ऊस पिकात ठिबक सिंचनाचे महत्व -Importance Of Drip Irrigation In Sugarcane Cultivation

ऊस आणि ठिबक सिंचनाचे महत्व -Importance Of Drip Irrigation In Sugarcane Cultivation

ऊस पिक हे आता आपल्या भागातील एक महत्त्वाचे नगदी पीक झाले असून आपल्या भागातील ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेत ऊस विकासास अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. कधीकधी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे व दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत असल्यामुळे ऊस उत्पादनातील चित्र बदलत चालले आहे.

ऊसाचे उत्पादन कमी येण्याचे खलील कारणामुळे होऊ शकते.

  • दोषपूर्ण मशागत पद्धती,
  • जमिनीतील क्षारांचे वाढते प्रमाण, ●खते, औषधे इ. गोष्टी वेळेवर न करणे,
  • पाणी व खते यांचा असमतोल वापर, ●पाण्याची सीमित उपलब्धता.

अशा परिस्थितीत ठिबक सिंचन तंत्रज्ञानाने पाण्याचे व्यवस्थापन व त्याचा शास्त्रशुद्ध वापर हाच ऊस उत्पादन वाढीला पर्याय होऊ शकतो. ऊसाच्या क्षेत्रावर आपल्या भागातील काही शेतकरी ठिबक सिंचन संच यशस्वीरीत्या कार्यान्वित करून घेऊन सदर पद्धतीच्या वापरामुळे शेतकरी उसाचे चांगले उत्पन्न घेत आहेत. ठिबक सिंचनामुळे शेतकऱ्यांना खलील मुख्य फायदे मिळतात.

1) उत्पादनात वाढ

2) रासायनिक खते, मजुरी व पीकसंरक्षण खर्चात बचत होते.

3) ऊस चांगला निरोगी तयार होतो.

सर्व ऊस उत्पादकांनी खालील गोष्टींची प्रामुख्याने दखल घेतल्यास ऊसाचे प्रतिहेक्टरी उत्पादन वाढेल यात शंकाच नाही.

ठिबक सिंचन पद्धतीने ऊसाची लागवड :

1) सरी पद्धत : ही ऊस लागवडीची पारंपारिक पद्धत असून यात दोन सरीतील अंतर 5 फुट ठेऊन सऱ्या पाडून घेतात. यात एक किंवा दोन डोळ्यांचे बेणे टिपरे वापरतात. या करिता हेक्टरी 20 हजार ते 25 हजार टिपरी लागतात. शेतकरी आपले स्वतःचे  रोप तयार करून किंवा तयार रोप विकत घेऊन लागवड करू शकतात त्या करीता हेक्टरी 15000 रोप लागतात. अश्या रीतीने लागवड केल्यास प्रत्येक सरीत  ठिबक सिंचनाची नळी टाकून मांडणी करता येते.

See also  आपण जांभई का देतो ? Why do we Yawn?

2) जोड ओळ पद्धत : या पद्धतीमध्ये 3 ते 3.5 फूट रुंदीच्या सऱ्या करावे. दोन सऱ्यांमध्ये उसाची लागवड करावी, तिसरी सरी मोकळी सोडावी. लागवड केलेल्या उसाच्या दोन सऱ्यामध्ये ठिबक सिंचनाची नळी सोडावी. दोन ड्रीपरमध्ये ५० से.मी. (२० इंच) अंतर ठेवावे. या पद्धतीत दोन सऱ्यांनंतर  6 ते 7 फुटांचा पट्टा राहतो. ठिबक संचाच्या दोन नळ्यांत 9 ते  10.50 फुट अंतर राहते. याचे काही फायदे आहेत, ते खालीलप्रमाणे

1) ठिबक सिंचन खर्चात 30 % बचत होते.

2) पाण्यामध्ये 50 ते 55 % बचत होते.

3) भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. हवा खेळती राहते.

4) आंतरमशागत सोपी होते.

5) जमीन खारवट होत नाही.

6) ऊस जोमाने वाढतो.

ठिबक सिंचन पद्धतीची वैशिष्ट्ये :

1) जमिनीत सतत वाफसा राहतो. उसाची वाढ चांगली होते.

2) पाणी हे जमिनीस न देता ऊस पिकास दिले जाते.

3) जमिनीच्या मगदुराप्रमाणे दररोज अथवा एक दिवसाआड पाणी दिले जाते.

4) उसाच्या गरजेप्रमाणे कमीतकमी वेगाने पाणी दिले जाते.

5) हवा व पाणी यांचा चांगला समन्वय होऊन मुळाशीच पाणी दिले जाते.

 

ठिबक सिंचनाचे फायदे :– Benefits and Importance Of Drip Irrigation In Sugarcane Cultivation

1) उपलब्ध पाण्यामध्ये प्रचलित पाटपद्धतीपेक्षा दुप्पट क्षेत्र भिजते.

2) थोडेसे क्षारयुक्त पाणीसुद्धा प्रभावीपणे वापरता येते.

3) सर्व रोपट्यांना सातत्याने समान पाणी मिळून वाफसा टिकून राहतो.

4) कांड्यांची संख्या, लांबी, जाडी चांगली व एकसारखी राहते.

5) फुटव्यांची संख्या चांगली राहते.

6) उंच सखल, पडीक जमिनी लागवडीखाली आणता येतात. हलक्या व रेताड मुरमाड जमिनीसाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे.

7) जमिनीची धूप टळते, प्रत चांगली राहते. मशागत कमी करावी लागते, खतांचा अपव्यय टळतो.

8) पिकाच्या गरजेप्रमाणे खते विभागून दिली जातात.

9) पाणी फक्त मुळाच्या क्षेत्रात राहते. इतर भाग कोरडा राहतो. तण वाढत नाही, पिकाची तणांसोबत अन्नासाठी व पाण्यासाठी स्पर्धा राहत नाही.

See also  DBMS आणि RDBMS यात काय फरक आहे? Difference Between DBMS And RDBMS

11) कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

11) पाणी देण्यासाठी मजुरी खर्च कमी होतो.

11) संच रात्री किंवा दिवसा केव्हाही चालविता येतो.

याप्रमाणे मोजक्या पाण्यात रासायनिक खतांचा प्रभावी उपयोग, रोग व किडींचा कमीतकमी प्रादुर्भाव, मजूर व जमिनीचा कार्यक्षम उपयोग व वाढीव उत्पादन, असे अनेक फायदे ठिबक सिंचन पद्धतीने होतात. ठिबक सिंचन ही पुढे जाऊन काळाची गरज ठरू शकते.