डीबी एम एस विषयी माहीती -DBMS Information In Marathi

डीबी एम एस विषयी माहीती -DBMS Information In Marathi

मागील एका लेखात आपण डीबीएम एस आणि आरडी बी एम एस या दोघांमध्ये काय फरक आहे हे जाणून घेतले होते.

पण आज आपण डीबीएम एस म्हणजे काय?त्याचे प्रकार किती आणि कोणकोणते असतात?डीबीएम एसचे फायदे आणि तोटे कोणकोणते असतात? इत्यादी महत्वाच्या बाबींचा सविस्तर आढावा घेणार आहोत.

ज्याने डीबी एम एस विषयी आपल्या मनात कुठलीही शंका राहुन जाणार नाही.

चला तर मग अधिक विलंब न करता आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे वळुया.

डीबी एम एसचा फुल फाँर्म काय होतो?-Full Form Of DBMS In Marathi

डीबीएम एसचा फुलफाँर्म -Database Management System) असा होतो.

डीबी एम एसची व्याख्या काय आहे?-Define DBMS In Marathi

डीबी एम एसची व्याख्या आपण पुढीलप्रमाणे मांडु शकतो-

डिबी एम एस हे एक प्रोग्रँमचे एक कलेक्शन आहे. ज्याच्या दवारे युझर्सला डेटाबेसमध्ये इंट्री करता येते,हवे ते बदल करता येतात.एवढेच नव्हे तर डेटाला व्यवस्थित हाताळता येते.मँनेज करता येते.

डिबी एम एस हे डेटाबेस मधील प्रवेश नियंत्रित करायला देखील साहाय्यकारी ठरत असते.

डीबीएम एसचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?-Types Of DBMS In Marathi

डीबीएम एसचे काही प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत–Data Model DBMS In Marathi)

1)Network Data Base System :

2) Hierarchical Data Base System:

3) Object Oriented Data Base System:

4) Relational Data Base System:

1) Relational Data Base System :

रिलेशनल डेटाबेस मँनेजमेंट सिस्टम ही एक सिस्टम आहे.

जिथे कुठल्याही डेटाला रो आणि काँलमच्या साहाय्याने -Two Dimensional Table) मध्ये आँर्गनाईज केले जाते.

ह्या डेटा माँडेलचा वापर मोठमोठया उद्योगांमध्ये केला जात असतो.

2) Object Oriented Data Base System :

आँब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस सिस्टममध्ये कुठलीही माहीती तसेच महत्वाचा डेटा आँब्जेक्टच्या फाँरमँटमध्ये दर्शविला जात असतो.

3) Hierarchical Data Base System:

हायराचिकल डेटाबेस सिस्टममध्ये कुठलाही डेटा ट्री च्या फाँरमँटमध्ये आँर्गनाईज केलेला असतो.

ज्याची रचना आपल्या कंप्युटर सिस्टममधील फोल्डरच्या रचनेसारखीच केलेली असते.ह्या डेटा माँडेलचा वापर हा मेनफ्रेम प्लँटफार्ममध्ये वेगवेगळया उद्योग व्यवसायात केला जात असतो.

4) Network Data Base System :

नेटवर्क डेटाबेस सिस्टम मध्ये सुदधा हायराचिकल डेटाबेस सिस्टम प्रमाणे हायराचिकल स्ट्रक्चरचाच विशेषकरून वापर केला जात असतो.

See also  20 थोर भारतीय स्वतंत्रता सेनानीं - भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक  - Greatest Freedom Fighters Of India Marathi information

पण यात कुठल्याही डेटाला ग्राफच्या फाँरमँटमध्ये आँर्गनाईज केले जात असते.

डीबी एम एसची उदाहरणे कोणकोणती आहेत?-DBMS Examples In Marathi

डीबी एम एसची काही प्रमुख उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत-

● My Sql

● Oracle Database

● Microsoft Access

● Sql Lite

● Dbase

● Fox Pro

डीबीएम एसचे फायदे किती आणि कोणकोणते आहेत?-Advantages Of DBMS In Marathi

तसे पाहायला गेले तर डीबीएम एसचे अनेक फायदे आहेत पण त्यातील काही अत्यंत महत्वाचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत-

1)No Data Redundancy

2) Data Security :

3) Data Privacy :

4) Backup And Recovery Procedure :

4) Data Independence

5) Data Sharing :

6) No Data Loss:

7) Data Searching :

8) Maintaining Cost Is Low :

9) Accessing Is Simple :

10) Data Integrity :

11) Data Consistancy :

12) Ease Of Application Development :

1)No Data Redundancy :

डीबीएम एस मध्ये कुठल्याही प्रकारची डेटा रिडंडन्सी होत नसते.हा एक सगळयात मोठा फायदा डिबीएम एसचा आपणास होत असतो.

म्हणजेच जसे की आपणा सर्वानाच एक गोष्ट चांगली माहीत आहे की कोणत्याही फाईल सिस्टममध्ये प्रत्येक अँप्लीकेशनची एक प्रायव्हेट फाईल असते.

ज्यामुळे खुप वेळा वेगवेगळया ठिकाणी एकाच डेटाच्या अलग अलग डुप्लीकेट फाईल्स तसेच काँपी तयार होत असतात.

पण डिबीएम एसमध्ये असा कुठलाही प्रकार घडत नसतो.कारण यात एका ठिकाणी एकाच टाईपची फाईल ठेवली जात असते.आणि ह्या फाईल्सची कुठल्याही प्रकारची डुप्लीकेसी देखील होत नसते.

डेटा रिडंडन्सी म्हणजे एकाच डेटाच्या विविध काँपीज.

2) Data Security :

डिबीएम एस चा दुसरा फायदा हा आहे की या मध्ये डेटा सिक्युरीटी असते.म्हणजेच आपल्या कुठल्याही डेटाला आपण इथे सिक्युअर ठेवू शकतो.

आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलीही परमिशन न घेता तसेच विदाऊट आँथराईझेशन कोणालाही आपला डेटा अँक्सेस करता येत नसतो.

3) Data Privacy :

डीबीएम एसचा तिसरा फायदा हा आहे की यामध्ये डेटाच्या प्रायव्हेसीची विशेष काळजी देखील घेतली जात असते.

कारण यामध्ये आपण डेटा बेस अँडमिनिस्ट्रेटरचा वापर करून हे ठरवू शकतो की कोणत्या युझरला कुठल्या लेव्हलचा डेटा अँक्सेस करू द्यायचा.आणि कोणत्या लेव्हलचा डेटा अँक्सेस करू नाही द्यायचा.

4) Backup And Recovery Procedure :

समजा सिस्टम करप्ट झाली किंवा सिस्टममध्ये इतर काही टेक्नीकल अडचण आली तर आपणास डिबीएम एसमध्ये डेटाला अँटोमँटिकली रिकव्हर तसेच रिस्टोअर करता येत असते.

याचसोबत यात डेटाचा बँक अप घेण्याचे आँटोमँटिक प्रोसिजर देखील असते.

5) Data Sharing :

डिबीएम एसचा पाचवा फायदा हा असतो की यात आपण डेटाला मल्टीपल युझर तसेच अँप्लीकेशन सोबत सहजपणे शेअर करू शकतो.

6) No Data Loss :

डीबीएम एसचा सहावा फायदा हा आहे की यात आपण जर एखादा डेटा खुप वर्षापासुन स्टोअर करून ठेवला तरी देखील तो डेटा कधीच लाँस तसेच डिलीट होत नसतो.कारण यात डेटाची सिक्युरीटी खुप स्ट्राँग असते.

7) Data Searching :

डिबीएम एसचा सातवा फायदा हा आहे की यात कुठल्याही डेटाला सर्च करणे खुप सोपे जात असते.तसेच यात आपण डिलीट झालेल्या डेटाला पुन्हा रिट्रीव्ह करू शकतो.

See also  ओपीडीचा फुल फाँर्म काय होतो? OPD Full Form In Marathi

डीबीएम एसची जुन्या डेटाबेसशी तुलना केली तर आपणास असे दिसुन येते की जुन्या डेटाबेसमध्ये आपल्याला पुर्ण प्रोग्रँम टाईप करावा लागायचा.

पण आता डिबीएम एसमध्ये तशी कुठलीही आवश्यकता भासत नाही फक्त एखादी छोटी क्वीरी टाईप करून देखील युझर्स कुठलीही माहीती सहज शोधु शकतात.

8) Maintaining Cost Is Low :

डिबीएम एसचा आठवा फायदा हा आहे की डीबीएम एसची सिस्टम खरेदी करत असताना जरी आपल्याला जास्त किंमत मोजावी लागत असली तरी डिबीएम एसच्या मेंटेनंसचा खर्च हा आपणास खुप कमी लागत असतो.

9) Accessing Is Simple :

डिबीएम एसचा नववा फायदा हा आहे की यात आपल्याला कुठल्याही डेटाला एकदम सहजपणे अँक्सेस करता येत असते.

10) Data Integrity :

डीबीएम एसचा दहावा फायदा हा आहे की यात डेटा इंटिग्रिटी ही कंसिस्टंट तसेच अँक्युरेट असते.म्हणजे यात डेटाबेस मधील डेटा हा नेहमी सुसंगत आणि अचूक राहत असतो.

11) Data Consistancy :

जेव्हा एकाच डेटाच्या विविध आवृती वेगवेगळ्या ठिकाणी आपणास दिसुन येत असतात.

तेव्हा फाईल्स तसेच डेटामध्ये विसंगती-Inconsistency) दिसुन येत असते.

पण डिबीएम एसचा अकरावा फायदा हा आहे की यात डेटाबेसमध्ये असा कुठलाही प्रकार घडुन येत नाही कारण यात डेटाची सुसंगतता म्हणजेच
-Consistency)यात सुनिश्चित केली जात असते.

12) Ease Of Application Development :

अँप्लीकेशन प्रोग्रँमर युझर्सच्या गरजेनुसार जे अँप्लीकेशन प्रोग्रँम डेव्हलप करत असतात.

ज्यात डेटाबेस मँनेजमेंट हे आपणास -Concurrent Access) देण्याचे,सिक्युरीटी देण्याचे काम करत असते.

याने अँप्लीकेशन डेव्हलपर्सला कुठलेही अँप्लीकेशन एकदम वेगात डेव्हलप करता येत असते तसेच ते अँप्लीकेशन डेव्हलप करणे एकदम सोपे देखील जात असते.

डीबीएम एसचे तोटे कोणकोणते आहेत?-Disadvantages Of DBMS In Marathi)

डिबीएम एसचे जसे अनेक फायदे आहेत तसेच त्याचे काही तोटे देखील आहेत जे आपल्याला माहीत असणे फार गरजेचे आहे.

डीबी एम एसचे काही तोटे पुढीलप्रमाणे आहेत-

1)High Cost :

डिबीएम एसचे जे प्रमुख घटक असतात जसे की त्यातील साँफ्टवेअर तसेच हार्डवेअर यांची किंमत फार जास्त असते.

2) Update,Upgrade :

डीबी एम एस मधील सर्व साँफ्टवेअर तसेच हार्डवेअर पार्टसला रेग्युलर अपडेट,अपग्रेड करावे लागत असते.

पण ह्या सर्व साँफ्टवेअर तसेच हार्डवेअर पार्टसची किंमत खुप अधिक असल्याने नेहमी असे करणे शक्य होत नसते.

3) Data Storage Space :

High Size Application तसेच प्रोग्रँम शी संबंधित कुठलाही डेटा तसेच फाईल स्टोअर करायला इथे खुप अधिक स्पेस लागत असतो.

डीबीएम एसचे घटक किती आणि कोणकोणते आहेत?-Components Of DBMS In Marathi)

डीबीएम एसचे काही महत्वाचे घटकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-

● साँप्टवेअर :

● हार्डवेअर :

● सिस्टमचा वापर करणारे युझर्स :

● सिस्टममधील डेटा :

● डेटाबेसला अँक्सेस करण्याची भाषा :

डीबी एम एसचा वापर कुठे कुठे केला जातो?-Application Of DBMS In Marathi)

डीबी एम एसचा वापर पुढील काही ठिकाणी अधिक केला जात असतो-

● एअरलाईन रिझर्वेशन :

● अकाऊंटिंग मध्ये :

● आँनलाईन खरेदी तसेच शाँपिंग सिस्टम:

● सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये-Social Media Sites)

See also  गटचर्चा Group discussion म्हणजे काय ? का महत्वाची असते ?

● क्रेडिट कार्ड एक्सचेंजिंग प्रोसेस :

● बँकिंग तसेच विविध शैक्षणिक क्षेत्रात :

● रेल्वे तिकिट रिझर्वेशन सिस्टम मध्ये :

● लायब्ररी मँनेजमेंट सिस्टममध्ये :

● फायनान्स सेक्टर मध्ये :

● अँग्रीकल्चर तसेच मँन्युफँक्चरिंग सेक्टर मध्ये:

डीबी एम एसची कार्ये कोणकोणती आहेत?-Functions Of DBMS In Marathi)

डीबी एम एसची काही प्रमुख कार्ये पुढीलप्रमाणे आहेत-

● आपल्या कुठल्याही डेटाला सिक्युअर ठेवणे हे डिबीएम एसचे एक प्रमुख कार्य आहे.

आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे डिबी एम एस कुठलीही परमिशन न घेता तसेच विदाऊट आँथराईझेशन कोणालाही आपला डेटा अँक्सेस करू देत नसते.

● डीबीएम एस आपल्या डेटाच्या प्रायव्हेसीची विशेष काळजी देखील घेत असते.

यासाठी यामध्ये डेटा बेस अँडमिनिस्ट्रेटरचा वापर केला जातो हे ठरवण्यासाठी की कोणत्या युझरला कुठल्या लेव्हलचा डेटा अँक्सेस करू द्यायचा.आणि कोणत्या लेव्हलचा डेटा अँक्सेस करू नाही द्यायचा.

● समजा अचानक सिस्टम करप्ट झाली किंवा सिस्टममध्ये अचानक इतर काही टेक्नीकल फाँल्ट आला तर डिबीएम एसमध्ये डेटाला अँटोमँटिकली रिकव्हर तसेच रिस्टोअर बँक अप करण्याची सुविधा असते.

आपल्याला मँन्युअली डेटाला रिस्टोअर बँक अप करावे लागत नाही.कारण यात डेटाचा बँक अप घेण्याचे आँटोमँटिक प्रोसिजर देखील असते.

● डिबी एम एस हे कुठल्याही डेटाला नेहमी सुसंगत आणि अचुक ठेवण्याचे काम करते.तसेच कुठल्याही जुन्या डेटाला लाँस तसेच डिलीट देखील होऊ देत नाही.

नाँर्मलाईझेशन म्हणजे काय?-Normalization In DBMS In Marathi)

नाँर्मलाईझेशन ही एक टेक्निक आहे.जिचा वापर डेटाबेसला डिझाईन करण्यासाठी केला जात असतो.

नाँर्मलाईझेशन हे डेटा रिडंडन्सी म्हणजेच डेटाच्या डुप्लीकेशनला कमी करण्याचे काम करते.

नाँर्मलाईझेशनचे देखील काही प्रमुख प्रकार आहेत–Types Of Normalization In Marathi)

● 1 एन एफ-First Normal Form)

● 2 एन एफ -Second Normal Form)

● 3 एन एफ -Third Normal Form)

● 4 एन एफ -Fourth Normal Form)

● 5 एन एफ -Fifth Normal Form)

डीबीएम एस मधील की किती आणि कोणकोणत्या आहेत?-Key In DBMS In Marathi)

रिलेशनल डेटाबेसमध्ये की ही फार महत्त्वाची भूमिका बजावत असते.

रिलेशनल डेटाबेसमध्ये की ही टेबलमधून डेटाच्या कोणत्याही रेकॉर्ड किंवा रो ला युनिकली आयडेंटीफाय करण्याचे महत्वाचे काम करते.

की चा उपयोग हा दोन टेबल मधील संबंध स्थापित करण्यासाठी किंवा ते त्या दोघांमधील संबंध ओळखण्यासाठी देखील केला जात असतो.

डीबी एम एसमधील काही महत्वाच्या की पुढीलप्रमाणे आहेत-

1)Primary Key :

2) Super Key :

3) Foreigh Key :

4) Composite Key :

5) Candidate Key :

1)प्रायमरी की म्हणजे काय? -What Is Primary Key In Marathi)

प्रायमरी की हा एक कँडिडेट की चा प्रकार असतो.ज्यात कोणत्याही रिलेशनल डेटाबेसची प्रायमरी की ही टेबल मध्ये असलेल्या प्रत्येक रेकाँर्डला आयडेंटीफाय करत असते ते ही एकदम युनिक पदधतीने.

डीबी एम एसमधील प्रायमरी की किती आणि कोणकोणत्या आहेत?-Primary Key In DBMS In Marathi)

प्रायमरी की ह्या एकुण दोन प्रकारच्या आहेत-

1)Simple Primary Key :

2) Composite Primary Key :

2)फाँरेन की म्हणजे काय?-Foreigh Key In Marathi)

फाँरेन की ला रिफरन्सिंग की म्हणुन देखील ओळखले जात असते.फाँरेन की अशी मेथड आपणास देत असते जिच्या साहाय्याने कुठल्याही डेटाच्या इंटीग्रिटीला मेंटेन करता येत असते.

3) Candidate Key :

जी की रिलेशनल डेटाबेसमध्ये कोणत्याही रो ला युनिकली आयडेंटीफाय करत असते अशा की ला आपण कँडिडेट की असे म्हणत असतो.

4) Super Key :

सुपर की ला आपण कँडिडेट की चा सुपरसेट म्हणुन देखील ओळखत असतो.तसेच सुपर की हा अँट्रीब्युटचा एक संच देखील असतो.

5) Composite Key :

जेव्हा एखादी प्रायमरी की विविध अँट्रीब्युटपासुन तयार होत असते.तेव्हा आपण तिला कंपोझिट की असे म्हणत असतो.

डीबी एमएस मध्ये इंटीटी काय आहे?-Entity In DBMS In Marathi)

इंटीटी म्हणजे वास्तविक जीवनातील कुठलीही एखादी वस्तु,व्यक्ती किंवा जागा असते जिला आपण इंटीटी असे संबोधित असतो.

उदा,एखाद्या कस्टमरचे ओळखपत्र,त्याचे नाव,त्याचा पत्ता ह्या सर्व घटकांना एक दुकानदार आपल्या कस्टमरच्या इंटीटी मध्ये समाविष्ट करत असतो.