DBMS आणि RDBMS यात काय फरक आहे? Difference Between DBMS And RDBMS

DBMS आणि RDBMS माहिती – Difference Between DBMS And RDBMS

आपण DBMS आणि RDBMS हे दोघे आपण physical database मध्ये information store करण्यासाठी use करत असतो.

आणि आपल्याला हे दोघे सारखेच आहे असेच वाटत असते कारण DBMS आणि RDBMS या दोघांमध्ये काही महत्वाचे फरक आहेत जे आपल्याला माहीत नसतात.

आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे DBMS आणि RDBMS मध्ये काय फरक आहे?हा प्रश्न आपल्याला job interview मध्ये देखील नेहमी विचारला जात असतो.

म्हणुन आजच्या लेखात आपण या दोघांमधील हेच महत्वाचे फरक जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्या मनात या दोघांमध्ये काय साम्य आणि भेद आहे याविषयी कुठलीही शंका राहणार नाही.

DBMS आणि RDBMS या दोघांमध्ये काय फरक आहे?

DBMS आणि RDBMS या दोघांमध्ये असणारे फरक पुढीलप्रमाणे आहेत.

● DBMS हे एक असे साँप्टवेअर असते. ज्याचा वापर करून आपण डेटाबेस create तसेच maintain करू शकतो.

* RDBMS हे DBMS चे एक advanced तसेच extended version म्हणुन ओळखले जाते.

DBMS चा फुल फाँर्म

database management system असा होतो.

RDBMS चा फुल फाँर्म

(relational database management system) असा होतो.

● DBMS हे कुठल्याही data ला file मध्ये store करून ठेवते.

RDBMS हे कुठल्याही डेटाला table च्या format मध्ये store करत असते.

● DBMS मध्ये data हा hierarchical तसेच navigational form मध्ये stored केला जात असतो.

RDBMS मध्ये data stored करण्यासाठी tabular structure use केले जात असते.यात डेटा row आणि column च्या स्वरुपात स्टोअर केला जातो.

● DBMS मध्ये normalization present नसते.

See also  सेट परीक्षा 2023 ची तारीख जाहीर,आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी ह्या लिंकवर जा - SET Exam 2023 Date Hall Ticket Released In Marathi

RDBMS मध्ये normalization present असते.

● DBMS यात Data मध्ये कुठलीही relationship नसते.

RDBMS मध्ये Data हा table च्या form मध्ये store केला जात असतो.आणि तो एकमेकांशी related असतो.

● DBMS मध्ये data manipulation च्या बाबतीत कोणतीही security लागु होत नसते.

RDBMS मध्ये multiple levels ची existing data security असते.

● DBMS च्या model मध्ये data redundancy ही common असते.

RDBMS मध्ये key आणि indexes data redundancy ला allow करत नसतात.

● DBMS हे एखाद्या small organizations साठी use केले जात असते.कारण हे लहान डेटाला हाताळण्याचे काम करते.

RDBMS हे multiple user supported असते.म्हणजेच यात small तसेच large amount of data सुदधा handle केला जात असतो.

● DBMS हे single users ला support करते.

RDBMS हे multiple users ला support करते.

● DBMS मध्ये large amount of data साठी data fetching ही slow असते.

RDBMS मध्ये data fetching fast होत असते.कारण यात relational approach use केला जात असतो.

● DBMS च्या उदाहरणांमध्ये xml तसेच microsoft access इत्यादींचा समावेश होत असतो.

RDBMS च्या उदाहरणांमध्ये mysql तसेच oracle,oracle server इत्यादींचा समावेश होत असतो.

● DBMS हे 1960( first introduced in 1960) मध्ये सादर केले गेले होते

RDBMS हे 1970 मध्ये(first introduced in 1970) सादर करण्यात आले होते.

● DBMS हे client server architecture ला support करत नसते.

RDBMS हे client server architecture ला support करते.

● DBMS मध्ये distributed data ला support केले जात नाही.

RDBMS मध्ये distributed data ला support केले जाते.

● DBMS मध्ये primary key आणि foreign key ही concept use केली जात नसते.

RDBMS मध्ये primary key आणि foreign key ही concept ही गरजेनुसार use केली जात असते.

See also  ज्यांचा मोबाईल नंबर पोस्ट खात्याशी लिंक नसेल त्यांच्या खात्यातील व्यवहार आता बंद केले जाणार - Post office update 2023 link mobile number with post office account in Marathi

● Dr EF कोड यांनी DBMS ला RDBMS म्हणयाबाबद जे नियम तयार केले होते त्यातील कमीत कमी 7 rules ला DBMS support करते.

Dr EF कोड यांनी DBMS ला RDBMS म्हणयाबाबद जे नियम तयार केले होते त्यातील कमीत कमी 8 ते 10 rules ला RDBMS support करते.

● DBMS हे small organizations साठी use केले जात असते म्हणुन यात low software hardware ची आवश्यकता असते.

RDBMS high level organization मध्ये use केले जात असते म्हणून यात high level software hardware ची आवश्यकता असते.

● DBMS मध्ये data elements ला individually access करणे गरजेचे असते.(म्हणजे एकाच वेळी एकच डेटा अँक्सेस करता येतो)

RDBMS मध्ये आपल्याला multiple data एकाच वेळी access करता येत असतो.

● DBMS मध्ये आपण computer network मध्ये database ला manage केले जाते.

RDBMS मध्ये आपण database system ला table मधील relationship manage करण्यासाठी use करत असतो.