फ्रीलांसिंग ची संपूर्ण माहिती, फ्रीलांसिंग म्हणजे काय? – Freelancing meaning Marathi
नोकरी करावी का व्यवसाय करावा? करियर म्हणून काय पर्याय आपल्या समोर असतात?
महाराष्ट्रत आपण पाहिलं तर जास्त कल हा आपला नोकरी करण्यावर असतो. आता थोड कल बदलत असला तरी नोकरीच्या 9 ते 5 चौकटी बाहेर अजून बाहेर पडून काही वेगळं करण्याचं धाडस कुणी करत नाही.
पैसेच कमवायचे असतील तर भरपूर पर्याय आहेत. ऑनलाइन कमावता येतील असे असंख्य पर्याय आहेत. जसे, ब्लॉगिंग, युट्युब चॅनेल निर्माण करणे, डिजिटल मार्केटिंग, अफिलेट मार्केटिंग ,ट्रेंडिंग इत्यादी.यात एक अतिशय चांगला पर्याय आहे फ्रिलांसिंग- freelancing
फ्रिलांसिंग म्हणजे काय? What is Freelancing in Marathi- Freelancing meaning Marathi
फ्रिलांसिंग करणरा फ्रिलांसर हा आर्थिक उत्पन्ना करता , पैसे कामावण्या करता , स्वतची व आपल्या कुटुंबाच निर्वाहन व उपजीविका भागवण्याकरता एक स्वतंत्र व्यक्ती म्ह्णून काम करतो. हा स्वयंरोजगारचा असतो . आपलं करियर म्ह्णून एकाद्या कंपनीत किंवा संस्थेत नोकरी न करता फ्रिलांसर कोणत्याही संस्थेशी बांधील किंवा करारबद्ध नसतो व आपल्या सोयुनूसार ,मर्जी नुसार काम घेऊ शकतो व पूर्ण करू शकतो.
अर्थात मर्जी नुसार म्हणजे काम घेतल्यानंतर मात्र ठराविक काल मर्यादेत मात्र ती काम पूर्ण करून द्यावी लागतात.
फ्रिलांसिंग चे काही प्रसिद्ध प्लॅटफॉर्म , कंपनी असून तिथं नोंद केली की ते कंपनी एक मध्यस्थ म्हणून काम करतात. ह्या कंपनी चं काम असते ते काम देणारा म्हणजे ज्यांना काही काम करून घ्यायची आहेत ते व फ्रिलांसार जे ते काम करून देणार आहेत ते ह्यांच्यात एक दुवा साधून देत. एक अस व्यासपीठ तयार करून देते जिथं काम देणारा त्यांना कोणती काम करून हवीत त्याची यादी त्या वेबसाईट वर जाहीर करतो तर फ्रिलांसार सुद्दा त्या वेबसाईट वर कोणती काम ते उत्तम रीत्या पूर्ण करून देऊ शकतात त्याची माहिती देत असतो
हे जे प्लॅटफॉर्म मध्यस्थ म्हणून काम करतात ते मात्र फ्रिलांसस ला मिळणाऱ्या पैसे तून काही पैसे त्यांचं कमिशन म्हणून स्वतः ठेवून घेतात.
कंपनीकडून फ्रिलांसर ना कमी किंवा मोठ्या कालावधी करता काम दिली जातात परुंतु ह्यात जे कायमस्वरूपी नोकरदार असतात त्यांच्या पेक्ष्या पगार व बाकी सुविधा कमी असतात.
फ्रिलांसिंग कसे काम करते?
- फ्रिलांसार त्यांना जे काम मिळाला ते पूर्ण करून दिल की त्या मोबदल्यात त्यांना पैसे मिळतात. त्यांनी काम पूर्ण करून दिल व काम देणारा समाधानी असला की त्यांचा संबंध संपला. म्हणजे हा काम देणं व काम करून देणे असा करार हा फक्त त्या एका कामा पुरता मर्यादित असतो.
- ह्यात समजा काम देणाऱ्याला काम आवडलं तर तो फ्रीलांसर ला काही तासाच, काही दिवसाच किंवा काही आठवड्याच सुद्दा काम देत असतो अर्थात काम देणारा व काम करून देणारा दोन्ही ना शर्ती व अटी मंजूर असतील तरच.
- आपल्याला आता थोड कल्पना आली असेल की फ्रिलांसिंग काय असते? -हे एक अगदी साध ,सोप पैसे कमवायचा मार्ग आहे , फ्रिलांसार त्याला कुणी व्यक्ती किंवा संस्थे ने दिलेले काम पार पाडतो दोन्ही मिळून कामाचा मोबदला व वेळ ठरवतात आणि त्या अटी नुसार काम पुर्ण केल्या च्या मोबदल्यात फ्रिलांसर ला पैसे मिळतात.
लोक फ्रिलांसिंग काम का करतात किंवा निवडतात?
- आपण स्वतः च आपले मालक असतो, कुणाचं बंधन किंवा कोणताही करार नसतो.
- असंख्य प्रकारची काम उपलब्ध असतात , एकाद् कौशल्य नसेल तर दुसरी काम , असे एक न अनेक काम उपलब्ध.
- आपल्यात जितकी कौशल्य येत असतील त्यातली सर्व कौशल्य आधारित काम मिळू शकतात, आणि काही दिवसात त्यात निपुणता मिळवली की आपण त्या कौशल्यावर आधारित काम मिळवून सतत एक उत्पन्ना स्रोत -इन्कम सोर्स तयार करू शकतात.
- फिलनसिंग काम करणारी सहसा काही वर्षे काम केलीत की स्वतःच एकादी फ्रिलांसिंग सेवा देणारी कंपनी सुद्धा स्थापन करून आपलं उत्पन्न वाढवू शकतात.
फ्रिलांसिंग चे फायदे – Freelancing meaning Marathi and its advantages
- जीवनात संतुलन- अगदी तात्काळ आणि काही गुंतवूनुक न करता काम करण्यास सुरुवात
- कामाचा वेळ- आपल्याला हवे तेव्हा,आपल्या सोयीनुसार, आपण कामाचे तास ,वेळ निवडू शकतो.
- जिथं हवं तिथून काम-काम करण्यासाठी ऑफिस किंवा ठराविक जागेच बंधन नाही, आपण घरून, किंवा कुठे कुठे प्रवास करत असाल तिथून काम करू शकता
- करार च बंधन नाही-सहसा काम देणारे त्यांना कधी व कसे काम हवे हे ठरवत असले तरी आपण कामाची फि ,मोबदला किती घ्यावं हे आपण ठरवू शकता. कधी आपण काम करू पूर्ण करू शकता ह्या बाबी आपण ठरवू शकता.
- कामाचा मोबदला पूर्ण आपण ठरवू शकता.-आपण एकादी नोकरी करत असाल तर आपला महिन्याचा पगार ठरलेला असतो त्याच पगारात आपल्याला भागावव लागत , त्यात आपल्या गरजा पूर्ण होवो न होवो . परंतु फ्रिलांसिंग मध्ये मात्र आपण एकाद्या कामाचा किती मोबदला घेणार हे आपण ठरवता. कदाचित नोकरी करत असता तर तेच काम कमी किमतीत करावं लागलं असते
- फ्रिलांसिंग सुरवात म्ह्णून काम करण्याकरता आपल्याला कसल्या ही आर्थिक गुंतवणूकीची गरज नाही.सहसा आपल्या कडे कॉम्प्युटर आणि काही काम करण्याकरता आवश्यक असलेली सॉफ्टवेअर असले की पुरेसे असते
- कुणा सोबत काम करायचं आपण ठरवता-सुरवातीला गरज असल्याने हवं ते काम स्वीकारू शकता, परुंतु नंतर वर्ष दोन वर्षानंतर आपल्याला अनुभव येतो व त्यावरून कुठल काम स्वीकारावी कुठल नाही ते आपण ठरवू शकता. एकदा काम देणारा मनस्ताप देत असेल तर त्याला आपण टाळू शकता
- स्पर्धत्माक वातवरण-आज फ्रिलांसिंग उद्योगात खूप स्पर्धा असली तरी कौशल्य पूर्ण, कामात निपुण,, दर्जेदार व विश्वासू काम करणाऱ्या करता फ्रिलांसिंग ही उत्तम संधी आहे
फ्रिलांसिंग मध्ये काही तोटे आहेत का?
- होय, सर्व क्षेत्रात असलेले काही तोटे किंवा धोके ह्यात ही आहेतच.
- आपण जरी कामाच्या अटी व मोबदला वेळ ठरवत असलो तरी काम देणाऱयांच्या काही वेळा , टाइम लिमिट आपल्याला फ्रिलांसर ला पाळाव्या लागतच
- त्यामुळे आपल्याला काम देणारा विदेशात ली व्यक्ती असेल तर त्याच्या वेळेनुसार तुमाला काम करणे भाग आहे.
- काम मिळण्यातील अनियमितता
- कायमस्वरूपी नोकरीत काम जास्त असो,कमी असो पगार मात्र ठरलेला असतो तेच मात्र फ्रिलांसिंग मध्ये मात्र एक काम पूर्ण झाला की दुसर काम शोधावं लागते॰
- सुरवातीस सर्व क्षेत्रात असते तशी धडपड इथं ही करावी लागतेच ,बऱयाच लोकांना काम मिळावं म्हणून संपर्क करावा लागतो ,मग एकाद काम मिळते व सुरवात होते.
- एकाच वेळी खूप सारी काम आणि खूप वेगवेगळ्या काम देणाऱ्या ना मॅनेज करण कठीण जाऊ शकत त्याकरता कामाच व्यस्थापण उत्तम रित्या करण आवश्यक
- शेवटचं म्हणजे पक्क्या सरकारी , खाजगी नोकरीत असतात तसे आरोग्य विमा,किंवा पीपीएफ फंड सारख्या सुविधा नसतात.
आता फ्रिलांसार म्हणून मी काम कसे सुरू करू शकतो -Freelancer कसे बनावे?
- फ्रिलांसिंग म्ह्णून काम करणे सर्वात सोपे आणि काही गुंतवूनुक न सुरू करता येण्या सारख आहे
- सर्वात आधी खाली काही नावाजलेल्या व प्रसिद्ध freelancing वेबसाईटची नांव दिली आहेत त्या साइट्स वर जाऊन आपण आपलं नाव नोंदवायच आहे
- आपण उपवर्क किंवा फिवर ने सुरुवात करू शकता
त्यानंतर काही बाबी
- आपण कुठली सेवा देणार आहात ,काय काम करणार आहात? डिझाईन, लेखन इत्यादी ,खाली काही यादी दिलेले आहे त्यातून आपण कुठल काम करू शकता ते पाहता येईल
- आपण कुठल्या देशाच्या क्लायंट्स करता करयाला प्राधान्य द्याल, अमेरिका, युरोप तसेच भारत, ते ठरवा.
- आपल्याला किती पैसे हवेत, एका काम करता आपण कसे चार्जेस असतील ते ठरावा , बाकी फ्रिलांसिंग चया प्रोफाइल चा अभ्यास करून बाकी लोक कोणत्या कामाकरता किती पैसे घेतात ते पाहून आपल्याला थोडी कल्पना येईल.
- त्या साइट्स आपण कोणते काम करता ,आपल्यात काय कौशल्य आहे, त्या एक स्वतःकरता चांगल्या प्रकारे प्रोफाईल तयार केलं पाहिजे व ते विविध वेबसाईट्स वर टाकून आपलं स्वतःच कौशल्य लोका पर्यंत पोहचवल पाहिजे जेणेककरून आपल्याला काम मिळतील.त्या करता आपण एक स्वतःची वेबसाईट तयार करू शकता किंवा पिंटरेस्ट , लिंकडेन व कोरा सारख्या साइट्स चि मदत घेऊ शकता.
फ्रिलांसिंग म्हणून आपण खालील काही काम निवडू शकता
- लिखाण, संकलन
- आभासी मदतनीस
- सोशल मीडिया मॅनेजर
- वेबसाईट निर्माण करणे
- शिक्षक, शिकवण्या
- मार्केटिंग
- डिजाईनिंग- इन्स्टग्राम पोस्ट, इन्फोरग्राफ ,बर्थडे कार्ड्स, प्लॅनर्स इत्यादी
- अनुवादक- आपल्या जर इंग्रजी व बाकी कोणत्या ही भारतीय व विदेशी भाषा येत असतील तर आपण अनुवादक म्हणहून ही चांगलं काम करू शकता.
अश्या प्रकारे फ्रिलनसिंग हा मुख्यतः आपल्या अंगी असणाऱ्या कौशल्या वर आधारित असल्याने आपण एक उत्तम करियर निर्माण करू शकता ज्यात चांगला पैसे मिळतात व जीवनात पैसे कुटुंब चा एक उत्तम संतुलन साधता येते.
आपल्याला फ्रिलांसिंग मध्ये काही अडचण असल्यास मला नक्की खाली कॉमेंट करून विचारा , मी नक्की उत्तर देईन .
खाली काही नामांकित फ्रिलांसिंग कंपनी ची नावे -List of Freelancing Sites, पण आपण नवखे असाल तर upwork पासून सुरू करावे
- Behance
- DesignHill
- Dribbble
- Envato Studio
- Fiverr
- Flexjobs
- Freelancer
- MediaBistro
- People Per Hour
- ServiceScape
- SimplyHired
- TaskRabbit
- Toptal
- Upwork
- WorkNHire
- Writer Access
3 thoughts on “फ्रीलांसिंग ची संपूर्ण माहिती, पैसे कसे कमवावे ? – Freelancing meaning Marathi”
Comments are closed.