद देखील होऊ शकतो.
पण स्वताचे एनजीओ सुरू न करता दुसरया एनजीओत काम करण्यासाठी आपल्याला आधी बीएसडब्लयु तसेच एम एसडब्लयु सारखा एनजीओच्या कामाशी संबंधित कोर्स करावा लागतो.
यानंतर आपण एखाद्या एनजीओत इंटर्नशिपसाठी देखील अँप्लाय करू शकतो.यासाठी आपण प्रत्यक्ष त्या एनजीओच्या कार्यकर्त्यांना भेट देऊ शकतो.किंवा त्यांच्या आँफिशिअल वेबसाईटला भेट देऊ शकतो.
वेबसाईटला भेट दिल्यावर आपल्याला तीन आँप्शन दिले जातात
- Become Member Of Ngo
- Include In Ngo
- Apply For Internship
वरील दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला जो पर्याय योग्य वाटेल आपण त्याची निवड करू शकतो.फक्त कोणत्याही पर्यायाची निवड केल्यानंतर आपल्याला काही माहीती भरण्यास सांगितले जाते.ती माहीती आपण आवर्जुन भरणे गरजेचे असते.
भारतातील प्रमुख एनजीओची नावे कोणकोणती आहेत?
भारतातील काही प्रमुख एनजीओची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- नन्नी कली
- सम्मान फाऊंडेशन
- सरगम इंस्टीटयुट
- गुंज
- प्रथम
- चाईल्डलाईन इंडिया फाऊंडेशन
- स्माईल फाऊंडेशन
- चाईल्ड राईट अँण्ड यु (Cry)
- आकांक्षा फाऊंडेशन
- स्पार्क अ चेंज फाऊंडेशन
- मेक अ डिफरन्स
- बचपण बचाओ आंदोलन
- मँजिक बस
- एज्युकेट गर्ल्स
1) नन्ही कली -नन्ही कली हे खास मुलींसाठी सुरू केलेले एनजीओ आहे.मुंबई येथील हे एन्जीओ महिंद्रा गृपचे अध्यक्ष यांनी समाजातील शिक्षणापासुन वंचित मुलींना शिक्षण प्राप्त व्हावे म्हणुन सुरू केले आहे.
2) प्रथम -हे भारतातील एक मोठे एनजीओ आहे जे समाजातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा म्हणून शिक्षण देण्याचे काम करते.
3) स्माईल फाऊंडेशन -समाजातील वंचित घटकांच्या जीवणात एक सकारात्मक बदल घडुन यावा ह्या हेतूने हे एनजीओ सुरू करण्यात आले आहे.
हे एनजीओ शिक्षण,आरोग्याच्या सेवा पुरवणे,महिलांना सक्षम बनण्यास मदत करणे इत्यादी काम करते.
4) क्राय -भारतातील वंचित मुलांच्या आयूष्यातील परिस्थिती बदलावी म्हणुन रिपन कपुर यांनी 1979 रोजी हे एनजीओ सुरू केले होते.
5) आकांक्षा फाऊंडेशन -सर्व मुलांना उच्च शिक्षण प्राप्त व्हावे म्हणुन हे एनजीओ सुरू करण्यात आले आहे.
6) स्पार्क अ चेंज फाऊंडेशन – समाजातील शिक्षणापासुन वंचित मुलांसाठी ही संस्था कार्य करते.
7) मेक अ डिफरन्स – हे एनजीओ भारतातील सर्व अनाथ आश्रमातील तसेच आश्रयित मुलांच्या हितासाठी कार्य करते.
8) बचपण बचाओ आंदोलन -समाजात लहान मूलांकडुन जे बालमजूरी करून घेण्यात येते त्याविरूदध लढा देऊन मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी ही संस्था काम करते.
9) मँजिक बस -हे एनजीओ समाजात कौशल्य आणि ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी काम करते.जेणेकरून समाजातील गरिबीत घट होईल
10) एज्यूकेट गर्ल्स -हे एनजीओ मुलींच्या शिक्षणातील दर्जात वाढ व्हावी म्हणुन विशेषकरून कार्य करते.