प्लँगँरिझम म्हणजे काय?- Meaning Of Plagiarism In Marathi

प्लँगँरिझम बाबत माहिती – Meaning Of Plagiarism In Marathi

आपल्या दैनंदिन जीवनात वावरताना असे अनेक शब्द ऐकायला मिळत असतात.जे आपल्यासाठी एकदम नवीन असतात.प्लँगँरिझम हा सुदधा एक असाच शब्द आहे.

प्लँगँरिझम हा शब्द आज ब्लाँगिंगच्या कंटेट रायटिंगच्या क्षेत्रात ज्या व्यक्तींनी नवीनच पाऊल टाकले आहे त्यांना नेहमी ऐकायला मिळत असतो.

जे व्यक्ती कंटेट रायटर म्हणुन नुकतेच एखाद्या ब्लाँग वेबसाईटसाठी आर्टिकल लिहिण्याचे काम करत असतात त्यांना क्लाईंटकडुन हे इंस्ट्रक्शन नेहमी दिले जाते की तुम्ही लिहिलेला कंटेट प्लँगँरिझम फ्री असायला हवा.

पण खुप जण ह्या क्षेत्रात नवीन असल्यामुळे त्यांना प्लँगँरिझम म्हणजे काय?हेच माहीत नसते.मग ते प्लँगँरिझम चेक तरी कसा करणार.

याचकरिता आज आपण जे व्यक्ती ब्लाँगिंगच्या,कंटेट रायटिंगच्या क्षेत्रात नवीन आहेत त्यांना प्लँगरिझम म्हणजे काय?प्लँगरिझम कसा आणि कुठे चेक करतात?या विषयी सविस्तर माहीती देणार आहोत.

जेणेकरून त्यांना याबाबतीत कुठलीही अडचण येणार नाही.

प्लँगँरिझम म्हणजे काय?- Meaning Of Plagiarism In Marathi

प्लँगरिझम म्हणजे असा कंटेट तसेच साहित्य,सामग्री असते जी कुठुन तरी काँपी केली आहे.तसेच चोरलेली आहे.

आज असे अनेक नवीन ब्लाँगर तसेच कंटेट रायटर असतात जे ब्लाँगिंगमधून कंटेट रायटिंगमधून फक्त पैसे कमविण्याच्या उददिष्टाने आलेले असतात.जे ब्लाँगिंगच्या कंटेट रायटिंगच्या बाबतीत पँशोनेट नसतात.

आणि मग झटपट पैसे कमविण्यासाठी ते इतरांचे कंटेट काँपी करून आपल्या साईटवर पब्लिश करत असतात,किंवा आपल्या क्लाईटला देत असतात अशा कंटेटलाच Plagiarized Content असे म्हटले जात असते.

See also  MSF – नवीन प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी सूचना- एम एस एफ भरती नवीन अपडेट - MSF bharti 2022 new update

प्लँगँरिझमचे पुढीलप्रमाणे काही अर्थ निघतात-

● असे साहित्य तसेच वाडमय जे चोरी केलेले आहे.

● साहित्यिक तसेच वाडमयीन चोरी

प्लँगँरिझमचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?- Types Of Plagiarism In Marathi

मित्रांनो प्लँगँरिझम हा कुठल्याही एक प्रकारचा नसुन अनेक प्रकारचे असतात त्यातील काही महत्वाच्या प्लँगँरिझमची नावे पुढीलप्रमाणे आहेत-

Self Plagiarism –

Mosaic Plagiarism –

Accidental Plagiarism –

Direct Plagiarism :

1)Self Plagiarism –प्लँगँरिझमचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत Types Of Plagiarism In Marathi

सेल्फ प्लँगँरिझम म्हणजे असा कंटेट ज्यात आपण आपलाच एखादा आधी पब्लिश केलेला जुना कंटेट वापरात आणत असतो.

ह्या प्लँगँरिझमचा उपयोग विदयार्थी वर्गामध्ये अधिक प्रमाणात केला जातो.

कारण खुप विदयार्थी आपल्याच आधी तयार केलेल्या जुन्या नोटस काँपी करण्याचा प्रकार करत असतात.

2) Mosaic Plagiarism –

आपण जेव्हा वेगवेगळया सोर्स वरून थोडा थोडा कंटेट काँपी करून त्यांना एकत्र करत असतो.

आणि असे करत असताना आपण ज्याचा कंटेट आहे त्याला कुठल्याही प्रकारचे श्रेय न देता त्या कंटेटचा वापर करत असतो तेव्हा त्यास मोसाईक प्लँगँरिझम असे म्हणतात.

मोझाईक प्लँगँरिझम देखील एक बेकायदेशीर प्लँगँरिझम मानला जात असतो.

3) Accidental Plagiarism –

अँक्सीडेंटल प्लँगँरिझम म्हणजे असा कंटेट जो आपण जाणुनबुजुन कुठुनही काँपी केलेला नसतो.

पण अकस्माकरीत्या आपला कंटेट आणि समोरच्या व्यक्तीच्या कंटेटमधील काही लाईन मँच होत असतात. म्हणुन याला अँक्सीडेंटल प्लँगँरीझम असे म्हटले जात असते.

4) Direct Plagiarism-

जेव्हा आपण एखाद्या सोर्स वरून एखादा कंटेट जसाच्या तसा काँपी करत असतो आणि त्यात कुठल्याही प्रकारचा बदल देखील करत नाही.

आणि तोच कंटेट आपल्या स्वताच्या साईटवर आपल्या नावाने पब्लिश करत असतो तर त्याला डायरेक्ट प्लँगँरिझम असे म्हणतात.

प्लँगँरिझम चेकर म्हणजे काय?- Plagiarism Checker Meaning In Marathi

प्लँगरिझम चेकर म्हणजे असे एखादे साँफ्टवेअर किंवा टुल जे एखादा कंटेट कुठुन चोरला तसेच काँपी केला आहे हे आपणास चेक करून सांगत असते.

See also  सत्यजित रे यांच्याविषयी काही रोचक तथ्ये -Satyajit Ray birth anniversary. - Satyajit Ray Facts in Marathi

फ्री प्लँगँरिझम चेकर किती आहेत आणि कोणकोणते आहेत?- Free Plagiarism Checker In Marathi

काही अत्यंत प्रसिदध आणि अत्याधिक वापरले जात असलेले उत्तम आणि फ्री प्लँगँरिझम चेकर टुल पुढीलप्रमाणे आहेत-(Best Free Plagiarism Checker In Marathi)

● डुप्लीचेकर

● ग्रामरली

● टूर्नीटीन

● क्युटेक्सट

● स्क्रीबर

● स्माँल एससीओ टुल्स

● प्लँगँरिझम डिटेक्टर डाँट नेट

● चेक प्लँगरिझम डाँट काँम

● प्लँगँरिझम चेकर

● प्लँग स्कँन

● काँपी लिक

● काँपी स्केप

● युनीचेक

● प्लँगली

● इथेंटिकेट