इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स म्हणजे काय? | International big cat alliance information in Marathi

International big cat alliance information in Marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडुन मागे तीन ते चार वर्षांपूर्वी मोठ्या मांजर प्रवर्गातील प्राण्यांच्या होत असलेल्या शिकारीला वन्यजीव व्यापारास आळा घालण्यासाठी रोखण्यासाठी त्यांच्या संरक्षणासाठी सुरक्षेसाठी संवर्धनासाठी जागतिक पातळीवर सर्व नेत्यांनी एकत्र यावे असे आवाहन देखील केले होते.

पण आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ह्या प्रोजेक्टला लाॅच देखील करत आहेत.ज्याचे नाव इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आहे.

याचा मराठीत आंतरराष्ट्रीय बिग मांजर युती असा अर्थ होतो.असे सांगितले जात आहे की आज नरेंद्र मोदी इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सला लाॅच करणार आहेत.

ह्या प्रकल्पामध्ये मांजर प्रवर्गातील विविध प्राण्यांचा समावेश करण्यात आला आहे.

उदा, सिंह,वाघ,चित्ता, बिबट्या,जॅग्वार,प्युमा इत्यादी

International big cat alliance information in Marathi
International big cat alliance information in Marathi

सीआरपीएफ शौर्य दिवस म्हणजे काय? याचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे

काय आहे हा इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स प्रोजेक्ट?

इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स हा प्रोजेक्ट जगातील सात मोठ्या मांजरप्रवर्गातील प्राण्यांच्या संरक्षणासाठी सुरक्षेसाठी संवर्धनासाठी लवकरच लाॅच केला जात आहे.

आयबीसीए हा प्रोजेक्ट प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व देशांसाठी खुले असणार असल्याचे सांगितले जात आहे.

भारतातील वन्यजीवांच्या संख्येवर सकारात्मक परिणाम व्हावा प्राण्यांच्या शिकारीस केल्या जात असलेल्या व्यापारास आळा बसावा म्हणून शासनाकडून हे पाऊल उचलले जाते आहे.

भारत देशातील मांजरप्रवर्गातील प्राण्यांच्या संख्येत आतापर्यंत किती वाढ झाली आहे?

२०१४ पासुनची आकडेवारी लक्षात घेतली तर आपणास असे दिसून येते की मांजर प्रवर्गातील काही प्राण्यांच्या संख्येत बरयापैकी वाढ झाली आहे.

यात वाघांची संख्या ही २०१४ सालामध्ये दोन हजार दोनशे सव्वीस इतकी होती यावरून ही संख्या २०१८ सालामध्ये दोन हजार नऊशे सदसष्ठ इतकी झाली असल्याचे दिसून आले आहे.

याचसोबत सिंहाची संख्या देखील वाढली असल्याचे सांगितले जात आहे २८ टक्के इतकी वाढ झाली आहे.

२०२० मध्ये सिंहाची संख्या ही ६७० इतकी झाली असल्याचे सांगितले जात आहे.याआधी ही संख्या ५०० च्या आसपास इतकी होती.

बिबटयांची संख्या २०१४ मध्ये ८ हजारच्या आसपास होती.२०१८ मध्ये हीच बिबटयांची संख्या ही १३ हजाराच्या आसपास झाली असल्याचे सांगितले जात आहे.

भारत आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स का सुरू करत आहे?

आपला भारत देश हा जगात असा एकमेव देश आहे जिथे बिबट्या सिंह वाघ असे मांजरवर्गातील प्राणी आढळुन येतात.

इतर देशात पाहायला गेले तर हे प्राणी आढळुन देखील येत नाही.अणि दिसले तरी फार मोजकेच प्राणी आढळुन येत असल्याने यासाठी भारताने ह्या प्रकल्पात मांजरवर्गातील मोठे प्राणी यांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यायचे ठरवले होते.

अणि मोठ्या मांजरवर्गातील प्राण्यांना एकत्र आणण्यासाठी भारताने जग्वार प्युमा हे प्राणी देखील भारतात अधिक आणले पाहिजे असे भारताने ठरवले.