कंटेट रायटिंग म्हणजे काय ? करियर संधी – Content Writing Information In Marathi

Table of Contents

कंटेट रायटिंग म्हणजे काय ? प्रकार महत्व व करियर संधी – Content Writing Information In Marathi

या नव्या शतकात , नव्या तंत्रज्ञान च्या युगात ,,अद्यावत टेक्नोलोजीने आपल्या जीवणात प्रवेश केला आहे.तेव्हापासुन शिक्षणापासुन ते नोकरीपर्यत सर्व काही डिजीटल झाले आहे .

एवढेच काय तर आज पैशांच्या देवाणघेवाणीचे व्यवहार देखील आता आँनलाईन पदधतीनेच अधिक करून घडत आहे.

म्हणजे आजचे युग डिजीटल क्रांतीचे युग झाले आहे.म्हणुन जर आपणास ह्या डिजीटल क्रांतीच्या युगात टिकुन राहायचे असेल तर आपणास डिजीटल पदधतीने पैसे कमविता आले पाहिजे.

आणि आजच्या काळात घरबसल्या डिजीटल पदधतीने आँनलाईन पैसे कमविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कंटेट रायटिंग आहे.

कंटेट रायटिंग ही एक अशी फिल्ड आहे.जिचा स्कोप आज दिवसेंदिवस वाढतो आहे.आणि भविष्यात अजुन जास्त वाढणार आहे.

आज अनेक खेडया पाडयातील गरीब घरातील विदयार्थी विदयार्थीनी सुदधा आपले शिक्षण करून कंटेट रायटिंगचे काम गरजेपुरता पार्ट टाईम तसेच फुल टाईम पैसे कमविण्यासाठी करताना आपणास दिसुन येत आहे.

म्हणुन कंटेट रायटिंगचा वाढता स्कोप आणि डिमांड बघुन आज आपण कंटेट रायटिंगविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

जेणेकरून आपल्याला देखील घरबसल्या कंटेट रायटिंगचे काम करून आँनलाईन पैसे कमविता येतील.

कंटेट म्हणजे काय- Content Meaning In Marathi

कंटेट म्हणजे सामग्री असा याचा अर्थ होतो. ज्यात लिखाण , आवाज , चलचित्र , चित्र टेक्सट,आँडियो,व्हिडिओ,इन्फोग्राफीक्स,ईमेजेस) इत्यादींचा समावेश होत म्हणजेच लिखाण , आवाज , चलचित्र , चित्र इत्यादींच्या माध्यमातुन निर्माण केलेली सामग्री म्हणजेच कंटेट होय.

म्हणजेच ब्लाँग वेबसाईटवर आपण जे विविध आर्टिकल वाचतो ते कंटेट आहे.याचसोबत आपण युटयुबवर जे व्हिडिओ बघतो आँडियो साँग ऐकतो तो सुदधा एक कंटेट आहे.

एवढेच नाहीतर सोशल मिडियावर आपण जे इन्फोग्राफीक्स,पिक्चर,ईमेजेस बघतो तो सुदधा एक कंटेट आहे.

See also  सायकोलाॅजी म्हणजे काय?Psychology meaning in Marathi

कंटेट रायटिंग म्हणजे काय? Content Writing Meaning, What Is Content Writing In Marathi

कंटेट रायटिंग ही आपण लिखाण स्वरुपात (फाँरमँट) मध्ये करत असतो कारण तिथे आपल्याला महितीपूर्ण लेख लिहावे लागतात .

कंटेट रायटिंग ब्लाँग वेबसाईटससाठी माहीतीपुर्ण लेख लिहिणे जेणेकरून तो लेख वाचकांपर्यत इंटरनेटच्या माध्यमातुन पोहचेल आणि त्यांना हवी असलेली माहीती प्राप्त होईल.कंटेट म्हणजे काय- Content Meaning In Marathi

कंटेट रायटिंग ही आपण आपल्या स्वताच्या ब्लाँगसाठी करू शकतो.किंवा इतरांकडून चार्ज घेऊन त्यांना त्यांच्या ब्लाँग वेबसाईटसाठी कंटेट राईट करून देऊ शकतो.

ज्यात आपण विविध एजन्सी,न्युज चँनल,कंपनींसाठी पार्ट टाईम किंवा फुलटाईम कंटेट लिहिण्याचे काम करू शकतो.ज्याचे आपल्याला आपल्या रायटिंग चार्जनुसार पर वर्ड प्रमाणे पैसे दिले जात असतात.

कंटेट रायटर कोणाला म्हणतात?- Content Writer Meaning In Marathi

जो व्यक्ती कुठल्याही ब्लाँग वेबसाईट,कंपनी,एजंसी न्युज चँनल करीता कंटेट लिहिण्याचे काम करत असतो त्यालाच कंटेट रायटर असे म्हणतात.

 • कंटेट रायटर कोण बनू शकते?कंटेट रायटिंगसाठी आपल्याकडे कोणती स्कील हवी?
 • ज्यांच्या अंगी एक चांगले लेखन कौशल्य आहे.ज्यांना लिहिण्याची आवड आहे.आणि ज्याला किवर्ड रिसर्च आणि एससीओचे सुदधा चांगले नाँलेज आहे अशी कुठलीही व्यक्ती कंटेट रायटर बनू शकते.
 • याचसोबत आपल्याकडे कंटेट रायटिंग करण्यासाठी अँड्राईड मोबाईल,लँपटाँप,कंप्युटर आणि एक आपला पर्सनल ईमेल आयडी असणे देखील खुप गरजेचे आहे.

फ्रिलान्सिंग म्हणजे काय? Freelancing Meaning In Marathi

फ्रिलान्सिंग म्हणजे आपल्या अंगी असलेल्या स्कील एक्सपर्टीजचा वापर करून इतरांसाठी पार्ट टाईम किंवा फुलटाईम आँनलाईन तसेच आँफलाईन स्वतंत्र पदधतीने काम करणे होय.

आणि याबदले आपल्याला आपल्या वर्किंग चार्जनुसार क्लाईंटकडुन त्या कामाचे पैसे देखील मिळत असतात.

फ्रिलान्सर म्हणजे काय? Freelancer Meaning In Marathi

फ्रिलान्सर म्हणजे एक अशी स्वतंत्र व्यक्ती असते जी कुठल्याही कंपनीत नोकरी करत नसते.

 • ही एक अशी व्यक्ती असते जी आपल्या अंगी असलेल्या स्कील एक्सपर्टीजचा वापर करून इतरांसाठी पार्ट टाईम किंवा फुलटाईम आँनलाईन तसेच आँफलाईन पदधतीने काम करत असते.आणि त्याबदले त्याला त्या कामाचे पैसे दिले जात असतात.
 • फ्रिलान्सर हा आपल्या अंगी असलेल्या कोणत्याही एका स्कीलचा वापर करून इतरांसाठी काम करू शकतो.फक्त यात फ्रिलान्सरला आपला क्लाईंट स्वता शोधावा लागत असतो.

फ्रिलान्स रायटर म्हणजे काय?-Freelance Writer Meaning In Marathi

फ्रिलान्स कंटेट रायटर म्हणजे एक अशी स्वतंत्र व्यक्ती असते जी कुठल्याही कंपनीत नोकरी करत नसते.

 • ही एक अशी व्यक्ती असते जी आपल्या अंगी असलेल्या रायटिंगच्या स्कील एक्सपर्टीजचा वापर करून विविध ब्लाँग,वेबसाईट,एजंसी,कंपनी,न्युज चँनल इत्यादी करीता आपल्या सवडीनुसार पार्ट टाईम किंवा फुलटाईम आँनलाईन तसेच आँफलाईन पदधतीने कंटेट लिहिण्याचे काम करत असते.
 • आणि त्याबदले त्याला त्या कामाचे क्लाईंटकडुन पर वर्ड चार्ज प्रमाणे पैसे दिले जात असतात.

कंटेट रायटरची गरज कुठे आणि कोणाला असते?

 • विविध ब्लाँग,वेबसाईट,न्युज चँनल,एजंसी,कंपनी मध्ये डेली कंटेट पब्लिश केले जात असतात.पण वेळेच्या कमतरतेमुळे तसेच इतर महत्वाच्या कामामुळे त्यांना स्वता रोज कंटेट लिहायला वेळ मिळत नसतो.
 • अशा वेळी विविध ब्लाँग वेबसाईट चालवणारे ब्लाँगर,न्युज चँनलवाले,एजंसी,कंपन्या कंटेट लिहुन घेण्यासाठी कंटेट रायटरला आँनलाईन किंवा आँफलाईन पदधतीने पार्ट टाईम किंवा फुल टाईम साठी आपल्या गरजेनुसार हायर करत असतात.
See also  निवडणुक चिन्हाविषयी माहीती- Electoral Symbol Information In Marathi

कंटेट रायटिंगचे काम आपण कोणकोणत्या पदधतीने करू शकतो?तसेच कंटेट रायटिंगचे प्रकार कोणकोणते आहेत?

कंटेट रायटिंगचे काम आपण पुढील पदधतीने करू शकतो-

1)आँनलाईन कंटेट रायटिंग :

2) आँफलाईन कंटेट रायटिंग :

3) फुल टाईम कंटेट रायटिंग –पार्ट टाईम कंटेट रायटिंग :

4) फ्रिलान्स कंटेट रायटिंग,वर्क फ्राँम होम :

1)आँनलाईन कंटेट रायटिंग :

आँनलाईन कंटेट रायटिंग मध्ये आपणास अपवर्क,फायवर,फ्रिलान्सर डाँट काम इत्यादी फ्रिलान्स वेबसाईटवर जाऊन कंटेट रायटिंगच्या कामासाठी क्लाईंट शोधावे लागत असतात.

किंवा आपण विविध ब्लाँग वेबसाईट,न्युज चँनल, एजंसी,कंपनीला ईमेल करून कंटेट रायटिंगचे काम आहे का याबाबत विचारू शकतो.

किंवा आँनलाईन कंटेट रायटिंगचे काही जाँब निघाले आहेत का हे गुगल वर सर्च करून तिथे कंटेट रायटरच्या पोस्टसाठी आपण अँप्लाय करू शकतो.

2) आँफलाईन कंटेट रायटिंग :

आँफलाईन कंटेट रायटिंग करण्यासाठी आपणास अशा आँफलाईन काम देत असलेल्या एजंसी,कंपनी,न्युज चँनल यांच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे.ज्यांना विविध प्रोजेक्टसाठी कंटेट रायटरची आवश्यकता भासत असते.

3) पार्ट टाईम,फुल टाईम कंटेट रायटिंग :

आँनलाईन आणि आँफलाईन कंटेट रायटिंग या दोघांमध्ये आपण फुलटाईम आणि पार्टटाईम आपल्या सवडीनुसार कंटेट रायटिंगचे काम करू शकतो.

जे व्यक्ती एखादी नोकरी करत आहे ते एक्सट्रा इन्कमसाठी पार्ट टाईम कंटेट रायटिंग करू शकतात.

आणि ज्यांच्याकडे दुसरे कोणते काम नाहीये ते फुलटाईम कंटेट रायटिंगचे काम करू शकतात.

4) फ्रिलान्स कंटेट रायटिंग,वर्क फ्राम होम :
:
ज्यांना कुठल्याही कंपनीत,एजंसीमध्ये कंटेट रायटरचा जाँब करायचा नसेल असे व्यक्ती आँफलाईन तसेच आँनलाईन वर्क फ्राँम होम यापैकी कुठल्याही एका पदधतीने फ्रिलान्स कंटेट रायटिंग देखील करू शकतात.

कंटेट रायटिंगमध्ये वापरल्या जात असलेल्या काही अत्यंत महत्वाच्या संज्ञा –

पीपी डब्लयु :

पीपी डब्लयुचा अर्थ प्राईज पर वर्ड असा होत असतो.म्हणजे एका शब्दाचे आपण किती पैसे चार्ज करतो हे आपण क्लाईंटला सांगायचे असते.

मराठीमध्ये सध्या कंटेट रायटरकडुन ब्लाँग साठी कंटेट लिहायला 20 ते 25 पीपीडब्लयु इतका चार्ज घेतला जातो आहे.

वर्ड काऊंट :

एका आर्टिकलमध्ये जेवढे शब्द असतात त्याच्या एकुण वर्ड लेंथला वर्ड काऊंट असे म्हणतात.

एसईओ :

कंटेट रायटरने एससीओ आँप्टीमाईज कंटेट लिहिणे गरजेचे असते जेणे तो गुगलवर टाँपला रँक करेल.

यासाठी आर्टिकलमध्ये योग्य तिथे युझर ज्यावर सर्च करतात अशा टारगेट किवर्डचा वापर कंटेट रायटरने करायला हवा.

 क्लाईंट :

जो आपणास कंटेट रायटिंगचे वर्क देतो त्यालाच क्लाईंट असे म्हणतात.

कंटेट रायटर कसे बनावे?कंटेट रायटिंग कशी करावी?How To Become Content Writer In Marathi

थोडे दिवस रोज गुगलवरील कंटेट वाचणे आणि त्यांचे नीट परीक्षण करून त्यांची लिहिण्याची पदधत एकदा नीट व्यवस्थित समजुन घेणे.कंटेट रायटिंगचा आराखडा लक्षात घेणे,आवश्यकता भासल्यास युटयुबवरील कंटेट रायटिंग कशी करावी याबाबतचे गाईड करणारे व्हिडिओ आपण ऐकु शकतो.

मग गुगलवरील इतर कंटेट वाचुन झाल्यावर लिहिण्यासाठी आपला एक विषय निवडायचा त्या विषयावर याआधी लिहिलेले आर्टिकल एकदा वाचुन घ्यायचे.

See also  जागतिक दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस का साजरा केला जातो?हया दिवसाचे महत्त्व काय आहे? National Anti-Terrorism Day 2023

आणि मग इतर आर्टिकलपेक्षा अधिक परिपुर्ण माहीती असलेले आर्टिकल आपण लिहायचे ज्याने गुगलवर आपले आर्टिकल टाँपला रँक करेल.

एक उत्तम कंटेट लिहिण्यासाठी आपण काय करावे?

 • एक उत्तम कंटेट राईट करण्यासाठी आपण इतर अनुभवी कंटेट रायटरने लिहिलेले कंटेट वाचायला हवेत.त्यांची लिहिण्याची पदधत प्रस्तावना मुख्य मुददे मांडण्याची पदधत कशी आहे हे बघायला हवे.आणि आपण देखील त्या पदधतीने कंटेट लिहिण्याचा प्रयत्न करायला हवा.
 • याचसोबत आपण पुस्तकांचे देखील विपुल प्रमाणात वाचन करायला हवे याने आपले नाँलेज आणि शब्दसाठा या दोघांमध्ये वाढ होत असते.ज्याचा फायदा आपल्याला कंटेट लिहिताना होत असतो.
 • कंटेट लिहितांना विषयांतर होणार नाही याची आपण विशेष काळजी घ्यायला हवी.नेहमी मुददेसुद आणि विषयाला अनुसरूनच लेखन करायला हवे.
 • इतर अनुभवी रायटर्सना आपले लिहिलेले आर्टिकल वाचायला देणे आणि त्यांच्याकडून फिडबँक घेणे आणि त्यांनी सांगितल्या प्रमाणे आपल्या लेखनात सुधारणा करत राहणे.

कंटेट रायटिंग करून पैसे कसे कमवायचे?- How To Earn Money From Content Writing In Marathi

सध्याचा काळ हा आँनलाईन पैसे कमविण्याचा काळ आहे.ज्यात कंटेट रायटिंग ही एक नवीन आणि बेस्ट करिअर आँपरच्युनीटी आहे.

ज्यात फुलटाईम करिअर करून आपण चांगले पैसे कमवू शकतो.

वर दिल्या प्रमाणे आपण सर्वात आधी एक उत्तम कंटेट लिहायला शिकुन घ्यायला हवे.मग आपल्याला चांगल्या पदधतीने कंटेट रायटिंग करता येऊ लागल्यावर आपण आपला फस्ट क्लाईंट (कंटेट रायटिंगचा काम देणारा व्यक्ती)शोधायला हवा.

कंटेट रायटिंगचे पहिले काम मिळविण्यासाठी आपण फ्रिलान्सिंग वेबसाईटची मदत घेऊ शकतो.तिथे जाऊन आपले एक प्रोफाईल तयार करू शकतो.

तसेच अशा विविध ब्लाँग वेबसाईट,कंपनी,एजंसी,न्युज चँनल्सला ज्यांना कंटेट आवश्यकता असते त्यांना ईमेल करून कामासाठी विचारणा करू शकतो.

याशिवाय आपण फेसबुक,व्हाँटस अँप,टेलिग्राम यासारख्या सोशल मिडिया वर विविध ब्लाँगर कंटेट रायटर्सचे गृप जाँईन करू शकतो.

कारण अशा गृपवर नेहमी कंटेट रायटिंगचे काम हवे असलेले रायटर आणि कंटेट रायटिंगचे काम देत असलेले क्लाईंट एकमेकांशी कामासाठी संवाद साधत असतात.म्हणुन आपण असे गृप देखील जाँईन करणे आवश्यक आहे.

यात सुरूवातीला कामाचा अनुभव नसल्याने आपल्याकडे क्लाईटला दाखवायला आधीच्या वर्कचा डेमो नसल्याने आपणास कमी पैशात देखील काम करावे लागु शकते.पण जसजसे आपला अनुभव आणि लेखन कौशल्य वाढेल आपण तसतसे आपले रायटिंगचे एक उत्तम प्रोफाईल तयार करून रायटिंगचे चार्ज देखील वाढवू शकतो.

कंटेट रायटिंगचे काम करून आपल्याला किती पैसे कमविता येतात?

 • कंटेट रायटिंगचे काम करून आपण किती पैसे कमवू शकतो हे सर्व आपल्या स्कील एक्सपर्टीज वर डिपेंड असते.
 • कारण आपली रायटिंगचे स्कील एक्सपर्टीज जर हाय लेव्हलची असेल तर आपण क्लाईंटकडुन तशी हाय फी चार्ज करू शकतो.
 • आणि समजा आपले स्कील एक्सपर्टीज जर अद्याप हाय लेव्हलची नसेल आपण यात नवीनच असाल तर आपण क्लाईंटकडुन मिळेल ते चार्ज घेऊन सुरूवातीला अनुभव प्राप्त करण्यासाठी कमी पैसे घेऊन देखील काम करू शकतात.

कंटेट रायटिंग करताना आपण कोणती काळजी घेणे गरजेचे आहे?

आपण आपल्या क्लाईंटसाठी जो कंटेट लिहितो आहे तो एकदम युनिक आणि प्लँगँरिझम फ्री असायला हवा.तो कुठूनही काँपी केलेला नसावा.

 • आपण लिहिलेल्या आर्टिकलमधील माहीती चुकीची नसावी.कारण याने व्हिझिटर्सच्या आपल्या लेखनावर विश्वास राहत नाही.
 • क्लाईंटने सांगितलेल्या प्रमाणे किमान आर्टिकलची हजार वर्ड इतकी लेंथ आहे का नाही हे क्लाईंटला आर्टिकल देण्याआधी एकदा नीट बघुन घ्यायला हवे.
 • आर्टिकलमध्ये काही व्याकरणिक चुका आहेत का हे देखील एकदा बघून घ्यावे.

कंटेट रायटिंग जाँब -(Content Writing Jobs In Marathi)

कंटेट रायटिंगचा जाँब प्राप्त करण्यासाठी आपण पुढील प्लँटफाँर्मला व्हिझिट करू शकतो-

 • अपवर्क
 • फायवर
 • फ्रिलान्सर
 • नौकरी डाँट काँम
 • लिंक्ड इन
 • माँस्टर इंडिया
 • इंडिड डाँट काँम

कंटेट रायटिंग कोर्स -Content Writing Course In Marathi

आज आँनलाईन कंटेट रायटिंग शिकण्यासाठी कंटेट रायटिंगचे अनेक विविध प्रकारचे कोर्स देखील तयार करण्यात आले आहे आपण गुगल वर सर्च करून त्यातील एखादा तुम्हाला आवडेल आणि परवडेल असा कोर्स देखील करू शकतात.

कंटेट रायटिंग इंटर्नशिप – Content Writing Internship In Marathi

आज कंटेट रायटिंग शिकण्यासाठी देखील आपण वेगवेगळया कंपन्यांमध्ये इंटर्नशिप साठी अँप्लाय करू शकतो.

आज अशा अनेक कंपन्या आहेत ज्या कंटेट रायटिंग जाँबसाठी इंटर्नशिप आँफर करत आहे.

इंटर्नशिप म्हणजे काय असते हे जर आपणास जाणुन घ्यायचे असेल तर आपण आमचे इंटर्नशिपवर लिहिलेले आर्टिकल वाचु शकतात.

1 thought on “कंटेट रायटिंग म्हणजे काय ? करियर संधी – Content Writing Information In Marathi”

Comments are closed.